Friday, September 1, 2017

विदयार्थ्यांनी अवांतर वाचनावर भर द्यावा -जिल्हा माहिती अधिकारी राजेंद्र सरग




        पुणे, दि. 1 : पत्रकारिता क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी विद्यार्थांनी अवांतर वाचन तसेच लिखाणाला जास्त महत्व द्यावे. शुध्दलेखन शब्दांचा योग्य प्रभावी वापर केल्यास विद्यार्थी पत्रकारितेच्या क्षेत्रात नाव कमावू शकतो, असे प्रतिपादन जिल्हा माहिती अधिकारी राजेंद्र सरग यांनी आज येथे केले.
            बारामती येथील तुळजाराम चतुरचंद महाविद्यालयाच्या वृत्तपत्रविद्या जनसंवाद विभागाच्या विद्यार्थ्यांनी जिल्हा माहिती कार्यालयास भेट दिली, त्यावेळी त्यांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. यावेळी प्रा.जयप्रकाश पाटील, प्रा.रणजित पंडित उपस्थित होते.
            वृत्तपत्रविद्या जनसंवाद विभागाच्या विद्यार्थ्यांना, माहिती जनसंपर्क महासंचालनालय तसेच जिल्हा माहिती कार्यालयाच्या कामकाजाची ओळख व्हावी यासाठी भेटीचे आयोजन करण्यात आले होते. श्री.सरग यांनी यावेळी जिल्हा माहिती कार्यालयाच्या कामकाजाची माहिती विद्यार्थ्यांना दिली. शासनाचे मुखपत्र असलेल्या तसेच पाच भाषांतून प्रसिध्द होणाऱ्या लोकराज्य मासिकाबद्दल माहिती, आकाशवाणीवरुन प्रसारित होणारा दिलखुलास कार्यक्रम, जनसंपर्काची विविध माध्यमे, सोशल मिडीयाचा जनसंपर्कासाठी वापर याबद्दल मार्गदर्शन केले. दर्शनी वर्गिकृत जाहिराती आणि त्याचे महत्व याबद्दल माहितीसुध्दा विद्यार्थ्यांना देण्यात आली.
            प्रा.जयप्रकाश पाटील यांनी, जिल्हा माहिती कार्यालयास भेट तेथील कामाची प्रत्यक्ष पाहणी याचा विद्यार्थ्यांना भावी आयुष्यात उपयोग होईल असे सांगितले. यावेळी जयंत कर्पे, रोहित साबळे, नितीन सोनवणे, मिलिंद भिंगारे, सुगतकुमार जोगदंड ,जिल्हा माहिती कार्यालयाचे कर्मचारी तसेच महाविद्यालयाचे विद्यार्थी उपस्थित होते.
संवाद पर्व
            शासनातर्फे राबविण्यात येणाऱ्या लोककल्याणकारी योजनांची माहिती नागरिकांना व्हावी यासाठी माहिती जनसंपर्क महासंचालयानाच्यावतीने गणेशोत्सव काळात संवाद पर्व कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते. आज  विद्यार्थ्यांना या कार्यक्रमाची माहिती देण्यात आली. जिल्हा माहिती कार्यालयाच्यावतीने राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांची माहिती यानिमित्ताने देण्यात आली.

000000





धार्मिक अल्पसंख्यांक विद्यार्थीबाहुल्य शाळांनी अनुदानासाठी अर्ज करावेत


पुणे, दि. 1 : धार्मिक अल्पसंख्यांक विद्यार्थ्यांचे बाहुल्य असलेल्या, शासनमान्य शैक्षणिक संस्थांना पायाभूत सोयी सुविधा उपलब्ध करुन देऊन शिक्षणाचा गुणात्मक दर्जा उंचवण्यासाठी अल्पसंख्यांक बहुल शासनमान्य खाजगी शाळा, कनिष्ठ महाविद्यालय, औद्योगिक प्रशिक्षण संस्था व अपंग शाळामध्ये पायाभूत सुविधा पुरविण्यासाठी शासनातर्फे अनुदान देण्यात येते.
   सदर योजनेअंतर्गत सन 2017-18 या वर्षासाठी अनुदान मिळवू इच्छिणाऱ्या अल्पसंख्यांक बहुल शासनमान्य खाजगी शाळा, कनिष्ठ महाविद्यालय, औद्योगिक प्रशिक्षण संस्था व अपंग शाळा यांनी यासंदर्भातील परिपुर्ण प्रस्ताव 18 सप्टेंबर, 2017 पर्यंत जिल्हा नियोजन कार्यालय, जुनी जिल्हा परिषद इमारत, 3 रा मजला, पुणे येथे कार्यालयीन वेळेत सादर करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष, अल्पसंख्यांक उच्चस्तरीय निवड समिती पुणे यांनी प्रसिध्दीपत्राद्वारे केले आहे.
०००

मुरघास निर्मितीसाठी अर्ज करण्याचे आवाहन


सोलापूरदि. 1:- राष्ट्रीय कृषि विकास योजनेंतर्गत बहुवर्षिय वैरण पिकांची  लागवड व उत्पादन करुन मुरघास  तयार करण्यासाठी जिल्ह्यातून इच्छूक शेतकऱ्यांडून अर्जाची मागणी करण्यात येत आहे. या योजनेच्या लाभासाठी इच्छूक शेतकऱ्यांनी आपले अर्ज 29 सप्टेबर 2017 या कालावधीत तालुक्याच्या पंचायत समिती मधील पशुधन विकास अधिकारी (विस्तार) यांच्याकडे करावेत.
मुरघास तयार करणे योजनेंतर्गत जिल्ह्यात 5 मेट्रीक टन क्षमतेचे 32 व 10 मेट्रीक टन क्षमतेचे 32 युनिट असून त्यापैकी 16 टक्के अनुसूचित जाती, 8 टक्के अनुसूचित जमतीच्या लाभार्थीस युनिट देण्यात येतील. तसेच 30 टक्के महिला व 3 टक्के अपंग लाभार्थिंनाही प्राधान्य देण्यात येणार आहे. शेतकऱ्यांना बहुवर्षीय वैरण पिकाच्या लागवडीसाठी 100 टक्के अनुदान विद्युतचलित कडबाकुट्टी साठी 50 टक्के तर मुरघास बांधकामासाठी 60 टक्के अनुदान शासनामार्फत देण्यात येणार आहे.
योजेनच्या अधिक माहितीसाठी पंचायत समितीध्ये पशुधन विकास अधिकारी, पशुवैद्यकीय दवाखना श्रेणी - 1/2  किंवा दूरध्वनी क्रमांक 0217 – 2342696 येथे संपर्क साधवा, असे आवाहन जिल्हा पशुसंर्धन अपआयुक्त, सोलापूर यांनी कळविले आहे.

*****

‘संवादपर्व’ च्या माध्यमातून शासकीय योजना नागरिकांपर्यंत पोहचविण्यास मदत - तहसिलदार सुनील जोशी



राजगुरुनगर येथे संवादपर्व कार्यक्रम संपन्न
पुणे,दि. 1 : संवादपर्व कार्यक्रमाच्या माध्यमातून शासनाच्या विविध कल्याणकारी योजना लोकांपर्यत पोहोचत असून लोकांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन खेड तालुक्याचे तहसिलदार सुनील जोशी यांनी केले.
क्षेत्रिय प्रचार निदेशालय सूचना आणि प्रसारण मंत्रालय, अहमदनगर व जिल्हा माहिती कार्यालय, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने हुतात्मा राजगुरु महाविद्यालय, राजगुरुनगर येथे संवादपर्व’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी आमदार सुरेश गोरे, केंद्रीय कांदा व लसूण संशोधन केंद्राचे संचालक मेजर सिंग, खेड तालुका शिक्षण प्रशासक मंडळाचे अध्यक्ष देवेंद्र बुट्टेपाटील, उपाध्यक्ष नानासाहेब टाकळकर, बाळासाहेब सांडभोर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.एस.बी.पाटील, अहमदनगर क्षेत्रिय प्रचार अधिकारी माधव जायभाये, प्राध्यापक रवी चौधरी उपस्थित होते.
तहसिलदार सुनील जोशी म्हणाले, राज्य शासन  राबवित असलेल्या विविध कल्याणकारी योजनांची माहिती संवादपर्व कार्यक्रमाच्या माध्यमातून जनतेपर्यंत पोहोचत आहे. याद्वारे लोकांच्या विकासासह राज्य व देशाचा विकास होण्यास मदत होणार आहे. नागरिकांनी  योजनांची माहिती घेवून आपला सर्वांगीण विकास करावा असेही त्यांनी यावेळी सांगितले.
क्षेत्रिय प्रचार अधिकारी माधव जायभाये यांनी राज्य शासनामार्फत प्रकाशित होत असलेले लोकराज्य मासिक विद्यार्थ्यांना उपयुक्त असल्याची माहिती दिली. तसेच सर्व विद्यार्थांना संवादपर्व कार्यक्रमातून मिळालेल्या माहितीचा उपयोग करुन यशस्वी कसे होता येईल याची माहिती आमदार सुरेश गोरे यांनी देखील संवादपर्व  उपक्रमाचे कौतुक केले.
कार्यक्रमास मिलिंद भिंगारे, रोहित साबळे, सुगतकुमार जोगदंड, मोहन मोटे, सुर्यकांत कासार, तसेच हुतात्मा राजगुरु विद्ययालयाचे प्राध्यापक, शिक्षक व विद्यार्थी मोठया संख्येने उपस्थित होते.
0000000




प्रवाशांनी शिवशाही बस सुविधेचा लाभ घ्यावा - पालकमंत्री विजय देशमुख


            सोलापूर दि. 01 : स्मार्ट सिटीच्या अनुषंगाने सोलापूर शहरातुन राज्य परिवहन महामंडळातर्फे सोलापूर ते पुणे या मार्गावर अत्याधुनिकवातानुकुलीत शिवशाही  या बसचा शुभारंभ परिवहन राज्यमंत्री विजय देशमुख यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवुन करण्यात आला.
            येथील सोलापूर आगारातर्फे शिवशाही  बस सेवा आज सोलापूर एसटीबसस्थानकावरुन सुरु करण्यात आली असून या शुभारंभ प्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमास विभाग नियंत्रक रमाकांत गायकवाड यांच्यासह एस.टी. महामंडळाचे वरिष्ठ अधिकारी, कर्मचारी व प्रवासी उपस्थित होते.
            पालकमंत्री म्हणाले, शिवशाही वातानुकुलित बसमुळे प्रवाशांच्या वेळेची बचत होणार आहे. तसेच बसचे भाडेही प्रवाशांना परडेल इतकेच आकारण्यात आले आहे. शिवशाही बस सुविधेचा लाभ जिल्ह्यातील प्रवाशांनी घ्यावा. प्रवाशांना एसटीप्रवासदरम्यान राज्य परिवहन महामंडळातर्फे अधिकाधिक सुविधा देण्याचे प्रयत्न असल्याचेही परिवहन राज्यमंत्री विजय देशमुख यांनी सांगितले.
            शिवशाही बस सकाळी 6, वाजता सोलापूर येथून निघून ती पुणे येथे सकाळी 10.50 वाजता पोहोचेलतसेच सायंकाळी वाजता पुणे येथून निघून ती सोलापूर येथे रात्री11.05 वाजता पोहोचेलप्रवाशांना लांब पल्ल्याचा प्रवास आरामदायी होणार असल्याचेही परिवहन राज्यमंत्री  श्रीदेशमुख यांनी यावेळी सांगितले.
 विभाग नियंत्रक रमाकांत गायकवाड यांनी यावेळी या बस सेवेसाठी सोलापूर ते पुणे सुमारे 395/- रुपये इतके तिकीट दर असून प्रवाशी ऑनलाईन सुविधेचाही लाभ घेऊ शकतातसोलापूर-पुणे या प्रवासी मार्गावर प्रवाशांना वातानुकुलीत सेवा, तसेच आरामदायी आसनाची व्यवस्थाही करण्यात आली असल्याचेही त्यांनी सांगितले.
                                                            0          0          0          0          0

कल्याणकारी योजनांचा लाभ घेवून स्व:चा सामाजिक व आर्थिक विकास करावा - समाज विकास अधिकारी संभाजी ऐवले




पुणे, दि. 1 : राज्य शासनासह पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या विविध कल्याणकारी योजनांचा नागरिकांनी लाभ घेवून स्व:चा समाजिक व आर्थिक विकास करावा, असे आवाहन पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे समाज विकास अधिकारी संभाजी  ऐवले यांनी केले.
            भोसरी गावठाण येथील श्रीराम मित्र मंडळ येथे जिल्हा माहिती कार्यालयाच्या वतीने घेण्यात आलेल्या संवादपर्व कार्यक्रमादरम्यान ते बोलत होते. यावेळी जिल्हा माहिती अधिकारी राजेंद्र सरग, मंडळाचे अध्यक्ष मचींद्र लांडगे, कार्यअध्यक्ष विक्रांत लांडगे, सुनील लांडगे, भरत लांडगे, अपस्थित होते.
श्री ऐवले म्हणाले, पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या हद्दीतील नागरिकांसाठी महानगरपालिकेने नागरवस्ती विकास योजना विभागामार्फत विविध कल्याणकारी योजना राबविल्या जातात. यामधील काही योजना वर्षाभर सुरु असतात तर काही कालमर्यादीत योजना असतात. यामध्ये महिला व बालकल्याण योजना, मागासवर्गीग कल्याणकारी योजना, अपंग कल्याणकारी योजना, खेळाडू कल्याणकारी योनांची माहिती त्यांनी उपस्थितांना दिली. तसेच इतर कल्याणकारी योजनेअंतर्गत इयत्ता पहिली ते पदव्युतर पर्यंत शिक्षण घेणाऱ्या महापालिका हद्दीतील अनाथ, निराधार मुलांना शिष्यवृत्ती एच.आय.व्हीबाधित मुलांचा संभाळ करणाऱ्या पालकांना व संस्थांना अर्थ सहाय्य करण्यात येते. तसेच अशा व्यक्तींना महानगरपालिके तर्फे पी.एम.पी.एल चा मोफत बस पास देखील देण्यात येतो, अशी माहिती त्यांनी दिली.
            जिल्हा माहिती अधिकारी राजेंद्र सरग यांनी शासनाचे मुखपत्र असणाऱ्या लोकराज्य या पाच भाषेत प्रकाशित होणाऱ्या मासिकासंबंधी माहिती उपस्थित नागरिकांना दिली.
यावेळी श्रीराम मित्र मंडळाचे पदाधिकारी महेश मरे, विनोद गावडे, महेश लांडगे, प्रशांत लांडगे, अक्षय भुजबळ, दिनेश पठारे, अनील लांडगे, तसेच विलास कसबे, मिलिंद भिंगारे, रोहित साबळे, मोहन मोटे, व परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
000000


प्रवाशांनी शिवशाही बस सुविधेचा लाभ घ्यावा - पालकमंत्री विजय देशमुख


            सोलापूर दि. 01 : स्मार्ट सिटीच्या अनुषंगाने सोलापूर शहरातुन राज्य परिवहन महामंडळातर्फे सोलापूर ते पुणे या मार्गावर अत्याधुनिकवातानुकुलीत शिवशाही  या बसचा शुभारंभ परिवहन राज्यमंत्री विजय देशमुख यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवुन करण्यात आला.
            येथील सोलापूर आगारातर्फे शिवशाही  बस सेवा आज सोलापूर एसटीबसस्थानकावरुन सुरु करण्यात आली असून या शुभारंभ प्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमास विभाग नियंत्रक रमाकांत गायकवाड यांच्यासह एस.टी. महामंडळाचे वरिष्ठ अधिकारी, कर्मचारी व प्रवासी उपस्थित होते.
            पालकमंत्री म्हणाले, शिवशाही वातानुकुलित बसमुळे प्रवाशांच्या वेळेची बचत होणार आहे. तसेच बसचे भाडेही प्रवाशांना परडेल इतकेच आकारण्यात आले आहे. शिवशाही बस सुविधेचा लाभ जिल्ह्यातील प्रवाशांनी घ्यावा. प्रवाशांना एसटीप्रवासदरम्यान राज्य परिवहन महामंडळातर्फे अधिकाधिक सुविधा देण्याचे प्रयत्न असल्याचेही परिवहन राज्यमंत्री विजय देशमुख यांनी सांगितले.
            शिवशाही बस सकाळी 6, वाजता सोलापूर येथून निघून ती पुणे येथे सकाळी 10.50 वाजता पोहोचेलतसेच सायंकाळी वाजता पुणे येथून निघून ती सोलापूर येथे रात्री11.05 वाजता पोहोचेलप्रवाशांना लांब पल्ल्याचा प्रवास आरामदायी होणार असल्याचेही परिवहन राज्यमंत्री  श्रीदेशमुख यांनी यावेळी सांगितले.
 विभाग नियंत्रक रमाकांत गायकवाड यांनी यावेळी या बस सेवेसाठी सोलापूर ते पुणे सुमारे 395/- रुपये इतके तिकीट दर असून प्रवाशी ऑनलाईन सुविधेचाही लाभ घेऊ शकतातसोलापूर-पुणे या प्रवासी मार्गावर प्रवाशांना वातानुकुलीत सेवा, तसेच आरामदायी आसनाची व्यवस्थाही करण्यात आली असल्याचेही त्यांनी सांगितले.
                                                            
0          0          0          0          0