पुणे, दि. 31 (विमाका): सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त आयोजित राष्ट्रीय एकता दौडला (रन फॉर युनिटी) पुण्यासह सातारा व सोलापूर जिल्ह्यात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. राष्ट्रीय एकतेचा संदेश देण्यासाठी दरवर्षी सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त 'रन फॉर युनिटी'चे आयोजन करण्यात येते. पुणे विभागातील पुणे, सातारा व सोलापूर या तिनही जिल्ह्यांमध्ये प्रशासनाच्यावतीने आयोजित केलेल्या राष्ट्रीय एकता दौडमध्ये संबंधित जिल्ह्यातील खेळाडू, सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी, शासकीय अधिकारी, कर्मचारी, विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले.
पुणे जिल्हा- सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त विभागीय आयुक्त कार्यालय, जिल्हाधिकारी कार्यालय व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्यावतीने आयोजित 'रन फॉर युनिटी' राष्ट्रीय एकता दौड मध्ये विभागीय आयुक्त डॉ. दिपक म्हैसेकर व जिल्हाधिकारी नवल किशोर राम सहभागी झाले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला सरदार वल्लभभाई पटेल व स्वर्गीय इंदिरा गांधी यांच्या प्रतिमेचे पूजन करुन त्यांना आदरांजली वाहण्यात आली. यावेळी जिल्हा क्रीडा अधिकारी विजय संतान यांनी राष्ट्रीय एकता दिनानिमित्त उपस्थितांना 'राष्ट्रीय एकता दिवस शपथ' दिली. त्यानंतर कौन्सिल हॉल ते साधू वासवानी चौक- अलंकार चौक- जनरल वैद्य मार्गे पुन्हा कौन्सिल हॉल परिसर या मार्गाने एकता दौड संपन्न झाली. या एकता दौड मध्ये पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी उदय जाधव, उपायुक्त संजयसिंह चव्हाण, उपायुक्त चंद्रकांत गुडेवार, अपर जिल्हाधिकारी साहेबराव गायकवाड, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी भारत शेंडगे, जिल्हा क्रीडा अधिकारी विजय संतान, उपवनसंरक्षक श्री नाईकडे, उपविभागीय अधिकारी संतोष देशमुख, नेहरु युवा केंद्राचे समन्वयक यशवंत मानखेडकर, तहसीलदार अर्चना निकम यांच्यासह जिल्ह्यातील खेळाडू, क्रीडाप्रेमी, सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी, विद्यार्थी तसेच शासनाच्या विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी सहभागी झाले.
सातारा जिल्हा - एकता काय करु शकते, किती प्रचंड ताकद एकतेमध्ये असते याचे महत्व सरदार वल्लभभाई पटेल यांनी समाजाला पटवून दिले आहे, त्यांचे आदर्श विचार पुढच्यापिढीपर्यंत पोहचवणे ही काळाची गरज असून त्यांच्या विचारांचे अनुकरण केल्यास समाजाची आणखीन प्रगती होऊ शकते, असा विश्वास जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांनी व्यक्त केला.
सरदार वल्लभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त जिल्हाप्रशासनाकडून 'रनफॉर युनिटी' अर्थात एकता दौड आयोजित करण्यात आली. या एकता दौडला जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांनी हिरवा झेंडा दाखवून या एकता दौडीचा प्रारंभ केला. यावेळी त्या बोलत होत्या. या एकता दौडला पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते, प्रांताधिकारी मिनाज मुल्ला, लाचलुचपत प्रतिबंध विभागाचे उप अधिक्षक अशोक शिर्के, जिल्हा क्रीडा अधिकारी युवराज नाईक यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी, विविध संस्थांचे पदाधिकारी, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
31 ऑक्टोंबर सरदार वल्लभाई पटेल यांच ा जयंती दिवस. या दिवसानिमित्त आज महाराष्ट्रभर एकता दौडचे आयोजन करण्यात आले असून आठवडाभर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. सरदार वल्लभाई पटेल यांनी एकतेचे महत्व तर समाजाला पटवून एकतेची संकल्पना समाजाला दिली आहे. त्यांचे विचार प्रत्येकाने आचरणात आणून त्यांच्या विचारानुसार आदर्श समाज घडवूया, असे आवाहनही जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांनी शेवटी केले.
* लाच लुचपत प्रतिबंध विभागाचे फलक ठरले एकता दौडेतील आकर्षण- भ्रष्टाचार मुक्त महाराष्ट्र, लाच देणे व घेणे हा गुन्हा आहे, लाच मागितल्यास तक्रार कुठे करावयाची यासह अनेक विविध फलक घेऊन लाच लुचपत प्रतिबंध विभागाचे अधिकारी, कर्मचारी या एकता दौडमध्ये सामील झाले होते हे फलक एकता दौडमधले आकर्षण ठरत होते.
सरदार वल्लभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त सातारा जिल्ह्यात आठवडाभर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. लाच देणे व घेणे हा गुन्हा आहे या विषयी शाळा, महाविद्यालयांमध्ये प्रबोधन करण्यात येणार आहे. प्रत्येक शाळा, महाविद्यालयांमध्ये एकतेची शपथ देणार असल्याचे पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी यावेळी सांगितले.
सकाळी 8 वाजता निघालेली एकता दौड ही पोवईनाका-पोलीस अधीक्षक कार्यालय - शेटे चौक-कमानी हौद-पोलीस करणुक केंद्र-नगरपालिका- जिल्हा वाहतुक शाखा रविवार पेठ अशी आयोजित करण्यात आली होती.
सोलापूर जिल्हा- सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त आयोजित एकता दौडला (रन फॉर युनिटी) सोलापूरकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. दरवर्षी सरदार पटेल यांची जयंती राष्ट्रीय एकता दिन म्हणून साजरी करण्यात येते.
जिल्हा प्रशासन, पोलीस विभाग, केंद्र सरकारच्या माहिती व प्रसारण मंत्रालयांच्या लोकसंपर्क कार्यालयातर्फे या दौडचे आयोजन करण्यात आले होते.
एकता दौडला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. चार पुतळा चौक येथे जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी हिरवा ध्वज दाखवून दौडला सुरवात केली. त्याअगोदर त्यांनी उपस्थित अधिकारी कर्मचारी, नागरिक यांना एकतेची शपथ दिली.
यावेळी पोलीस आयुक्त अंकुश शिंदे, महापालिका आयुक्त दीपक तावरे, पोलीस अधीक्षक मनोज पाटील, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रकाश वायचळ, निवासी उपजिल्हाधिकारी अजित देशमुख, क्षेत्रीय प्रचार अधिकारी अंकुश चव्हाण, शिक्षण अधिकारी संजय राठोड, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणचे व्यवस्थापक चंद्रकांत बरडे , उपजिल्हाधिकारी शैलेश सुर्यवंशी, जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक सचिन जाधव आदी व्यासपीठावर उपस्थित होते.
एकतेची शपथ दिल्यानंतर दौड व्हिआयपी रोडमार्गे डफरीन चौक ते एम्प्लॉयमेंट चौक ते सात रस्ता या मार्गे शासकीय विश्रामग्रह येथे आली. तिथेच दौडचा समारोप झाला.
दौडमध्ये राज्य राखीव बलचे असिस्टंट कमांडट बंडगर, सोलापूर रनर्स असोसिएशनचे डॉ. सत्यजीत वाघचवरे, सोलापूर ॲथलॅटीक्स असोसिएशनचे राजू प्याटी, टेनिस असोसिएशनचे सचिव राजीव देसाई, एनएचआयचे व्यवस्थापक अनिल विपत, क्रीडा कार्यालयाचे नदीम शेख, वन विभागाच्या संध्याराणी बंडगर, मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे स्वीय सचिव अविनाश गोडसे, महाराष्ट्र बटालियनचे वसंत जाधव, शहाजी पाटील आदी सहभागी झाले.
दौडमध्ये लहान मुलांसह युवक-युवती, पोलीस अधिकारी-कर्मचारी, महसूल, क्रीडा, महानगरपालिका आदी विभागातील अधिकारी- कर्मचारी उत्साहाने सहभागी झाले होते.
0000