Monday, April 9, 2018

‘इनोव्हेशन रिपब्लिक’ पुस्तकात केंद्र सरकारच्या कामांचा अभ्यासपूर्ण आढावा - राज्यपाल चे. विद्यासागर राव



पुणे दि. 9 (वि.मा.का.): पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या चार वर्षाच्या कालावधीत देशात केलेल्या नाविन्यपूर्ण कामांचा आढावा सामाजिक, आर्थिक, राजकीय आणि प्रशासकीय दृष्टीकोनातूनइनोव्हेशन रिपब्लिक: गव्हर्नन्स इनोव्हेशन्स इन इंडीया अंडर नरेंद्र मोदी या पुस्तकाच्या माध्यमातून मांडला आहे. सुशासनासाठी विविध सोप्या व अभिनव कल्पना सादर करून करण्यात आलेल्या कामांचा संशोधनात्क तपशील या पुस्तकात घेण्यात आला असल्याचे प्रतिपादन राज्यपाल चे. विद्यासागर राव यांनी आज व्हिडीओ कॉन्फरंसिंगव्दारे केले.
येथीलयशदाच्या लेझीम सभागृहात भारतीय सांस्कृतिक संबंध परिषदेचे अध्यक्ष खासदार डॉ. विनय सहस्त्रबुद्धे आणि धीरज अय्यर यांनी लिहीलेल्या  इनोव्हेशन रिपब्लिक: गव्हर्नन्स इनोव्हेशन्स इन इंडीया अंडर नरेंद्र मोदीया पुस्तकाचे प्रकाशन राज्यपाल चे. विद्यासागर राव यांच्या हस्ते होणार होते, मात्र काही तांत्रिक कारणामुळे ते या कार्यक्रमाला येवू शकले नाहीत. त्यामुळे मान्यवरांच्या हस्ते या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. त्यानंतर राज्यपाल चे. विद्यासागर राव यांनी व्हिडीओ कॉन्फरंन्सिंगव्दारे उपस्थितांशी संवाद साधला. यावेळी यशदाचे महासंचालक डॉ. आनंद लिमये, यशदाच्या उपमहासंचालिका प्रेरणा देशभ्रतार, धीरज अय्यर रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीचे चेअरमन अनिरुद्ध देशपांडे, महासंचालक रवींद्र साठे उपस्थित होते.
राज्यपाल चे. विद्यासागर राव म्हणाले, या पुस्तकात केंद्र शासनाकडून सन 2014 ते 2018 या कालावधीत शासनस्तरावर राबविलेल्या 17 नवनवीन कल्पनांचा समावेश आहे. केंद्र सरकारच्या 100 विभागांच्या उपक्रमांद्वारे आणि 17 क्षेत्रांतील नवकल्पनांवर हे पुस्तक आधारित आहे. भूतकाळाचा तपशील पाहिल्यास भारत अनेक वर्षांपासून इनोव्हेशन रिपब्लिक होता. मात्र परकीय शक्तींच्या अधिपत्यामुळे देशाची आर्थिक, राजकीय आणि सामाजिक नुकसान झाले.
गत चार वर्षांच्या कालखंडात, नरेंद्र मोदी सरकारने शासनाच्या विविध क्षेत्रांत भरीव कामगिरी केली आहे. या काळात देशात सामाजिक, आर्थिक आणि राजकीय क्षेत्रात मोठे बदल झाले आहेत. तंत्रज्ञानाच्या मदतीने पारदर्शक आणि गतीमान कारभार करण्यावर या सरकारचा भर राहिला आहे. नाविन्यपूर्ण उपक्रमांच्या माध्यमातून सामान्य जनतेचे जगणे अधिक सुखकर होण्यासाठी या शासनाने मोलाची भूमीका बाजवली असल्याचे त्यांनी सांगितले.
गेल्या चार वर्षात भारताच्या राजनैतिक आणि परदेशी संबंधांमध्ये एक महत्त्वपूर्ण बदल झाला असल्याचे निरीक्षण नोंदवत राज्यपाल म्हणाले, भारताने अमेरिका, रशिया, ऑस्ट्रेलिया आणि आफ्रिकन देशांशी धोरणात्मक भागीदारी बनविली आहे. इस्राईलच्या पंतप्रधानांच्या ऐतिहासिक दौऱ्यामुळे दोन राष्ट्रांमधील मजबूत भागीदारीसाठी नवीन मार्ग उघडण्यात आला आहे.
कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात खासदार डॉ. विनय सहस्त्रबुध्दे म्हणाले, केंद्र शासनाने गेल्या चार वर्षात लोकसहभागावर भर दिल्यामुळे शासनाच्या प्रक्रीयेत सामान्य नागरिकांना सामावून घेण्यात आले आहे. त्याचा  उपयोग देशाच्या विकासासाठी होत आहे. या पुस्तकाच्या माध्यमातून प्रशासनातील सकारात्मक बदल संशोधनात्मक पातळीवर टिपण्याचा प्रयत्न केला आहे.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुमंत पांड्ये यांनी केले. तर आभार अजय सावरीकर यांनी मानले. या कार्यक्रमाला विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
*****















‘आयसीसीआर’च्या माध्यमातून अभ्यास करणारे परदेशी विद्यार्थीच भारताचे खरे सांस्कृतिक दूत -राज्यपाल चे. विद्यासागर राव



पुणे दि. 9 (वि.मा.का.): भारत आणि इतर देशांमधील सांस्कृतिक संबंध वाढवणे, त्यांचे पुनरुज्जीवन करून त्याला बळकटी देणे हेच ‘आयसीसीआर’ अर्थात भारतीय सांस्कृतिक संबंध परिषदेच्या स्थापनेचे खरे उद्दीष्ट आहे. विविध देशातील विद्यार्थ्यांच्या माध्यमातून सांस्कृतिक देवाण-घेवाण करण्यासाठी ही संस्था महत्वाची भूमीका बजावत असून या संस्थेच्या माध्यमातून अभ्यास करणारे विविध देशांतील विद्यार्थी हेच आपल्या देशाचे खरे सांस्कृतिक दूत बनतील असा विश्वास राज्यपाल चे. विद्यासागर राव यांनी आज व्हिडीओकॉन्फरंसींगव्दारे व्यक्त केला.
येथील सावित्रीबाई फुले विद्यापीठाच्या कॅम्पसमध्ये भारतीय सांस्कृतिक संबंध परिषदेच्या नवीन क्षेत्रीय कार्यालयाचे उद्घाटन राज्यपाल चे. विद्यासागर राव यांच्या हस्ते होणार होते. मात्र काही तांत्रिक कारणामुळे ते पुण्यात येवू शकले नाहीत. त्यामुळे या कार्यालयाचे उद्घाटन इंडियन काऊन्सील फॉर कल्चरल रिलेशन्सचे अध्यक्ष खासदार डॉ. विनय सहस्त्रबुद्धे यांच्या हस्ते पार पडले. त्यानंतर झालेल्या कार्यक्रमात राज्यपाल चे. विद्यासागर राव यांनी व्हिडीओ कॉन्फरंसींगव्दारे उपस्थितांशी संवाद साधला. यावेळी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ नितीन करमाळकर, आयसीसीआरचे संचालक उद्योजक मिलींद कांबळे, सैयद मेहमूद आखतर, संस्थेच्या विभागीय कार्यालयाचे वरिष्ठ संचालक कलकित चंद, प्रा. डॉ. विजय खरे उपस्थित होते.
चे. विद्यासागर राव संवाद साधताना पुढे म्हणाले, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या आवारात भारतीय सांस्कृतिक संबंध परिषदेच्या नवीन क्षेत्रीय कार्यालय सुरू झाले ही अत्यंत चांगली गोष्ट आहे. चार महिन्यांपूर्वीच ‘आयसीसीआर’चे अध्यक्षपदाची जबाबदारी स्विकारल्यानंतर डॉ. विनय सहस्त्रबुद्धे यांनी राष्ट्रीय संस्कृती मंडळाच्या कार्यात गतिशीलता आणली आहे. आयसीसीआरचे अध्यक्ष म्हणून त्यांची नियुक्ती हा संपुर्ण महाराष्ट्राचा सन्मान आहे.
मानव संसाधन विकास मंत्रालयाने भारतातील विद्यापीठांसाठी घोषीत केलेल्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ रँकिंग फ्रेमवर्कमध्ये सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ देशात नवव्या स्थानावर आहे, त्याबद्दल मी कुलगुरू आणि विद्यापीठाच्या सर्व टीमचे अभिनंदन करतो. विद्यापीठाची ही प्रगती दिवसेंदिवस बहरत जावो, अशी सदिच्छा त्यांनी व्यक्त केली. 
राज्यपाल पुढे म्हणाले, जगातील विविध देशांशी सांस्कृतिक संबंध प्रस्थापित करताना विद्यार्थी हेच सर्वात महत्त्वाची भूमिका बजावतात. जगभरातील अनेक देश भारताबरोबर सांस्कृतिक आदानप्रदान करण्यास उत्सुक आहेत. आजही कंबोडिया, थायलंड, इंडोनेशिया, जपान आणि इतर देशांत भारताच्या संस्कृतीचा मोठा प्रभाव आढळतो. भारतीय संस्कृतीचा प्रसार-प्रचार झाल्यास त्याचा पर्यटन उद्योगाला मोठा फायदा होणार आहे. पर्यटनाच्या माध्यातूनही सांस्कृतिक देवाण घेवाण होत असते. त्याच बरोबर कला, संगीत आणि नृत्य क्षेत्रात तरुण कलाकारांना व्यासपीठ पुरवणे हे परिषदेचे महत्त्वाचे काम असल्याचे त्यांनी सांगितले.
खासदार डॉ. विनय सहस्त्रबुध्दे म्हणाले, पुणे विद्यापीठात सुरू करण्यात आलेल्या ‘आयसीसीआर’च्या कार्यालयामुळे शैक्षणिक आणि सांस्कृतीक कार्याला गती मिळणार आहे. देशातील संस्थेची कार्यालये अधिक मजबूत करण्यावर भर देणार असून पुढच्या काळात गोवा आणि मुंबईचे कामही पुण्याच्या क्षेत्रीय कार्यालयातून करण्याचा विचार असल्याचे त्यांनी सांगितले.
प्रास्ताविक कुलगुरू नितीन करमाळकर यांनी केले. तर आभार प्रो-व्हाईस चान्सलर डॉ. एन. एस. उमराणी यांनी मानले. यावेळी विद्यापीठाचे रजिस्टार अरविंद शाळीग्राम, प्रभा मराठे, सतिश आळेकर, निलेश कुलकर्णी, मनिषा साठे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर, विद्यार्थी उपस्थित होते.

*****