Friday, August 29, 2025

महाराष्ट्राची विविध कंपन्यांशी सामंजस्य करार ३४ हजार कोटींची गुंतवणूक; ३३ हजार रोजगार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उद्योग मंत्री डॉ.उदय सामंत यांच्या उपस्थितीत १७ सामंजस्य करार

 

मुंबई, दि २९ : श्री गणेशोत्सवाच्या शुभमुहूर्तावर महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक होत आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उद्योग व मराठी भाषा मंत्री डॉ.उदय सामंत यांच्या प्रमुख उपस्थितीत आज तब्बल १७ सामंजस्य करारांवर (MoU) स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. या करारांची एकूण किंमत सुमारे ३३,७६८.८९ कोटी रुपये असून, त्यातून राज्यात सुमारे ३३,४८३ रोजगारनिर्मिती होणार असल्याची माहिती मुख्यमंत्री श्री.फडणवीस यांनी दिली.
या गुंतवणुकीत इलेक्ट्रॉनिक्स, पोलाद, सोलार, इलेक्ट्रिक बसेस व ट्रक्स, संरक्षण व त्यासंबंधित विविध क्षेत्रांचा समावेश आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील उत्तर महाराष्ट्र, पुणे, विदर्भ, कोकण अशा सर्वच भागांमध्ये उद्योग उभारणीची संधी उपलब्ध होणार आहे.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, “गुंतवणूकदारांना महाराष्ट्रात सहज आणि सुरळीत अनुभव मिळावा यासाठी सरकार वचनबद्ध आहे. आम्ही फक्त करार स्वाक्षरीत करून थांबणार नाही, तर गुंतवणुकीच्या प्रत्येक टप्प्यावर राज्य शासन भागीदार म्हणून सोबत राहील. याबाबत कुठेही अडथळा येणार नाही.”
यावेळी त्यांनी मैत्री पोर्टल (Maitri Portal) या वन-स्टॉप संकल्पनेचा विशेष उल्लेख केला. उद्योगांसाठी जमीन, परवानग्या आणि इतर मंजुरी तातडीने मिळवून देण्याबाबत शासन प्रयत्नशील असल्याचे ते म्हणाले.
ऊर्जाविषयक निर्णयांचा उल्लेख करताना श्री.फडणवीस म्हणाले की, “राज्यात नुकताच ५ वर्षांचा मल्टी-इयर टॅरिफ मंजूर झाला असून, वीजदर वर्षागणिक कमी होणार आहेत. पूर्वी दरवर्षी वीजदर ९ टक्क्यांनी वाढत असत, पण आता विजेचे दर कमी होणार आहेत. हे उद्योगांसाठी मोठे दिलासादायक ठरणार आहे.”
मुख्यमंत्री श्री.फडणवीस यांनी पुढे सांगितले की, उद्योग क्षेत्रातील गुंतवणुकीचा जीवनचक्र (Investment Life Cycle) राज्य सरकारने स्थिर आणि अंदाजपत्रित ठेवण्याचे धोरण स्वीकारले आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांचा विश्वास वृद्धिंगत होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
या करारादरम्यान मुख्य सचिव राजेश कुमार, उद्योग सचिव डॉ.पी. अन्बळगन, उपमुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव नवीनकुमार सोना, एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी पी वेलारासू, विकास आयुक्त दीपेंद्रसिंह कुशवाह आणि विविध कंपन्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
000
See insights
Create Ad
Like
Comment
Share

Thursday, August 28, 2025

बालसंगोपन संस्थांतील मुलांच्या मानसिक आरोग्यासाठी "मासूम" मुख्यमंत्र्यांच्या संवेदनशील निर्णयामुळे ३,३३७ मुलांना लाभ

 

मुंबई, दि.२८ : राज्यातील बालसंगोपन संस्थांमध्ये (Child Care Institutions - CCI) राहणाऱ्या समस्याग्रस्त आणि विधी संघर्षीत मुलांना मानसिक आरोग्यसेवा व समुपदेशन करण्यासाठी महिला व बालविकास विभाग एमपॉवर संस्थेच्या माध्यमातून "मासूम" प्रकल्प राबवित आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संवेदनशील निर्णयामुळे या प्रकल्पाचा आजपर्यंत ३,३३७ मुलांना लाभ झाला असून एकूण ९५९३ वैयक्तिक समुपदेशन सत्रे पार पडली आहेत.
महाराष्ट्रातील महिला व बालविकास विभाग (WCD) राज्यातील बालकल्याण व मानसिक आरोग्याच्या कार्याला बळकटी देण्यासाठी, आदित्य बिर्ला एज्युकेशन ट्रस्टच्या Mpower या उपक्रमामार्फत ‘मासूम’ प्रकल्प राबवीत आहे. या प्रकल्पांतर्गत अडचणीत असलेल्या व विधी संघर्षीत मुलांना, जे बाल संगोपन संस्थांमध्ये (Child Care Institutions – CCIs) राहतात, त्यांना मानसिक आरोग्य सेवा व समुपदेशन (counselling) पुरवले जाते. हा सार्वजनिक-खाजगी भागीदारीचा उपक्रम, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली सुरू करण्यात आला आहे.
सेवेची भावना या उद्देशाने व बांधिलकीने Mpower व आदित्य बिर्ला एज्युकेशन ट्रस्टच्या संस्थापिका व अध्यक्षा, श्रीमती नीरजा बिर्ला यांनी अनेक उपक्रम राबवले आहेत. त्यांच्या प्रयत्नातून १८० दशलक्षाहून अधिक लोकांपर्यंत पोहोचून, Mpower हे दक्षिण आशियातील मानसिक आरोग्य साक्षरता, क्षमता-वृद्धी आणि सामुदायिक संपर्कावर लक्ष केंद्रित करणारे सर्वांत मोठे खासगी व्यासपीठ ठरले आहे.
महिला व बालविकास विभाग (WCD) सोबतच्या सामंजस्य करारानंतर हा प्रकल्प मुंबई, पुणे, ठाणे, नागपूर आणि नाशिक या विभागांमध्ये राबवला जात आहे. एकूण १९ बालसंगोपन संस्थांना पाच मानसशास्त्रज्ञाच्या टीमकडून सेवा दिल्या जात आहेत. या प्रकल्पांतर्गत मानसशास्त्रज्ञ रोटेशन पद्धतीने सीसीआयला भेट देतात, स्तिथीपरत्वे समुपदेशन करतात, मुलांचे मानसिक आरोग्य स्क्रिनिंग करतात आणि गरजेनुसार थेरपी सेवा पुरवतात. याशिवाय गंभीर प्रकरणांमध्ये बालकल्याण समिती (CWC) आणि किशोर न्याय मंडळाला (JJB) तज्ज्ञांचे सहकार्य दिले जाते. थेरपिस्ट काही मुलांच्या आरोग्य आणि मानसिक परिस्थितीनुसार त्यांचे तणाव मापन पट्टी (Stress Scale), आक्रमकता मापन पट्टी (Aggression Scale), स्थिती-गुणधर्म चिंतामापन चाचणी (State Trait Anxiety Test), मानसिक आरोग्य व कल्याण मापन पट्टी (Psychological Well-Being Scale) यांसारख्या साधनांद्वारे सखोल परीक्षण केले जाते.
मुलांच्या कुटुंबियांनाही समुपदेशनाची सुविधा दिली जाते. पालकांचे समुपदेशन केल्याने , मुले घरी परतल्यावर त्यांना पुर्वीप्रमाणे मोकळे वातावरण मिळेल हा या प्रकल्पाचा उद्देश आहे. मासूम प्रकल्प हा राज्यातील बालसंगोपन संस्थांमध्ये मानसिक आरोग्य सेवांना बळकटी देणारा ठरला असून मुलांच्या पुनर्वसन प्रक्रियेत महत्त्वाची भूमिका बजावत आहे.
या प्रकल्पासंदर्भात Mpower व आदित्य बिर्ला एज्युकेशन ट्रस्टच्या संस्थापिका व अध्यक्षा नीरजा बिर्ला म्हणाल्या की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील संस्थांमध्ये राहणाऱ्या मुलांच्या मानसिक आरोग्याला दिलेले प्राधान्य हे दूरदर्शी नेतृत्वाचे द्योतक आहे. या सार्वजनिक-खासगी भागीदारीद्वारे Mpower चे कार्य म्हणजे अडचणीत असलेल्या व विधी संघर्षीत मुलांना त्वरित ट्रॉमा रिलिफ व सर्वसमावेशक मानसशास्त्रीय आधार देणे. प्रशिक्षित मानसशास्त्रज्ञांच्या मदतीने विद्यमान प्रणालीला बळकटी देऊन मुलांच्या पुनर्वसन व समाजात पुन्हा समावेशक होण्यासाठी सुरक्षित व सहाय्यकारी वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे.
00000

‘माविम’च्या माध्यमातून बारामतीच्या महिलांकडून ४० मेट्रिक टन हिरवी मिरची दुबईला निर्यात · ग्रामीण महिलांचे कृषी क्षेत्रात आंतरराष्ट्रीय स्तरावर यश

 

मुंबई, दि. २६ :- ग्रामीण महिलांना औद्योगिक आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम) ‘नवतेजस्विनी महाराष्ट्र ग्रामीण महिला उद्यम विकास प्रकल्पा’अंतर्गत विविध उपक्रम राबवित आहे. या अंतर्गतच बारामतीतील ३० महिला शेतकऱ्यांनी उच्च दर्जाची हिरवी मिरची पिकवून तब्बल ४० मेट्रिक टन उत्पादन दुबईला निर्यात केले असून यामुळे इतर महिलांनाही प्रोत्साहन मिळत आहे.
ग्रामीण महिलांनी कृषी क्षेत्रात नेतृत्व करत आंतरराष्ट्रीय स्तरावर यश मिळविले आहे. महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम) यांच्या मार्गदर्शनाखाली बारामतीतील ३० महिला शेतकऱ्यांनी उच्च दर्जाची हिरवी मिरची पिकवून तब्बल ४० मेट्रिक टन उत्पादन दुबईला निर्यात केले. हा उपक्रम ‘नवतेजस्विनी महाराष्ट्र ग्रामीण महिला उद्यम विकास प्रकल्पा’अंतर्गत राबविण्यात आला.
या उपक्रमाची अंमलबजावणी संघर्ष क्लस्टर मायक्रो रिसोर्स सेंटर (CMRC), बारामती यांच्या माध्यमातून झाली असून कृषी विज्ञान केंद्र, बारामती यांनी तांत्रिक मार्गदर्शन केले. तसेच खरेदी व बाजारपेठेसाठी आदी नेचर फूड्स प्रा. लि. यांच्याशी खरेदी हमी करार करण्यात आला.
शेतीत आधुनिक पद्धतींचा अवलंब
२२ एकर क्षेत्रावर प्रायोगिक तत्वावर सुरू झालेल्या या शेतीत ठिबक सिंचन, मल्चिंग पेपर, सेंद्रिय खतांचा वापर व एकात्मिक कीड व्यवस्थापनासारख्या आधुनिक पद्धतींचा अवलंब करण्यात आला. नेदरलँड तंत्रज्ञानावर आधारित उगमशिव मिरचीची रोपेही वापरण्यात आली.
एकूण उत्पादनात प्रति महिला सरासरी ६,००० किलो मिरची मिळाली. त्यात स्मिता पवार (७,६९२.५ किलो), रोहिणी जाधव (७,६६७.५ किलो) आणि राणी जामधडे (६,०५२.५ किलो) यांचे विशेष योगदान राहिले.
अनियमित पाऊस, काढणी नंतरची गुणवत्ता व निर्यातीतील आव्हाने यावर मात करण्यासाठी सतत फील्ड मार्गदर्शन, पीक विमा सल्ला व प्रक्रिया प्रशिक्षण दिले गेले. पुढील टप्प्यात उत्पादनाच्या गुणवत्तेसाठी स्थळावर ग्रेडिंग युनिट उभारण्याची योजना आहे.
कृषी मूल्यसाखळीत महत्त्वपूर्ण भूमिका
या उपक्रमामुळे ग्रामीण भागातील महिलांचे आर्थिक उत्पन्न वाढले असून आंतरराष्ट्रीय बाजारपेठेचा अनुभव, तांत्रिक ज्ञान आणि उद्योजकीय कौशल्य विकसित झाले आहे. ग्रामीण महिला जागतिक कृषी मूल्यसाखळीत महत्त्वपूर्ण भूमिका बजावू शकतात, हे या प्रयोगातून अधोरेखित झाले आहे. बारामतीचा हा यशस्वी उपक्रम ग्रामीण महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी एक ‘स्केलेबल व रीप्लिकेबल मॉडेल’ ठरत आहे.
000
See insights
Create Ad
Like
Comment
Share

‘श्रीगणेशा आरोग्याचा’ उपक्रमातून संपूर्ण राज्यात नागरिकांची आरोग्य तपासणी मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी कक्षाचा पुढाकार

 

मुंबई, दि.२८ : गणेशोत्सवाच्या मंगलमय वातावरणात नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेण्याच्या दृष्टीने मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्षाने महत्त्वपूर्ण उपक्रम हाती घेतला आहे. मुख्यमंत्री श्री.देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून संपूर्ण महाराष्ट्रातील ३६ जिल्ह्यांमध्ये ‘श्रीगणेशा आरोग्याचा’ या विशेष मोहिमेअंतर्गत मोफत आरोग्य तपासणी शिबिरे आयोजित केली जात आहेत.
या उपक्रमात मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्ष, महात्मा फुले जन आरोग्य योजना, शासकीय वैद्यकीय महाविद्यालये, जिल्हा रुग्णालये, तसेच धर्मादाय रुग्णालयांशी संलग्न तज्ज्ञ डॉक्टर यांचा संयुक्त सहभाग राहणार आहे. याशिवाय मोठ्या संख्येने गणेश मंडळे या उपक्रमात सक्रिय सहभागी झाले आहेत. मंडपांमध्ये किंवा जवळपास उभारण्यात येणाऱ्या शिबिरांमध्ये गणेशभक्त आणि स्थानिक नागरिक यांची मोफत आरोग्य तपासणी केली जात आहे.
नागरिकांच्या आरोग्याबाबत सातत्यपूर्ण जागरूकता
शिबिरांच्या माध्यमातून नागरिकांना केंद्र व राज्य शासनाच्या आरोग्य योजनांची माहिती दिली जाणार असून, तपासणी दरम्यान आजार आढळणाऱ्या रुग्णांना पुढील उपचार संबंधित योजनांतर्गत मोफत उपलब्ध करून दिले जात आहे. विशेष म्हणजे, या उपक्रमाचा उद्देश फक्त तपासणीपुरता मर्यादित नसून नागरिकांच्या आरोग्याबाबत सातत्यपूर्ण जागरूकता निर्माण करणे हा देखील आहे.
प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी स्थापन करण्यात आलेल्या कक्षाच्यावतीने गणेश मंडळांशी संपर्क साधून भव्य आरोग्य शिबिरे राबवली जात आहेत. यात महात्मा फुले जन आरोग्य योजनेत नोंदणीकृत रुग्णालये, स्थानिक वैद्यकीय महाविद्यालये, तसेच धर्मादाय रुग्णालयांचे तज्ज्ञ डॉक्टर आणि त्यांची संपूर्ण टीम सक्रिय सहभागी झाले आहेत.
गणेशमंडळांकडून व्यापक जनजागृती
नागरिकांना या उपक्रमाची माहिती मिळावी यासाठी मागील आठवडाभर गणेश मंडळांकडून बॅनर, पत्रकांच्या माध्यमातून व्यापक जनजागृती सुरू आहे. परिणामी या शिबिरांचा लाभ घेण्यासाठी मोठ्या प्रमाणावर नागरिक आणि भाविक पुढे येत आहेत. आरोग्य तपासणीच्या माध्यमातून उच्च रक्तदाब, मधुमेह, हृदयरोग, कर्करोग आदी आजारांचे लवकर निदान करून वेळेत उपचार मिळण्याची सोय होणार आहे.
गणेशोत्सवासारख्या मोठ्या सणाच्या पार्श्वभूमीवर आरोग्य तपासणी शिबिरांचे आयोजन करणे ही मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांची अभिनव कल्पना आहे. ‘श्री गणेशा आरोग्याचा’ या उपक्रमातून हजारो नागरिकांना त्यांच्या आरोग्याची मोफत तपासणी करण्याची संधी मिळत आहे. तपासणीदरम्यान आजार आढळलेल्या रुग्णांना पुढील मोफत उपचारही दिले जाणार आहेत. हा उपक्रम म्हणजे आरोग्यसेवेतील लोकाभिमुख आणि जनहिताचा उत्तम आदर्श ठरत आहे, असे मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रूग्णालय मदत कक्ष प्रमुख श्री रामेश्वर नाईक यांनी कळविले आहे.
00000
May be an image of ‎1 person and ‎text that says "‎निधी व धर्मादिायय हहमयत सहाय्यता रुग्णालय កររេញ្ពី قف 原 0究 मुख्यमत्री + প मदत ទល महाराष्ट्र राज्य‎"‎‎
See insights
Create Ad
All reactions:
3