Wednesday, April 26, 2017

माजी मंत्री सुशीलकुमार शिंदे यांना राज्यपाल राव यांच्या हस्ते डी. लिट




सोलापूर दि. 26 :  संघर्षमय जीवनातून राजकीय तसेच सामाजिक  क्षेत्रात कार्याचा ठसा उमटविल्याबद्दल सोलापूर विद्यापीठातर्फे माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांना डी.लिट पदवी राज्यपाल सी. विद्यासागर राव यांच्या हस्ते प्रदान करण्यात आली
            सोलापूर विद्यापीठाच्या सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या विशेष दीक्षांत समारंभास राज्यपाल श्री. राव यांच्यासह व्यासपीठावर सहकार, पणन वस्त्रोद्योग मंत्री सुभाष देशमुख, जिल्ह्याचे पालकमंत्री विजयकुमार देशमुख, कुलगुरु एन.एन. मालदार, परीक्षा नियंत्रक विभागाचे प्रमुख डॉ. बी. पी. पाटीलकुलसचिव पी. प्रभाकर उपस्थित होते.
            सुशीलकुमार  शिंदे यांनी प्रतिकूल परिस्थितीवर मात करुन स्वकर्तृत्वाने मुख्यमंत्री, देशाच्या गृहमंत्री पदावर विराजमान होण्याचा मान मिळविला. मिळालेल्या संधीचे सोने  करुन त्यांनी  सामान्य माणसासाठी काम करुन ओळख निर्माण केली, असे राज्यपाल सी. विद्यासागर राव म्हणाले.
            सत्कारास उत्तर देताना श्री. शिंदे म्हणाले, सोलापूर माझी जन्मभूमी आहे. सोलापूरच्या मातीने मला घडविले असून  सोलापूर विद्यापीठाने दिलेली डी. लिट पदवी माझ्या आईने दिलेली पदवी, असे मला गौरवाने म्हणावे वाटतेसोलापूर विद्यापिठाने अल्पावधीत केलेली शैक्षणिक प्रगतीही कौतुकास्पद आहे. विद्यापिठाचे संशोधनाच्या क्षेत्रात  होत असलेले काम समाधानकारक असून यापुढे त्यांनी वेगवेगळया संशोधनात भरीव काम करावे, अशी अपेक्षाही त्यांनी यावेळी व्यक्त केलीसोलापूर विद्यापीठामुळे येथील विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेला वाव मिळाला असून सर्वसामान्य विद्यार्थ्यांसाठी ज्ञानाची दारे खुली झाली याचे समाधानही आपल्यास वाटते असेही ते म्हणाले.
            तत्पूर्वी राज्यपाल सी. विद्यासागर राव यांच्या हस्ते विद्यापीठाच्या बास्केटबॉल कोर्ट, व्हीव्हीआयपी अतिथी गृहाचे उद्घाटन आणि इलेक्ट्रॉनिक विभाग इमारत, बहुउद्देशीय सभागृह, आरोग्य केंद्र आणि 400 मीटर रनिंग ट्रॅकचे भूमिपूजन करण्यात आले.
            कार्यक्रमास आमदार प्रणिती शिंदे, आमदार सिद्धराम म्हेत्रे, सौ. उज्वला शिंदे, विद्यापीठाचे सर्व विभाग प्रमुख, विद्यापीठाशी संलग्न असलेल्या महाविद्यालयांचे प्राचार्य यांच्यासह मान्यवर पदाधिकारी, अधिकारी सन्माननीय नागरीक  उपस्थित होते.
0000
                                                            

                     


Wednesday, April 19, 2017

पंडीत दीनदयाळ उपाध्याय विद्यामंदिरात मुख्यमंत्र्यांनी घेतला विद्यार्थ्यांचा तास


 पंडीत दीनदयाळ उपाध्याय विद्यामंदिरात
मुख्यमंत्र्यांनी घेतला विद्यार्थ्यांचा तास
पुणे दि. 19 : पुणे महानगरपालिका शिक्षण मंडळाच्या पंडीत दीनदयाळ उपाध्याय विद्यामंदिर या मुलींच्या शाळेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ई-लर्निंगचे उद्घाटन करून विद्यार्थ्यांचा तास घेतला.
            यावेळी आमदार मेधा कुलकर्णी, अजय गोगावलेंसह पुणे शिक्षण मंडळाचे पदाधिकारी, शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक उपस्थित होते.
            पुणे शिक्षण मंडळाच्यावतीने पौड फाटा येथील पंडीत दीनदयाळ उपाध्याय विद्यामंदिर या मुलींच्या शाळेत ई-लर्निंगच्या प्रकल्पाचे मुख्यमंत्र्यांनी उद्घाटन केलेयावेळी या शाळेत लावण्यात आलेल्या विद्यार्थ्यांच्या फेस रेकगनायझिंग बायोमॅट्रीक यंत्रणेचा शुभारंभ करण्यात आला.यावेळी मुख्यमंत्र्यांनी विद्यार्थ्यांचा तास घेतलाया ई-लर्निंग मधील छत्रपती शाहू महारांजांवरील पाठ यावेळी घेण्यात आलासाक्षात राज्याचे मुख्यमंत्रीच वर्गात आल्याने विद्यार्थीनी आनंदी होत्यामहानगरपालिकेच्या शाळेत राबविण्यात आलेल्या उपक्रमांची माहिती घेवून मुख्यमंत्र्यांनी कामाचे कौतुक केले.
****

भारतीय संस्कृती व संस्काराचे श्री श्री रविशंकर हे राजदूत - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस




भारतीय संस्कृती व संस्काराचे
श्री श्री रविशंकर हे राजदूत
- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
पुणे, दि. १९ (विमाका): जगभरात भारताच्या विचाराला, जीवनपध्दतीला, संस्कृतीला, योगाला श्री श्री रविशंकर यांनी प्रतिष्ठा मिळवून दिली,ते खऱ्या अर्थाने आपल्या देशाच्या विचारांचे आणि संस्कारांचे राजदूत असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज केले.
            पद्मावती येथील अण्णाभाऊ साठे नाट्यगृहात महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्यावतीने श्री श्री रविशंकर यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते जीवन गौरव पुरस्कार देवून सन्मानित करण्यात आलेत्यावेळी मुख्यमंत्री बोलत होतेयावेळी आर्ट ऑफ लिव्हिंगचे प्रणेते श्री श्री रविशंकर,पालकमंत्री गिरीश बापटऑल जर्नालिस्ट असोसिएशन दिल्लीचे अध्यक्ष अशोक वानखेडे, महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे राज्य संघटक संजय भोकरेप्रदेशाध्यक्ष राजा मानेज्येष्ठ संपादक दिनकर रायकर वसंत मुंढेविजय बाविस्करगोंविंद घोळवेमंदार फणसेकिरण जोशी उपस्थित होते.
            मुख्यमंत्री म्हणालेस्वामी विवेकानंदांनी आपल्या विचारांच्या सामर्थ्यावर जगावर विजय मिळवलात्यांनी पहिल्यांदा आपल्या देशाच्या महान संस्कृतीचे दर्शन जगातील मान्यवरांना शिकागो येथे झालेल्या धर्मपरिषदेत घडवून आणलेत्यानंतर दिल्ली येथे रविशंकर यांनी जगभरातील धार्मिक गुरुंचा एकत्रित कार्यक्रम घेवून वसुधैवं कुटुंबकमंचा अविष्कार जगाला दाखवून दिलास्वामी विवेकांनदांच्या विचारांचा अविष्कार गुरूजींनी सर्वांसमोर मांडलाचारित्र्य संपन्नवैचारिक बैठकीचे अधिष्ठान असलेले नेतृत्व सर्व क्षेत्रात असणे आवश्यक आहेगुरुजींच्या विचारांच्या माध्यमातून हे घडत आहेस्वामी विवेकानंदांचे विचार गुरूजींनी प्रकट रुपाने आपल्या समोर मांडले आहेतयाच विचारांतून देशाचे नवीन भविष्य घडणार आहे.
‘जलयुक्त शिवार’ला आर्ट ऑफ लिव्हिंगची साथ
            आर्ट ऑफ लिव्हिंगच्या माध्ययमातून अध्यात्माबरोबरच इतर आठ क्षेत्रात गुरुजींचे मोठे कार्य आहेदेशाला सामर्थ्यशाली बनविण्यासाठी त्यांचे कार्य  सुरु असून, राज्य शासनाच्या जलयुक्त शिवार अभियानातही आर्ट ऑफ लिव्हिंगची मोलाची साथ आहेवैज्ञानिक पध्दतीने जलयुक्त शिवारची कामे ही संस्था करत आहेराज्यातील शेतकऱ्यांची आवश्यकता समजून घेवून काम करण्याची गरज आहेकर्जमाफी आणि कर्जमुक्ती हा केवळ एकच उपाय शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबविण्याचा नाहीतर शेतकऱ्यांना शाश्वत शेतीचा मंत्र देण्याची आवश्यकता आहेत्यासाठी राज्य शासन विविध पातळीवर प्रयत्न करत आहेयामुळे राज्याचा कृषीचा‍ विकासदर साडे बारा टक्क्यांवर गेला असून शेतकऱ्यांचे उत्पन्न 40 हजार कोटींनी वाढले असल्याचे त्यांनी सांगितले.
कर्तव्य भावनेतूनच कायदा केला
            पत्रकार हा लोकशाहीचा चौथा स्तंभ आहेलोकशाहीला मजबूत करण्यासाठी पत्रकारांना संरक्षण देणे सरकारचे काम आहेपत्रकारांच्या संरक्षणाचा कायदा केला हा कर्तव्य भावनेतूनच केला आहेलोकशाहीला अधिक प्रकल्भ करण्याचे काम पत्रकारिता करत असतेत्यामुळे लोकशाहीच्या या चौथ्या स्तंभाला अधिक मजबूत करण्याची आवश्यकता आहे.
सेवा भावनेतूनच लाल दिवा काढला
            पंतप्रधानांनी देशातील व्हीआयपी संस्कृती संपविण्यासाठीच मंत्र्यांसह मान्यवरांच्या गाड्यांवरील लाल दिवे काढण्याचा निर्णय घेतलाहा निर्णय हा अत्यंत चांगला असून लोकप्रतिनिधी हे समाजाचे सेवक असतातमी ही स्वता:ला समाजाचा सेवकच मानतोयाच सेवाभावातूनच आजच माझ्या गाडीवरील लाल दिवा काढण्याचा निर्णय घेवून त्यांची तातडीने अंमलबजावणी केली आहेयापुढेही याच सेवाभावाने काम करणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
            श्री श्री रविशंकर म्हणालेसर्वांनी एकत्र येवून काम केले तरच सर्व समाज पुढे जाईलप्रत्येकाने आपल्या जीवनाचा सन्मान करणे हेच खरे अध्यात्म आहेकोणत्याही परिस्थितीत सत्याची साथ देणे हे पत्रकारांचे काम आहेमात्र हे करत असताना विकास पत्रकारिता करण्याची आवश्यकता आहेसमाजात सुरू असणाऱ्या चांगल्या गोष्टी पत्रकारांनी समाजासमोर मांडाव्यातसत्याला समोर ठेवताना समाजाला प्रेरणा देण्याचे काम पत्रकारांनी करणे अभिप्रेत आहेमहाराष्ट्रातील जलयुक्त शिवार अभियानाची कल्पनाही अत्यंत चांगली असून लोकसहभागामुळेच ती यशस्वी झाली आहे. अध्यात्मात सांगितलेल्या नेत्यांच्या अंगातील सर्व गुण देवेंद्र फडणवीस यांच्या अंगी असल्याचे गौरोद्गार त्यांनी काढले.
            पालकमंत्री गिरीश बापट म्हणालेपत्रकार हा लोकशाहीचा आधारस्तंभ आहेसमाजाला दिशा देण्याचे काम पत्रकार करत असतातत्यामुळे लोकशाहीच्या या चौथ्या स्तंभाला संरक्षण देणे हे शासनाचे काम आहेपत्रकारांवरील हल्ला हा लोकशाहीवरील हल्ला असतोराज्य शासनाने नव्याने आणलेल्या कायद्यामुळे राज्यातील पत्रकारांवरील हल्ले थांबण्यास मदत होणार आहे.
            श्री श्री रविशंकर यांना मानपत्रस्मृतीचिन्हशालफेटा देवून मुख्यमंत्र्यांच्या हस्ते जीवन गौरव पुरस्कार देवून सन्मानित करण्यात आले.पत्रकार हल्ला विरोधी कायदा मंजूर केल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्यावतीने लोकमतचे समुह संपादक दिनकर रायकर यांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आलात्याच बरोबर यावेळी मान्यवरांच्या हस्ते पत्रकारिता क्षेत्रात उल्लेखनीय काम केलेल्या पत्रकारांचा आदर्श पत्रकार म्हणून सत्कार करण्यात आलातसेच इतर क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या व्यक्तींचाही यावेळी मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला.
            यावेळी राजा मानेअशोक वानखेडे यांनी मनोगते व्यक्त केलीकार्यक्रमाचे प्रास्ताविक संजय भोकरे यांनी केलेतर आभार नितीन बिबवे यांनी मानले.
****

केंद्रीय मंत्रिमंडळाच्या निर्णयाची तात्काळ अंमलबजावणी वाहनावर लाल दिवा न लावण्याचा मुख्यमंत्र्यांचा निर्णय

जनसंपर्क कक्ष (मुख्यमंत्री सचिवालय)

केंद्रीय मंत्रिमंडळाच्या निर्णयाची तात्काळ अंमलबजावणी
वाहनावर लाल दिवा न लावण्याचा मुख्यमंत्र्यांचा निर्णय

मुंबई, दि. 19 : शासकीय वाहनांवरीललाल दिव्याच्या वापरावर केंद्रीय मंत्रिमंडळाने घातलेल्या निर्बंधांचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वागत केले असून त्याची वैयक्तिक पातळीवर तात्काळ अंमलबजावणी करण्यास सुरुवात केली आहे. आज पुणे दौऱ्यावर असताना या निर्णयाची माहिती मिळताच मुख्यमंत्र्यांनी आपल्या शासकीय वाहनावरील लाल दिवा काढून टाकण्याचे आदेश दिले.
केंद्रीय मंत्रिमंडळाने घेतलेल्या या निर्णयाची अंमलबजावणी 1 मे पासून होणार असली तरी मुख्यमंत्र्यांनी आजपासूनच गाडीवर लाल दिवा वापरणे बंद केले आहे.व्हीआयपी संस्कृतीला चाप लावण्यासाठी प्रधानमंत्रीनरेंद्र मोदी यांनी उचललेल्या या महत्त्वाच्या निर्णयाचे महाराष्ट्र सरकार स्वागत करीत असूनआपणशासकीय वाहनावर लाल दिवा (RedBeacons)लावणार नाही,असे मुख्यमंत्र्यांनी जाहीर करून त्याची पुणे दौऱ्यात तात्काळ अंमलबजावणीहीकेली.या निर्णयामुळे लोकशाही अधिक बळकट होण्यास मदत होणार आहे, अशी आशाही मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली आहे.

******




Thursday, April 6, 2017

शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयांना अहवाल सादर करण्याचे आवाहन


पुणे, दि. 6 : पुणे जिल्ह्यातील सर्व शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयांचा सन 2016-2017 या वर्षाचा वार्षिक अहवाल विहीत नमुन्यासह दि. 30 जुन 2017 पर्यंत सादर करावयाचा आहे.
 तसेच 31 ऑक्टोबर 2017 पर्यंत ग्रंथालयाचा सन 2016-17 चा अंकेषण अहवाल विहीत नमुन्यातील ऑडिट रिपोर्ट Receipt and Payment तक्त्यासह जिल्हा ग्रंथालय  अधिकारी कार्यालय, 166/1, रविवार पेठ, सरदार बिल्डिंग, गुरुव्दाराजवळ, पुणे-411002 या कार्यालयीन पत्त्यावर पाठवावा असे जिल्हा ग्रंथालय अधिकारी .सु.लोंढे यांनी प्रसिध्दी पत्रकाव्दारे कळविले आहे.

0000

विभागीय भ्रष्टाचार निर्मूलन समितीची तिमाही सभा 10 एप्रिल रोजी होणार


पुणे, दि. 6 : पुणे विभागीय भ्रष्टाचार निर्मूलन समितीची  बैठक एप्रिल, 2017 या महिन्याच्या दुसऱ्या सोमवारी  विभागीय लोकशाही दिनाच्या दिवशी दि. 10 एप्रिल रोजी सकाळी 11-15 वाजता सभागृह क्र. 1 विभागीय आयुक्त कार्यालय, नवीन इमारत येथे आयोजित केली जाणार असल्याचे सुधाकर तेलंग उप आयुक्त महसूल, विभागीय आयुक्त, पुणे विभाग यांनी प्रसिध्दी पत्रकाव्दारे कळविले आहे.

00000