Wednesday, February 22, 2017

जिल्हा परिषद, पंचायत समित्यांसाठी 69.87 टक्के मतदान तालुक्यांच्या ठिकाणी आज मतमोजणी


पुणे, दि. 22 : जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी जिल्ह्यात सरासरी 69.87 टक्के मतदान झाले. सन 2012 च्या तुलनेत (65.60 टक्के) यंदा मतदानात सुमारे चार टक्क्यांची वाढ नोंदविण्यात आली आहे. निवडणुकीसाठी काल दि. 21 फेब्रुवारी रोजी झालेल्या जिल्ह्यातील मतदानाची अंतिम आकडेवारी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या ग्रामपंचायत निवडणूक शाखेने दिली आहे. जिल्ह्यात सर्वाधिक मतदानाची टक्केवारी शिरुर तालुक्याची 75.64 तर सर्वात कमी हवेली तालुक्यात 62.68 टक्के मतदान झाले.
            तालुकानिहाय मतदानाची आकडेवारी यामध्ये तालुक्याचे नाव, मतदान केलेल्या पुरुष व स्त्री मतदारांची संख्या, एकूण मतदान नोंदविलेल्या मतदारांची संख्या आणि कंसात टक्केवारी पुढीलप्रमाणे.
जुन्नर - पुरुष 95884, स्त्री 86034, एकूण 181918 (69.11 टक्के),
आंबेगाव - पुरुष 64283, स्त्री 57529, एकूण 121812 (70.23 टक्के),
शिरुर - पुरुष 97043, स्त्री 82752, एकूण 179795 (75.64 टक्के),
खेड - पुरुष 94284, स्त्री 78220, एकूण 172504 (70.47 टक्के),
मावळ - पुरुष 71148, स्त्री 59660, एकूण 130808 (74.16 टक्के),
मुळशी - पुरुष 46699, स्त्री 36768, एकूण 83467 (66.22 टक्के),
हवेली - पुरुष 164385, स्त्री 137518, एकूण 301903 (62.68 टक्के),
दौंड -  पुरुष 84123, स्त्री- 70025, एकूण 154148 (66.33 टक्के),
पुरंदर - पुरुष 61003, स्त्री 52744, एकूण 113747 (71.25 टक्के),
वेल्हे - पुरुष 19443, स्त्री 16330, एकूण 35773 (75.30 टक्के),
भोर - पुरुष 52482, स्त्री 46110, एकूण 98592 (72.95 टक्के),
बारामती - पुरुष 95877, स्त्री 81193, अन्य 1, एकूण 177071 (71.43 टक्के),
इंदापूर - पुरुष 106823, स्त्री 92591, एकूण - 199414 (74.80 टक्के)
याप्रमाणे जिल्ह्यात 10 लाख 53 हजार 477 पुरुष व 8 लाख 97 हजार 474 आणि अन्य 1 याप्रमाणे एकूण 19 लाख 50 हजार 952 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. त्याची टक्केवारी 69.87 इतकी आहे. जिल्ह्यात एकूण 14 लाख 70 हजार 153 पुरुष आणि 13 लाख 22 हजार 273 स्त्रिंया व अन्य 12 याप्रमाणे एकूण 27 लाख 92 हजार 438 पात्र मतदारांची संख्या नोंदविण्यात आलेली होती.
            मतमोजणीसाठी प्रशासन सज्ज झाले असून उद्या दिनांक 23 फेब्रुवारी 2017 रोजी संबंधित तालुक्याच्या ठिकाणी मतमोजणीस सकाळी 10 वाजता सुरुवात होईल.
00000

Monday, February 20, 2017

दौंडच्या उपविभागीय दंडाधिकाऱ्यांकडून 12 व्यक्तींविरोधात कलम 144 (3 ) नुसार प्रतिबंधात्मक आदेश जारी


पुणे,दि. 20-  पुणे जिल्हा परिषद आणि त्याअंतर्गत पार पडणाऱ्या पंचायत  समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुका सुव्यस्थीत  पार पाडण्याच्या  दृष्टिकोनातून  दौंडचे उपविभागीय दंडाधिकारी संजय असवले यांनी विविध गुन्हे नोंद असलेल्या व्यक्तींना 24 तारेखपर्यंत   फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 च्या कलम 144(3) नुसार दौंड तालुक्याच्या हद्दीत प्रवेश करण्यास मनाई केली आहे.
            या  प्रतिबंधात्मक आदेशान्वये अविनाश उर्फ  रांगड्या भानुदास दिवेकर, विकास बाळासो  दिवेकर, गोपीनाथ मच्छिंद्र दिवेकर,दिपक गोरख दिवेकर, गणेश केशव दिवेकर, दिपक रामचंद्र दिवेकर, अक्षय अर्जुन दिवेकर, मंगेश कांतीलाल दिवेकर, वैभव राजेंद्र दिवेकर, अभिजीत पाटीलबुवा दिवेकर, तुषार दिपक दिवेकर,मंगेश विनायक दिवेकर, सर्व राहणार वरवंड, ता. दौंड, यांच्यावर यवत पोलीस ठाण्यामध्ये भा.दं.वि. कलम 143,147,148,149,452,337,323,504  आणि 506 अन्वये गुन्हे दाखल असल्याने त्यांना 24 फेब्रुवारी  रात्री 12 वाजेपर्यंत दौंड तालुक्याच्या हद्दीत प्रवेशास वास्तव्यास मनाई केली आहे.
            तथापि, या व्यक्तींना मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी 21 फेब्रुवारी रोजी सकाळी 7.30  वाजल्यापासून  सायं 5.30 वाजेपर्यंत मतदानासाठी सवलत देण्यात  आली आहे. मात्र त्यांनी मतदानासाठी हद्दीत प्रवेश केल्याबद्दल यवत पोलीस ठाण्यास लेखी सूचना देणे बंधनकारक करण्यात आले आहे.
            या आदेशाचा अवमान करणारी व्यक्ती  भारतीय दंडविधान कलम 188 अन्वये कारवाईस  पात्र  राहील, असेही आदेशात नमूद करण्यात आले  आहे.
0000



Saturday, February 18, 2017

मतदानाची टक्केवारी वाढविण्यावर जिल्हा प्रशासनाचा भर - जिल्हाधिकारी सौरभ राव


पुणे, दि.18 : जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत मतदानाची टक्केवारी वाढविण्यावर जिल्हा प्रशासनाचा भर आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी सौरभ राव यांनी आज येथे दिली.
            जिल्हाधिकारी सौरभ राव यांनी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पत्रकार परिषद घेऊन ही माहिती दिली. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र मुठे, समन्वय अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी विक्रांत चव्हाण उपस्थित होते.
            जिल्हाधिकारी श्री. राव यांनी सांगितले की, भारतीय राज्यघटनेने प्रत्येक नागरिकाला मतदानाचा पवित्र हक्क दिला आहे. हा हक्क प्रत्येक नागरिकाने बजावयाला हवा,यासाठी प्रशासन मतदार जनजागृतीचे विविध कार्यक्रम राबवित आहे. मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी पोस्टर्स, बॅनर्स, रांगोळी स्पर्धा आदींसह महाविद्यालयांमध्ये जनजागृतीचे कार्यक्रम मोठ्या प्रमाणात राबविण्यात आले आहेत. मतदारांनी निर्भीड आणि नि:पक्षपातीपणे कोणत्याही दबावाला बळी पडता मतदान करावे यासाठी राज्य निवडणूक आयोगाच्या सूचनांनुसार विविध समित्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
            ते पुढे म्हणाले की, पुणे जिल्हा परिषदेच्या 13 तालुक्यातील 75 गटांसाठी 375 उमेदवार आणि पंचायत समितीच्या 150 गणांसाठी 641 उमेदवार येत्या 21 तारखेला आपले नशिब आजमावत आहेत. जिल्हा परिषदेसाठी 27 लाख 92 हजार 773 मतदार आहेत. मतदान केंद्रांची संख्या 3 हजार 364 असून 344 क्षेत्रीय अधिकाऱ्यांसह 21 हजार 616 कर्मचाऱ्यांची नेमणूक केली आहे. प्रत्येक मतदान केंद्र निहाय एका पोलीस कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आली असून राखीव 1500 पोलीसांची नेमणूकही करण्यात आली आहे.
            जिल्ह्यात 84 संवेदनशील मतदान केंद्रे असून या ठिकाणी जादा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. आता पर्यंत मतदान अधिकारी, कर्मचाऱ्यांचे दोन प्रशिक्षण झाली असून मतदान यंत्र (ईव्हीएम) हाताळणीचे (हॅन्डस ऑन) प्रशिक्षणही देण्यात आले आहे. 20 तारखेला तिसरे प्रशिक्षण होणार असून या प्रशिक्षणानंतर मतदान साहित्य वाटप करण्यात येणार आहे.
            आतापर्यंत आचारसंहिता भंगाचे 30 गुन्हे दाखल झाले असून मुंबई पोलीस कायद्यानवये 11 व्यक्तींना तडीपार करण्यात आले आहे. या व्यतिरिक्त फौजदारी प्रक्रिया संहितेच्या कलम 144(3) नुसार 42 प्रकरणात प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे. असे असले तरी या व्यक्तींना मतदान करण्याचा हक्क बजावण्यासाठी योग्य व्यवस्थाही करण्यात आली आहे. जिल्ह्यात 83 भरारी पथके, 64 व्हिडीओ सर्वेलन्स पथके तसेच 72 स्थीर सर्वेलन्स पथके नेमण्यात आली असून 53 हजार 308 वाहनांची तपासणी करण्यात आली आहे.
            जिल्ह्यात 3 हजार 668 पैकी 3 हजार 386 शस्त्रे जमा करण्यात आली आहेत. राज्य उत्पादन शुल्क विभागाने केलेल्या कारवाईत 346 गुन्ह्यांमध्ये 196 व्यक्तींना अटक करण्यात आली असून 27 वाहनांसह सुमारे 90 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. निवडणुकीत होणारा मद्याचा वापर रोखण्यासाठी दि.20,21 आणि 23 फेब्रुवारीला कोरडा दिवस (ड्रायडे) घोषीत करण्यात आला आहे.
            जिल्हा तालुका पातळीवर कायदा सुव्यवस्था आबाधित राहण्यासाठी स्वतंत्र कक्ष स्थापन करण्यात आला असून तो 24 तास कार्यान्वित आहे. मतदान केंद्रामध्ये निवडणूक विषयक गुन्हे करणाऱ्या व्यक्तींना अटकाव करण्यासाठी क्षेत्रीय अधिकाऱ्यांना निवडणुकी पुरते कार्यकारी दंडाधिकाऱ्याचे अधिकार देण्यात आले आहेत. मतदानाच्या दिवशी दि.21 फेब्रुवारीला सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. तसेच या दिवशी सर्व ताल्युक्यातील आठवडे बाजार बंद ठेवण्याचे आदेशही देण्यात आले आहेत.
            नागरिकांनी कोणत्याही आमिषाला वा दबावाला बळी पडता पारदर्शीपणे लोकशाहीच्या बळकटीकरणासाठी निश्चितपणे आपला मतदानाचा पवित्र हक्क बजावावा, असेही आवाहन पत्रकार परिषदेच्या शेवटी जिल्हाधिकारी सौरभ राव यांनी नागरिकांना केले.

0000000