Wednesday, November 30, 2016

अनाधिकृत धार्मिक स्थळाबाबत आढावा बैठक संपन्न



     सोलापूर दि. 30: अनाधिकृत धार्मिक स्थळाबाबत उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार व शासनाच्या सूचनेनुसार आवश्यक कार्यवाही करण्याबाबतची आढावा बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी रणजीत कुमार यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली.बैठकीस निवासी उपजिल्हाधिकारी अजित रेळेकर उपस्थित होते.
       जिल्हाधिकारी म्हणाले, अनाधिकृत धार्मिक स्थळे निष्काशित करण्याबाबत मा. न्यायालयाचे निर्देश आहेत. त्यानुसार जिल्ह्यात असणा-या अनाधिकृत धार्मिक स्थळाचे विहित मुदतीत निष्काशन करावे. जिल्ह्यात नगरपालिका क्षेत्रातील बार्शी- 121, सांगोला 91, करमाळा 61, कुर्डूवाडी 24, अक्कलकोट 70, दुधणी 4 आणि पंढरपूर 253 तर ग्रामीण भागात बार्शी तालुक्यात 1, माढा 1, मोहोळ 7, सांगोला 163 आणि माळशिरस तालुक्यातील 64 धार्मिक स्थळाबाबत तपासणी करुन नियमानुसार कारवाई करावी. याबाबत केysलेल्या कार्यवाहीचा अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयास सादर करावा अशा सूचनाही त्यांनी संबंधित अधिका-यांना दिल्या.बैठकीस नगरपालिकेचे मुख्यधिकारी व संबंधित तालुक्याचे तहसिलदार उपस्थित होते.
00000

पुण्याबरोबरच नागपूर व औरंगाबाद येथेही उद्योजकांनी गुंतवणूक करावी - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस








                 चाकण औद्योगिक परिसातील होरीबा इंडीया टेक्निकल सेंटरचे उद्घाटन
पुणे दि.30: गेल्या दहा वर्षात देशात होरीबा कंपनीने आपल्या उत्पादन व सेवा क्षेत्रात भरीव अशी कामगिरी केली आहे. पुणे परिसरात ॲटोमोबाईलच्या 80 टक्के सुट्या भागांची निर्मिती होते. होरीबा या कंपनीने चाकण या परिसरात प्रकल्प सुरू केल्यामुळे निश्चितच याचा फायदा होईल. महाराष्ट्र हे उद्योजकांसाठी नेहमीच पसंतीचे ठिकाण राहिले आहे, यापुढे होरीबाने नागपूर व औरंगाबाद सारख्या ठिकाणी गुंतवणूक करावी. शासनामार्फत सर्व सुविधा उपलब्ध करुन देण्यात येतील, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
            होरीबा इंडीया कंपनीची भारतातील दशकपूर्ती व चाकण औद्योगिक परिसरात नव्याने सुरु केलेल्या होरीबा इंडीया टेक्निकल सेंटरचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले, त्या निमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी जपानचे भारतातील राजदूत केंजी हिरामत्सू, खासदार शिवाजीराव आढळराव-पाटील, आमदार सुरेश गोरे, आमदार संजय भेगडे, होरीबा ग्रुपचे चेअरमन डॉ. आर्त होरीबा, होरीबा इंडीया कंपनीचे चेअरमन डॉ. जय हकू, राजू गौतम उपस्थित होते.
            मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले, ॲटोमोबाईलच्या उत्पादनात भारत जगात आग्रक्रमावर असून या क्षेत्रातील भारताची बाजारपेठही मोठी आहे. ही बाजारपेठ विस्तारत असून या क्षेत्रात आणखी गुंतवणुकीला वाव आहे. देशात महाराष्ट्र ॲटोमोबाईल उत्पादनात पहिल्या क्रमांकावर आहे. पुणे आणि परिसरात यातील 80 टक्के उत्पादने तयार होतात. जपानमधील उद्योजकांसाठी महाराष्ट्र कायमच पहिल्या पसंतीचे ठिकाण राहिले आहे. पुण्याबरोबरच देशाच्या मध्यवर्ती ठिकाण असणारे नागपूर व सर्व सुविधांनीयुक्त असणाऱ्या औरंगाबाद शहरातही होरीबा व अन्य उद्योजकांनी गुंतवणुकीसाठी प्राधान्य द्यावे. पुण्यातील ॲटोमोबाईल क्षेत्र आपल्या पंतप्रधानांचे मेक इन इंडीयाचे स्वप्न साकार करत आहे. या क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मिती होत असून मनुष्यबळ हीच आपल्या देशाची ताकत आहे. याच जोरावर येत्या काही वर्षात शंभर टक्के मेक इन इंडीयाकडे आपली वाटचाल सुरु असल्याचे त्यांनी सांगितले.
            औद्योगिक गुंतवणुकीसाठी आणि विस्तारासाठी महाराष्ट्र हे अतिशय चांगले ठिकाण असल्याचे सांगत श्री. फडणवीस म्हणाले, जपानसह इतर देशातील उद्योजकांनी महाराष्ट्रातील पोषक वातावरणाचा फायदा करुन घ्यावा. उद्योजकांना सर्व सुविधा पुरविण्यास महाराष्ट्र शासन कटीबध्द असल्याचे त्यांनी सांगितले.
            जपानचे राजदूत श्री. हिरामात्सू म्हणाले, भारत आणि जपान यांच्यातील मैत्रीचे संबंध अतिशय दृढ असून आर्थिक संबंधही विस्तारत आहेत. जगातील जपानच्या एकूण गुंतवणुकीच्या सर्वाधिक गुंतवणूक भारतात आहे. पुणे हे भारतातील ॲटोमोबाईल हब असून औद्योगिक गुंतवणुकीसाठी महाराष्ट्रातील वातावरण पोषक असल्याचे त्यांनी सांगितले.
            खासदार शिवाजीराव आढाळराव-पाटील म्हणाले, महाराष्ट्राची औद्योगिक क्षेत्रात चांगली प्रगती होत आहे. चाकण औद्योगिक परिसरातही उद्योजकांची गुंतवणुकीला पसंती आहे. या ठिकाणी सर्व पायाभूत सुविधा प्राधान्याने पुरविण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
            कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. होरीबा यांनी केले. तर शेवटी आभार राजीव गौतम यांनी मानले.
000000

माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचा उपक्रम कृषि विकास व शेतकऱ्यांची यशोगाथा मांडण्यासाठी 'महाराष्ट्र माझा शेतकरी राजा' लघुचित्रपट स्पर्धा 2016 जाहीर लघुपट सादर करण्यास 31डिसेंबर पर्यंत मुदत वाढ

माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचा उपक्रम
कृषि विकास व शेतकऱ्यांची यशोगाथा मांडण्यासाठी
महाराष्ट्र माझा शेतकरी राजालघुचित्रपट स्पर्धा 2016 जाहीर

लघुपट सादर करण्यास 31डिसेंबर पर्यंत मुदत वाढ

पुणे दि. ३० : माहिती व जनसंपर्क महासंचालनालयातर्फे  राज्यातील शेतकऱ्यांची यशोगाथाकृषि विकासजलसंधारण या विषयावर 'महाराष्ट्र माझा शेतकरी राजालघुचित्रपट स्पर्धा 2016 आयोजित करण्यात येत आहे. माहिती व जनसंपर्क विभागाचे सचिव ब्रिजेश सिंह यांनी या स्पर्धेची घोषणा केली  आहे. या स्पर्धेसाठी लघुपट सादर करण्यास दि.31डिसेंबर 2016 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.
प्रथम क्रमांक विजेत्या लघुचित्रपटास 51 हजार रुपयांचे तर द्वितीय आणि तृतीय क्रमांक विजेत्यांना अनुक्रमे 31 हजार आणि 21 हजार रुपयांचे पारितोषिक देण्यात येणार आहे.
लघुचित्रपट स्पर्धा सर्वांसाठी खुली आहे. स्पर्धेत सहभागी होणाऱ्या लघुचित्रपटांची मालकी ही माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाकडे राहील. लघुचित्रपट हा तीन ते पाच मिनिटे कालावधीचा असावा. चित्रीकरण HD गुणवत्तेचे असणे आवश्यक आहे. स्पर्धकांनी गेल्या दोन वर्षातील कृषि क्षेत्राचा विकासशेतकरी बांधवांची बदललेली परिस्थितीजलयुक्त शिवार योजनापीक कर्जाची सहज उपलब्धता,जलसंधारणामुळे शेतीचा विकासशासकीय योजनांच्या सहकार्याने शेतीत केलेले प्रयोग अशी यशोगाथा सांगणारे लघुचित्रपट तयार करावेत त्यामध्ये शेतकऱ्यांचे मनोगत घ्यावेयशोगाथा चित्रिकरण करीत असताना संबंधित शेतकऱ्याचे ना हरकत प्रमाणपत्र स्पर्धकांनी घेणे बंधनकारक राहील.
स्पर्धकांनी हे लघुचित्रपट दि. 31डिसेंबर 2016 पर्यंत dgiprnews01@gmail.comया ई-मेलवर पाठवावेत. लघुचित्रपटाचे चित्रिकरण हे सद्दस्थितीतील असावे. ते संकलीत करून यशोगाथा स्वरूपात स्पर्धकांनी सादर करणे आवश्यक आहे.  जुने चित्रिकरण असलेले लघुचित्रपट स्पर्धेसाठी पात्र ठरणार नाही. स्पर्धकांनी चित्रिकरण कुठे आणि कधी केले याबाबतचे प्रमाणपत्र देखील देणे आवश्यक आहे.
परिक्षकांच्या समितीने निवडलेल्या लघुचित्रपटास पारितोषिक देण्यात येईल. या स्पर्धेचे सर्व हक्क माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाकडे राखून ठेवण्यात आले आहेत. स्पर्धक लघुचित्रपटाच्या सीडीज् आपल्या जिल्ह्यातील जिल्हा माहिती कार्यालयाकडे देऊ शकतात. या संदर्भात अधिक माहितीसाठी सागरकुमार कांबळेसहायक संचालक (माहिती) ८६०५३१२५५५ यांचेशी  संपर्क साधावा.

जिल्हा माहिती कार्यालयातील रद्दीसाठी दरपत्रकांसाठी आवाहन


            पुणे, दि. 30: पुणे जिल्हा माहिती कार्यालय, नवीन मध्यवर्ती इमारत, पुणे. 1 या कार्यालयामध्ये मराठी  व इंग्रजी  वर्तमानपत्रे, साप्ताहिके, मासिके यांची  रद्दी उपलब्ध आहे. कार्यालयीन वेळेमध्ये रद्दी पाहण्यासाठी उपलब्ध आहे. रद्दी इच्छुक खरेदीदारांनी आपली दरपत्रके शॉप ॲक्टसह दि.8 डिसेंबर 2016 अखेरपर्यंत कार्यालयीन वेळेत सुट्टीचे दिवस सोडून प्रत्यक्षपणे सादर करावी, असे आवाहन जिल्हा माहिती अधिकारी, पुणे. यांनी  केले आहे.
000000
     

जिल्ह्यातील ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहिर


पुणे 30, - राज्य निवडणूक आयोगाने पुणे जिल्ह्यातील जानेवारी ते  मे,2017 या कालावधीत मुदत संपणाऱ्या तसेच नव्याने अस्तित्वात आलेल्या सहाग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे.  या कार्यक्रमानुसार  निवडणूकीची नोटीस प्रसिध्द करण्यात येणार असून दि.6ते 13 डिसेंबर 2016दरम्यान सकाळी 11 ते दुपारी 3 वाजेपर्यत नामनिर्देशनपत्रे मागविणे व सादर करणे, 14 डिसेंबर,2016 रोजी सकाळी 11 वाजेपासून छाननी संपेपर्यत नामनिर्देशन पत्राची छाननी करण्यात येणार आहे.
नामनिर्देशन पत्रे मागे घेण्यासाठी  अंतिम दिनांक 16 डिसेंबर,2016 असून दुपारी 3 वाजेपर्यत नामनिर्देशन पत्र मागे घेता येईलदुपारी वाजेनंतर निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांना चिन्ह नेमून देण्यात येवून अंतिमरित्या निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांची यादी प्रसिध्द करण्यात येणार आहे.  आवश्यक असल्यास 28डिसेंबर,2016  रोजी सकाळी 7-30 वाजल्यापासून सायंकाळी 5-30 पर्यत मतदान घेण्यात येणार आहे. 28 डिसेंबर,2016 रोजी  जिल्हाधिकाऱ्यांच्या मान्यतेने मतमोजणीचा दिनांक (मतमोजणीचे ठिकाण व वेळ) तहसीलदार निश्चित करतील 29 डिसेंबर,2016 रोजी ग्रामपंचायतींच्या निवडणूकीचा निकाल प्रसिध्द करण्यात येणार आहे.
0000

कॅशलेस’ व्यवस्था निर्माण करण्यासाठी बँकांनी विशेष प्रयत्न करण्याची गरज ... जिल्हाधिकारी सौरभ राव

 ‘निश्चलनीकरणानंतरच्या परिस्थतीचा जिल्हाधिकारी यांनी घेतला आढावा

          पुणे, दि. 29 : सार्वजनिक आणि खाजगी क्षेत्रातील बँक अधिकाऱ्यांनी समाजातील सर्व घटकांना बँकेच्या व्यवहारात समाविष्ट करुन घ्यावे. नागरिकांनी कॅशलेस व्यवहारावर भर द्यावा यासाठी  सर्वांनी विशेष प्रयत्न करावेत असे प्रतिपादन जिल्हाधिकारी सौरभ राव यांनी आज येथे केले.
            निश्चलनीकरणानंतर करण्यात आलेल्या विविध उपाययोजनांचा आढावा घेण्यासाठी आणि निर्माण झालेल्या समस्यांवर उपाययोजनांसाठी जिल्हास्तरीय सल्लागार समितीची बैठक आज जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित करण्यात आली होतीबैठकीत जिल्हयातील विविध बँकांचे अधिकारी व विविध विभागाचे अधिकारी सहभागी झाले होते. त्यांना मार्गदर्शन करताना जिल्हाधिकारी सौरभ राव बोलत होते.
            निश्चलनीकरणानंतर कॅशलेस व्यवहार, -पेमेंट, -बीलींग, रुपे कार्डाचा मोठया प्रमाणावर वापर ही काळाची गरज असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी सांगितले. नवीन खाते उघडणे, कामगार संघटना व पणन महामंडळाच्या सहकार्याने शेतमजूर, कामगार यांना बँकींग व्यवहाराशी जोडणे, निश्चलनीकरणाचे फायदे यावर मार्गदर्शन शिबीर आयोजित करण्याच्या सूचना यावेळी जिल्हाधिकारी यांनी बँकेच्या अधिकाऱ्यांना केल्या. बँक व्यवहाराबद्दल नागरिकांना कोणतीही गैरसोय होणार नाही याची दक्षता घेण्याची सूचना करुन बँकाना यासंदर्भात काही अडचण असल्यास संबधितांनी जिल्हा प्रशासनाशी संपर्क साधावा, असे जिल्हाधिकारी यावेळी म्हणाले.
            जन धन खात्याद्वारे कुटूंब बँकेशी जोडले गेले आहे परंतु, वैयक्तिक खातेधारकांमध्ये बँकांनी  वाढ करावी, अशी सूचना रिझर्व्ह बँकेचे सहायक सरव्यवस्थापक बी.एच.मेश्राम यांनी केली. सर्व बँक खात्याचे आधार कार्डशी संलग्निकरण लवकरात लवकर पूर्ण करण्याची सूचना त्यांनी यावेळी बँक अधिकाऱ्यांना केली.  
            या बैठकीस जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दौलत देसाई, निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र मुठे, विविध बँकांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

000


Tuesday, November 29, 2016

शून्य ते पाच वयोगटातील दिव्यांगासाठी लवकर निदान त्वरीत उपचार उपक्रम - अपंग कल्याण आयुक्त नितीन पाटील


सोलापूर दि. 29 :    शून्य ते पाच वयोगटातील दिव्यांग मुलाना त्वरीत उपचार मिळाळेत, त्यांच्यातील दिव्यांगाचे लवकर निदान व्हावे यासाठी अपंग कल्याण आयुक्तालयामार्फत लवकर निदान त्वरीत उपचार हा उपक्रम राबविण्यात येणार येत असल्याची माहिती अपंग कल्याण आयुक्त नितीन पाटील यांनी आज दिली. 
            अपंग कल्याण आयुक्तलयामार्फत्‍ राबविण्यात येणार या उपक्रमाची सुरुवात सोलापूर जिल्ह्यातून करण्यात येत असून या उपक्रमास व्यापक प्रमाणात प्रसिद्धी मिळावी अशी अपेक्षा श्री. पाटील यांनी व्यक्त केली.  या उपक्रमाबाबत माहिती देतांना श्री. पाटील म्हणाले,दिव्यांग असलेल्या मुलास त्वरीत उपचार मिळणे गरजचे आहे. त्याला त्वरीत व वेळेत उपचार  मिळाल्यास तो बरा होऊ शकतो.  त्वरीत उपचाराबाबरोबरच आपले मुल दिव्यांग आहे हा  त्याच्या आई-वडिलामध्ये असणारा न्यूनगंड कमी करणेही महत्वाचे आहे. तसेच दिव्यांगासाठी राबविण्यात येणाऱ्या उपक्रमात लोकांचा सहभाग वाढणे महत्वाचे आहे.
            दिव्यांगासाठी राबविण्यात येणाऱ्या या उपक्रमास येणाऱ्या खर्चाचा प्रस्ताव शासनास लवकरात लवकर पाठविण्यात येणार आहे.  शासनाबरोबरच उद्योजकांनी त्यांच्या सीएसआर फंडामधूनही या उपक्रमास हातभार लावावा अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. 

000000

पालखीमार्ग संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न



सोलापूर दि. 29 :  राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणामार्फत पंढरपूर आणि परिसरात विकसित करण्यात येणाऱ्या पालखी मार्गाच्या कामासंदर्भात जिल्हाधिकारी रणजीत कुमार यांच्या अध्यक्षतेखाली आज जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक संपन्न झाली. बैठकीस उपजिल्हाधिकारी संजय तेली, पंढरपूरचे उपविभागीय अधिकारी डॉ. विजय देशमुख यांच्यासह संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते. 
            राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणामार्फत पालखी मार्ग विकसित करण्यात येत असून पंढरपूर, नातेपुते, माळशिरस आणि वेळापूर ठिकाणी बायपास करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी रणजीत कुमार यांनी बैठकीत दिल्या. पालखीच्यावेळी  पंढरपूर येथील कॉलेज चौक, सरगम चौक आणि तीन रस्ता या ठिकाणी  ठिकाणी वाहतुकीची कोंडी मोठ्या प्रमाणात होत असते. यातून मार्ग काढण्यासाठी या ठिकाणी आवश्यक ती उपाय योजना करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या. 
            पंढरपूर येथील 65 एकरात ज्या प्रमाणे पिण्याच्या पाणी व्यवस्था करण्यात  आली आहे त्याच प्रमाणे पालखी मार्गावरील मुक्कामाच्या ठिकाणी व्यवस्था करण्यासाठी कायमस्वरुपी पाण्याची टाकी उभारण्याबाबतही बैठकीत चर्चा करण्यात येऊन त्यानुसार प्रस्ताव तयार करण्याबाबतही त्यांनी सूचना दिल्या. 
000000


ध्वनी प्रदुषणाच्या तक्रारीकरीता व्हॉटस अपवर यंत्रणा कार्यान्वीत


सोलापूर दि.29: - सोलापूर ग्रामीण पोलीस दलाचे कार्यक्षेत्रात ध्वनी प्रदुषण ( नियमन व नियंत्रण) नियम 2000 व महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 मधील तरतुदींची अंमलबजावणी करणेकरीता ध्वनी प्रदुषणाच्या तक्रारी देणेकरीता पोलीस नियंत्रण कक्ष, सोलापूर ग्रामीण येथे 7264885901 / 7264885902/7264885903 हे व्हॉटस अप क्रमांक कार्यान्वीत केले आहेत.
           तरी नागरिकांनी ध्वनी प्रदुषणाच्या तक्रारी दाखल करणेसाठी या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन पोलीस अधिक्षक,सोलापूर ग्रामीणच्या वतीने करण्यात आले आहे.
                                                   0 0 0 0

डिजीटल कॅशलेस व्यवहारास प्राधान्य द्यावे - जिल्हाधिकारी रणजीत कुमार


सोलापूर दि. 29 : सर्व प्रकाराचे आर्थिक व्यवहार करण्यासाठी जिल्ह्यातील जनतेने डिजीटल कॅशलेस व्यवहारास प्राधान्य द्यावे असे आवाहन जिल्हाधिकारी रणजीत कुमार यांनी केले. 
            जनतेने डिजीटल कॅशलेस पेमेंट संदर्भात नीति आयोगामार्फत व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे मार्गदर्शन करण्यात आले. या कॉन्फरन्ससाठी जिल्हाधिकारी रणजीत कुमार यांच्यासह, मुख्य कार्यकारी अधिकारी अरुण डोंगरे, अतिरीक्त जिल्हाधिकारी प्रविण देवरे, निवासी उपजिल्हाधिकारी अजित रेळेकर उपस्थित होते. संपूर्ण देशात यापुढे कॅशलेस व्यवहारास प्राधान्य देण्यात आले असल्याचे नीति आयोगामार्फत सांगण्यात आले. 
            जिल्हाधिकारी म्हणाले, जिल्ह्यातील महा ई सेवा केंद्र, ग्रामपंचायती, शासकीय कार्यालयांनी डिजीटल कॅशलेस पेमेंट करावे. तसेच छोटे-मोठे व्यापारी यांनी पॉस मशीन कार्यान्वित करुन कॅशलेस व्यवहार करावेत. पॉस (POS) मशीनची मागणी  बँकेकडे नोंदवावी. तसेच  जनतेने  आर्थिक व्यवहारासाठी डेबीट कार्ड, क्रेडीट कार्ड, प्रिपेड कार्ड, मोबाईल बँकिंग, आधार कार्ड पेमेंट सिस्टिम, युपीआय, वॅलेट सिस्टिमचा वापर करावा. 
            जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात कॅशलेस व्यवहार होण्यासाठी लवकरच बँका तसेच ट्रेडर्स यांची बैठक घेण्यात येणार असल्याचेही जिल्हाधिकारी रणजित कुमार यांनी यावेळी सांगितले.
0000000

‘कॅशलेस’ व्यवस्था निर्माण करण्यासाठी बँकांनी विशेष प्रयत्न करण्याची गरज... जिल्हाधिकारी सौरभ राव





निश्चलनीकरणानंतरच्या परिस्थतीचा जिल्हाधिकारी यांनी घेतला आढावा
           पुणे, दि. 29 : सार्वजनिक आणि खाजगी क्षेत्रातील बँक अधिकाऱ्यांनी समाजातील सर्व घटकांना बँकेच्या व्यवहारात समाविष्ट करुन घ्यावे. नागरिकांनी कॅशलेस व्यवहारावर भर द्यावा यासाठी  सर्वांनी विशेष प्रयत्न करावेत असे प्रतिपादन जिल्हाधिकारी सौरभ राव यांनी आज येथे केले.
            निश्चलनीकरणानंतर करण्यात आलेल्या विविध उपाययोजनांचा आढावा घेण्यासाठी आणि निर्माण झालेल्या समस्यांवर उपाययोजनांसाठी जिल्हास्तरीय सल्लागार समितीची बैठक आज जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित करण्यात आली होतीबैठकीत जिल्हयातील विविध बँकांचे अधिकारी व विविध विभागाचे अधिकारी सहभागी झाले होते. त्यांना मार्गदर्शन करताना जिल्हाधिकारी सौरभ राव बोलत होते.
            निश्चलनीकरणानंतर कॅशलेस व्यवहार, -पेमेंट, -बीलींग, रुपे कार्डाचा मोठया प्रमाणावर वापर ही काळाची गरज असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी सांगितले. नवीन खाते उघडणे, कामगार संघटना व पणन महामंडळाच्या सहकार्याने शेतमजूर, कामगार यांना बँकींग व्यवहाराशी जोडणे, निश्चलनीकरणाचे फायदे यावर मार्गदर्शन शिबीर आयोजित करण्याच्या सूचना यावेळी जिल्हाधिकारी यांनी बँकेच्या अधिकाऱ्यांना केल्या. बँक व्यवहाराबद्दल नागरिकांना कोणतीही गैरसोय होणार नाही याची दक्षता घेण्याची सूचना करुन बँकाना यासंदर्भात काही अडचण असल्यास संबधितांनी जिल्हा प्रशासनाशी संपर्क साधावा, असे जिल्हाधिकारी यावेळी म्हणाले.
            जन धन खात्याद्वारे कुटूंब बँकेशी जोडले गेले आहे परंतु, वैयक्तिक खातेधारकांमध्ये बँकांनी  वाढ करावी, अशी सूचना रिझर्व्ह बँकेचे सहायक सरव्यवस्थापक बी.एच.मेश्राम यांनी केली. सर्व बँक खात्याचे आधार कार्डशी संलग्निकरण लवकरात लवकर पूर्ण करण्याची सूचना त्यांनी यावेळी बँक अधिकाऱ्यांना केली.  
            या बैठकीस जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दौलत देसाई, निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र मुठे, विविध बँकांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

000

Monday, November 28, 2016

कौशल्य विकासाची जोड दिल्यास लोकसंख्या देशावरील भार न राहता आधार होईल - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस






पुणे,दि28 (वि.मा.का): लोकसंख्या मानवसंसाधनात परावर्तीत झाल्यास राष्ट्राला मोठा आधार होईल. देशातील युवा शक्तीला कौशल्य विकासाची जोड दिल्यास लोकसंख्या ही देशावरील भार न राहता देशाचा भक्कम आधार होईल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज केले.
कौशल्य विकास योजनेंतर्गत चिंचवड येथील युवा शक्ती फाउंडेशनच्या कार्यालयाचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झालेत्यावेळी ते बोलत होतेयावेळी पालकमंत्री गिरीश बापट, खासदार संजय काकडेआमदार सर्वश्री लक्ष्मणराव जगतापसंजय भेगडेयुवा शक्ती फाउंडेशनचे अध्यक्ष एकनाथ पवार उपस्थित होते.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, प्रत्येक क्षेत्रात कौशल्य हे आवश्यक असते. समाजात कौशल्याचा आभाव असल्याने बेरोजगारांची संख्या वाढत आहे. या बेरोजगार युवकांना कौशल्याची जोड दिल्यास त्यांच्या हाताला  निश्चित काम मिळेल. पुस्तकी ज्ञानाबरोबरच कौशल्य आवश्यक आहे, त्यामुळे प्रत्येकाने कौशल्य धारण करण्याची आवश्यकता आहे. कौशल्य विकासाच्या क्षेत्रात केंद्र सरकारने मोठे काम केले आहे, त्याचा दृष्य परिणाम आपल्याला दिसत आहे.
कोणत्याही क्षेत्रात कौशल्य असेल तर रोजगार निश्चितच उपलब्ध असल्याचे सांगत मुख्यमंत्री म्हणाले, युवा शक्ती फाउंडेशनने युवकांसाठी कौशल्यविकासाचे केलेले काम मोठे आहे. या संस्थेचे काम कौतुकास्पद असून युवा शक्ती फाउंडेशनने या क्षेत्रात आणखी काम करण्याची आवश्यकता असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी युवा शक्ती फाउंडेशनच्या वेबसाईटचे मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.
कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात एकनाथ पवार यांनी युवाशक्ती फाउंडेशनच्या विविध उपक्रमांचा आढावा घेतला. शेवटी आभार सतीश पवार यांनी मानले.
0000000

जिल्हा माहिती अधिकारी गोविंद अहंकारी यांना पदोन्नती निमित्त निरोप





पुणे, दि. 28 (वि.मा.का.) : माहिती व जनसंपर्क विभागातील सर्व घटकांनी आधुनिक माध्यम, तंत्रज्ञानाचा वापर करुन  तत्परतेने  काम केल्यास शासन विषयक माहिती जनतेपर्यंत पोहोचण्यास कमी वेळ लागेल, असे मत पुणे विभागाचे माहिती उपसंचालक मोहन राठोड यांनी व्यक्त केले.
            जिल्हा माहिती अधिकारी गोविंद अहंकारी यांची उपसंचालक (माहिती) (वृत्त) पदी पदोन्नतीने मुंबई येथे बदली झाल्याबद्दल त्यांचा सत्कार आणि निरोप समारंभ आयोजित करण्यात आला. त्याप्रसंगी श्री. राठोड बोलत होते. यावेळी सहायक संचालक वृषाली पाटील, माहिती सहायक सर्वश्री सचिन गाढवे, जयंत कर्पे, संग्राम इंगळे यांच्यासह विभागीय आणि जिल्हा माहिती कार्यालयातील कर्मचारी उपस्थित होते.
            स्पर्धेच्या युगात टिकण्यासाठी आपल्या विभागाशी संबंधित चौफेर ज्ञान आत्मसात करणे गरजेचे आहे, असे सांगून श्री. राठोड म्हणाले, शासनाची माहिती जनतेपर्यंत तात्काळ पोहोचविण्यासाठी आधुनिक माध्यम तंत्रे, सोशल मिडीया यांचा उपयोग करणे गरजेचे आहे. व्हॉटस्अॅपच्या युगात आपण आपल्या माहिती व जनसंपर्क विभागाची विश्वासार्हता राखून असल्यामुळे आपला विभाग वरिष्ठ पातळीवर महत्त्वपूर्ण ठरला आहे. पुणे विभागाला नाव लौकिक मिळवून देण्यासाठी सर्वांनी एकदिलाने काम करावे, असेही श्री. राठोड म्हणाले.
            सत्काराला उत्तर देताना श्री. अहंकारी म्हणाले की, पुणे जिल्हा माहिती अधिकारी म्हणून पाच महिने काम करण्याची संधी मिळाली. सर्वांनी आपापली भूमिका उत्कृष्ट बजावल्यास काम सुरळीत पार पडण्यास मदत होते. सर्वांना बरोबर घेवून काम करण्यास नेहमीच प्राधान्य दिले आहे. मुख्यालयातील वृत्त शाखेची जबाबदारी मिळाल्याने यापुढेही जिल्हा स्तरावर सर्वांशी संपर्क होत राहील, असेही ते म्हणाले.
            यावेळी सहायक संचालक वृषाली पाटील, माहिती सहायक सचिन गाढवे, जयंत कर्पे यांनी मनोगत व्यक्त केले. स्वागत आणि आभार संग्राम इंगळे यांनी मानले.

00000000

जिल्हा सोलापूर डाळींब निर्यातीचे केंद्र बनायला हवा पणनमंत्री सुभाष देशमुयांख चे प्रतिपादन : डाळींब उत्पादक शेतकऱ्यांची कार्यशाळा

    
महाराष्ट्र राज्य सोलापूर दि.28 :- सोलापूर जिल्हा डाळींब निर्यातीचे केंद्र बनायला हवा. त्यासाठी राज्य शासन सर्वतोपरी मदत करेल, अशी ग्वाही सहकार, पणनमंत्री तथा महाराष्ट्र राज्य कृषि पणन मंडळाचे अध्यक्ष सुभाष देशमुख यांनी आज येथे दिली.
कृषि पणन मंडळ, कृषि विभाग, अपेडा, नवी दिल्ली आणि राष्ट्रीय डाळींब संशोधन केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने डाळींब उत्पादक शेतकऱ्यांची कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी ते बोलत होते. कृषि उत्पन्न बाजार समितीच्या सहकार महर्षि शिवदारे सभागृहात ही कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. यावेळी व्यासपीठावर राष्ट्रीय डाळींब संशोधन केंद्राचे संचालक डॉ. आर.के. पाल, अपेडाचे सहाय्यक सरव्यवस्थापक डॉ. सी.पी.सिंग, डाळींब उत्पादक संघाचे अध्यक्ष श्रीकांत जाचक, महाअनारचे अध्यक्ष प्रभाकर चांदणे, गोविंद हांडे, अंकुश पडवळे आदी उपस्थित होते.
श्री. देशमुख म्हणाले, राज्यात सोलापूर जिल्ह्यात डाळींबाची लागवड सर्वाधिक होते. पण गुणवत्ता, निर्यात, मूल्यवर्धन आणि ब्रँडिंग करण्याची आवश्यकता आहे. निर्यातीसाठी उत्पादन पश्चात असणारी साखळी बळकट करण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी राज्य कृषि पणन मंडळाच्या वतीने नजिकच्या काळात प्रभावी भूमिका बजावली जाईल.
शेतकऱ्यांच्या मालाला चांगला भावमिळावा यासाठी राज्य शासनाने माल तारण योजना आणली आहे. या योजनेच्या माध्यमातून शेतकरी आपला शेतमाल बाजार समितीत ठेवून कर्ज घेऊ शकतो. योग्य भाव आल्यास विक्रीसाठी बाजारात आणू शकतो. यासाठी केवळ सहा टक्के व्याज आकारणी केली जाणार आहे, असे श्री. देशमुख यांनी सांगितले. डाळींबावर आधारित प्रक्रिया उद्योग सुरु करण्यात अद्याप  म्हणावे तितके यश आलेले नाही. पण राष्ट्रीय डाळींब संशोधन केंद्राने  याबाबत पुढाकार घ्यावा, असे आवाहनही श्री. देशमुख यांनी केले.
प्रास्ताविक विभागीय उपनिबंधक संतोष पाटील यांनी केले आहे. यावेळी श्री. चांदणे, श्री. जाचक यांचीही भाषणे झाली. पणन मंडळाचे उपसरव्यवस्थापक डॉ. भास्कर एन. पाटील यांनी कार्यशाळेचे संयोजन केले.
*****



Thursday, November 24, 2016

एटीएममध्ये तत्काळ सुधारणा करा केंद्रीय निरीक्षक विजयालक्ष्मी बिदरी यांच्या सूचना



                                                                                                
सोलापूर दि.24:- नव्या नोटांचे वितरण करता यावे यासाठी जिल्ह्यातील सर्व बँकांनी आपल्या एटीएम सेंटर मध्ये आवश्यक त्या सुधारणा (कॅलिब्रेशन) करुन घ्याव्यात, अशा सूचना केंद्र सरकारच्या निरीक्षक विजयालक्ष्मी बिदरी यांनी आज येथे दिल्या. 
500 आणि 1000 रुपयांच्या नोटा चलनातून बाद करण्याच्या निर्णयामुळे उद्भवलेली परिस्थिती आणि त्यावर उपाययोजना यांचा आढावा घेण्यासाठी श्रीमती बिदरी यांच्या अध्यक्षतेखाली आज जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक झाली. त्यावेळी श्रीमती बिदरी यांनी या सूचना दिल्या. 
या बैठकीस जिल्हाधिकारी रणजीतकुमार, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अरुण डोंगरे, जिल्हा पोलीस अधिक्षक वीरेश प्रभू, प्रभारी निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बसवराज बिराजदार, जिल्हा उपनिबंधक नारायण आघाव, मुद्रांक जिल्हाधिकारी एस.एन.दुतोंडे, उपजिल्हाधिकारी संजीव जाधव, सोलापूर महापालिकेचे लेखाधिकारी दत्तात्रय लोंढे, पोस्टाचे वरिष्ठ अधीक्षक बी.आर. नानजगी, अग्रणी बँकेचे प्रभारी व्यवस्थापक सुरेश श्रीराम आदी उपस्थित होते.
श्रीमती बिदरी यांनी सांगितले की, नव्या नोटा मिळाल्यावर त्या लवकरात लवकर वितरीत करता येण्यासाठी एटीएम मध्ये सुधारणा करण्याची (कॅलिब्रेशन) आवश्यकता आहे. यासाठी किमान पाच ते सात दिवस लागतात. काही बँकांनी अशी प्रक्रिया केली आहे. ज्या बँकांनी अद्याप केलेली नाही त्यांनी ही प्रक्रिया गतीने करावी. जुन्या नोटा जमा करण्यास येणाऱ्या ग्राहकांच्या हातावर मार्करच्या सहाय्याने खूण करा जेणेकरुन एकच व्यक्ती वारंवार पैसे जमा करण्यास येणार नाही.
 ज्येष्ठ नागरिक, महिला, दिव्यांग यांच्यासाठी पैसे जमा करण्याची स्वतंत्र व्यवस्था करा. त्यांना पाणी, बसण्यासाठी आसन व्यवस्था करा, अशा सूचना श्रीमती  बिदरी यांनी बँकेच्या अधिकाऱ्यांना सूचना दिल्या. 
श्रीमती बिदरी यांनी शेतीसाठी आवश्यक बियाणे, खते, कीटकनाशके, तणनाशके यांच्या खरेदीची माहिती घेतली. शेतकऱ्यांना आता औषधे आणि खते खरेदी करण्यासाठी पैसे लागतील. त्यामुळे जुन्या नोटांच्या आधारे खते, कीटकनाशके खरेदी करण्यास परवानगी मिळाल्यास शेतकऱ्यांना आधार मिळेल, असे श्रीमती बिदरी यांना सांगण्यात आले. यावर ही बाब केंद्र सरकारकडे सुचविण्यात येईल, असे बिदरी यांनी सांगितले. नोटांच्या बंदीनंतर शेतमालाचे भाव घसरले आहेत, अशी माहिती श्री. बिराजदार यांनी दिली. जिल्ह्यातून डाळींब, कांदा, द्राक्षे यांची उलाढाल मोठ्या प्रमाणावर चालते. या शेतकऱ्यांच्या निर्यातीला सवलत किंवा अनुदान मिळण्याची  विनंती उपजिल्हाधिकारी संजीव जाधव यांनी केली. 
गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात 4739 दस्तांची नोंद झाली होती. त्यामुळे शासनाला 11 कोटी रुपयांचा महसूल मिळाला होता. पण नोव्हेंबर महिन्यात आतापर्यंत 1435 दस्तांची नोंद झाली असून तीन कोटी सदतीस लाख रुपयांचा महसूल मिळाल्याची माहिती श्री. दुतोंडे यांनी दिली. 
महापालिकेला कर वसुलीत 32 टक्के वाढ झाली असून 22 कोटी रुपये जमा झाले आहेत. महापालिकेला जुन्या नोटांव्दारे  कर स्वीकारण्यास मुदतवाढ मिळावी, असे श्री. लोंढे यांनी सांगितले. 
पतसंस्था, नागरी सहकारी बँक आणि जिल्हा सहकारी बँकांच्या विविध शाखांत जमा झालेल्या रकमेची सविस्तर माहिती जिल्हा प्रशासनाकडे द्यावी, अशी सूचना जिल्हाधिकारी रणजीकुमार यांनी केली. यावर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे व्यवस्थापक किसन मोटे यांनी बॅकेकडे 200 कोटीहून जास्त रुपयांच्या आसपास रक्कम जमा झाली आहे. ही रक्कम कोषागार शाखा स्वीकारत नाही त्यामुळे शेतकऱ्यांना देण्यासाठी पुरेशी रक्कम उपलब्ध झालेली नाही. जिल्हा मध्यवर्ती बॅंकेला भरघोस रक्कम मिळावी, अशी विनंती  त्यांनी केली.
राज्य शासनाच्या कर्मचाऱ्यांना नोव्हेंबर महिन्याचे वेतनातील 50 टक्के रक्कम दहा हजार रुपयांच्या मर्यादेत रोखीने द्यावे अशी मागणी केली आहे. या मागणीबाबत राज्य (कर्मचारी संघटनेचे) शासनाला पत्र पाठवले जाणार आहे, असे जिल्हाधिकारी रणजीतकुमार यांनी सांगितले.
निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली यांनी जिल्ह्यातील परिस्थितीची माहिती दिली. त्यांनी सांगितले की, 8 नोव्हेंबर ते 22 नोव्हेंबर या कालावधीत जिल्ह्यातील 536 शाखांमधून सुमारे 3175 कोटी रुपयांची रक्कम जमा झाली आहे. त्यापैकी सर्वाधिक भारतीय स्टेट बँकेकडे जमा झाली आहे. प्रमुख बॅकाकडे जमा झालेली रक्कम पुढीलप्रमाणे भारतीय स्टेट बँक – 576.10 कोटी, बँक ऑफ इंडिया 507.64 कोटी, बँक ऑफ बडोदा – 478.24 कोटी, आयसीआयसीआय 328.64 कोटी, जिल्हा मध्यवर्ती बँक – 240 कोटी,  आतापर्यंत 91.66 कोटी रुपयांचे नवीन चलन देण्यात आले आहे. बँक ऑफ इंडियाने 12.29 कोटी, भारतीय स्टेट बँकेने 28.93 केाटी रुपयांच्या नव्या नोटा वितरीत केल्या असल्याची माहिती त्यांनी दिली.
00000