Monday, December 31, 2018











एटीपी वर्ल्ड टूर टेनिस स्पर्धेचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शानदार उद्घाटन

टाटा ओपन महाराष्ट्र स्पर्धेपासून नवोदित खेळाडूंना प्रेरणा मिळेल   
                                       
-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

           पुणे दि. ३१ : टाटा ओपन महाराष्ट्र टेनिस स्पर्धेच्या निमित्त जगजेत्ते खेळाडू या ठिकाणी आले आहेत. या स्पर्धेपासून नवोदित खेळाडूंना प्रेरणा मिळेल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज व्यक्त केला.
           शिवछत्रपती क्रीडा संकुल महाळूंगे-बालेवाडी येथे एटीपी वर्ल्ड टूर टेनिस स्पर्धेचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले. त्यावेळी श्री फडणवीस बोलत होते. यावेळी पालकमंत्री गिरीश बापटपुण्याच्या महापौर मुक्ता टिळकपिंपरी-चिंचवडचे महापौर राहूल जाधवआमदार सर्वश्री लक्ष्मण जगतापसंजय उर्फ बाळा भेगडेभीमराव तापकीरपुणे महापालिकेचे आयुक्त सौरभ रावपिंपरी-चिंचवडचे आयुक्त श्रावण हार्डीकरस्पर्धेचे संचालक प्रशांत सुतारसकाळ समूहाचे अभिजीत पवार उपस्थित होते.
                     पुण्यासारख्या ठिकाणी स्पर्धा आयोजित केल्याबद्दल संयोजकांचे अभिनंदन करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुढे  म्हणालेएटीपी वर्ल्ड टूर स्पर्धेच्या निमित्ताने जगभरातील नामांकीत खेळाडू या ठिकाणी आले आहेत. त्यामुळे टेनिसप्रेमींसाठी ही मोठी पर्वणी आहे. तसेच या निमित्त जगजेत्त्या खेळाडूंचा खेळ पाहण्याची संधी नवोदित खेळाडूंना मिळणार आहे. त्यातून ते निश्चित प्रेरणा घेतील. अशा स्पर्धांचे वारंवार आयोजन होण्याची आवश्यकता असून या टेनिस मैदानातून भविष्यातील चॅम्पिअन निर्माण होतील,आसा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
                      आकाशात फुगे सोडून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी मुख्यमंत्र्यांनी स्वाक्षऱ्या केलेले टेनिस बॉल त्यांनी टेनिस रॅकेटने प्रेक्षागृहात बसलेल्या प्रेक्षकांच्या दिशेने भिरकवले.
                     मुख्य स्पर्धेच्यापूर्वी जगातील चौथ्या मानांकीत केरोलीना मेरिनअभिनेत्री तापसी पन्नूटेनिसपटू लिएंडर पेस यांच्यात प्रदर्शनीय सामाना झाला.
                       त्यानंतर भारताचा अव्वल खेळाडू प्रजनेश गुन्नेश्वरण आणि अमेरिकेच्या मायकेल मोह यांच्यात पहिला सामना झाला, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी  मैदानात थांबून सामन्याचा आनंद घेतला.
०००००


Tuesday, December 18, 2018

नवभारताच्या निर्माणात पुण्यासह महाराष्ट्राचे मोठे योगदान असेल - प्रधानमंत्री नरेंद्र मोदी










प्रधानमंत्र्यांच्या हस्ते पुणे मेट्रो लाईन-३चे शानदार भूमीपूजन
पुणे दि. 18 (विमाका)पायाभूत सुविधांबरोबरच नवनवीन तंत्रज्ञान उपलब्ध करून देण्यात येत आहे. माहिती तंत्रज्ञानाची राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुणे शहराला मेट्रो रेल्वेची सुविधा उपलब्ध होणार असल्याने भविष्यात हे शहर जागतिक स्तरावर ओळखले जाईल. मेट्रो देशातील शहरांची जीवन वाहिनी बनत असून ज्ञान आणि तंत्रज्ञानाचे केंद्र हीच नव्या भारताची ओळख असणार आहे. या नवभारताच्या निर्माणात महाराष्ट्र आणि पुण्याचे मोठे योगदान असेल, असा विश्वास प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज व्यक्त केला
महाळुंगे-बालेवाडी येथील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलाच्या मैदानावर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पुणे मेट्रो लाईन-३चे भूमीपूजन आज झाले, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी राज्यपाल चेविद्यासागर रावमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसकेंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकरकेंद्रीय गृहनिर्माण आणि नगर विकास मंत्री हरदीप सिंग पुरीपालकमंत्री गिरीश बापटसामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळेपुण्याच्या महापौर मुक्ता टिळकपिंपरी-चिंचवडचे महापौर राहुल जाधवखासदार अनिल शिरोळेपीएमआरडीएचे आयुक्त किरण गित्ते उपस्थित होते.
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी पुढे म्हणालेपुणे शहराची ओळख सांस्कृतिक आणि शैक्षणिक शहर अशी असून माहिती तंत्रज्ञानच्या क्षेत्रातही पुण्याने मोठी प्रगती केली आहेहिंजवडी हे माहिती तंत्रज्ञानाचे हब असून या‍‍ ठिकाणी काम करणाऱ्या लोकांनी देशाला नवी ओळख दिली आहेया ठिकाणी होत असलेल्या हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रोमुळे या ठिकाणी काम करत असलेल्या माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील युवकांसाठी मोठी उपलब्धी ठरणार आहेया मेट्रो मार्गामुळे वाहतुकीचा आणि प्रगतीचा वेग वाढणार आहे.
पुण्यातील पहिल्या दोन टप्प्यातील मेट्रोचे काम वेगाने सुरू असून पुढच्यावर्षी १२ किलोमीटरपर्यंत मेट्रो पुण्यात धावेलपायाभूत सुविधांच्या विकासावर केंद्राचे आणि राज्याचे विशेष लक्ष आहेदेशातील गावे-शहरे एकमेकांना जोडण्याचे काम सुरू आहेदेशाच्या कोणत्याही भागात फिरताना या कामाचा वेग सहज लक्षात येईल.
विकासाच्या महामार्गापासून कोणीही वंचित राहू इच्छित नाहीत्यासाठी देशभरातील अनेक शहरांतून मेट्रोचे प्रस्ताव केंद्राकडे आले आहेतदेशात ५०० किलोमीटरचे मेट्रोचे काम पूर्ण झाले असून ६५० किलोमीटरचे काम प्रगतीपथावर आहेअटल बिहारी वाजपेयी यांच्या काळात मेट्रोची सुरूवात झाली.त्यांच्या काळातच दिल्लीच्या मेट्रोचे काम पूर्ण झाले.
गावांपासून शहरांपर्यंत पायाभूत सुविधांवर भर देण्याचे सरकारचे धोरण आहेसार्वजनिक-खाजगी भागीदारी धोरणाचा पुरस्कार केंद्राने केला असून त्यामाध्यमातून देशातील पहिला मेट्रो प्रकल्प पुण्यात साकारत आहेया नव्या धोरणामुळे मेट्रोच्या विकासाला गती मिळणार आहेमेट्रो-रेल्वेचे चांगले धोरण केंद्र सरकारने विकसीत केले असून केंद्राच्या आणि राज्याच्या व्यापक दृष्टीचा हा परिणाम आहे.
इज ऑफ लिव्हिंग आणि इज ऑफ डुईंग हे केंद्र सरकारचे धोरण असल्याचे सांगत श्रीमोदी पुढे म्हणालेपुण्यासह महाराष्ट्रातील ९ शहरात स्मार्ट सिटी अंतर्गत १५०० कोटी रुपयांचे काम पूर्ण झाले असून ३५०० कोटी रुपयांची कामे सुरू आहेतत्याच बरोबर देशात स्वच्छता आणि गरिबांना घरे देण्याबाबत मोठे काम सूरू असून रस्तेवीज आणि पाणी यांच्याशी निगडीत अनेक प्रकल्प सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.
सामान्य लोकांना सरकारच्या सेवा वेगाने आणि चांगल्या प्रकारे उपलब्ध होण्यासाठी डिजीटल इंडियाचे काम सुरु आहेया माध्यमातून देशातील गावे ऑप्टिकल फायबरने जोडली जात आहेत. लोकांसाठी सोपे आणि सुलभ नियम बनिवण्याचे सरकारचे धोरण आहेनवे तंत्रज्ञान लोकांपर्यंत पोहोचविण्यात स्वस्त मोबाईल आणि स्वस्त इंटरनेट डेटाचा मोठा वाटा आहेजगातला सर्वाधिक मोबाईल बनविणारा दुसरा देश म्हणून भारताची ओळख निर्माण झाली आहे.तंत्रज्ञानाच्या मदतीने गेल्या साडेचार वर्षात डिजीटल व्यवहार सहा पटीने वाढले आहेतयामुळे लोकांच्या रोजच्या गरजा वेगाने पूर्ण होत आहेतहार्डवेअर बरोबरच स्वस्त इंटरनेट डेटा लोकांपर्यंत पोहोचविण्याचे काम सुरू आहेत्याचबरोबर महाराष्ट्रात १ लाख एलईडी पदपथ दिवे लावण्याचे काम पूर्ण झाले असून या माध्यमातून मोठी विजेची बचत होत असल्याचेही त्यांनी सांगितले.  
यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, पुण्याकरिता अत्यंत महत्वाकांक्षी असलेल्या मेट्रो प्रकल्पाचे भूमिपूजन आज होत आहे. हा सर्वांकरिता आनंदाचा क्षण आहे. आयटी हब असलेले हिंजवडी जगाला मानव संसाधन पुरवते. याच ठिकाणी माहिती तंत्रज्ञानाची निर्मिती केली जाते. हा भाग शिवाजीनगरशी मेट्रोच्या माध्यमातून जोडल्या गेल्यामुळे प्रगतीचे नवे दालन खुले झाले आहे. आयटी पार्कमध्ये लाखो लोक कामाच्या निमित्ताने येतात. प्रवासामध्ये त्यांचा वेळ जातो. त्यामुळे कार्यक्षमतेवर परिणाम होतो.
केंद्राच्या नव्या पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिपच्या या नव्या धोरणानुसार सर्वात पहिला मेट्रोचा प्रकल्प पुण्यात होत आहे. याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला. मेट्रो प्रकल्पामुळे पर्यावरणाची हानी होणार नाही. तसेच वेळेचे बचत होऊन गतिमानता आणि कार्यक्षमता वाढून देशाचा विकास होईल. प्रधानमंत्री श्री. नरेंद्र मोदी यांच्या स्वप्नातील तसेच देशातील सर्वोत्तम शहर म्हणून पुणे  नावलौकिक मिळवेल, असा विश्वास श्री. फडणवीस यांनी यावेळी व्यक्त केला.
पुणे महानगर प्रदेश विकास प्राधीकरण (पीएमआरडीए)चे क्षेत्र महाराष्ट्रातील विकासाचे क्षेत्र होईल, असे स्पष्ट करून मुख्यमंत्री फडणवीस यांनी या भागात सुरु करण्यात येणाऱ्या रिंग रोड, हायटेक सिटी, इलेक्ट्रिक बसेस आदी प्रकल्पांचा उल्लेख केला.  पीएमआरडीएच्या माध्यमातून तसेच लोकांच्या सहकार्यातून  या भागाचा सुनियोजित विकास साधण्यावर आपला भर असल्याचे त्यांनी सांगितले.
केंद्रीय मंत्री हरदीप सिंग पुरी म्हणालेपुणे शहराबरोबर माझा जवळचा संबंध राहिला आहेराज्यातीलच नव्हे तर देशातले सर्वात प्रगतशील शहर म्हणून पुण्याचा विकास होत आहेपुणे ही सांस्कृतिक आणि शैक्षणिक राजधानी आहेस्मार्ट सिटी आणि प्रधानमंत्री आवास योजनेचे काम चांगले सुरू आहे.
पालकमंत्री गिरीश बापट  म्हणालेकमी कालावधीत पुण्यात मेट्रोच्या कामाला गती मिळाली आहेपुणे मेट्रो लाईन-३ मुळे हिंजवडीच्या आयटी पार्क मधील आयटी क्षेत्रात काम करणाऱ्यांनां मोठा लाभ होणार आहेया मेट्रोच्या कामामुळे प्रवासाला गती मिळणार आहेहिंजवडी मेट्रोचा विस्तार वाढत राहणार असून शिवाजीनगर पर्यंतची ही मेट्रो हडपसर पर्यंत नेण्याची आवश्यकता आहेपुण्याच्या विकासाठी केंद्र व राज्य सरकारच्या माध्यमातून मोठा निधी पुणे शहरासाठी आला आहेस्मार्ट सिटीजायकामेट्रो यांसारखे मोठे प्रकल्पाबरोबर १६ हजार कोटी रुपयांचा राष्ट्रीय महामार्गाची कामे होणार आहेतलोहगाव विमानतळ विस्तारीकरणाबरोबच पुरंदर येथील विमानतळाच्या कामालाही गती मिळत आहे
****

Saturday, December 15, 2018





शासन साखर उत्पादकांच्या पाठिशी
एफआरपी देण्यात महाराष्ट्र देशात अव्वल
-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

·        वसंतदादा शुगर इन्स्टिट्युटच्या वार्षिक सर्वसाधारण सभा
·        पारितोषिक वितरण समारंभ थाटात संपन्न

पुणे दि. १५:  साखर उद्योग शेतकऱ्यांचा कणा असून शेतकऱ्यांच्या हितासाठी राज्य शासन साखर उद्योगांच्या पाठीशी ठामपणे उभे आहे. ऊसाच्या हार्व्हेस्टरसाठी राज्य शासनाने ४० लाखांपर्यंत अनुदान देण्याचा निर्णय घेतला असून एफआरपी देण्यात महाराष्ट्र देशात अव्वल असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज केले. तसेच मराठवाड्यात वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटची शाखा सुरू करण्यासाठी राज्य शासन सकारात्मक असल्याचे त्यांनी सांगितले.
मांजरी, पुणे येथे वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट संस्थेच्या ४२ व्या वार्षिक सर्वसाधारण सभा आणि पुरस्कार वितरण कार्यक्रम मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले. त्यावेळी श्री फडणवीस बोलत होते. यावेळी माजी केंद्रीय मंत्री तथा संस्थेचे अध्यक्ष शरद पवार, राष्ट्रीय साखर संघाचे अध्यक्ष दिलीप वळसे-पाटील, खासदार विजयसिंह मोहिते-पाटील, आमदार अजित पवार, बाळासाहेब थोरात, जयंत पाटील, बबनदादा शिंदे, कलप्पा आवाडे, सतेज पाटील, बाळासाहेब पाटील, हर्षवर्धन पाटील, दिलीपराव देशमुख, राजेश टोपे, इंडियन शूगर इन्सिट्यूटचे अध्यक्ष रोहित पवार, जयप्रकाश दांडेगावकर, साखर आयुक्त शेखर गायकवाड, संस्थेचे महासंचालक शिवाजीराव देशमुख, निवृत्त साखर आयुक्त संभाजीराव कडू पाटील उपस्थित होते.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, महाराष्ट्राच्या साखर उद्योगात वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचे मोठे योगदान आहे. नवीन तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत व्हीएसआयच्या माध्यमातून पोहोचत असते. त्यामुळेच साखर उद्योगात महाराष्ट्र देशात अव्वल स्थानी आहे. आज साखर उद्योगासमोर अनेक अडचणी आहेत. तरीही गेल्या चार वर्षात एफआरपीची रक्कम देण्यात महाराष्ट्राचे काम चांगले आहे. साखरेचा हमीभाव कमीतकमी २९ रुपयांवरुन ३१ रुपयांवर करण्याविषयी केंद्र सरकारला विनंती करणार आहे. तसेच ऊस वाहतुकीसाठी अनुदान देण्याचा राज्य सरकार विचार करत असल्याचे श्री. फडणवीस यांनी सांगितले.
सर्वाधिक पाणी लागणारे पीक म्हणून ऊस पिकावर टीका होत असते परंतु त्यासाठी ऊसाचे सर्व क्षेत्र ठिबकखाली घेण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. यासाठी आता बीट सारखा पर्याय निवडण्याची वेळ आली आहे. केंद्र सरकारने इथेनॉल पॉलिसी केल्यामुळे काही चांगले परिणाम दिसत आहेत. साखरेची उत्पादकता वाढविण्याबरोबरच साखरेच्या उपपदार्थ निर्मितीवर भर देण्याची आवश्यकता असून यावर कारखान्यांनी विचार करावा. उसासारख्या शाश्वत उत्पन्न देणाऱ्या उद्योगाला जगविण्यासाठी सरकारबरोबर साखर कारखानदार आणि शेतकऱ्यांनी एकत्र येऊन काम करण्याची गरज आहे. राज्यावर दुष्काळाची छाया आहे, त्यामुळे पुढच्या साखर हंगामावर त्यांचा परिणाम होणार आहे. साखर उद्योगाला जगविण्यासाठी उत्पादन खर्च कमी होवून उत्पादकता आणि गुणवत्ता वाढविण्यावर सर्वांनी भर देण्याची आवश्यकता असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी आपल्या भाषणात श्री शरद पवार म्हणाले, यावर्षी देशात १६० लाख टन साखर शिल्लक असून अतिरिक्त उत्पादनामुळे साखरेचे दर कमी झाले आहेत. त्यामुळे साखर कारखान्यांना एफआरपी देण्यात मोठी अडचण येत आहे. साखरेच्या निर्यातीसाठी सरकारने अनुदान दिले ही चांगली बाब आहे. साखर व्यवसाय हा महाराष्ट्रातील ग्रामीण व्यवस्थेचा महत्वाचा भाग आहे. या व्यवसायामुळे राज्याला  चांगले आर्थिक उत्पन्न होत आहे. उसाची उत्पादकता आणि गुणवत्ता वाढविण्यासाठी प्रत्येक कारखान्यांनी ऊस विकास कार्यक्रम राबविण्याची आवश्यकता आहे. राज्यात दुष्काळाची स्थिती दिसत आहे, त्यामुळे पुढील वर्षी साखर हंगाम अडचणीत येण्याची शक्यता आहे. ऊस उत्पादकांसमोर हुमणी किडीच्या  प्रादुर्भावाची मोठी समस्या निर्माण झाली आहे. युरोपाच्या धर्तीवर आपल्या येथेही बीट शेतीसाठी प्रयोग करण्याची आवश्यकता असून साखर उद्योगाला वाचविण्यासाठी सर्वांनी एकत्रितपणे प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे.
            यावेळी दिलीप वळसे-पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी तांत्रिक कार्यक्षमता अहवाल, आसवणी अहवाल, आर्थिक कार्यक्षमता अहवाल व मेंटेनन्स बुक फॉर शुगर इंजिनिअर्स या पुस्तकांचे प्रकाशन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले.
            या वेळी वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्यावतीने विविध पुरस्कारांचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते वितरण करण्यात आले.
या कार्यक्रमाला राज्यातील ऊस कारखान्यांचे पदाधिकारी, सभासद, शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

देण्यात आलेले पुरस्कार
दक्षिण विभाग:
पूर्व हंगामात पहिला क्रमांक सौ. शोभा धनाजी चव्हाण, मु.पो. घोगांव, ता. पलूस, जि. सांगली, राजारामबापू पाटील साखर कारखाना, वाळवा. सुरु हंगामात पहिला क्रमांक श्री. मोहन भरमा चकोते, मु.पो. नांदणी, ता. शिरोळ, जि. कोल्हापूर, श्री. दत्त सहकारी साखर कारखाना शिरोळ. खोडवा हंगामात पहिला क्रमांक दत्तात्रय चव्हाण, मु.पो. वांगी, ता. कडेगाव, जि सांगली.
मध्य विभाग:
पूर्व हंगामात पहिला क्रमांक श्री. शिवाजी गजेंद्र पाटील, मु.पो. नेवरे, ता. माळशिरस, जि. सोलापूर, सहकार महर्षी शंकरराव मोहिते-पाटील साखर कारखाना, अकलूज. सुरु हंगामात पहिला क्रमांक श्री. प्रकाश बाळासाहेब ढोरे, मु.पो. वडगाव, ता. मावळ, जि. पुणे, श्री. संत तुकाराम सहकारी साखर कारखाना मुळशी. खोडवा हंगामात पहिला क्रमांक श्री. तानाजी बळी पवार, मु.पो. लवंग, ता. माळशिरस, जि. सोलापूर, सहकार महर्षी शंकरराव मोहोते-पाटील साखर कारखाना, अकलूज.
उत्तरपूर्व विभाग:
पूर्व हंगामात पहिला क्रमांक श्रीमती वैशालीताई विलासराव देशमुख, मु.पो. बाभळगाव, लातूर, विलास साखर कारखाना, निवळी, जि. लातूर. खोडवा हंगामात पहिला क्रमांक श्री. रविकिरण मोहन भोसले, मु.पो. खामसवाडी, केशेगाव, जि. उस्मानाबाद, डॉ. बाबासाहेब आंबेडकर साखर कारखाना, केशेगाव, जि. उस्मानाबाद.
राज्यस्तरीय ऊसभूषण पुरस्काराचे मानकरी:
कै. यशवंतराव चव्हाण पुरस्कार: श्री. चवगोंडा अण्णा पाटील, रा. दानोळी, ता. शिरोळ, जि. कोल्हापूर, दत्ता शेतकरी सहकारी साखर कारखाना लि. दत्तनगर, ता. शिरोळ, जिल्हा कोल्हापूर. कै. वसंतराव नाईक पुरस्कार: सौरभ कोकीळ, मु.पो. धामणेर, ता. कोरेगाव, जि. सातारा, जयवंत शुगर्स लि. धावरवाडी, ता. कराड, जि. सातारा. कै. अण्णासाहेब शिंदे पुरस्कार: मारोती ज्ञानू शिंदे, मु.पो. वाठार, ता. हातकणगले, जि. कोल्हापूर, तात्यासाहेब कोरे वारणा सहकारी साखर कारखाना कोल्हापूर.

विभागवार तांत्रिक कार्यक्षमता पुरस्कार :
दक्षिण विभाग
प्रथम क्रमांक :
उदगिरी शुगर अ‍ॅण्ड पॉवर लि. ता. खानापूर, जि. सातारा. द्वितीय क्रमांक : कुंभी कासारी सहकारी साखर कारखाना, ता. करवीर. तृतीय क्रमांक : क्रांती अग्रणी डॉ. जी. डी. बापू, लाड साखर कारखाना, ता. पलूस.

मध्य विभाग:
प्रथम क्रमांक : श्री अंबालिका शुखर प्रा. लि. ता. कर्जत. द्वितीय क्रमांक : अगस्ती साखर कारखाना, ता. अकोले. तृतीय क्रमांक : सहकारमहर्षी शंकरराव मोहिते पाटील साखर कारखाना, ता. माळशिरस.

उत्तर पूर्व विभाग:
प्रथम क्रमांक : विलासराव देशमुख मांजरा शेतकरी साखर कारखाना, ता. लातूर. द्वितीय क्रमांक : विलास साखर कारखाना, निवळी, लातूर. तृतीय क्रमांक : बारामती अ‍ॅग्रो लि. ता. कन्नड, जि. औरंगाबाद.

उत्कृष्ट आर्थिक व्यवस्थापन पुरस्कार:
दक्षिण विभाग : छत्रपती शाहू साखर कारखाना, ता. कागल.
मध्य विभाग : नीरा भीमा साखर कारखाना, ता. इंदापूर
उत्तरपूर्व विभाग : रेणा साखर कारखाना, ता. रेणापूर.
कै. वसंतदादा पाटील सर्वोत्कृष्ट साखर कारखाना पुरस्कार : रेणा साखर कारखाना, ता. रेणापूर, जि. लातूर.
कै. रावसाहेबदादा पवार सर्वोत्कृष्ट आसवणी पुरस्कार : दौंड शुगर प्रा.लि., दौंड
कै. आबासाहेब वीर सर्वोत्कृष्ट पर्यावरण संवर्धन पुरस्कार : पतंगराव कदम सोनहिरा कारखाना, ता. कडेगाव, जि. सांगली
कर्मयोगी शंकरराव पाटील सर्वोत्कृष्ट आर्थिक व्यवस्थापन पुरस्कार : डॉ.डी.जी.बापू लाड साखर कारखाना
सा.रे.पाटील सर्वोकृष्ट ऊस विकास व संवर्धन पुरस्कार : विघ्नहर साखर कारखाना, ता. जुन्नर
विलासरावजी देशमुख सर्वोत्कृष्ट उद्योजकता पुरस्कार : छत्रपती शाहू साखर कारखाना

उत्कृष्ट ऊस विकास व संवर्धन पुरस्कार:
दक्षिण विभाग: क्रांती अग्रणी डॉ.डी.जी.बापू लाड साखर कारखाना, पलूस
मध्य विभाग: विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखाना ता. मेढा

वैयक्तिक पुरस्कारांची यादी:
उत्कृष्ट मुख्य शेती अधिकारी : संभाजी पांडुरंग थिटे
उत्कृष्ट पर्यावरण अधिकारी : आर. के. गोफणे
उत्कृष्ट चीफ इंजिनिअर : गजेंद्र गिरमे
उत्कृष्ट चीफ केमिस्ट : संजय साळवे
उत्कृष्ट चीफ अकाऊंटंट : अमोल अशोकराव पाटील
उत्कृष्ट आसवाणी व्यवस्थापक : धैर्यशील रणवरे
उत्कृष्ट कार्यकारी संचालक : राजेंद्रकुमार रणवरे
उत्कृष्ट कामगिरी केलेले कर्मचारी : राजेंद्र चांदगुडे, संतोष वाघमारे, सिकंदर शेख
*****


Tuesday, November 27, 2018

धर्मादाय न्यासातर्फे १६ डिसेंबर रोजी सामुहिक विवाह सोहळा इच्छूकांनी अर्ज करण्याचे आवाहन


            पुणे दि. 27- धर्मादाय आयुक्त शिवकुमार डिगे यांनी धर्मादाय न्यासामार्फत गरीब, गरजू लोकांच्या मुला-मुलींचे मोफत सामुदायिक विवाह सोहळे करणे संदर्भात निर्देश दिलेले आहेत. त्यानुसार पुणे शहरामध्ये १६ डिसेंबर २०१८ रोजी सामुदायिक विवाह सोहळा आयोजित करण्यात आलेला आहे. या विवाह सोहळयामध्ये  सहभागी होणाऱ्या वधू-वरांना पुणे जिल्हा मोफत सामुदायिक विवाह सोहळा समितीच्यावतीने संसारोपयोगी साहित्य, मनीमंगळसुत्र, कपडे इ. वस्तू देण्यात येणार आहेत. तसेच भोजन व्यवस्था करण्यात येणार आहे.
            वधूचे वय१८ वर्षापेक्षा कमी व वराचे वय २१ वर्षापेक्षा कमी असू नये. त्याबाबत वयाचा अधिकृत दाखला नोंदणी करताना करणे बंधनकारक असून वधू-वरांचे यापूर्वी लग्न झालेले नसलेबाबतचे प्रतिज्ञापत्र सादर करणे बंधनकारक राहील.
            ज्या इच्छूक वधूवरांना या सामुदायिक विवाह सोहळयामध्ये सहभागी होवून लग्न करावयाचे असेल  त्यांनी, या धर्मादायसह आयुक्त या कार्यालयाकडे ५ डिसेंबर,२०१८ रोजी पूर्वी आपला लेखी अर्ज दाखल करावा. मुदतीनंतर आलेल्या अर्जांचा विचार केला जाणार नाही, असे धर्मादाय सह आयुक्त, पुणे विभाग, पुणे यांनी कळविले आहे.
००००

Saturday, November 24, 2018

डिजीटल कनेक्टीविटीच्या माध्यमातून गावांना थेट मंत्रालयाशी जोडणार
-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

पुणे दि. २४: ग्रामविकासाच्या माध्यमातून देशाच्या विकासाची दिशा ठरत असते.केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजनांचा योग्य समन्वय करून गावांनी आपला विकास साधावा. सध्याच्या युगात फिजीकल कनेक्टीविटी बरोबरच डिजीटल कनेक्टिविटीची आवश्यकता असून या माध्यमातूनच गावांना थेट मंत्रालयाशी जोडणार असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज केले. तसेच सरपंचांच्या मानधन वाढीबाबत सरकार सकारात्मक असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
            आळंदी येथील ८ व्या सरपंच महापरिषदेचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले.त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी सकाळ माध्यम समूहाचे व्यवस्थापकीय संचालक प्रतापराव पवार, फोर्स मोटर्सचे व्यवस्थापकीय संचालक प्रदीप धाडीवाल, जैन इरिगेशनचे अतुल जैन, सकाळ माध्यम समूहाचे सल्लागार संचालक श्रीराम पवार, ॲग्रोवनचे संपादक आदिनाथ चव्हाण उपस्थित होते.
         मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुढे म्हणाले, सरपंच महापरिषद हा राज्यातील चांगले काम करणाऱ्या सरपंचांना एकत्र करून चर्चा, संवाद आणि अभिसरण करणारा चांगला मंच आहे. या माध्यमातून राज्यातील सरपंचांना चांगले काम करण्याची दिशा मिळेल. महात्मा गांधी, संत तुकडोजी महराजांसारख्या अनेक विभुतींनी ग्रामविकासाची संकल्पना मांडली. ग्राम विकास हाच देशाच्या आणि राज्याच्या विकासाचा केंद्रबिंदू आहे. गेल्या आठ वर्षातील पाच वर्षे राज्यात दुष्काळाची ‍स्थिती आहे. यावर्षीही राज्यातील २६ जिल्ह्यात हीच परिस्थिती आहे. या दुष्टचक्रातून बाहेर पडण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करण्याची गरज आहे.
            पाण्याच्या योग्य व्यवस्थापनाव्दारे इस्त्राईल सारख्या देशाने क्रांती करून दाखवली आहे, त्याचधर्तीवर आपल्याला काम करण्याची आवश्यकता आहे. जलयुक्त शिवार योजनेच्या माध्यमातून राज्यात गेल्या चार वर्षात मोठे काम झाले आहे. १६ हजार गावात ५ लाख जलसंधारणाची कामे झाली आहेत. मात्र महाराष्ट्राच्या भौगोलिक स्थितीमुळे पावसाचे पाणी जमिनीत मुरण्याला मर्यादा आहेत. तरीही या योजनेच्या माध्यमातून मोठे संचित आपण साध्य केले आहे. 
२०१३-१४ साली १२४ टक्के पाऊस होवूनही आपली उत्पादकता १३७ लाख मेट्रीक टन इतकीच होती, तर गेल्या वर्षी सरासरीच्या तुलनेत ४० टक्के पाऊस कमी पडूनही आपली उत्पादकता ही १८० लाख मेट्रीक टनापर्यंत गेल्याचे सांगत ही जलयुक्त शिवार योजनेची सफलता असल्याचे श्री. फडणवीस यांनी सांगितले.
         जलसंधारणाच्या कामांबरोबरच शेतीत विविध प्रयोग करून उत्पादन खर्च कमी करण्यावर भर देण्याची आवश्यकता आहे. त्याचा भाग म्हणून उन्नत शेती, समृध्द शेती, गट शेती यांसारख्या योजना आपण प्रभावीपणे राबविल्या आहेत. कृषी क्षेत्रातील हरवलेले पारंपारिक कौशल्य शोधून निसर्गाशी संवाद साधण्यावर शेतकऱ्यांनी भर देण्याचे आवाहन श्री. फडणवीस यांनी केले.
         कोणत्याही आपत्तीत शेतकऱ्यांच्या पाठीशी सरकार ठाम असून विविध माध्यमातून ४८ हजार कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आले आहेत. तीन वर्षात १ लाख ४० हजार शेततळ्यांची निर्मिती करून ५ लाख एकराच्यावर सिंचन निर्मिती करण्यात आली आहे. ५ लाख लोकांना वीज कनेक्शन देण्यात आले आहे. दीड लाख सिंचन विहिरींची निर्मिती करण्यात आली आहे. कृषी फिडर सौर ऊर्जेवर टाकण्याचे काम सुरू असून या माध्यमातून शेतकऱ्यांना विनाखंडीत १२ तास विज उपलब्ध करून देण्यात येणार आहे. या प्रकल्पामुळे शासनाची साडे चार हजार कोटी रुपयांची बचत होणार आहे.
       राज्यातील विविध सरकारी जागांवर असणारी अतिक्रमणे नियमित करण्याचा शासन आदेश काढण्यात आला असून या माध्यमातून प्रत्येक गावांनी आपल्या गावातील सर्व अतिक्रमणे नियमित करून घ्यावीत. या जागांवर असणारी कच्ची घरे पक्की करण्यासाठी प्रधानमंत्री आवास योजनेचा लाभ घ्यावा. प्रत्येक सरपंचांनी आपले गाव बेघरमुक्त करण्यासाठी प्रयत्न करावे.२०२१ पर्यंत महाराष्ट्रात प्रत्येकाला घर मिळणार आहे.
       ग्राम सडक योजनेंतर्गत राज्यात ३० हजार किलोमीटर रस्त्यांचे काम सुरू आहे. या रस्त्यांच्या कामांच्या गुणवत्तेबद्दल एशियन बँकेने समाधान व्यक्त केले आहे. राष्ट्रीय पेय जल योजनेव्दारे राज्यातील २५ हजार गावांत पाणी पोहोचविण्यात आले आहे. एक वर्ष आधीच राज्य हागणदारीमुक्त झाल्यामुळे केंद्र सरकारने मोठा निधी या योजनेंतर्गत आपल्याला दिला आहे. यापुढे सर्व पेयजल योजना सौरऊर्जेवर करण्याचा शासनाचा विचार असल्याचे श्री. फडणवीस यांनी सांगितले.
       राज्यातील १५ हजार ग्रामपंचायती भारत नेटच्या माध्यमातून फायबर नेटव्दारा जोडण्यात आल्या आहेत. २६ जानेवारीपर्यंत १० हजार गावांना डिजीटल कनेक्टीविटीने जोडण्यात येणार आहे. या संकल्पनेच्या माध्यमातून राज्यातील प्रत्येक गाव थेट मंत्रालयाशी जोडण्यात येणार असल्याचे सांगत महाराष्ट्र प्रत्येक क्षेत्रात चौफेर प्रगती करत असल्याचे श्री. फडणवीस यांनी सांगितले.
         यावेळी श्री. प्रतापराव पवार, प्रदीप धाडीवाल, अतुल जैन यांची भाषणे झाली.
            यावेळी फोर्स मोटर्सच्यावतीने आयोजित केलेल्या ट्रॅक्टर लकी ड्रॉची सोडत मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांच्या हस्ते काढण्यात आली. सरपंच महापरिषदेत सहभागी झालेल्या श्री. बिंटू पंढरीनाथ भोईटे रा. हिवरखेडे ता. चांदवड, जि. नाशिक यांना हे ट्रॅक्टरचे बक्षीस मिळाले. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते श्री. भोईटे यांचा सत्कार करण्यात आला. 
     या सरंपंच महापरिषदेला राज्याभरातून सरपंच मोठ्या संख्येने उपस्थित होते.
*****