Monday, October 29, 2018

पाणीपुरवठा मंत्री बबनराव लोणीकर यांच्या हस्ते 277 पाणीपुरवठा योजनांचे ई-भूमीपूजन संपन्न


पुणेदि. 29 – मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल कार्यक्रम व राष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्रमाअंतर्गत पुणे महसूल विभागातील 277 पाणीपुरवठा योजनांचे ई-भूमीपूजन पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर यांच्या हस्ते आज करण्यात आलेकार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अन्न व नागरी पुरवठा तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश बापट होतेयावेळी जलसंपदा राज्यमंत्री तथा सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री विजय शिवतारेपरिवहन राज्यमंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री विजय देशमुखविभागीय आयुक्त डॉदीपक म्हैसेकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
श्रीलोणीकर यांच्या हस्ते पुणे जिल्ह्यातील 1 हजार 823.6 लक्ष रुपये रकमेच्या 82 योजनांचेसातारा जिल्ह्यातील 4 हजार 72 लक्ष रुपये रकमेच्या72, सांगली जिल्ह्यातील 4 हजार 824.35 लक्ष रुपये रकमेच्या 33, कोल्हापूर जिल्ह्यातील 1 हजार 191.51 लक्ष रुपये रकमेच्या 25 तर सोलापूर जिल्ह्यातील 3 हजार 299.68 रुपये किंमतीच्या 65 अशा एकूण योजनांचे 277  योजनांचे ई-भूमीपूजन संपन्न झाले.
यावेळी बोलताना पाणीपुरवठा मंत्री श्रीलोणीकर म्हणालेयापूर्वी अनेक जुन्या योजना असल्याने मागील तीन वर्षांत केंद्र सरकारने नव्या योजना सुरू करण्यास स्थगिती दिली होतीत्या सर्व जुन्या योजना पूर्ण करण्यात आल्या आहेतयावर्षी राष्ट्रीय पेयजल योजनेचा 8 हजार कोटींचा आराखडा मंजूर झाला आहेमुख्यमंत्री पेयजल योजनेमार्फतही 1 हजार कोटींची कामे सुरू आहेया सर्व योजनांची अंमलबजावणी करण्यासाठी स्थानिक लोकप्रतिनिधींनी यात लक्ष घालावेअसे आवाहन श्रीलोणीकर यांनी यावेळी केले.
श्रीलोणीकर यांनी पुणे विभागातील पाणीपुरवठा व स्वच्छता विभागातर्फे राबविण्यात येणाऱ्या राष्ट्रीय पेयजल कार्यक्रममुख्यमंत्री ग्रामीण पेयजल कार्यक्रमजलस्वराज्य टप्पा 2, महाराष्ट्र जीवन प्राधीकरण आणि स्वच्छ भारत मिशन (ग्रामीणकार्यक्रमांचा जिल्हानिहाय आढावा घेतलायावेळी कृती आराखडाअंदाजपत्रकेसमाविष्ट उद्दीष्टप्रगतीपथावर असलेल्या योजनांची सद्यस्थिती व कामांदरम्यान निर्माण होणाऱ्या अडीअडचणी व समस्यांबाबत चर्चा करण्यात आली.
या कार्यक्रमास माजी पाणीपुरवठा मंत्री तथा आमदार दिलीप सोपलज्येष्ठ आमदार गणपत देशमुखआमदार बाबूराव पाचर्णे,आमदार भारत भालके,आमदार नारायण पाटीलआमदार राहूल कुलआमदार प्रशांत परिचारकसोलापूर जिल्हा परिषद अध्यक्ष संजय शिंदेसांगली जिल्हा परिषद अध्यक्ष संग्रामसिंह देशमुखकोल्हापूर जिल्हा परिषद अध्यक्ष शौमिका महाडीकविकास उपआयुक्त चंद्रकांत गुडेवारपुण्याचे जिल्हाधिकारी नवलकिशोर राम,महाराष्ट्र जीवन प्राधीकरणचे मुख्य अभियंता सुभाष भुजबळकार्यकारी अभियंता वैशाली आवटे यांच्यासह वरीष्ठ अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
000000



Tuesday, October 23, 2018

राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांचे पुणे येथून दिल्लीकडे प्रयाण


पुणे दि. 23: राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांचे आज वायुसेनेच्या विमानाने पुणे येथून दिल्लीकडे प्रयाण झाले.  यावेळी राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी पुष्पगुच्छ देवून त्यांना निरोप दिला.
यावेळी अन्न व नागरी पुरवठा मंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश बापटपुण्याच्या महापौर मुक्ता टिळकलेफ्टनंट जनरल मनोज पांडेएअर कमोडोर के.व्ही.एस. नायरविभागीय आयुक्त दीपक म्हैसेकरपोलीस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशमजिल्हाधिकारी नवल किशोर राम आदी उपस्थित होते .
00000


सिम्बायोसिस विद्यापीठाचा १५ वा पदवीदान समारंभ थाटात संपन्न



देशाच्या शैक्षणिक परंपरेचा वारसा जोपासत विद्यार्थ्यांनी देश उभारणीत योगदान द्यावे 

                                                                                                                          - राष्ट्रपती रामनाथ कोविंद

पुणे दि. २३: भारत अनेक शतकांपासून जागतिक ज्ञान केंद्र आहे, तक्षशिला ते नालंदा असा आपल्या देशाला मोठा शैक्षणिक परंपरेचा वारसा लाभला आहे. हा वारसा जोपासत विद्यार्थ्यांनी आपल्या बौध्दिक संपदेचा वापर देशाच्या उभारणीसाठी करण्याचे आवाहन राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी आज केले.  
लवळे येथे सिम्बायोसिस आंतरराष्ट्रीय अभिमत विद्यापीठाच्या १५ व्या पदवीदान समारंभ राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या उपस्थितीत पार पडला, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी राष्ट्रपतींच्या सुविद्यपत्नी सविता कोविंद, राज्यपाल चे. विद्यासागर राव, शिक्षणमंत्री विनोद तावडे, पालकमंत्री गिरीश बापट, विद्यापीठाचे कुलपती शां. ब. मुजूमदार, कुलगुरू रजनी गुप्ते, लेह-लडाखचे शिक्षणतज्ज्ञ तथा शास्त्रज्ञ डॉ. सोनम वांगचूक उपस्थित होते.  
राष्ट्रपती रामनाथ कोविंद म्हणाले, शिक्षण घेण्यासाठी जात,‍ लिंग, भाषा, देश यांची कोणतीही बंधने नसतात. शिक्षणामुळे जगभरातील संधीची दारे उघडली जातात. शिक्षण हे प्रत्येकाला जबाबदारीची जाणीव करुन देते. आपल्या देशाला तक्षशिला ते नालंदा असा उज्ज्वल शैक्षणिक वारसा आहे. संपूर्ण आशिया खंडातील विद्यार्थी शिक्षणासाठी भारतात येत होते. हा वसुधैव कुटुंबकमचा वारसा सिंम्बायोसिस विद्यापीठ चालवत आहे. जगभरातील विविध देशांचे विद्यार्थी या ठिकाणी शिक्षणासाठी येतात, ही गौरवाची बाब आहे. या ठिकाणी शिक्षण घेतलेले परदेशातील विद्यार्थी आपले कायमचे मित्र तर होतीलच, परंतु ते आपले अनौपचारिक राजदूत म्हणून काम करतील, असा विश्वास श्री. कोविंद यांनी व्यक्‍त केला.
 राष्ट्रपती रामनाथ कोविंद पुढे म्हणाले, देशातील अनेक विद्यापीठे आणि शैक्षणिक संस्थांना भेट देवून तेथील विद्यार्थ्यांशी संवाद संवाद साधतो, आता गुणवत्तेत मुलांपेक्षा मुलीचे प्रमाण वाढल्याचे या निमित्ताने समोर येत आहे. हे आपल्या समाजासाठी आनंदाचे द्योतक असून अभिमानाची बाब आहे. पुणे शहराला मोठी शैक्षणिक परंपरा आहे. १९४८ साली फुले दाम्पत्याने पहिली मुलींची शाळा सुरू करून या परंपरेला सुरुवात केली. त्याच बरोबर न्यायमूर्ती रानडे, गोपाळ कृष्ण गोखले, गोपाळ गणेश आगरकर, लोकमान्य टिळक, वासुदेव बळवंत फडके या लोकोत्तर पुरुषांचा वारसा या शहराला लाभला आहे. या शहराशी महात्मा गांधी आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचेही ऋणानुबंध असल्याचे श्री. कोविंद यांनी सांगितले.
यावेळी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते शास्त्रज्ञ डॉ. सोनम वांगचूक यांना मानद डॉक्टरेट पदवी प्रदान करण्यात आली. यावेळी विद्यापीठातील गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांना राष्ट्रपतींच्या हस्ते पदवी प्रदान करण्यात आली.  कार्यक्रमानंतर राष्ट्रपतींच्या हस्ते विद्यापीठाच्या आवारात वृक्षारोपण करण्यात आले.    
यावेळी डॉ. सोनम वांगचूक, कुलगुरु रजनी गुप्ते यांची भाषणे झाली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. शां. ब. मुजूमदार यांनी केले. तर आभार कुलसचिव एम. जी. शेजूल यांनी मानले. यावेळी विद्यापीठाच्या प्रधान संचालिका विद्या येरवडेकर, विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर, कोल्हापूर परिक्षेत्राच्या विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास पाटील, जिल्हाधिकारी नवल किशोर राम, जिल्हा पोलीस अधिक्षक संदीप पाटील, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सूरज मांढरे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर, विद्यार्थी, पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
******










Saturday, October 20, 2018

वास्तुविशारद शाखेच्या विद्यार्थ्यांनी पर्यावरणपूक नगर निर्मितीसाठी योगदान द्यावे … मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस


                                                                                  

        पुणे,दि.20 :-  मोठया प्रमाणावर शहरीकरण होत असताना शहरांचा नियोजनबध्द विकास होणे गरजेचे आहे. सध्या तापमानवाढीचं मोठ संकट आपल्यासमोर आहे. यासाठी वास्तुविशारद शाखेच्या विद्यार्थ्यांनी पर्यावरणाचा विचार करुनउत्कृष्ट दर्जाच्या नगर निर्मितीसाठी योगदान देणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
            सतीश मिसाळ एज्युकेशन फाऊंडेशनच्या ब्रिक स्कूल ऑफ आर्किटेक्चरउंड्री या संस्थेचा पहिला पदवीप्रदान समारंभ मुख्यमंत्री श्री.फडणवीस यांच्याहस्ते संपन्न झालात्यावेळी ते बोलत होते. यावेळी महिला व बालविकास मंत्री पंकजा मुंडेमहापौर मुक्ता टिळकसावित्रीबाई फुले पुणे विद्यापिठाचे कुलगुरु नितीन करमळकरसंस्थेच्या विश्वस्त आमदार माधुरी मिसाळकार्यकारी संचालक पूजा मिसाळदीपक मिसाळप्राचार्या पूर्वा केसकर आदि मान्यवर उपस्थित होते.
    कार्यक्रमात थेसीस कॅटलॉगचे प्रकाशन श्री.फडणवीस यांच्याहस्ते करण्यात आले. तसेच विशेष प्राविण्य मिळविणाऱ्या व पदवीप्राप्त विद्यार्थ्यांना पदवी प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.
                पदवी संपादन केलेल्या सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन करुन मुख्यमंत्री श्री. फडणवीस  म्हणालेइतक्या कमी वेळेत आणि कमी काळात ब्रिक एज्युकेशन संस्थेने शैक्षणिक क्षेत्रात चांगले नाव कमाविले आहेहे कौतुकास्पद आहे.
 नगर नियोजनात शाश्वत विकासाचा विचार करणे गरजेचे असल्याचे सांगून ते पुढे म्हणालेजगातलं सर्वोत्तम स्थापत्यशास्त्र भारतात तयार झालं आहे. हडाप्पा आणि मोहंजोदडोसारखी सुनियोजित शहरे ही प्राचीन काळातील उत्कृष्ट स्थापत्यशास्त्राची उदाहरणे आहेत. सध्या नगररचना नियोजनाची पर्यायाने अधिक नगररचनाकारांची आवश्यकता आहे. देशाची निर्मिती व बांधणीमध्ये या अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांनी योगदान द्यावे व दर्जेदार मानव संसाधन निर्माण करावे.
            एकविसावे शतक सर्वोत्तम गुणवत्तेचे आहे. यामध्ये विद्यार्थ्यांनी सामान्य दर्जाचे न राहता अधिकाधिक ज्ञान ग्रहण करुन समाजाला उत्कृष्ट सेवा पुरवावी. देशाचा विकास झपाटयाने होत असतांना विद्यार्थ्यांनी तंत्रज्ञानरुपी अश्वावर स्वार होणे आवश्यक आहेअसे सांगितले. आपल्याला समाजाकडून जे मिळतेते समाजाचं देणं असतं. आपल्या कार्यकर्तृत्वातून विद्यार्थ्यांनी समाजाला परत देण्याची भूमिका घ्यावीअसे आवाहन श्री.फडणवीस यांनी यावेळी केले.
            महिला व बालविकास मंत्री पंकजा मुंडे म्हणाल्यासंस्थेच्या विद्यार्थ्यांचा उत्साह वाखाणण्याजोगा आहे. तरुणांनी नवनवी आव्हानं पेलून ती पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करावेत. आव्हानांना सामोरं जाताना अपयश आलं तरीही विद्यार्थ्यांनी खचून न जाता धैर्याने यशस्वी वाटचाल करावी. आर्किटेक्टचे विद्यार्थी म्हणजे नवनव्या संकल्पना मांडून त्या साकार करण्याची क्षमता असणारे विद्यार्थी असतात. आपल्या संकल्पना मूर्त स्वरुपात आणून देशाच्या निर्मितीमध्ये योगदान द्यावेअसेही त्या म्हणाल्या.
            प्रास्ताविकातून पूजा मिसाळ यांनी संस्थेच्या प्रगतीची माहिती दिली. प्राचार्या पूर्वा केसकर यांनी आभार मानले. यावेळी खा.अनिल शिरोळे,आ.भीमराव तापकीरआ.संजय भेगडे,आ.योगेश टिळेकर तसेच लोकप्रतिनिधीशिक्षण क्षेत्रातील मान्यवरविद्यार्थीपालकशिक्षक मोठया संख्येने उपस्थित होते.






Wednesday, October 17, 2018

संभाव्य टंचाई सदृश्य परिस्थितीचा सामना करण्यासाठी शासनाच्या सर्व विभागांनी काटेकोर नियोजन करावे - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचना



सोलापूर, दि. 17 : सोलापूर जिल्ह्यात शेततळी, जलयुक्त शिवार, मनरेगा, सिंचन विहिरी आदी कामे चांगली झाली आहेत. मात्र यावर्षी जिल्ह्यात सरासरीच्या तुलनेत अवघा 38 टक्के पाऊस झाला आहे. अगामी काळात टंचाईची परिस्थिती उद्भवू शकते याचा विचार करून शासनाच्या सर्व विभागांनी समन्वयाने नियोजन करण्याच्या सूचना देत जिल्ह्यातील विकासाला गती देवून दोन महिन्यात उर्वरीत विकास कामे पूर्ण करण्याच्या सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिल्या.
सोलापूर जिल्ह्यातील पर्जन्यमान, पिकपाणी व राज्य शासनाच्या विविध योजनांचा आढावा मुख्यमंत्री  फडणवीस यांनी आज बहुउद्देशीय सभागृहात घेतला. यावेळी सहकारमंत्री सुभाष देशमुख, पालकमंत्री विजयकुमार देशमुख, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजय शिंदे, महापौर शोभा बनशेट्टी, खासदार शरद बनसोडे, मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव प्रवीणसिंह परदेशी, विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर, कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास पाटील, जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले, सोलापूरचे पोलीस आयुक्त महादेव तांबडे, जिल्हा पोलीस अधिक्षक मनोज पाटील  उपस्थित होते.
या बैठकीत मुंबई येथून मुख्य सचिव डी.के.जैन यांच्यासह प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून सहभागी झाले.
यावेळी मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, 'सोलापूर जिल्ह्यात यावर्षी अवघा  38 टक्के पाऊस झाला आहे. जिल्ह्यातील एकूण 91 मंडलापैकी 68 मंडलात 50 टक्क्यांपेक्षा कमी पाऊस झाला आहे. तुलना करता ही स्थिती सन 2015 सालाशी साधर्म्य असणारी आहे. दुष्काळाच्या संदर्भात केंद्र शासनाने 2016 मध्ये काही वैज्ञानिक निकष घालून दिले आहेत. यामध्ये कमी पर्जन्यमानाबरोबरच दोन पावसातील खंडीत अंतराचा समावेश आहे. तसेच किमान 10 गावात पीक कापणीचे प्रयोग करून त्यांचे विश्लेषण करून टंचाई घोषीत करण्याबाबत निर्णय देण्यात येणार आहे. या वैज्ञानिक निकषांच्या आधारावर आपली पाहणी सुरू असून त्याचे अहवाल आल्यानंतरच याबाबतचा योग्य निर्णय घेतला जाईल.
सुदैवाने यावर्षी उजनी धरणात 96 टक्के पाणी आहे, त्यामुळे या टंचाईची तीव्रता कमी भासेल असे सांगत टंचाईची तीव्रता कमी भासावी यासाठी पिण्याच्या पाण्याचे स्त्रोतांच्या अधिग्रहणासह चारा लागवडीचे नियोजन करण्याच्या सूचना श्री. फडणवीस यांनी दिल्या.   
राज्य शासनाच्या अग्रक्रमांच्या योजनांतील जलयुक्त, शेततळे, नरेगामध्ये विहीरींची कामे चांगल्या पद्धतीने झाली आहेत. मात्र काही योजनांमध्ये कामे रेंगाळली आहेत. ग्राम सडक योजनेची प्रगती मंद गतीने होत आहे. त्यामुळे यंत्रणेने यामध्ये लक्ष देऊन मार्चपर्यंत रस्त्यांची कामे पूर्ण करावीत. दिलेली उद्दिष्टे पूर्ण करण्यासाठी तालुका स्तरावर नियोजन करावे. येत्या दोन महिन्यांत विकासकामे ‘मिशन मोड’ मध्ये पूर्ण करावीत. या योजनांच्या प्रगतीचा आढावा घेण्यासाठी  दोन महिन्यानंतर पुन्हा बैठक घेण्यात येईल.
अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ योजनेत कर्जाची  हमी शासनाने घेतली आहे. त्यामुळे महामंडळाने प्रकरणे मंजूर करून अर्थसहाय उपलब्ध करुन देण्यासाठी बँकांशी समन्वय साधावा. महामंडळाने संबंधित बँकांच्या जिल्हा समन्वयकांना यादी उपलब्ध करून पात्र अर्जदारांना वित्त सहाय्य तातडीने उपलब्ध करुन देण्यासाठी पाठपुरावा करावा. मुद्रा योजनेत सोलापूर जिल्ह्याचे काम चांगले झाले असून 1 लाख 34 हजार 845 लाभार्थ्यांना 524.15 कोटी रुपयांच्या कर्जाचे वाटप झाले आहे. संपर्ण राज्यात ही आकडेवारी अत्यंत चांगली आहे, असे श्री. फडणवीस यांनी सांगितले.
भूसंपादनासाठी निधी
            सोलापूरसाठीच्या थेट पाईपलाईन प्रकल्पासाठी भूसंपादन करण्यासाठी सुमारे तीनशे कोटी रुपयांचा निधी दिला जाईल मात्र पाईपलाईन प्रकल्प गतीने पूर्ण करायला हवा, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
            उजनी धरणातून सोलापूर शहरासाठी पिण्याचे पाणी आणण्याच्या प्रकल्पाचे काम आराखडा स्तरावर आहे. मात्र भूसंपादन आणि प्रकल्पाची किंमत साडेचारशे कोटी रुपये असल्याने त्याची निवीदा प्रक्रीया राबवण्यास उशीर होत असल्याचे सोलापूर महानगर पालिकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. मात्र आता निवीदा प्रक्रीया सी फॉर्म पध्दतीने केली जावी. त्यासाठी आवश्यक तांत्रिक प्रक्रिया 31 ऑक्टोबरपुर्वी करावी आणि कामकाजास सुरुवात केली जावी, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
            सेालापूर शहरात पंतप्रधान आवास योजनेतून 220 घोषित झोपडपट्ट्यांवर नवीन घरकुले बांधण्याच्या कामास प्राधान्य दिले जावे. या योजनेत जास्तीत जास्त नागरिक सहभागी होतील यासाठी महानगरपालिकेने विशेष प्रयत्न करावेत. रे नगर येथील गृहनिर्माण प्रकल्पास राज्य शासनाने 120 कोटी रुपये देण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे असंघटीत कामगारांना हक्काचे घर मिळण्यास मदत होणार आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
            सोलापूरमध्ये अमृत अभियानातून उभारण्यात येणारे शहरी भुयारी गटार योजना, टर्शरी ट्रीटमेंट प्लांट आणि पाणी पुरवठा योजना यासाठी आवश्यक असणारा निधी देण्यात आला आहे. निधीची गरज भासल्यास नगरोत्थान योजनेतून आणखी निधी दिला जाईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
गुन्हे  उघडकीस आणण्यासह
अपराधसिध्दीचे प्रमाण वाढवा
            सामान्य लोकांच्या जीवनाशी निगडीत असणारे घरफोडी, मोबाईल चोरी आणि इतर चोऱ्यांना आळा घालण्यासाठी उपायोजना करताना या प्रकरणातील गुन्हे उघडीस आणण्याचे प्रमाण वाढविण्यासाठी विशेष प्रयत्न करा. त्याच बरोबर चोरीला गेलेला माल परत मिळवून तो मूळ मालकांना देण्याची प्रक्रीया गतीने राबविण्याच्या सूचना श्री. फडणवीस यांनी दिल्या.
            गुन्हे सिध्दतेचे प्रमाण वाढविण्यासाठी सरकारी वकील आणि पोलीस यांनी समन्वयाने काम करावे. सामान्यांचा विश्वास पोलीस यंत्रणेवर वाढविण्यासाठी प्रयत्न करावेत. पोलीस विभागातील वरिष्ठांनी सामान्य कर्मचाऱ्यांशी सुसंवाद ठेवावा. सोलापूरमधील पोलीस वसाहतींचा प्रश्न तातडीने मार्गी लावण्याबरोबरच पोलीसांसाठी मालकी हक्कांच्या घरांची योजना राबविण्यासाठी तातडीने पाऊले उचलण्याच्या सूचना श्री फडणवीस यांनी  दिल्या.  
            यावेळी महसूल, पोलीस, सार्वजनिक आरोगय, न्यायालयीन अधिकारी, सार्वजनिक बांधकाम, जिल्हा परिषद आदी विभागाचे अधिकारी उपस्थ‍ित होते.
0000









राज्यशासकिय निवृत्तीवेतन धारकांच्या मेळाव्याचे आयोजन


पुणे,दि.17 :-   कोषागार कार्यालयातर्फे पुणे जिल्ह्यातील राज्यशासकिय निवृतीवेतन धारकांचा मेळावा मंगळवार दिनांक 23 ऑक्टोबर 2018 रोजी सकाळी 11 वाजता आयोजित करण्यात आला आहे. हा मेळावा महात्मा गांधी सभागृह , बी. जे. वैद्यकिय महाविद्यालय, पुणे  येथे आयोजित करण्यात आला आहे.
सर्व निवृत्तीवेतन धारकांनी मेळाव्यास उपस्थित रहावे, असे आवाहन वरिष्ठ कोषागार अधिकारी यांनी केले आहे.   
0000

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सोलापूर विमानतळावर स्वागत



            सोलापूर दि. 17 :-  राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज सोलापूर दौऱ्यावर आले असून सोलापूर विमानतळावर त्यांचे उत्स्फूर्त स्वागत करण्यात आले. मुख्यमंत्री यांच्या समवेत सहकारमंत्री सुभाष देशमुख, मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव प्रविणसिंह परदेशी यांचेही आगमन झाले.
            विमानतळावर पालकमंत्री विजय देशमुख, महापौर शोभाताई बनशेट्टी, खासदार शरद बनसोडे, उपमहापौर शशिकला बत्तुल, पुणे विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर, कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे - पाटील, जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले, पोलीस आयुक्त महादेव तांबडे, मुख्य कार्यकारी अधिकारी  डॉ. राजेंद्र भारुड, पोलीस अधिक्षक मनोज पाटील, प्रांताधिकारी शिवाजी जगताप यांनी मुख्यमंत्री यांचे स्वागत केले. यावेळी मान्यवर, पदाधिकारी, अधिकारी उपस्थित होते.
*****





गृहनिर्माण संस्था पदाधिकाऱ्यांची निवडणूक शाखेतर्फे बैठक



        पुणे,दि.17 :-  1 जानेवारी 2019 च्या अर्हता दिनांकावर आधारित मतदार याद्यांचा संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम निवडणूक आयोगातर्फे हाती घेण्यात आला आहे. या अनुषंगाने, पुणे व पिंपरी महानगरपालिका हद्दीतील सहकारी गृहनिर्माण संस्थांचे अध्यक्ष व सचिव यांना निवडणुक विषयक कामकाजात सहभागी करून घेऊन, मतदार नोंदणी करण्याच्या दृष्टीने व प्रत्यक्ष निवडणूकीच्या काळात मतदान केंद्रस्तरीय स्वंयसेवक म्हणून नेमणूक करण्यासंदर्भात जिल्हाधिकारी, पुणे यांच्या अध्यक्षतेखाली 19 ऑक्टोबर 2018 रोजी दुपारी 12-00 वाजता बैठक आयोजित करण्यात आली आहे. सदरहू बैठक बी विंग, जिल्हाधिकारी कार्यालय, 4 था मजला सभागृह, पुणे येथे आयोजित करण्यात आली आहे.या बैठकीस सर्व संबंधितांनी उपस्थित रहावे, असे आवाहन उप जिल्हा निवडणूक अधिकारी, पुणे यांनी केले आहे.
00000

टंचाईवर मात करण्यास शासन कटीबद्ध - पालकमंत्री विजय देशमुख यांचा शेतकऱ्यांना दिलासा






            

             सोलापूर दि.16 :-  जिल्ह्यात समाधानकारक पाऊस न झाल्यामुळे पाण्याअभावी खरिपाचे  पीक निघाले नाही,  रब्बीची पेरणी झाली नाही. यामुळे जनावरांच्या चाऱ्यासह पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर होणार आहे. टंचाई परिस्थितीवर मात करण्यासाठी शासन कटीबद्ध असून शेतकऱ्यांनी निर्धास्त रहावे, असा दिलासा पालकमंत्री विजय देशमुख यांनी आज बार्शी येथे बोलतांना दिला.
            कृषी उत्पन्न बाजार समिती बार्शी येथे टंचाई परिस्थितीबाबत आयोजित केलेल्या बैठकीत पालकमंत्री देशमुख बोलत होते. यावेळी माजी आमदार राजाभाऊ राऊत, जिल्हा परिषद सदस्य किरण मोरे, श्रीमंत थोरात, तहसीलदार ऋषिकेश शेळके,गटविकास अधिकारी प्रमोद काळे, तालुका कृषी अधिकारी राजेंद्र चौधरी यांच्यासह संबंधीत विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
            पालकमंत्री  देशमुख म्हणाले, ‘जिल्ह्यातील सर्वच तालुक्यात टंचाईची परिस्थिती निर्माण झाली आहे. सर्व परिस्थितीचा अहवाल संबधीत यंत्रणा मार्फत घेतला जाईल. संभाव्य काळात पिण्याच्या पाण्याची आणि जनावरांच्या चाऱ्याची टंचाई भासणार नाही, या दृष्टीने आवश्यक उपाय - योजना केल्या जातील.  पिण्याच्या पाण्यासाठी टँकर सुरु करण्यासाठी प्रस्ताव आल्यास त्यावर सकारात्मक निर्णय घेतला जाईल. टंचाई काळात जनावरांच्या चारा, रोजगार हमीच्या कामांना प्राधान्य देण्यात येईल. जलयुक्त शिवार योजनेमुळे काही प्रमाणात दिलासा मिळाला असून, या पुढेही नाला सरळीकरण, खोलीकरण आदी कामे लोकसहभागातुन सुरु करावीत’.
             तहसीलदार शेळके यांनी तालुक्यातील टंचाई परिस्थितीबाबत माहिती दिली.
            पालकमंत्री देशमुख यांनी बार्शी तालुक्यातील श्रीपत पिंपरी येथील रामराजे सुरवसे यांच्या तूर व ऊस, शेंद्री येथील बाळासाहेब कासार, हनुमंत मोरे  खांडवी येथील सुरेश शेळके व सुभाष माळी यांच्या पिकांची पाहणी करुन  शेतकऱ्याशी सवांद साधला.  उपळाई  येथील बार्शी उपसा सिंचन योजनेअंतर्गत वितरण केंद्राला पालकमंत्री देशमुख यांनी भेट देऊन योजनेची अपूर्ण असलेली कामे सुरु करण्याबाबत  कार्यवाही केली जाईल, असे सांगितले.
*****