Saturday, June 30, 2018

आत्मबळ, जिद्द व चिकाटीमुळे यश प्राप्त होते -सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले


            पुणे दि. 30 : अपयशामागे यश लपलेले असते, हे स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवणे आवश्यक आहे. आत्मबळ, जिद्द व चिकीटीमुळे यश प्राप्त होते, असे प्रतिपादन सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले यांनी केले.
             डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था अर्थात बार्टीतर्फे संघ लोकसेवा आयोग-नागरी परीक्षा आणि महाराष्ट्र लोकसेवा आयोग-राज्य सेवा परीक्षा 2017 मधील बार्टीपुरस्कृत तसेच अन्य यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार यशदा येथे आयोजित करण्यात आला होता, त्यावेळी सामाजिक न्याय मंत्री बोलत होते. अनुसूचित आयोगाचे सदस्य न्या.सी.एल.थूल, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचे सचिव दिनेश वाघमारे, बार्टीचे महासंचालक कैलास कणसे, समाज कल्याण आयुक्त मिलींद शंभरकर यावेळी उपस्थित होते.
            यावेळी सामाजिक न्याय मंत्री श्री.बडोले म्हणाले, यशस्वी विद्यार्थ्यांनी आपल्या सेवेकाळात शासन व प्रशासनात ताळमेळ ठेवून समाजाच्या विकासासाठी काम करावे. बार्टीतर्फे विद्यार्थ्यांसाठी विविध प्रकारचे उपक्रम राबविले जातात. या उपक्रमांचा लाभ विद्यार्थ्यांनी घ्यावा. स्पर्धा परीक्षेतील यशस्वी उमेदवारांचा सत्कार अन्य विद्यार्थ्यांना प्रेरणादायी असल्याचे त्यांनी सांगितले. नागरी सेवा स्पर्धा परीक्षेमध्ये उत्तीर्णाचे प्रमाण वाढावे, यासाठी बार्टीतर्फे दोनशे विद्यार्थ्यांना नवी दिल्ली येथील नामांकित खाजगी कोचींग क्लासेसला प्रवेश देण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली. यशस्वी विद्यार्थ्यांना उज्ज्वल भवितव्यासाठी त्यांनी शुभेच्छाही दिल्या.
            अनुसूचित जाती आयोगाचे सदस्य न्या.सी.एल.थूल यांनी, बार्टीच्या उपक्रमांचा फायदा घेत विद्यार्थ्यांनी अन्य क्षेत्रातही यश संपादन करावे असे सांगितले.
            सामाजिक न्याय विभागाचे सचिव दिनेश वाघमारे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. प्रास्ताविकात बार्टीतर्फे राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांसह बार्टीपुरस्कृत विद्यार्थ्यांनी प्राप्त केलेल्या यशाची माहिती दिली.
            यशस्वी विद्यार्थ्यांपैकी नागरी सेवा परीक्षेमध्ये महाराष्ट्रातून प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झालेल्या डॉ.गिरीश बडोले यांनी मनोगत व्यक्त्‍ केले. अपयशातून खचून न जाता, नेटाने प्रयत्न केल्यास यश निश्चित मिळते असे त्यांनी सांगितले.
            नागरी सेवा परीक्षेत यशस्वी विद्यार्थ्यांची माहिती दर्शविणाऱ्या 'यशोगाथा' या पुस्तिकेचे विमोचन सामाजिक न्याय मंत्री यांच्याहस्ते करण्यात आले. त्यांच्याहस्ते, संघ लोकसेवा आयोग नागरी सेवा परीक्षा तसेच महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा त्यांच्या पालकांसह स्मृतीचिन्ह, भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला.
            कार्यक्रमाला यशस्वी विद्यार्थी, त्यांचे पालक, सामाजिक न्याय विभाग व बार्टीचे अधिकारी व कर्मचारी मोठया संख्येने उपस्थित होते.
0000





Friday, June 29, 2018

आषाढी यात्रेसाठी राज्य परिवहन महामंडळाच्या 3781 जादा बसेस उपलब्ध करुन देणार


                                                                     
                   परतीच्या प्रवासासाठी 10 टक्के बसेस आगाऊ आरक्षणासाठी
                                                                              परिवहनमंत्री-दिवाकर रावते





     पंढरपूर दि. 29 :   आषाढी यात्रे निमित्त  श्री विठ्ठल-रुक्मिणी दर्शनासाठी राज्यातील विविध भागातून मोठ्या प्रमाणात भाविक येत असतात. यात्रेसाठी येणा-या भाविकांना सुरक्षित  व सुखकर प्रवासाठी  राज्य परिवहन महामंळामार्फत 3 हजार 781 जादा बसेसची सुविधा उपलब्ध करुन देण्यात येणार  आहे. तसेच परतीच्या प्रवासाठी 10 टक्के बसेस आगाऊ आरक्षणासाठी  उपलब्ध करुन देण्यात येणार असल्याची माहिती परिवहन मंत्री  दिवाकर रावते यांनी दिली.
            आषाढी यात्रेच्या पार्श्वभूमीवर शासकीय विश्रामगृह पंढरपूर येथे  राज्य परिवहन महामंडळामार्फत करण्यात आलेल्या नियोजनाबाबतच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी अतिरिक्त जिल्हाअधिकारी रामचंद्र शिंदे, एस.टी प्रांतधिकारी सचिन ढोले. सहाय्यक पोलीस अधिक्षक निखिल पिंगळे, उपविभागीय पोलीस अधिकारी अनिकेत भारती, तहसिलदार मधुसूदन बर्गे, एस.टी.महामंडळाचे महाव्यवस्थापक आर.आर.पाटील, महाव्यवस्थापक यांत्रिकी श्री. पावणीकर, उपमहाव्यस्थापक वाहुकचे श्री.तोरो,  उपप्रादेशिक परिवहन अधिकारी संजय डोळे,श्रीमती अर्चना गायकवाड, श्री.आजरे,  विभाग नियंत्रक-रमाकांत गायकवाड यांच्यासह संबधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
            यावेळी  परिवहन मंत्री दिवाकर रावते बोलताना म्हणाले,  आषाढी एकादशीच्या निमित्ताने पंढरपूर येथे राज्यातील विविध भागातून मोठ्या प्रमाणत भाविक येत असतात. भाविकांचा प्रवास सुरक्षित व सुखकर व्हावा यासाठी 21  ते 28 जुलै या कालावधीत महामंडळाचे सुमारे 8 हजार कर्मचारी सेवा देणार  असून, या      कर्मचा-यांना  वैद्यकीय सुविधा देण्यात येणार आहे. तसेच प्रवाशांच्याच्या सोयीसाठी तीन तात्पुरत्या बसस्थानकाची निर्मिती  करण्यात येत आहे. या  बसस्थाकावर प्रवाशांसाठी स्वच्छ पिण्याचे पाणी,  फिरती स्वच्छतागृहे, उपहारगृहे, रुग्णवाहिका, विभागनिहाय चौकशी कक्ष तसेच संगणकीय उदघोषणा आदी सोयी उपलब्ध करुन देण्यात येणार असल्याचे परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी यावेळी सांगितले.
           




   आषाढी यात्रेच्या दिवशी चंद्रभागा बसस्थानकावरुन गर्दीच्या ठिकाणाहून बाहेर पडण्यासाठी पोलीस विभागाने एस.टी बसेससाठी राखीव वेळ ठेवावी. जेणेकरुन वाहतुक कोंडी होणार नाही. त्यामुळे भाविकांना  इच्छितस्थळी पोहचता येईल अशा सुचना परिवहन मंत्री श्री.रावते यांनी याबैठकीत दिल्या. तसेच  भंडीशेगांव येथील बाजीराव विहिर येथे शनिवार  दिनांक 21 जुलै  रोजी होणा-या रिंगण सोहळ्याला जाण्यासाठी व येण्यासाठी  चंद्रभागा बसस्थानक  येथून 100 जादा बसेसची सोय उपलब्ध करुन देण्यात येणार  आहे. तसेच यात्रेनंतर परतीच्या प्रवासासाठी प्रवाशांची मोठ्या प्रमाणात गर्दी  असते.  भाविकांना परतीच्या प्रवासासाठी 10 टक्के बसेस आगाऊ आरक्षणासाठी उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. यासाठी महामंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावरुन ऑनलाईन आरक्षण करावे. तसेच   पंढरपूर येथील मठ, यात्री निवास, धर्मशाळा  आदी ठिकाणी  वारकरी व भाविक मुक्कामासाठी थांबले आहेत अशा ठिकाणी  महामंडळाचे कर्मचारी जाऊन प्रवाशांच्या मागणी नुसार आगाऊ आरक्षण करुन देण्यात येणार असून, या सुविधेचा भाविकांनी  लाभ घ्यावा असे आवाहन परिवनमंत्री दिवाकर रावते यांनी  केले.
                        तत्पुर्वी परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी  प्रवाशांच्यासोयीसाठी तात्पुरत्या उभारण्यात येणा-या भिमा बसस्थानक, चंद्रभागा बसस्थानक तसेच विठ्ठल सहकारी साखर कारखाना येथील बसस्थानकांची पाहणी केली. तसेच संबधीत अधिका-यांनकडून माहिती घेवून आवश्यकत्या सुचना केल्या. तसेच रिवहन श्री रावते यांनी  श्री विठ्ठल-रुक्मिणी मातेचे दर्शन घेतले यावेळी मंदीर समितीच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. तसेच नविन  एस.टी.बसस्थानकाची पाहणी करुन  स्थाकावर प्रवाशांच्या सोयीसाठी नवीन पानसर तयार करण्याच्या सुचना संबधित अधिका-यांना दिल्या.          
00000

Wednesday, June 27, 2018

रोजगाराबरोबरच मानव संसाधन निर्मिती ‘सारथी’च्या माध्यमातून निश्चित होईल - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस






पुणेदि. 26 (विमाका):  छत्रपती शाहू महाराज यांना अभिप्रेत असलेला समाज घडविण्यासाठी छत्रपती शाहू महाराज संशोधनप्रशिक्षण व मानव विकास संस्था अर्थात ‘सारथी ही संस्था निश्चितपणे महत्त्वाची भूमिका पार पाडेल आणि रोजगाराबरोबरच मानव संसाधनाची निर्मिती करेलअसा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज व्यक्त केला.
सेनापती बापट मार्गावरील बालचित्रवाणीच्या इमारतीत स्थापन करण्यात आलेल्या सारथी या संस्थेचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते फित कापून करण्यात आलेत्यानंतर सिंबायोसिसच्या सभागृहात आयोजित मुख्य समारंभात ते बोलत होतेकार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी खासदार संभाजीराजे छत्रपती होते.
यावेळी महसूल मंत्री चंद्रकांत पाटीलअन्न व नागरी पुरवठा मंत्री तथा पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापटसामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोलेसामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळेजलसंपदा विभागाचे राज्यमंत्री विजय शिवतारेपुण्याच्या महापौर मुक्ता टिळकसारथी संस्थेचे अध्यक्ष डॉसदानंद मोरेखासदार अनिल शिरोळेआमदार जगदीश मुळीकआमदार गौतम चाबुकस्वारआमदार भीमराव तापकीरआमदार विजय काळेपुणे महानगरपालिकेचे सभागृह नेते श्रीनाथ भिमालेसामाजिक न्याय विभागाचे सचिव दिनेश वाघमारेसामाजिक न्याय विभागाचे आयुक्त मिलिंद शंभरकरबार्टीचे महासंचालक कैलास कणसेसारथी समितीचे व्यवस्थापकीय संचालक डीआरपरिहारसदस्य सचिव उमाकांत शेरकर आदी उपस्थित होते
प्रारंभी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एआयएसएसएमएस कॅम्ससमधील पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
छत्रपती शाहू महाराजांनी सर्वसामान्य माणूस हा केंद्रबिंदू मानून आपल्या संस्थानामध्ये वंचित घटकांना न्याय देण्याचा प्रयत्न केला असल्याचे सांगून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुढे म्हणालेशिक्षण आणि रोजगार हेच मराठा समाजाच्या उन्नतीसाठीचे महत्वाचे घटक आहेतमानवसंसाधन आणि ज्ञान हेच 21व्या शतकाचा मंत्र असून मराठा समाजाला मानव संसाधनात परावर्तीत करण्यासाठीच सारथीची निर्मिती करण्यात आली आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुढे म्हणालेमहाराष्ट्राच्या जडण-घडणीत मराठा समाजाचे योगदान मोठे आहेएका बाजूला राज्यकर्ता समाज आणि दुसऱ्या बाजूला समाजाचा मोठा वर्ग आर्थिक आणि सामाजिक रुपाने मागासलेला आहेत्यामुळेच समाजात अस्वस्थता असणे हे स्वाभाविक आहेमराठा समाजात शिक्षणरोजगार रूजत नाहीसमाज नवतंत्रज्ञानाचा स्वीकार करत नाहीतोपर्यंत समाजाचा विकास होणार नाहीत्यामुळे मराठा समाजाच्या शिक्षणाचा आणि रोजगाराचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी राज्य शासन प्रयत्नशील आहे.
मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी राज्य शासनाने मागासवर्गीय आयोगाची निर्मिती केलीन्यायमूर्ती गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली काम सुरू आहेमराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी राज्य शासन प्रामाणिक प्रयत्न करत आहेशिक्षण आणि रोजगार हेच आरक्षणाचे उद्दिष्ट असतेसारथीच्या माध्यमातून हे प्रश्न सोडविण्यावर भर देण्यात आला आहेराजर्षी शाहू महाराज शिष्यवृत्ती योजनेच्या माध्यमातून अनेक मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न मार्गी लागला आहेरोजगार आणि स्वयंरोजगारावर भर देण्यासाठी आण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे पुनरूज्जीवन राज्य शासनाने केले असल्याचे त्यांनी सांगितले.   
शाहू महाराजांच्या स्वप्नातील युवक घडविण्यावर राज्य शासनाचा भर आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या अरबी समुद्रातील स्मारकामुळे जगभरात भारताची नवी ओळख निर्माण होईल. तसेच रायगड प्राधिकरणाच्या माध्यमातून स्वराज्याची राजधानी राहिलेल्या रायगडाची पुननिर्मिती करण्यात येत आहे. राज्यातील सर्व समाज घटकांना एकत्र करून पुढे जाण्याचा राज्य शासनाचा प्रयत्न आहे. छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती शाहू महाराजांच्या स्वप्नातील समाज डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाच्या माध्यमातून निर्माण करण्याचा प्रयत्न राहीलअसा विश्वास व्यक्त करून ते पुढे म्हणालेमराठा समाजातील मुलांच्या शिक्षणासाठी सर्व जिल्ह्यात शासकीय वसतिगृह निर्माण करण्यात येत आहेमराठा समाजाचे प्रश्न तातडीने मार्गी लावण्यासाठी मंत्री मंडळाच्या उपसमितीची निर्मिती करण्यात आली आहे. या उपसमितीला निर्णय घेण्याचे स्वतंत्र अधिकार देण्यात आले असल्याचेही त्यांनी सांगितले.
यावेळी बोलताना महसूल मंत्री चंद्रकांत पाटील म्हणालेमराठा समाजाच्या हितासाठी सारथी संस्थेची स्थापना करण्यात आली आहेशाहू महाराजांच्या जयंती दिनी ही संस्था कार्यान्वित होत आहेयाचा अधिक आनंद आहेमराठा समाजाचे सर्व प्रश्न मार्गी लावण्यासाठी राज्य शासन सर्वतोपरी प्रयत्न करत आहे.
खासदार छत्रपती संभाजीराजे म्हणालेसारथी संस्थेची उद्दिष्टे, ही छत्रपती शाहू महाराजांना अभिप्रेत होती.  बहुजन समाजाला न्याय देण्याची भूमिका सारथीच्या माध्यमातून राज्य शासनाने घेतली आहे.सारथीच्या माध्यमातून मराठा समाजाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी शासनाने प्रयत्न करावेतमराठा समाजाचे प्रश्न कालबध्द पध्दतीने सोडवावेतअशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.  
यावेळी प्रास्ताविक भाषणात डॉसदानंद मोरे म्हणालेमराठा समाजाचे प्रश्न सोडविण्यासाठी सारथी संस्था राज्य शासनाने स्थापन केली आहेकुणबीमराठा आणि शेतकरी समाजाची सामाजिक,आर्थिक उन्नत्ती करण्यासाठी ही संस्था कायम कटीबध्द राहील.
यावेळी सारथी संस्थेच्या निर्मितीची आणि उद्दीष्टांबाबतची चित्रफित दाखविण्यात आलीउपस्थितांचे आभार बार्टीचे महासंचालक कैलास कणसे यांनी मानले.


सारथी : ठळक वैशिष्ट्ये -
·         मैसूर येथील कुशल कारागिरांनी बनविलेल्या राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या काष्टशिल्पाचे अनावरण मुख्यमंत्र्यांनी केले.
·         सारथी संस्थेच्या बोधचिन्हाचे अनावरण मुख्यमंत्र्यांचे हस्ते झाले.
·         सेनापती बापट रोडपुणे येथील 'बालचित्रवाणीइमारतीमध्ये छत्रपती शाहू महाराज संशोधनप्रशिक्षण व मानव विकास संस्थेचे (सारथी) कार्यालय कार्यान्वित.
·         इमारतीचे क्षेत्रफळ - सुमारे 392 चौरस मीटर.
·         दुमजली इमारत - दोन्ही मजल्यावर प्रत्येकी 11 खोल्या म्हणजेच एकूण 22 खोल्या.
·         इमारतीत 30 ते 35 आसनक्षमतेचे सभागृहव्यवस्थापकीय संचालकनिबंधक यांचा कक्षसंगणक कक्षग्रंथालय व स्वच्छतागृहांची सोय.
·         एकूण 100 कर्मचारी व अधिकारी यांची बैठक व्यवस्था.
·         सारथी संस्थेमार्फत मराठाकुणबीकुणबी-मराठामराठा-कुणबी या समाजातील पदवीधर विद्यार्थ्यांना एम.फील व पीएचडी साठी शिष्यवृत्ती देण्यात येणार.
·         विद्यार्थ्यांना एमपीएससीयूपीएससी तसेच अन्य स्पर्धा परीक्षांचे प्रशिक्षण या संस्थेमार्फत मोफत देण्यात येणार.
*****

Friday, June 22, 2018

उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांचे दिल्लीकडे प्रयाण .






पुणे, दि.२३: दोन दिवसाच्या पुणे भेटीनंतर उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू यांनी पुणे येथील लोहगाव विमानतळावरून आज सकाळी ७.२५ वाजता भारतीय वायुसेनेच्या खास विमानाने दिल्लीला प्रयाण केले.

        विमानतळावर त्यांना निरोप देण्यासाठी अन्न व नागरी पुरवठा मंत्री गिरीश बापट, पुण्याच्या महापौर मुक्ता टिळक, खासदार अनिल शिरोळे, एअर कमांडर के व्ही एस नायर, लेफ्टनंट जनरल मनोज पांडे, विभागीय आयुक्त दीपक म्हैसेकर, पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला, जिल्हाधिकारी नवल किशोर राम, राजशिष्टाचार विभागाचे उपजिल्हाधिकारी विक्रांत चव्हाण आदी मान्यवर उपस्थित होते.
0000

शेतकरी आणि ग्राहक यांच्यात सुयोग्य सांगड घालण्याची आवश्यकता -उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू









पुणे दि. २२: अनियमित मान्सून, बाजार भावांची अनिश्चितता, नैसर्गिक आपत्ती यांचा कृषी क्षेत्रावर थेट परिणाम होत असून यातून शेतकऱ्यांची सोडवणूक करण्यासाठी शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे अधिक गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे. कृषी क्षेत्राला शाश्वत आणि किफायतशीर बनविण्यासाठी कृषीमाल उत्पादक शेतकरी आणि ग्राहक यांची सुयोग्य सांगड घालण्याची आवश्यकता असल्याचे प्रतिपादन उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी आज केले.  
      येथील वैकुंठ मेहता सहकार व्यवस्थापन राष्ट्रीय संस्थेमध्ये आयोजित कृषी क्षेत्र शाश्वत व फायदेशीर या विषयावर आयोजित राष्ट्रीय चर्चासत्राच्या समारोप सत्रात मार्गदर्शन करताना उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू बोलत होते. यावेळी पालकमंत्री गिरीश बापट, केंद्रीय कृषी राज्यमंत्री पुरूषोत्तम रुपाला, आय. व्ही. सुब्बा राव, टी. चटर्जी, प्रो. अशोक गुलाटी उपस्थित होते.
            उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू पुढे म्हणाले, शेती व्यवहार्य, फायदेशीर आणि शाश्वत बनविण्यासाठी बहुस्तरीय धोरण विकसित करण्याची गरज आहे. कृषी क्षेत्रासमोरील आव्हानांचा सामना करण्यासाठी सर्वांना एकत्रित प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे. गेल्या काही वर्षात देशात अन्न-धान्याचे उत्पादन मोठ्या प्रमाणात होत आहे. उत्पादन वाढीबरोबरच आपल्याला अन्नधान्याच्या कार्यक्षम वितरणाची व्यवस्था करावी लागणार आहे. शेतकऱ्यांना पीक पध्दती, कापणी नंतरची प्रक्रिया आणि अन्नप्रक्रिया तंत्रज्ञानाविषयी सल्ला देण्यासाठी कृषि विज्ञान केंद्रांनी अधिक लोकाभिमूकपणे काम करण्याची आवश्यकता आहे.
            सैनिक, वैज्ञानिक आणि शेतकरी यांच्यामुळेच आपल्या देशाला जगभरात सन्मान मिळत आहे. त्यामुळे आपण जय जवान, जय किसान आणि जय विज्ञान या त्रिसुत्रीला कायम स्मरणात ठेवायला हवे. शेतकरी हा सर्वांचा अन्नदाता असून त्याचा सन्मान होण्याची आवश्यकता आहे. अन्न सुरक्षा हीच राष्ट्र सुरक्षेची चावी असून कृषी क्षेत्राला शाश्वत आणि किफायतशीर बनविण्याचे कायम स्वरूपी धोरण स्वीकारण्याची आवश्यकता असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी केंद्रीय कृषी राज्यमंत्री पुरूषोत्तम रूपाला म्हणाले, कृषी क्षेत्राच्या विकासावर अनेक घटकांचा परिणाम होतो, त्यात अनियमित मान्सूनचा मोठा वाटा आहे. विविध उपययोजनांमुळे देशातील शेती उत्पादनात मोठी वाढ झाली आहे. शेतकऱ्याच्या उत्पादित कृषी मालाला योग्य बाजारपेठ मिळवून देणे आवश्यक आहे. केंद्र सरकार त्यासाठी प्रयत्नशील असून सन 2022 पर्यंत शेतकऱ्यांच्या मालाला दुप्पट दर मिळवून देण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. उपराष्ट्रपतींच्या मार्गदर्शनाखाली देशात सुरू असणारी स्वराज्य ते सुराज्य ही चर्चासत्राची शृंखला अत्यंत महत्वाची असल्याचे त्यांनी  सांगितले.
यावेळी आंध्र प्रदेशचे माजी मंत्री व्ही. एस. राव यांनी त्यांच्या गटातील केंद्र सरकारचे कृषी सचिव एस. के. पट्टनायक, प्रो. अशोक गुलाटी यांच्या साथीने सक्षम धोरण मांडणी तयार करणे या विषयावर सादरीकरण केले. भारत सरकारचे कृषी आयुक्त एस. के. मल्होत्रा यांनी त्यांच्या गटातील अराबीन दास, डॉ. के. एच. पुजारी यांच्या साथीने शेतीची गहनता, उच्च मूल्य शेतीसाठी वैविध्य आणि संबध्द कृतीव्दारा उत्पन्नाची पूरकता या विषयावर सादरीकण केले. अशोक दलवाई यांनी विपणन आणि कृषी वाहतूक या विषयावर सादरीकरण केले. निती आयोगाचे सल्लागार जे. पी. मिश्रा यांनी त्यांच्या गटातील संजीव कुमार चढ्ढा, राजेश सिन्हा यांच्या साथीने कृषी व्यापार धोरण या विषयावर सादरीकरण केले. महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरू के. पी. विश्वनाथ यांनी त्यांच्या गटातील डॉ. अशोक पातुरकर, डॉ. लखन सिंह यांच्या साथीने प्रयोग शाळेतील तंत्रज्ञान शेतीपर्यंत पोहोचविणे या विषयावर सादरीकरण केले. भारत सरकाच्या कृषी विभागाचे सह-आयुक्त दिनेश कुमार यांनी कृषी पत आणि विमा या विषयावर सादरीकरण केले.
            यावेळी कृषी क्षेत्रातील तज्ज्ञ, संशोधक, शास्त्रज्ञ उपस्थित होते.
00000

उपराष्ट्रपती एम.व्यंकय्या नायडू यांनी विद्यार्थ्यांकडून घेतली नाविन्यपूर्ण प्रयोगांची माहिती


                 उपराष्ट्रपती एम.व्यंकय्या नायडू यांनी विद्यार्थ्यांकडून
                     घेतली नाविन्यपूर्ण प्रयोगांची माहिती

बारामती  दिनांक 22-उपराष्‍ट्रपती  व्‍यंकय्या नायडू यांनी आज बारामती येथील शारदानगर शैक्षणिक  संकुलातील विद्यार्थ्‍यांनी केलेल्‍या नावीन्‍यपूर्ण उपक्रमांची माहिती घेऊन आनंद व्‍यक्‍त केला.
                            नीती आयोगाकडून शेतीशी निगडीत उद्योग उभारणीसाठी कृषि महाविद्यालयास मंजूर झालेल्‍या भारतातील दुस-या व महाराष्‍ट्रातील पहिल्‍या अटल इन्‍क्‍युबेशन सेंटर आणि अटल टिंकरिंग लॅबच्‍या विद्यार्थ्‍यांशी उपराष्‍ट्रपती  श्री. नायडू यांनी संवाद साधला. संस्‍थेच्‍या दहावीच्‍या विद्यार्थ्‍यांनी तयार केलेल्‍या विविध उपकरणांची माहिती त्‍यांनी जाणून घेतली. टाकाऊतून खेळणी, पवनचक्‍की, अविष्‍कार स्‍वच्‍छता यंत्र, चरख्‍यातून वीजनिर्मिती, ऑब्‍स्‍टॅकल अॅव्‍हॉयडर, ऑटोमॅटीक रेन अलार्म सिस्‍टीम, थ्रीडी प्रिंटर, गॅस सुरक्षा यंत्र, कम्‍युनिकेशन ऑफ डिव्‍हाईसेस युझींग वायफाय, टच सेन्‍सर अशा विविध उपकरणांची उपराष्‍ट्रपतींनी पहाणी केली. याशिवाय  नेदरलँड एज्‍युकेशन प्रोग्राम, सीबीई बेस्‍ड एज्‍युकेशनल थिम्‍सची माहिती घेतली.  अॅग्रीकल्‍चरल डेव्‍हलपमेंट ट्रस्‍ट,  बारामती कृषी महाविद्यालयाच्‍या तसेच शारदाबाई पवार महिला महाविद्यालयाच्‍या विद्यार्थ्‍यांनी जमीनीचा पोत सुधारण्‍यासाठी  तसेच पीक उत्‍पादकता वाढीसाठी तयार केलेल्‍या उत्‍पादनांची माहितीही उपराष्‍ट्रपतींनी घेतली.
                           यावेळी माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार, अन्‍न व नागरी पुरवठा मंत्री तथा पुणे जिल्‍ह्याचे पालकमंत्री गिरीश बापट, खासदार सुप्रिया सुळे, माजी मंत्री अजित पवार, जिल्‍हा परिषदेचे अध्‍यक्ष विश्‍वासराव देवकाते, सुनंदा पवार, शुभांगी पवार, रोहित पवार, रणजीत पवार, राजेंद्र पवार, नीलेश नलावडे, डॉ. एस.पी. महामुनी, प्रा. संतोष कर्णेवार, प्रा. सोनाली सस्‍ते, तेजश्री गोरे, सुनील पवळ,  सूर्यकांत मुंढे आदींची प्रमुख उपस्थिती होती.
                            विभागीय आयुक्‍त डॉ. दीपक म्‍हैसेकर, विशेष पोलीस महानिरीक्षक कृष्‍ण प्रकाश, विशेष पोलीस महानिरीक्षक विश्‍वास नांगरे पाटील, अपर जिल्‍हाधिकारी रमेश काळे, जिल्‍हा पोलीस अधीक्षक सुवेझ हक, बारामतीचे  उपविभागीय अधिकारी हेमंत निकम, उपविभागीय अधिकारी संजय अस्‍वले, बारामतीचे तहसिलदार हनुमंत पाटील,  हेही यावेळी उपस्थित होते.
0 00 0




कृषी विज्ञान केंद्रातील संशोधनाने उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू प्रभावीत


कृषी विज्ञान केंद्रातील संशोधनाने
उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू प्रभावीत

बारामती, दि. २२ - बारामती येथील कृषी विज्ञान केंद्रातील शेती संशोधनाने उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू आज प्रभावीत झाले. कृषी केंद्रातील विविध संशोधन आणि प्रायोगिक प्रकल्पाचे त्यांनी कौतुक केले.
              उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू यांनी आज माळेगाव (ता. बारामती) येथील कृषी विज्ञान केंद्राला भेट दिली. यादरम्यान त्यांनी इंडो-डच सेंटर फॉर व्हेजिटेबल एक्सेलन्स, पशुजनुकीय सुधारणा केंद्र, कृषी विज्ञान केंद्राची प्रशासकीय इमारत अशा विविध ठिकाणांची पाहणी केली. त्यांनी केंद्रातील प्रायोगिक प्लॉटवर जाऊन उत्पादन पाहिले.
            उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू यांचे सकाळी पावणेदहाच्या सुमारास कृषी विज्ञान केंद्र येथे आगमन झाले. त्यावेळी माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार, जिल्हा परिषद सदस्य रोहित पवार, कृषी विज्ञान केंद्राचे अध्यक्ष राजेंद्र पवार, विश्वस्त सुनंदा पवार यांनी त्यांचे स्वागत केले.
उपराष्ट्रपती श्री. नायडू यांनी प्रथम केंद्रातील ग्रीनहाऊसमधील सिमला मिरचीच्या प्लॉटला भेट दिली. केंद्राचे प्रमुख संशोधक सय्यद  शाकीर अली यांनी त्यांना मिरचीचे वाण, उत्पादकता व त्यातून मिळणारे उत्पन्न याबाबत माहिती दिली. इंडो-डच सेंटर फॉर व्हेजिटेबल एक्सेलन्सच्या माध्यमातून पिकविण्यात येणाऱ्या विविध भाज्यांची उत्पादकता कशी वाढवता येईल, या तसेच त्याचा प्रसार केला जाण्यासाठी केंद्राकडून करण्यात येणाऱ्या विविध उपाययोजनांची माहिती उपराष्ट्रपती श्री. नायडू यांनी घेतली.
           उपराष्ट्रपती श्री. नायडू यांनी मधुमक्षिका पालन आणि पशुजनुकीय संशोधनाबाबत माहिती घेतली. तसेच कृषी विज्ञान केंद्राच्या प्रशासकीय इमारतीमध्ये त्यांनी संपूर्ण कृषी विज्ञान केंद्राच्या प्रकल्पाच्या प्रतिकृतीची पाहणी केली.
त्यानंतर कृषी विज्ञान केंद्रातील सभागृहात राजेंद्र पवार यांनी उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू यांचा शाल, बैलगाडीची प्रतिकृती आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. रणजित पवार यांनी पालकमंत्री गिरीश बापट यांचा सत्कार केला. यावेळी उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी कृषी विज्ञान केंद्राची प्रगती आणि विविध संशोधन व प्रायोगिक प्रकल्पांवर आधारित माहितीपट पाहिला.
          यावेळी बारामतीच्या नगराध्यक्षा पौर्णिमा तावरे, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे, जिल्हा परिषद अध्यक्ष विश्वासराव देवकाते, विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर, विशेष पोलीस महानिरीक्षक कृष्णप्रकाश, विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे पाटील, पोलीस अधीक्षक सुवेझ हक, अपर जिल्हाधिकारी रमेश काळे, शुभांगी पवार, डॉ. लखन सिंग आदी उपस्थित होते
000000



बारामतीचे कृषी विज्ञान केंद्र देशासाठी रोल मॉडेल – उपराष्ट्रपती नायडू


बारामतीचे कृषी विज्ञान केंद्र
देशासाठी रोल मॉडेल उपराष्ट्रपती नायडू
बारामती दि.22 : -  कृषी,विज्ञान,शिक्षण क्षेत्रात बारामतीने घेतलेली झेप कौतुकास्पद आहे. येथील  कृषी विज्ञान केंद्र हे देशातील सर्व कृषी विज्ञान केंद्रासाठी रोल मॉडेल आहे, असे प्रतिपादन उपराष्ट्रपती एम.व्यंकय्या नायडू यांनी केले.
बारामती मधील कृषी विज्ञान केंद्र, शारदानगर शैक्षणिक संकुल आणि विद्या प्रतिष्ठान येथील संग्रहालयाला भेट दिल्यानंतर उपराष्ट्रपती नायडू यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते. ज्येष्ठ नेते खासदार शरद पवार, पालकमंत्री गिरीश बापट, खासदार सुप्रिया सुळे, माजी मंत्री अजित पवार, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष विश्वास देवकाते, नगराध्यक्षा पौर्णिमा तावरे आदींची उपस्थिती होती.
                        बारामती येथील कृषी तंत्रज्ञान, शिक्षण क्षेत्रात झालेली प्रगती सर्वांनी आवर्जून पाहण्यासारखी आहे. याशिवाय कृषी क्षेत्रात येथील कृषी विज्ञान केंद्रात झालेले संशोधनही इतर अभ्यासकांना उपयुक्त आहे, असे सांगून उपराष्ट्रपती नायडू म्हणाले, कृषी विस्तार क्षेत्रात सर्व कृषी विज्ञान केंद्रांनी काम करण्याची गरज आहे. भारतीय कृषी अनुसंधान परिषदेनेही संशोधनात मुलभूत काम केले आहे. ते शेतक-यांपर्यंत घेऊन जाण्याची जबाबदारी कृषी विज्ञान केंद्राची असल्याचे त्यांनी नमूद केले.
                          देशातील शेतक-यांपुढे  आणि शेतीसमोर आव्हाने भरपूर आहेत. मात्र त्या आव्हानांचा मुकाबला करण्यासाठी येथे संशोधन क्षेत्रात होत असलेले काम मूलभूत स्वरूपाचे असल्याचे त्यांनी सांगितले.
                          उपराष्ट्रपतीपद स्वीकारल्यानंतर आपण केवळ एकाच ठिकाणी थांबता देशातील चांगल्या संशोधन संस्था, कृषी संस्था, विद्यापीठे यांना आवर्जून भेट देत आहे. तेथील संशोधन, नवीन प्रकल्पांची माहिती घेत असलयाचे श्री.नायडू यांनी नमूद केले.
                           दरम्यान पत्रकारांशी संवाद साधण्यापूर्वी श्री.नायडू यांनी विद्या प्रतिष्ठान येथील संग्रहालयाला भेट दिली. याठिकाणी श्री.पवार यांना विविध ठिकाणांहून भेट मिळालेल्या वस्तू, त्यांची छायाचित्रे यांची श्री. नायडू यांनी पाहणी केली. पाहणीवेळी नायडू हे भारावून गेले होते.
                        "हे संग्रहालय एक असामान्य व्यकतीमत्वाचं व्यक्तीचित्रण करणारे प्रतिबिंब आहे. अतिशय मौल्यवान असा हा ठेवा असून अतिशय उत्कृष्ट पध्दतीने तो जतन करण्यात आला आहे. नवीन युवा पिढीस हा ठेवा निश्चित मार्गदर्शक ठरेल", असा अभिप्राय यावेळी श्री.नायडू यांनी अभिप्राय नोंदवहीत नोंदवला.
                       यावेळी त्यांनी श्री.पवार, श्रीमती सुळे, पालकमंत्री बापट,श्री.अजित पवार, विद्या प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष .व्ही.प्रभुणे, रजिस्ट्रार कुंभाजकर यांच्यासह या संग्रहालयाची पाहणी केली.
                     विभागीय आयुक्त डॅा.दिपक म्हैसेकर,विशेष पोलीस महानिरीक्षक कृष्णप्रकाश, विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरेपाटील, जिल्हा पोलीस अधिक्षक सुवेझ हक आदींची उपस्थिती होती.
0 0 0 0