Monday, January 14, 2019

“खेलो इंडिया”च्या माध्यमातून देशभरातील क्रीडा क्षेत्रातील हिरे सापडतील - पालकमंत्री गिरीश बापट



पुणे दि. 14: खेलो इंडिया स्पर्धेच्या माध्यमातून देशाच्या कानाकोपऱ्यातील खेळाडूंना आपली प्रतिभा दाखविण्यासाठी मोठा मंच उपलब्ध झाला आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून क्रीडा क्षेत्रातील हिरे सापडतील, असा विश्वास पालकमंत्री गिरीश बापट यांनी आज व्यक्त केला.
महाळुंगे-बालेवाडी येथील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलात खेलो इंडिया युथ गेम्स मधील वेटलिफ्टिंग क्रीडा प्रकारातील पदकांचे वितरण पालकमंत्री गिरीश बापट यांच्या हस्ते झाले. त्यानंतर ते बोलत होते. श्री बापट यांनी खेलो इंडियातील स्पर्धेतील कबड्डीसह इतर मैदानाला भेट देवून खेळाडूंना प्रोत्साहन दिले. तसेच मैदानातील व मैदाना बाहेरील व्यवस्थेची माहिती घेवून पाहणी केली.
पालकमंत्री श्री बापट म्हणाले, खेलो इंडिया स्पर्धेचे हे दुसरे वर्ष आहे. या माध्यमातून देशभरातील मुलांना क्रीडा प्रकारात आपले नैपुण्य दाखविण्याची मोठी संधी उपलब्ध झाली आहे. खेलो इंडियामध्ये सहभागी झालेल्या खेळाडूंना अत्याधुनिक व तंत्रशुध्द प्रशिक्षण उपलब्ध होत आहे. त्यामुळे येणाऱ्या ऑलिम्पिक स्पर्धेसाठी हे खेळाडू तयार होवून आपल्या देशाची कामगिरी उंचावेल.
केंद्र सरकारने खेलो इंडिया स्पर्धेचे आयोजन करण्याची संधी महाराष्ट्राला दिल्यामुळे क्रीडा क्षेत्राविषयी चांगले वातावरण राज्यात निर्माण झाले आहे. या वातावरणाचा लाभ राज्यातील मुलांना होईल, तसेच इतर युवकही आता खेळांकडे आकर्षित होतील असा विश्वास व्यक्त करत या स्पर्धेच्या नियोजनाबाबत समाधान व्यक्त केले.
*****

Thursday, January 10, 2019

खेलो इंडीया -यूथ गेम्स -2019 पत्रकारांसाठी अद्यावत मिडीया सेंटर

खेलो इंडीया -यूथ गेम्स -2019
पत्रकारांसाठी अद्यावत मिडीया सेंटर

पुणे दि. १० : पुणे येथे आयोजित खेलो इंडीया युथ गेम्ससाठी विविध माध्यामातील क्रीडा पत्रकार वार्तांकनासाठी आले असून त्यांना एकाच ठिकाणी सुलभतेने वृत्त पाठविण्याची सुविधा होण्याच्या दृष्टीने अद्यावत मिडीया सेंटर उभारण्यात आले आहे.
नाशिकचे जिल्हा क्रीडा अधिकारी तथा माध्यम समन्वयक रविंद्र नाईक व माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या पुणे विभागातर्फे समन्वय साधण्यात येत आहे.
म्हाळूंगे-बालेवाडीच्या शिवछत्रपती क्रीडा संकुलाच्या मुख्य इमारतीतील दुसऱ्या माळ्यावर हे मिडीया सेंटर आहेदेशभरातून आलेल्या पत्रकारांना कोणतीही अडचण येवू नयेयासाठी इमारतीत प्रवेश करताच मदत तथा स्वागत केंद्र आहेहे मिडीया सेंटर 8 जानेवारीपासून सुरु झाले आहे.
या संबंधी आपली प्रतिक्रिया व्यक्त करताना मिलींद ढमढेरे म्हणतात ,प्रत्येक मोठ्या स्पर्धेचा प्रसिध्दी विभाग हा नेहमीच गजबजलेला असतोही स्पर्धा सर्वांपर्यंत पोहोचण्यासाठी प्रत्येक वृत्तपत्र व विविध वृत्त वाहिन्यांचे प्रतिनिधी कसोशीने प्रयत्न करत असतातया दृष्टीने मोठ्या स्पर्धेचा प्रसिध्दी विभाग म्हणजे मिडीया सेंटर.. सकाळपासून रात्री पर्यंत सतत कार्यरत असतेप्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींना प्रत्येक माहिती वेळोवेळी अद्यावत देण्यासाठी या विभागासाठी नियुक्त करण्यात आलेल्या स्वयंसेवक मनापासून काम करत असतातयेथे देखील खेलो इंडीयाच्या विविध स्पर्धाचे अद्यावत निकाल देण्यासाठी 50 स्वयंसेवकांची फौज कार्यरत आहे.खऱ्या अर्थाने प्रसिध्दी विभाग ही स्पर्धेचा कणाच असतो.

ठळक वैशिष्टये
·        या ठिकाणी वाय-फायवायर इंटरनेट, कॉम्पुटर्स, प्रिंटर्स, मिडीया प्रतिनिधींना याच ठिकाणी स्पर्धेचे लाईव टेलीकास्ट बघण्याची सोय करण्यात आली आहे.
·        मिडीयाच्या प्रतिनिधींना प्रवासाकरिता बसेसची सोय केली आहे.
·        मिडिया प्रतिनिधीसाठी चहानाश्ताभोजन सोय केली आहे.
·        प्राविण्य प्राप्त खेळाडूंची मुलाखात घेणेकरीता खास दालन तयार करण्यात आले आहे.
·        सोशल मिडीयामध्ये संपूर्ण माहिती प्रसारित करण्याकरीता फेसबूक पेज केले आहे.
·        सर्व मिडियाशी संपर्क करण्याकरिता व्हॉट्सअप चे ग्रुप तयार केले आहे.त्यामुळे संपूर्ण स्पर्धेची माहिती छायाचित्र व निकाल सर्व मिडिया प्रतिनिधीपर्यत तात्काळ पोहचते.



खेलोत्सव प्रदर्शनात लोकराज्यच्या स्टॉलचे क्रीडा मंत्राच्या हस्ते उद्घाटन

खेलोत्सव प्रदर्शनात लोकराज्यच्या स्टॉलचे क्रीडा मंत्राच्या हस्ते उद्घाटन

पुणे दि. १० : महाळुंगे-बालेवाडी येथे सुरू असणाऱ्या खेलो इंडीया २०१९ स्पर्धे दरम्यान आयोजित करण्यात आलेल्या खेलोत्सव प्रदर्शनातील लोकराज्यच्या स्टॉलचे उद्घाटन क्रीडा मंत्री विनोद तावडे यांच्या हस्ते आज झाले. 
महाराष्ट्र शासनाचे मुखपत्र असणाऱ्या लोकराज्यचा जानेवारीचा अंक खेलो इंडीया विशेषांक म्हणून प्रकाशित करण्यात आला आहे. या विशेषांकाचे खेलो इंडीया स्पर्धेच्या उद्घाटनावेळी त्याच मंचावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसकेंद्रीय क्रीडा मंत्री राजवर्धनसिंग राठोडपालकमंत्री गिरीश बापटक्रीडा मंत्री विनोद तावडेसामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. या विशेषांकाचे अतिथी संपादक क्रीडा मंत्री विनोद तावडे हे आहेत.


क्रीडा मंत्रीही म्हणाले, “बस पाच मिनीट और..!”

क्रीडा मंत्रीही म्हणाले, बस पाच मिनीट और..!
·        क्रीडामंत्री कबड्डी खेळले अन् खेळाडूंचा उत्साह वाढला.
·        गगन नारंगच्या स्टॉलला भेट देताना नेम धरण्याचा मोह मंत्र्यांना आवरला नाही.
·        खेळाडुंबरोबर टेबल टेनिसही खेळले..
पुणे दि. 10 : कबड्डीटेबल टेनीसलगोरनेमबाजी या सारख्या आवडीच्या खेळांचा आस्वाद घेताना क्रीडा मंत्री विनोद तावडे यांनाही बस पाच मिनीट औरम्हणण्याचा मोह आवरला नाहीनिमित्त होते खेलो इंडीया स्पर्धे दरम्यान राष्ट्रीय युवा को ऑपरेटिव्ह सोसायटीतर्फे (एन.वाय.सी.एस.) आयोजित इंडीया का खेलोत्सव उपक्रमाच्या भेटीचे.
महाळुंगे-बालेवाडी येथे युवकांसाठी  राष्ट्रीय स्तरावरील खेलो इंडीया 2019 स्पर्धा सुरु आहेतया स्पर्धेच्या ठिकाणी मुलांना खेळा विषयी आवड निर्माण व्हावीक्रीडा क्षेत्रातील करीअरची ओळख व्हावी यासाठी खेलोत्सव उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहेया उपक्रमला क्रीडा मंत्री विनोद तावडे यांनी भेट दिली.
यावेळी श्री विनोद तावडे यांनी कबड्डीटेबल टेनीसलगोर आणि नेमबाजी या खेळाचा आनंद घेतलातसेच रिले धावणेवॉल क्लायंबींगतिरंदाजीफुटबॉल या खेळांच्या मैदानावर जावून त्या संबंधी माहिती घेतली.  खेळ खेळण्यासाठी आलेल्या मुलांना योग्य मार्गदर्शन करात्यांच्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर तेथे उपस्थित असलेल्या क्रीडा प्रशिक्षकांनी देण्याच्या सूचना त्यांनी केल्या.
या ठिकाणी आलेल्या विविध शाळेतील विद्यार्थ्यांशी श्री तावडे यांनी संवाद साधलाखेलो इंडीया बघून काय वाटतेकोणते खेळ खेळायला आवडतात.. यांसारखे प्रश्न विचारून श्री तावडे यांनी मुलांशी संवाद साधलाखेलोत्सवात लावलेल्या प्रत्येक स्टॉलला जावून क्रीडा मंत्री श्री तावडे यांनी माहिती घेतलीखलोत्सवाच्या मैदानावर बराच वेळ रमलेल्या क्रीडा मंत्र्यांनाही या निमित्त बस पाच मिनीट और… म्हणण्याचा मोह आवरला नाही



0000000

Wednesday, January 9, 2019

पोलीस दलाने अधिकाधिक लोकाभिमूख होऊन लोकसेवेला प्राधान्य द्यावे -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस


पोलीस दलाने अधिकाधिक लोकाभिमूख होऊन लोकसेवेला प्राधान्य द्यावे
-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या विविध विकास प्रकल्पांचे
ई- भूमिपूजन आणि उद्घाटन

पुणे,दि.9:- पोलीस दल हे लोकसेवा करण्यासाठी असून त्यांनी अत्याधूनिक तंत्रज्ञानाचा वापर करुन अधिकाधिक लोकाभिमुख होवून लोकसेवेला प्राधान्य द्यावे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
    प्राध्यापक रामकृष्ण मोरे सभागृहात आयोजित पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या विविध विकास प्रकल्पांचे ई- भुमिपूजन आणि उद्घाटन समारंभात ते  बोलत होते.
            पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या इमारतीचे उद्घाटन आज मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांच्याहस्ते फीत कापून करण्यात आले. तसेच दीपप्रज्वलन करुन कोनशिलेचे अनावरण करण्यात आले. यावेळी पिंपरी-चिंचवड पोलीस दलाच्या वतीने मुख्यमंत्री यांना मानवंदना देण्यात आली. यानंतर सादरीकरणाद्वारे पोलीस आयुक्तालय कामकाजाची पाहणी केली. 
यानंतर झालेल्या मुख्य समारंभात पोलीस आयुक्तालय इमारतीचे उद्घाटन, पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या स्मार्ट सिटी पहिला टप्पा, प्रधानमंत्री आवास योजना तसेच अर्बन स्ट्रीट डिझाईन अंतर्गत विकसीत रस्त्याचे मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांच्या हस्ते कळ दाबून ई-भूमिपूजन करण्यात आले.
यावेळी पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश बापट, सामाजिक न्याय विभागाचे राज्यमंत्री दिलीप कांबळे, महापौर राहुल जाधव, खासदार सर्वश्री शिवाजीराव आढळराव पाटील, श्रीरंग बारणे, आमदार सर्वश्री लक्ष्मण जगताप, महेश लांडगे, गौतम चाबुकस्वार, पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष सदाशिव खाडे, राज्याचे पोलीस महासंचालक दत्ता पडसलगीकर, महानगरपालिकेचे आयुक्त श्रावण हर्डीकर, पिंपरी-चिंचवडचे पोलीस आयुक्त आर. के. पद्मनाभन, पुणे ग्रामीणचे पोलीस अधिक्षक संदीप पाटील यावेळी उपस्थितीत होते.
मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले, पिंपरी-चिंचवड शहराच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने स्वतंत्र पोलीस आयुक्तालय स्थापन करुन नागरिकांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देण्यात आले आहे. यासाठी सीसी-टीव्ही तसेच इतर तांत्रिक बाबी देण्यावर भर देण्यात आलेला आहे. आयुक्तालयाचे काम प्रभावीपणे पार पाडण्यसाठी आवश्यक मनुष्यबळ व अन्य सेवा सुविधा लवकरच देण्यात येतील. नागरी व ग्रामीण भाग समाविष्ठ करुन आयुक्तालयाचे कार्यक्षेत्र वाढविण्यात आले आहे. पोलीसांच्या कामाचे मोजमाप करतांना केवळ गुन्हांच्या प्रमाणाचा विचार न करता किती गुन्हे उघडकीस आणले, किती लोकांना शिक्षा झाली. तसेच किती मुद्देमाल जप्त करण्यात आला, याबाबींचा विचार करणे आवश्यक आहे. अपराध सिध्दतेचे प्रमाण नऊ टक्क्यावरुन पन्नास टक्क्यापर्यंत वाढले, ही पोलीस विभागासाठी अभिमानाची बाब आहे.
यावेळी मुख्यमंत्री श्री फडणवीस पुढे म्हणाले, स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत विविध सेवा सामान्य लोकांपर्यंत गतिमानतेने पोहचविण्यासाठी प्रयत्नशील आहे. पिंपरी-चिंचवड ही श्रमिकांची नगरी असल्यामुळे येथील श्रमिकांसाठी मोठ्याप्रमाणात घरे उपलब्ध करुन देणे आवश्यक आहे. प्रधानमंत्री यांचे 2022 पर्यंत सर्वांसाठी घरे देण्याचे स्वप्न साकार करण्यासाठी प्रधानमंत्री आवास योजना महत्वपूर्ण ठरेल. अनधिकृत बांधकामांना समर्थन दिले जाणार नाही. परंतु शास्ती कराच्याबाबतीत सामान्य नागरिकांना दिलासा देण्याच्यादृष्टीने लवकरच मंत्रीमंडळाच्या बैठकीत निर्णय घेण्यात येईल.
शहराला पवना धरणातून पाणीपुरवठा करण्याबरोबरच मावळमधील आंदोलनग्रस्त शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यात येईल, त्यांच्या शेतीसाठी मायक्रो इरिगेशन करण्यात येईल, नुकसानग्रस्त कुटुंबाच्या पाठिशी सरकार संवेदनशीलतेने उभे राहून सदस्यांना नोकरीत सामावून घेण्यात येईल, असे यावेळी ते म्हणाले.
            पिंपरी-चिंचवड महानगरपालिका ही राज्यातील आर्थिकदृष्ट्या सक्षम आहे. या नगरपालिकेने आजवर विविध लोकाभिमुख निर्णय घेवून त्यादृष्टीने यशस्वी उपक्रम राबविल्याबद्दल महापालिकेच्या कामाचे श्री. फडणवीस यांनी कौतुक केले.
            कायदा, सुव्यवस्था राखणे हे पोलीसांचे कर्तव्य असते. सामन्यांच्या संरक्षणासाठी पोलीसांनी प्राधान्य द्यावे, असे आवाहन पालकमंत्री श्री बापट यांनी केले.
            यावेळी महापौर राहुल जाधव, आमदार सर्वश्री महेश लांडगे, लक्ष्मण जगताप यांची समयोचित भाषणे झाली.
            पोलीस आयुक्त आर.के. पद्मनाभन यांनी पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांचा आढावा घेतला तर एकनाथ पवार यांनी महानगरपालिकेच्या योजना व उपक्रमांची माहिती प्रस्ताविकातून दिली.
 कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुधीर गाडगीळ यांनी केले. आभार अपर पोलीस आयुक्त मकरंद रानडे यांनी मानले. यावेळी लोकप्रतिनिधीसह पोलीस विभाग व महानगरपालिकेतील अधिकारी, कर्मचाऱ्यांसह सामान्य नागरिक उपस्थित होते.





00000

“लोकराज्य” विशेषांकाचे प्रकाशन

लोकराज्य विशेषांकाचे प्रकाशन
महाराष्ट्र शासनाचे मुखपत्र असणाऱ्या लोकराज्यच्या जानेवारी महिन्याच्या खेलो इंडीया विशेषांकाचे प्रकाशन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसकेंद्रीय मंत्री राजवर्धनसिंग राठोडक्रीडा मंत्रीविनोद तावडेपालकमंत्री गिरीश बापटसामाजिक न्याय राज्यमंत्री यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते यावेळी करण्यात आले.
या कार्यक्रमाला विविध क्षेत्रातील मान्यवरखेळाडूप्रशिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

खेलो इंडीया स्पर्धेतून ऑलंपिक विजेते तयार होतील – राजवर्धनसिंग राठोड

खेलो इंडीया स्पर्धेतून ऑलंपिक विजेते तयार होतील – राजवर्धनसिंग राठोड
कर्नल राजवर्धनसिंग राठोड म्हणालेखेळासाठी देशाच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या खेळाडू आणि प्रशिक्षकांचे स्वागत आहेप्रधानमंत्री नरेंद्र मोदीं यांच्या मार्गदर्शनामुळे या दुसऱ्या खेलोइंडीया क्रीडा स्पर्धेचे अयोजन करण्यात आले आहेया स्पर्धेच्या यशस्वी आयोजनाबद्दल महाराष्ट्र शासनाचे आम्ही मनापासून आभारी आहेपुढच्या दहा दिवसात येथे होणाऱ्या स्पर्धांचे थेट प्रक्षेपणहोणार असून या नव्या चॅम्पिअनला सर्व देश पाहणार आहेया स्पर्धेतून  हजार खेळाडू निवडून त्यांना प्रतिर्षी  लाख रुपयांची शिष्यवृत्ती दिली जाणार आहेयेथील विजेत्या खेळाडूंतून ऑलंपिकविजेते तयार होतीलखेळाच्या मैदानात मिळणारे शिक्षण कोणत्याही पुस्तकात मिळत नाहीआजची पिढी मजबूत होण्यासाठी युवकांनी खेळण्याचे आवाहन त्यांनी केले.  
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा शुभेच्छा संदेश केंद्राचे क्रीडा सचिव राहूल भटनागर यांनी वाचून दाखविलाखेलो इंडीयाच्या जय आणि विजय या दोन्ही शुभंकरांनी मैदानात फेरी मारली.यावेळी खेळाडूंनी देशभराच्या प्रमुख शहरांची यात्रा करून आलेल्या खेलो इंडीयाची ज्योत मान्यवरांच्या हाती दिलीयावेळी केंद्रीय मंत्री राजवर्धनसिंग राठोड यांनी उपस्थितांना खेळा विषयी एकनिष्ठराहण्याची शपथ दिली.  


खेलो इंडीया २०१९ चे शानदार उद्घाटन औरंगाबादमध्ये महाराष्ट्रातील पहिले क्रीडा विद्यापीठ उभारणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा

खेलो इंडीया २०१९ चे शानदार उद्घाटन
औरंगाबादमध्ये महाराष्ट्रातील पहिले क्रीडा विद्यापीठ उभारणार
- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा

·         डोळ्याचे पारणे फेडणारा रंगारंग कार्यक्रम सव्वातास चालल्याने उपस्थितांमध्ये उत्साह वाढला
·         नीटनेटके आणि उत्साहपूर्ण आयोजन
·         रंगारंग कार्यक्रमाच्या प्रारंभीच महाराष्ट्राच्या संस्कृतीचे दर्शन आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कार्य कर्तुत्वाची झलक दाखविण्यात आली
·         संपूर्ण देशातून खेळाडू आल्याने खऱ्या अर्थाने भारतीय संस्कृतीचे दर्शन घडले
·         लहान मुलांच्या कलागुणांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय क्रीडा मंत्री रावर्धनसिंग राठोड व अन्य मान्यवरांनी उत्स्फूर्त दाद दिली.

पुणे दि : युवकांसाठी खेलो इंडीया स्पर्धेचे आयोजन करून केंद्र सरकार स्वामी विवेकानदांच्या सुदृढ भारत निर्माणाचा मंत्र आचरणात आणत आहेतीच प्रेरणा घेवून क्रीडा क्षेत्रातमहाराष्ट्राचे नाव उंचाविण्यासाठी औंरगाबादमध्ये महाराष्ट्रातील पहिले क्रीडा विद्यापीठ उभारणार असल्याची महत्वपूर्ण घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज केली.
महाळुंगे-बालेवाडी येथील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलमध्ये दुसऱ्या खेलो इंडीया २०१९ स्पर्धेचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झालेत्यावेळी श्री फडणवीस बोलतहोतेयावेळी केंद्रिय क्रीडा  युवक कल्याण मंत्री कर्नल राजवर्धनसिंग राठोडपालकमंत्री गिरीश बापटक्रीडा मंत्री विनोद तावडेसामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळेखासदार अनिलशिरोळेआंतरराष्ट्रीय कुस्तीपटू सुशील कुमारस्पोर्ट ॲथॉरिटी ऑफ इंडीयाच्या महासंचालक नीलम कपूरक्रीडा विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव वंदना कृष्णाकेंद्राचे क्रीडा सचिव राहूलभटनागरसाईचे उपमहासंचालक संदीप प्रधान उपस्थित होते.  
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणालेमहाराष्ट्रात खेलो इंडियाचे आयोजन केल्याबद्दल केंद्र सरकारचे आभारी आहेस्वामी विवेकानंद युवकांना म्हणाले होते मंदिरात जाण्याऐवजी फुटबॉलच्या मैदानावर जाऊन खेळाज्या प्रमाणे देवाला सुकलेली फुले चालत नाहीतत्याच प्रमाणे तंदुरूस्त नसलेले युवक मातृभूमीला चालत नाहीतसुदृढ युवकांच्या माध्यमातून स्वस्थ भारताच्या निर्माणाचे स्वामी विवेकानंदांचे स्वप्न होते.
स्वामी विवेकानंदांच्या शिकवणीचे आचरण सरकार करत आहेत्यामाध्यमातून खेलो इंडीया स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहेयामुळे युवा खेळाडूंना चांगला मंच मिळाला आहेया स्पर्धेच्या माध्यमातून प्रतिभाशाली खेळाडू घडतील.
केंद्राच्या धर्तीवरच राज्य शासनानेही क्रीडा क्षेत्रात काही महत्वपूर्ण निर्णय घेतले आहेतपूर्वी तालुकास्तरावर क्रीडा मैदानाच्या उभारणीसाठी १ कोटी रुपये दिले जात होतेती रक्कम आता ५ कोटी रूपये केली आहेतर विभागस्तरावरील मैदानासाठी २४ कोटी रूपयांच्या ऐवजी ४५ कोटी रूपये दिले जात आहेतक्रीडा क्षेत्रात महाराष्ट्राचे नाव उज्ज्वल करण्यासाठीच राज्य शासनाने ही पाऊले उचलली आहेत.
खेळात हार जीत तर होत असते असे सांगत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देशाचे माजी प्रधानमंत्री अटल बिहारी वाजपेय यांची ना हार मैना जीत मै ही कविता उध्दगृत केलीतसेच खेळात हार जीतपेक्षा खेळाची उर्मी असणे आवश्यक आहेहारू तर पुन्हा जिंकूजिंकू तर पुन्हा पुढे जावू आणि पुढे जावू तर देशाचे नाव पुढे जाईल असे सांगत देशाचा तिरंगा उचावण्यासाठी खेळण्याचे आवाहन त्यांनी खेळाडूंना यावेळी केले.