Friday, September 21, 2018

शासनाच्या कल्याणकारी योजना सामान्यांपर्यंत पोहोचविण्यात ‘लोकराज्य’अग्रेसर - आमदार मेधा कुलकर्णी


पुणे दि. 21 : लोकराज्य’ हे मासिक अत्यंत दर्जेदार आहे. महाराष्ट्र शासनाचे ते मुखपत्र आहे. शासनाच्या विविध कल्याणकारी योजना सामान्यांपर्यंत पोहोचविण्यात ‘लोकराज्य’ अग्रेसर असल्याचे प्रतिपादन आमदार मेधा कुलकर्णी यांनी आज केले.  
येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात ‘लोकराज्य वाचक अभियाना’ची संकल्पना पुणे विभागाचे उपसंचालक (माहिती) मोहन राठोड यांनी आमदार मेधा कुलकर्णी यांना सांगितली. त्यानंतर आमदार कुलकर्णी बोलत होत्या. यावेळी नगरसेवक जयंत भावे, तात्यासाहेब ताम्हाणे, सहायक संचालक वृषाली पाटील, माहिती सहायक संग्राम इंगळे, संदीप राठोड, संजय गायकवाड, अक्षय माटे उपस्थित होते.
आमदार मेधा कुलकर्णी म्हणाल्या, माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे प्रकाशन असणारे लोकराज्य हे मासिक अत्यंत दर्जेदार आहे. महाराष्ट्र शासनाचे ते मुखपत्र आहे. गेल्या सत्तर वर्षापासून शासनाच्या विविध कल्याणकारी योजना सामान्यांपर्यंत पोहोचविण्याचे काम हे मासिक करत आहे. लोकराज्य वाचक अभियानाच्या माध्यमातून प्रत्येक व्यक्तीपर्यंत लोकराज्य पोहोचविण्याची संकल्पना अत्यंत चांगली आहे.
स्पर्धा परिक्षेच्या विद्यार्थ्यांसाठी हे मासिक अत्यंत उपयुक्त आहे. याचा लाभ प्रत्येकाने घेण्याचे आवाहन आमदार कुलकर्णी यांनी केले.
*****




Wednesday, September 19, 2018

पर्यटन विकास महामंडळातर्फे पर्यटन पर्वाचे आयोजन


 पुणे, १९- पर्यटन विकास महामंडळाद्वारे दि. १५ ते २७ सप्टेंबर २०१८ या कालावधीत पर्यटन पर्व साजरा करण्यात येणार आहे. या निमित्त पुढील कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
            २० सप्टेंबर रोजी सकाळी ८.४५ वा श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर येथे थायलंड देशातील पर्यटकांची भेट आणि त्यांच्या हस्ते श्रीगणेशाची आरती आणि अभिषेक. २४ सप्टेंबर रोजी सकाळी ११.० वा जिल्हाधिकारी कार्यालय येथे पर्यटन पर्वाचे उद्घाटन आणि आदिवासी हस्तकला प्रदर्शनाचे आयोजन. २५ सप्टेंबर सकाळी १०.०० वा पुणे रेल्वे स्थानक येथे  पर्यटन पर्वानिमित्त पर्यटक जनजागरण कार्यक्रम. २६ सप्टेंबर रोजी सकाळी १०.०० वा  डॉ. डी. वाय पाटील विद्यापीठ लोहगांव येथे पर्यटन दिन व पर्यटन पर्वानिमित्त कार्यक्रम २७ सप्टेंबर रोजी  सकाळी  ७.०० वा पर्यटन पर्वनिमित्त पुणे स्टेशन येथून सायकल फेरी प्रारंभ. २७ सप्टेंबर रोजी सकाळी ८.०० वा शनिवारवाडा येथून सायकल फेरी  या कार्यक्रमाचा सर्वांनी लाभ घ्यावा असे प्रादेशिक व्यवस्थापक महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ यांनी कळविले आहे

00000

अनुसूचित जाती उपयोजनेतर्गेत शेतावर मृद व जलसंधारणाचे उपचारासाठी योजना


  पुणे, १९- जिल्हा वार्षिक योजनेमधून अनुसूचित जाती उपयोजनेतंर्गत (विशेष घटक योजना) अनुसूचित जातीच्या लाभार्थ्यांच्या शेतावर मृद व जलसंधारणाचे विविध उपचार राबविण्यासाठी पुणे जिल्ह्यास एक कोटी वीस लाख रुपये निधी मंजूर झाला आहे.
                  अनुसूचित जातीमधील शेतक-यांना उत्पन्नाचे इतर कायम स्वरुपी साधन नसतेत्यांचे संपूर्ण क्षेत्र सिंचनाखाली आणण्यासाठीच्या मर्यादा लक्षात घेता  कृषि उत्पन्नात वाढ करण्यासाठी कृषि विभागातर्फे पाणलोट विकास कार्यक्रम राबण्यात येत आहे.
                 अनुसूचित जातीच्या शेतक-यांच्या उत्पन्नात वाढ करुन त्यांचे राहणीमान सुधारणे व त्यांचे स्थलांतर रोखणे यासाठी हि योजना १०० टक्के अनुदानावर राबविण्यात येत  आहे. या योजनेतंर्गत अनुसूचित जातीच्या लाभार्थ्यांची संमती घेऊन त्यांच्या वैयक्तीक क्षेत्रावर मृद व जलसंधारणाचे सलग समतल चरकंपार्टमेंट बंडीगअनघड दगडी बांधशेततळेमजगी,जुने भात शेती दुरुस्ती इ. व सामुहीक स्वरुपाचे माती नाला बांधसिंमेंट नाला बांध इ. उपचार घेण्यात येतात.
                या योजनेंतर्गत लाभ घेण्यासाठी अनुसूचित जातीचा दाखला ७/१२ उतारा व ८ अ चा उतारा इ. कागदपत्र देणे आवश्यक आहे. या योजनेचा लाभ घेऊ  इच्छित असलेल्या शेतक-यांनी कृषि विभागाच्या तालुका कृषि अधिकारीमंडळ कृषि अधिकारीकृषि पर्यवेक्षककृषि सहायक तसेच उपविभागीय कृषि अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा असे अवाहन, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी पुणे यांनी केले आहे.
००००

जिल्ह्यात पशुवैद्यकीय सेवा दर्जेदार करणार -पशुसंवर्धन मंत्री महादेव जानकर यांचे प्रतिपादन


सोलापूर दि 19 :- जिल्ह्यात पशुधन वाढाव, पशुधनासाठी चांगल्या व दर्जेदार पशुवैद्यकीय सेवा उपलब्ध होण्यासाठी  पशुसंवर्धन्‍ विभागामार्फत आवश्यक यंत्रसामग्री उपलब्ध करुन देण्यात येईल, असे प्रतिपादन पशुसंवर्धन व दुग्ध विकास मंत्री महादेव जानकर यांनी अकलूज येथे केले.
अकलूज येथे बांधण्यात आलेल्या तालुका लघु पशु वैद्यकीय  चिकित्सालयाचे उद्घाटन पशुसंवर्धन मंत्री जानकर यांचे हस्ते करण्यात आले. त्याप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमास खासदार विजयसिंह मोहिते पाटील, रणजितसिंह मोहितेपाटील यांच्यासह पदाधिकारी, पशुपालक उपस्थित होते.
मंत्री जानकर म्हणाले, ‘अकलूज येथील पशुवैद्यकीय चिकित्सालय या भागातील शेतकऱ्यांच्या पशुधनास सेवा देण्याचे महत्वाचे काम होणार आहे. अकलूज येथील पशुचिकित्सालय  जिल्ह्यात महत्वाचे केंद्रातून  पशुधनासाठी चांगल्या दर्जेदार सेवा मिळव्यात  यासाठी सोनोग्राफी, एक्सरे मशिनच्या युनिटाला मंजुरी दिली जाईल.’
*****

ऑक्टोबर ते डिसेंबरसाठी गहू व तांदूळ नियतन मंजूर


सोलापूर दि 19 :-  राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेंतर्गत अंत्योदय अन्न  योजना व प्राधान्य कुटुंब लाभार्थ्यांसाठी माहे ऑक्टोबर ते डिसेंबरसाठी 2018 साठी गहू व तांदूळाचे नियतन  (अन्नधान्य) मंजूर झाले आहे.यामध्ये  अंत्योदय अन्नयोजनेंतर्गत प्रतिकार्ड लाभार्थ्यांना 20 किलो गहू तर 15 किलो तांदूळ प्राधान्य कुटूंब लाभार्थ्यांसाठी प्रति लाभार्थी 3 किलो गहू तर 2 किलो तांदूळ नियतन मंजूर करण्यात आले आहे. यानुसार  अंत्योदय अन्न योजनेसाठी 1143 क्विंटल गहू व 857 क्विंटल तांदूळ आणि प्राधान्य कुटुंबातील लाभार्थीसाठी 5047.00 क्विंटल गहू व 3364.00 क्विंटल गहू नियतन ऑक्टोबर ते डिसेंबरसाठी 2018  साठी मंजूर असल्याचे  जिल्हा पुरवठा अधिकारी रामचंद्र उगले  यांनी कळविले आहे.
****

जिल्ह्याचा लौकिक कायम राखूया जिल्हास्तरीय शांतता समितीच्या बैठकीत आवाहन


सोलापूर, दि. 18 -  सोलापूर जिल्हा जातीय सलोखा आणि शांततेचा पुरस्कर्ता आहे.  सोलापूर जिल्ह्याचा लौकिक कायम राखू, असं आवाहन आज जिल्हास्तरीय शांतता समितीच्या बैठकीत आज करण्यात आले. 
            जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित केलेल्या जिल्हा स्तरीय शांतता समितीच्या बैठकीत आज हे आवाहन करण्यात आले. बैठकीस आमदार बबन शिंदे, जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले,  जिल्हा पोलिस अधीक्षक मनोज पाटील, अतिरिक्त जिल्हाधिकारी रामचंद्र शिंदे, अतिरिक्त पोलिस अधीक्षक मिलिंद मोहिते आदी उपस्थित होते.
            आमदार बबन शिंदे यांनी सांगितले की गणेशोत्सव आणि मोहरम सण एकत्र आले आहेत. हे दोन्ही सण आपण एकत्र येऊन साजरा करुया. 
            जिल्हाधिकारी भोसले यांनी सांगितले की जिल्ह्यातील सामाजिक सलोखा राखण्याची खरी जबाबदारी ही समाजातील विविध घटकांची आहेत. सोलापुरात ही जबाबदारी सर्व समाजातील नागरिक अतिशय चोखपणे पार पाडतात. जिल्ह्यातील शहरांतील महत्वाच्या चौकात सीसीटीव्ही बसवावेत.
            पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी सांगितले की , जिल्ह्यात गेल्या पाच सहा महिन्यांत विविध आंदोलने झाली. त्यामध्ये एसटी बसेसचे नुकसान झाले. हे टाळायला हवे. सोशल मिडियाचा जबाबदारीने वापर करायला हवा.  याबाबत सर्व समाजाने याबाबत जागरूक रहावे.
            यावेळी मोहोळचे कासिम मणियार, माळखांबीचे प्रशांत शेळके, दक्षिण सोलापूरचे बी. एन. गायकवाड, पंढरपूरचे भीमराव शिंदे, तळेहिप्परगा येथील विशाल कांबळे, अक्कलकोटचे बसवराज हांजगी, मोहोळचे  बिलाल शेख  यांनी मनोगत व्यक्त केले.
            यावेळी उपविभागीय अधिकारी शमा ढोक, ज्योती पाटील, प्रमोद गायकवाड, मारुती बोरकर, उपविभागीय पोलिस अधिकारी सागर कवडे, प्रमोद खांडवी, तहसीलदार मधुसूदन बर्गे, ऋषीकेश शेळके, सदाशिव पडदुणे, अंजली मरोड आदी उपस्थित होते.
'डॉल्बीचा वापर नको'
            अतिरिक्त पोलीस अधीक्षक मिलींद मोहिते यांनी डॉल्बी साऊंड सिस्टीमचा वापर करण्यास न्यायालयाने मनाई केली आहे.  न्यायालयाच्या या आदेशाचे तंतोतंत पालन केले जाईल.  यासाठी सर्वांनी सहकार्य करावे, असे सांगितले.
0000




भरपूर अभ्यास करा, खूप शिका पालकमंत्री देशमुख यांनी साधला विद्यार्थ्यांशी संवाद


          सोलापूर दि. 18 – भरपूर अभ्यास करा, खूप शिका सोलापूरचे नाव रोशन करा, असा सल्ला आज पालकमंत्री विजय देशमुख यांनी विद्यार्थ्यांना दिला.
            पालकमंत्री विजय देशमुख यांनी आज सोलापूर जिल्हा कर्मचारी कल्याण निधी संचलित व डॉ. पंजाबराव देशमुख वसतिगृह निर्वाह भत्ता योजनेअंतर्गत  मान्यता प्राप्त वसतीगृहाचे आज येथील रंगभवन परिसरातील इमारतीमध्ये उद्घाटन करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.
            येथील रंगभवन परिसरातील इमारतीमध्ये वसतीगृह सुरु करण्यात आले आहे. या वसतीगृहात प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांशी पालकमंत्री देशमुख यांनी गप्पा मारल्या. त्यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांना खूप शिका, सोलापूरचे नांव रोशन करा. शिक्षणात अथवा कसली समस्या असल्यास मला अथवा जिल्हाधिकारी भोसले यांना संपर्क साधा, असे सांगितले.
            यावेळी जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले, पोलीस अधीक्षक मनोज पाटील, अतिरिक्त जिल्हाधिकारी रामचंद्र शिंदे, निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली, माऊली पवार, दत्ता मामा मुळे, अनिल कादे, प्राचार्य महेंद्र चितलांगे, प्रांताधिकारी शिवाजी जगताप, दीपक शिंदे आदी उपस्थित होते
            सध्या महसूल कर्मचारी कल्याण निधी संचलित इमारतीच्या चार खोल्या वसतिगृहासाठी घेण्यात आल्या आहेत. त्यातील दोन खोल्यात प्रत्येकी सात आणि दोन खोल्यात प्रत्येकी पाच विद्यार्थ्यांची निवासाची व्यवस्था होऊ शकते. वसतिगृहात प्रवेशासाठी एकूण बारा विद्यार्थ्यांचे अर्ज आले होते. त्यापैकी सात विद्यार्थी पात्र असून त्यांना प्रवेश देण्यात आल्याचे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले..
000