Saturday, May 2, 2020

पुणे विभागात 46 हजार 931 क्विंटल अन्नधान्याची तर 11 हजार 186 क्विंटल भाजीपाल्याची आवक -विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर



        पुणे, दि.2 : सध्याच्या लॉकडाऊन काळात पुणे विभागात अन्नधान्य व भाजीपाल्याचा पुरेसा साठा उपलब्ध आहे. विभागात अंदाजे 46 हजार 931 क्विंटल अन्नधान्याची तर 11 हजार 186  क्विंटल भाजीपाल्याची आवक मार्केटमध्ये झाली आहे. विभागात 5 हजार 217 क्विंटल फळांची आवक तसेच कांदा-बटाटयाची आवक 21 हजार 154 क्विंटल इतकी झाली आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी दिली आहे.
            पुणे विभागात 1 मे 2020 रोजी 100.098 लाख लिटर दुधाचे संकलन झाले असून 23.646 लाख लिटर दुधाचे पॅकेजिंग स्वरुपात वितरण झाले आहे. तर उर्वरित दूध सुट्टया स्वरुपात वितरित करण्यात आले आहे, असेही डॉ. म्हैसेकर यांनी सांगितले.


पुणे विभागात 40 हजार 993 स्थलांतरित मजुरांची सोय
1 लाख 12 हजार 793 मजुरांना भोजन

       सध्याच्या लॉकडाऊन परिस्थितीत स्थलांतर केलेल्या मजुरांसाठी जिल्हा प्रशासनामार्फत 158 कॅम्प, कामगार विभागामार्फत 68  कॅम्प तर साखर कारखान्यांमार्फत 255 कॅम्प असे  पुणे विभागात एकुण 481 रिलीफ कॅम्प उभारण्यात आले आहेत.    या कॅम्पमध्ये 40 हजार 993 स्थलांतरित मजूर असून 1 लाख  12 हजार 793 मजुरांना भोजन देण्यात येत आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी दिली.
0000

विस्थापित आदिवासी नागरिक यांच्या प्रवासाच्या नियोजनाकरीता अधिका-यांची नियुक्ती -जिल्हाधिकारी नवल किशोर राम


पुणे दि.2 : -  आंतरराष्ट्रीय स्तरावर व देशांतर्गत कोरोना विषाणू संसर्ग बाधित रुग्ण आढळत आहेत. तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावरुन व देशांतर्गत विमान प्रवासाद्वारे प्रवासी भारतात व इतरत्र प्रवास करीत आहेत. त्यामुळे कोरोना विषाणूचे संशयित रुग्ण पुणे शहरातही आढळून आल्याचे निदर्शनास आलेले आहे. त्यामुळे संसर्ग वाढण्याची शक्यता लक्षात घेता त्यावर तात्काळ नियंत्रण  करणे व विषाणूच्या संसर्गात अधिक वाढ होऊ न देता तात्काळ उपाययोजना आखणे आवश्यक आहे. महाराष्ट्र शासनाच्या अधिसूचनेअन्वये विस्थापित आदिवासी नागरिक यांचे प्रवासाकरीताआदेश निर्गमित केले आहेत. या आदेशानुसार सदर व्यक्तींची प्रवास व्यवस्था व त्याचे नियोजन करण्यात आले आहे. तसेच अधिकारी, कर्मचा-यांची आपत्ती व्यवस्थापन कायदा अन्वये नियुक्ती करण्यात आली आहे, अशी माहिती  जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी दिली.
घोडेगावचे सहाय्यक प्रकल्प अधिकारी श्री. रामभाऊ पंदुरे, (मो. 9850549740) पुणे जिल्हयातून बाहेरच्या राज्यामध्ये, जिल्हयात जाणा-या आदिवासी नागरिकांना त्या त्या संबधित राज्य, जिल्हयाकडून परवानगी घेणे. तसेच संबंधित कामगारांची स्क्रिनिंग झालेबाबतची खात्री करणे, परवानगी पत्र तयार करुन घेणे, व त्यांना संबंधित त्या त्या राज्यामध्ये, पाठविण्याची व्यवस्था करणे, बाहेरच्या राज्यातून,जिल्हयातून पुणे जिल्हयात येणा-या आदिवासी नागरिकांची (परराज्यातून,जिल्हयातुन येणारे) यांची वैद्यकीय तपासणी करणे, त्यांना क्वारंटाईन करण्याची व्यवस्था करणे. तसेच संबंधिताना त्यांचे रहिवास  ठिकाणी पोहोच करण्याची व्यवस्था करणे याकरिता उपविभागीय अधिकारी तथा प्रकल्प अधिकारी, आदिवासी प्रकल्प घोडेगांव श्री. जितेंद्र डुड्डी, यांचेशी समन्वय साधुन कार्यवाही करणे. तसेच संदर्भिय आदेशामधील Annexure A प B (SOP) प्रमाणे कार्यवाही करणेबाबतचे आदेश जिल्हाधिकारी राम यांनी दिले आहेत.

विस्थापित कामगार, यात्रेकरु, पर्यटक, विद्यार्थी व इतर व्यक्ती यांच्या प्रवासाच्या नियोजनाकरीता अधिका-यांची नियुक्ती -जिल्हाधिकारी नवल किशोर राम



पुणे दि.2 : -  आंतरराष्ट्रीय स्तरावर व देशांतर्गत कोरोना विषाणू संसर्ग बाधित रुग्ण आढळत आहेत. तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावरुन व देशांतर्गत विमान प्रवासाद्वारे प्रवासी भारतात व इतरत्र प्रवास करीत आहेत. त्यामुळे कोरोना विषाणूचे संशयित रुग्ण पुणे शहरातही आढळून आल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे संसर्ग वाढण्याची शक्यता लक्षात घेता त्यावर तात्काळ नियंत्रण  करणे व विषाणूच्या संसर्गात अधिक वाढ होऊ न देता तात्काळ उपाययोजना आखणे आवश्यक आहे. राज्य शासनाच्या अधिसूचनेअन्वये विस्थापित कामगार यात्रेकरु, पर्यटक, विद्यार्थी  व इतर व्यक्ती यांचे प्रवासाकरीता आदेश निगर्मित केले आहेत. या आदेशानुसार सदर व्यक्तींची प्रवास व्यवस्था व त्याचे नियोजन करण्यात आले आहे तसेच अधिकारी, कर्मचा-यांची आपत्ती व्यवस्थापन कायदा अन्वये नियुक्ती करण्यात आली आहे. अशी माहिती  जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी दिली.
उपजिल्हाधिकारी सुभाष भागडे ( मो.नं.9423043030) व तहसिलदार, संजय गांधी योजना,पुणे शहर श्रीमती रोहिणी आखाडे ( मो.नं. 9226373191),अव्वल कारकून ( महसूल शाखा) कैलास बांडे, लिपीक (महसूल) अंकुश गायकवाड, लिपिक, (संजय गांधी योजना) तहसिल कार्यालय श्रीमती आफरीन शेख यांचेकडे पुणे जिल्हयातून बाहेरच्या राज्यामध्ये, जिल्हयात जाणा-या स्थलांतरित कामगारांसाठी त्या-त्या संबंधित राज्य, जिल्हयाकडून परवानगी घेणे तसेच संबंधित कामगारांचे स्क्रिनिंग झालेबाबतची खात्री करणे, परवानगी पत्र तयार करुन घेणे. व त्यांना संबंधित त्या-त्या  राज्यामध्ये, जिल्हयामध्ये पाठविण्याची व्यवस्था करणे तसेच संदर्भिय आदेशामधील Annexure A व B         ( SOP) प्रमाणे कार्यवाही करणे
उपजिल्हाधिकारी भूसंपादन निता सावंत ( मो.नं. 9421118446),तहसिलदार ( महसूल शाखा), जिल्हाधिकारी कार्यालय  विवेक जाधव ( मो.नं.9421215678),  अव्वल कारकून ( महसूल शाखा) योगेश कुंभार, अव्वल कारकून ( महसूल शाखा) श्रीमती सारिका चौधरी, लिपिक ( महसूल शाखा) शशिकांत वाघ यांचेकडे पुणे जिल्हयातून बाहेरच्या राज्यामध्ये, जिल्हयात जाणा-या स्थलांतरित, विद्यार्थी, यात्रेकरु, पर्यटनासाठी त्या-त्या संबंधित राज्य, जिल्हयाकडून परवानगी घेणे तसेच संबंधित कामगारांचे स्क्रिनिंग झालेबाबतची खात्री करणे. परवानगी पत्र तयार करुन घेणे. व त्यांना संबंधित त्या-त्या राज्यामध्ये, जिल्हयामध्ये पाठविण्याची व्यवस्था करणे तसेच संदर्भिय आदेशामधील Annexure A व B ( SOP) प्रमाणे कार्यवाही करणे
उपजिल्हाधिकारी जिल्हाधिकारी कार्यालय (स्वागत शाखा) अमृत नाटेकर ( मो.नं. 9834468894/ 9422616033), तहसिलदार,जिल्हाधिकारी कार्यालय ( पुनर्वसन शाखा) श्रीमती स्मिता पवार, अव्वल कारकून ( स्वागत शाखा) आदेश दुनाखे, अव्वल कारकून (पुनर्वसन शाखा) संतोष भालेरे, लिपीक (पुनर्वसन शाखा) यांचेकडे बाहेरच्या राज्यातून, जिल्हयातून पुणे जिल्हयात येणा-या स्थलांतरित विद्यार्थी, यात्रेकरु, पर्यटक यांची वैद्यकीय तपासणी करणे, त्यांना क्वारंटाईन करण्याची व्यवस्था करणे, तसेच संबंधितांना त्यांचे रहिवास ठिकाणी पोहोच करण्याची व्यवस्था करावी, तसेच संदर्भिय आदेशामधील Annexure A व B ( SOP) प्रमाणे कार्यवाही करणे
उपजिल्हाधिकारी, भूसंपादन क्र.3 श्रीमंत पाटोळे (मो. नं. 9075748361), तहसिलदार (पुनर्वसन शाखा)  बालाजी सोमवंशी ( मो.नं.8308127992), अव्वल कारकून ( पुनर्वसन शाखा) जितेंद्र पाटील, लिपीक (पुनर्वसन शाखा) मिलींद पोळ, मंडल अधिकारी ( भूसंपादन क्र.3) राजेंद्र वाघ यांच्याकडे बाहेरच्या जिल्हयातून पुणे जिल्हयात येणा-या स्थलांतरित कामगार ( परराज्यात / जिल्हयात येणारे) यांची वैद्यकीय तपासणी करणे, त्यांना क्वारंटाईन करण्याची व्यवस्था करणे, तसेच संबंधितांना त्यांचे रहिवास ठिकाणी पोहोच करण्याची व्यवस्था करावी, तसेच संदर्भिय आदेशामधील Annexure A व B ( SOP) प्रमाणे कार्यवाही करणे .
संजय पवार, उपजिल्हाधिकारी (मो.9850032095), सहाय्यक श्रीमती विमल डोलारे, , श्रीमती शुभद्रा पंडीत, अ.का.सर्वसाधारण शाखा, श्रीमती छाया सानप, लिपिक, सर्वसाधारण शाखा, श्रीमती सरिता नेहरकर, लिपिक, लेखा शाखा यांनी जिल्हा आरोग्य अधिकारी व जिल्हा शल्य चिकित्सक, आरोग्य विभाग व शिक्षण विभाग यांचेशी समन्वय साधून कोरोना या संसर्ग आजाराचा पुणे जिल्हयामध्ये जनजागृती व प्रतिबंधात्मक उपाययोजना करणेबाबत आवश्यक ती कार्यवाही करणे. सर्व शासकीय , निमशासकीय आस्थापनेवरील सर्व अधिकारी व कर्मचारी यांना प्रशिक्षण संबंधित यंत्रणेकडून देण्यात आले आहे. किंवा कसे याबाबतची खात्री करुन अहवाल नियंत्रण  कक्षास सादर करणे. कंटेनमेंट प्लॅनचा काळजीपूर्वक अभ्यास करुन आरोग्य विभागाच्या अधिका-यांशी समन्वय करुन यासंदर्भात समन्वय अधिकारी यांची क्षमता बांधणी करणे. विद्यार्थी, यात्रेकरु, पर्यटक व स्थलांतरित कामगार, इतर व्यक्ती इतर राज्यात, जिल्हयात वैयक्तीक स्वत:च्या वाहनाने जाणा-या व्यक्तींकरिता पासेस देण्याची कार्यवाही करणे. माहिती नियंत्रण कक्षाला कळविणेत यावी.
नोंदणी व मुद्रांक शुल्क कार्यालयाचे उपजिल्हाधिकारी श्री. हिम्मत खरोड, (मो. 9422072572). सहाय्यक अधिकारी व कर्मचारी  श्रीमती रुपाली रेडेकर, तहसिलदार निवडणूक शाखा, श्रीमती नेहा चाबुकस्वार, नायब तहसिलदार, श्री. योगेश ब्रम्हे, अ.का., श्री.सचिन कोकाटे, अ.का., श्रीमती पुजा नाईक, अ.का., श्रीमती शितल शिंदे, लिपिक, श्री. संदिप पवार, लिपिक शासन आदेश क्र. DMU/2020/CR.92/DisM-1, दिनांक 17.04.2020 प्रमाणे सर्व प्रकारचे पासेस देणे. पुणे जिल्हयात व इतर ठिकाणावरुन पास बाबत दुरध्वनी व ई-मेलव्दारे येणा-या तक्रारी व विचारणा करणा-या नागरिकांना मार्गदर्शन करणे. दररोज  अहवाल नियंत्रण कक्षास सादर करणे. तसेच अत्यावश्यक व वैद्यकीय व्यक्तींना पास देण्याची कार्यवाही करणे.
उप प्रादेशिक परिवहन अधिकारी श्री. संजीव भोर (मो. 9422221114), उप प्रादेशिक  परिवहन अधिकारी, पिंपरी चिंचवड श्री. विनोद सकरे, (मो. 8605837070) उपरोक्त नोडल अधिकारी यांना विद्यार्थी यात्रेकरु, पर्यटक व स्थलांतरित कामगार, इतर व्यक्ती (परराज्यात, जिल्हयात येणारे व जाणारे) यांची प्रवास मार्गनिहाय वाहतूक व्यवस्था करणेकरिता नोडल अधिकारी यांचेशी समन्वय साधून कार्यवाही करणे बाबतची जबाबदारी देण्यात आली आहे. जिल्हाधिकारी राम यांनी नुकताच याबाबतचा आदेश निर्गमित केला आहे.
0000

Friday, May 1, 2020

Corona updates from PMC

Corona updates from PMC 
01.05.2020
Time :- 9.30 P.M.

Case summary
 
* Total admissions  9889
* Negative _ 8396
* Negative Discharge - 8396
** COV positive cured & discharged - 325*
 *(Naidu-109, Bharati (PMC ) - 44, Symbiosis (pmc) - 101 ,Sahyadri Nagar Road hospital - 1 ,Bharati Hospital - 4, K.E.M - 14, DMH - 12 , Jahangir - 3 , Poona Hospital- 4,Sahyadri Karve – 4 Sahyadri Hadapsar -1, ruby -3, Noble – 1, Inlanks – 2, Sasoon -22)
*critical : on ventilator 12*
*Serious and on o2 therapy   = 56*
* PositiveProgressive in pmc - 1379
 * Total passengers  - 12134
* Under surveillance  passengers  - 8878
* Surveillance completion (14days of incubation period consider) - 3256
** Still in Hospital Positive patients -1057*
1) Naidu -   102
2)Symbiosis Center - 172
3)Sanas ground - 81
4)Rakshak Nagar- 47
5) Bopodi -51
6) Laygude - 22
7) Bharati (PMC) - 63
8) Bharati - 42
9) SH - karve - 06
10) K.E.M - 15
11) Jahangir  - 16
12) Poona Hospital - 01
13) DMH - 48
14)Ruby Hall – 43
15] Inlaks  - 01 
16) Noble - 13
17) Sahyadri Surya - 1 
18) Sahyadri Ngr Road - 1
19] NICMAR – 139
20] Singhgad Institute Girls Hostel  [ Godhavari ] – 135
21] Pune Cantonment [ PMC ] – 18 
22] Yewale Wadi - 40
*
*Sassoon Hospital**
a) Positive progressive - 232***
b. Sassoon Discharge – 22
c. Negative – 1747
* Up Till Now,
**  Total Death Progressive*=
  Sassoon  60 +Aundh civil -3+Naidu 2+ Noble 2+ Inamdar -1+ Jehangir -1+ Sahyadri Karve -1,+ Poona Hospital -1  + KEM -5 ,DMH -4,Symbiosis - 2, Inlanks - 1 , Bharati – 6 +AICTs-1 , +YCM -1=* *91 
*up till now Total progressive positive = pmc  1379 + 232  Sasoon = 1611. Out of 1611 -91 total death – 325 total  discharge  = 1195  active cases ***present.*

पुणे विभागातील 358 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी विभागात कोरोना बाधित 1 हजार 986 रुग्ण -विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर

पुणे विभागातील 358 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी 
विभागात कोरोना बाधित 1 हजार 986 रुग्ण
                            -विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर
 
  पुणे दि. 1:-पुणे विभागातील 358 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 1 हजार 986 झाली आहे.  तर ॲक्टीव रुग्ण 1 हजार 519 आहेत. विभागात कोरोनाबाधीत एकुण 109 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच 77 रुग्ण  गंभीर असून उर्वरीत निरीक्षणाखाली आहेत, अशी माहिती विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर यांनी दिली.
  विभागात 1 हजार 986 बाधित रुग्ण असून 109 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यापैकी पुणे जिल्हयात 1 हजार 783 बाधीत रुग्ण असून 99 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सातारा जिल्हयात 52 बाधीत रुग्ण असून 2 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सोलापूर जिल्हयात 106 बाधीत रुग्ण असून 6 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सांगली जिल्हयात 31 बाधीत रुग्ण असून  एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. कोल्हापूर  जिल्हयात 14 बाधीत रुग्ण असून एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे.
पुणे जिल्हयातील कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 1 हजार 783 झाली आहे. 309 कोरोना बाधीत रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत.  ॲक्टीव रुग्ण संख्या 1 हजार 375 आहे. पुणे जिल्हयात कोरोनाबाधीत एकुण 99 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच 76 रुग्ण गंभीर असून उर्वरीत निरीक्षणा खाली आहेत. 
          आजपर्यत विभागात  19 हजार 989 नमूने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते त्यापैकी 19 हजार 96 चा अहवाल प्राप्त आहे. 1 हजार 48 नमून्यांचा अहवाल प्रतीक्षेत आहे. प्राप्त अहवालांपैकी 17 हजार 58 नमून्यांचा अहवाल निगेटीव्ह असून 1 हजार 986 चा अहवाल पॉझिटिव्ह आहे.
          आजपर्यंत विभागामधील 66 लाख 1 हजार 329 घरांचे सर्वेक्षण पूर्ण करण्यात आले असून त्याअंतर्गत 2 कोटी 55 लाख 47 हजार 352 व्यक्तींची तपासणी केली आहे. त्यापैकी 1 हजार 452 व्यक्तींना अधिक तपासणीसाठी संदर्भीत करण्यात आले आहे.
0000

बारामती पॅटर्न नुसार कडक निर्बंध पाळून पुण्यातील वाढत्या रुग्ण संख्येला आळा घाला -उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निर्देश







* कोरोना प्रतिबंधासाठी हॉट स्पॉट भागावर अधिक लक्ष केंद्रित करा

* पुणे आणि पिंपरी चिंचवड मधील कंटेंटमेंट भागासाठी सूक्ष्म नियोजन करा 

* दाट लोकवस्ती मधील नियंत्रणासाठी स्वच्छतेवर भर द्या

* रेड झोन मधील नागरिक ये-जा करु नयेत यासाठी पोलिसांनी तपासणी वाढवावी

* अधिकाऱ्यांनी समन्वय ठेवून कार्यवाही करावी

* नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावे

            पुणे, दि. १ : पुणे आणि पिंपरी-चिंचवड मध्ये रुग्णांची संख्या वाढत असून ही चिंतेची बाब आहे. बारामती पॅटर्न नुसार कडक निर्बंध पाळून येथील रुग्णसंख्येला आळा घाला, असे निर्देश उपमुख्यमंत्री तथा जिल्हयाचे पालकमंत्री अजित पवार यांनी आज पुणे येथे दिले. येथील सर्व अधिकाऱ्यांनी मिळून समन्वयाने सुक्ष्म नियोजन करुन आवश्यक त्या सर्व उपाययोजना राबवून कोरोनाचा फैलाव थांबवावा, असे आवाहनही श्री.पवार  यांनी  यावेळी केले.

           पुण्यातील कौन्सिल हॉल येथे उपमुख्यमंत्री श्री.पवार यांच्या अध्यक्षतेखाली प्रशासनाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत बैठक घेण्यात आली, यावेळी त्यांनी हे निर्देश दिले. या बैठकीला महापौर मुरलीधर मोहोळ, महापौर उषा उर्फ माई ढोरे, आमदार सुनील शेळके, विभागीय आयुक्त  डॉ. दीपक म्हैसेकर, पोलीस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम, संदीप विष्णोई, जिल्हाधिकारी नवल किशोर राम, पुणे महापालिका आयुक्त शेखर गायकवाड, पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर, सहकार आयुक्त अनिल कवडे, साखर आयुक्त सौरभ राव, पशुसंवर्धन आयुक्त सचिंद्र प्रताप सिंग, भूजल सर्व्हेक्षण संचालक कौस्तुभ दिवेगावकर, अतिरिक्त आयुक्त रुबल अग्रवाल, पोलीस अधीक्षक संदीप पाटील, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, आरोग्य विभागाचे निवृत्त महासंचालक डॉ. सुभाष साळुंखे आदींसह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

              कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर त्या त्या विभागांकडून करण्यात येणाऱ्या विविध उपाययोजनांबाबत उपमुख्यमंत्री श्री. पवार यांनी बैठकीत माहिती जाणून घेतली. त्याचबरोबर आवश्यक ते उपाय सुचवून त्यांची जलदगतीने कार्यवाही करण्याच्या सूचना त्यांनी  संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.

       कोणत्याही परिस्थितीत लवकरात लवकर पुणे आणि पिंपरी चिंचवड मधील कोरोना बाधित रुग्णांची संख्या व मृत्यू दर कमी करणे गरजेचे आहे. महानगरपालिकांतर्गत असणाऱ्या हॉटस्पॉटनिहाय अधिकाऱ्यांवर जबाबदारी सोपवावी. कोरोना नियंत्रणासाठी नियुक्त करण्यात आलेल्या वरिष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्यांचा यासाठी सहभाग घ्यावा. संबंधित अधिकाऱ्यांनी त्या त्या भागातील रुग्णसंख्या नियंत्रणात आणण्यासाठी काटेकोर नियोजन करुन त्यानुसार समन्वय ठेवून अंमलबजावणी करावी. तसेच अति संवेदनशील भागात टेस्टींगचे प्रमाण वाढवण्यासाठी आधुनिक तंत्राचा वापर करण्याबाबत विचार करा. त्याचबरोबर खबरदारीचा उपाय म्हणून झोपडपट्टी परिसरात तपासणी वाढवून या भागातील स्वच्छतेवर भर द्यावा. तसेच येथील नागरिकांना मास्क, सॅनिटायझरचे वाटप लवकरात लवकर करा, असेही त्यांनी सांगितले.

उपमुख्यमंत्री श्री. पवार म्हणाले, कंटेंटमेंट भागात पोलीस प्रशासनाने निर्बंधांची कडक अंमलबजावणी करावी.  या परिसरातील नागरिक अन्य भागात ये-जा करु नयेत याची खबरदारी घ्यावी. शहरातील रुग्णसंख्या नियंत्रणात राहण्यासाठी झोपडपट्टी भागातील कुटुंबियांचे संस्थात्मक क्वारंटाईन करावे. नागरिकांनीही सामाजिक अंतर पाळणे, मास्क वापरणे, सॅनिटायझरचा वापर करणे, अशा सामाजिक शिष्टाचाराबाबत प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करणे गरजेचे आहे. तसेच सद्य परिस्थितीत घालून दिलेले निर्बंध पाळून प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन उपमुख्यमंत्री श्री. पवार यांनी केले.

              कोरोना प्रतिबंधासाठीच्या उपाययोजना राबविण्यासाठी आरोग्यसेवा सक्षम करा, असे सांगून यासाठी राज्यशासन सर्वतोपरी मदत करेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. खासगी दवाखाने सुरु ठेवण्याबाबत  दोन्ही महापालिका आयुक्तांनी कडक निर्देश द्यावेत, अशा सूचना करुन ते म्हणाले, ससून रुग्णालयात कार्यरत डॉक्टरांची खाजगी हॉटेलमध्ये सोय करण्यात येत असून त्या धर्तीवर कोरोना विषयक कामातील पोलीसांची देखील हॉटेलमध्ये सोय उपलब्ध करुन द्यावी.

  पुणे, पिंपरी चिंचवड, मालेगाव, औरंगाबाद अशी जास्त रुग्ण संख्या असणारी शहरे वगळून अन्य ठिकाणी इंडस्ट्री सुरु करण्याबाबत राज्य शासन विचाराधीन आहे. येथील ग्रामीण भागातील कारखानदारी सुरु करण्यासाठी नियोजन करावे.  तथापी यासाठी आवश्यक त्या नियमांचे व  सामाजिक शिष्टाचाराचे पालन करणे आवश्यक राहील. त्याचबरोबर शहरी भागातील कंटेंटमेंट भाग वगळता अन्य भागातील कारखानदारी बाबतही नियोजन करावे. निवारागृहात असलेल्या कामगारांना चोख सोयी- सुविधा पुरवाव्यात तसेच पर राज्यातील मजुर, कामगारांच्या स्थलांतराबाबत संबंधित जिल्हाधिका-यांनी एकमेकांशी समन्वय साधून कार्यवाही करावी, असेही त्यांनी सांगितले. 
             
विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी विभागातील पुणे, पिंपरी चिंचवड व सोलापूर सह विभागातील कोरोना परिस्थितीची सविस्तर माहिती दिली. जास्त रुग्ण असणाऱ्या प्रभागात प्रशासन विभागांच्या वतीने करण्यात येत असणाऱ्या उपाययोजनांची  माहिती दिली. 
महानगरपालिका क्षेत्रात आढळलेले रुग्ण, या रुग्णांच्या अति निकटच्या संपर्कात आलेले नागरिक, गृहभेटी, फ्ल्यू क्लिनिक मधून निष्पन्न झालेले व प्रवास करुन आल्यानंतर आढळलेल्या रुग्णांची संख्यात्मक माहिती महानगरपालिका आयुक्त शेखर गायकवाड यांनी दिली. तसेच प्रतिबंधित क्षेत्रात महानगरपालिकेच्या वतीने करण्यात येणारी खबरदारी विशद केली. 

जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी कोरोना चा प्रसार रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांची माहिती दिली. 
 पोलीस आयुक्त डॉ.के.व्यंकटेशम, संदीप बिष्णोई व पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनी पोलीस प्रशासनाच्या वतीने करण्यात येणाऱ्या उपाययोजनांबाबत माहिती दिली. 

महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर, सहकार आयुक्त अनिल कवडे, साखर आयुक्त सौरभ राव, पशुसंवर्धन आयुक्त सचिंद्र प्रताप सिंग, भूजल सर्व्हेक्षण संचालक कौस्तुभ दिवेगावकर, अतिरिक्त आयुक्त रुबल अग्रवाल, मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, डॉ. सुभाष साळुंखे यांनी देखील कोरोना प्रतिबंधासाठी करण्यात येत असलेल्या उपाययोजनांची माहिती दिली. अतिसंवेदनशील भागात आवश्यक असणाऱ्या उपाययोजना, आवश्यक मनुष्यबळ, टेस्टींग, ट्रेसींगबाबत करण्यात आलेल्या नियोजनाची देखील सविस्तर माहिती दिली.

00000000

खरीप हंगामाचे काटेकोर नियोजन करा-उपमुख्यमंत्री अजित पवार

  पुणे जिल्हा खरीप हंगाम आढावा बैठक





  पुणे दि.1:- खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांच्या मागणीप्रमाणे खते, बियाणे, किटकनाशके उपलब्ध करुन देण्याबाबतचे आवश्यक ते नियोजन कृषि विभागाने करावे. कृषि निवीष्ठाबाबत आवश्यक ती दक्षता घेण्यासाठी भरारी पथके नेमून जादा दराने विक्री होणार नाही याबाबत दक्ष राहून खरीप हंगामाचे काटेकोर नियोजन करा, अशा सूचना उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्हयाचे पालकमंत्री अजित पवार यांनी दिल्या.
  विभागीय आयुक्त कार्यालयात खरीप हंगाम आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी नवल किशोर राम, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ.जयश्री कटारे, उपजिल्हाधिकारी विजयसिंह देशमुख, विभागीय कृषी सहसंचालक दिलीप झेंडे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बाळासाहेब पडघलमल, महावितरणचे अधीक्षक अभियंता राजेंद्र पवार, जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ.शितलकुमार मुकणे, महावितरणचे मुख्य अभियंता सुनिल पावडे, जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक आनंद बेडेकर आदींसह  लोकप्रतिनिधी व विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
  उपमुख्यमंत्री श्री.पवार म्हणाले, पुणे जिल्हयात 2 लाख 30 हजार 937 हेक्टर क्षेत्राचे खरीप हंगामासाठी नियोजन करण्यात आले आहे. यामध्ये भात, बाजरी, मका, नाचणी, सोयाबीन क्षेत्राचा समावेश आहे. यासाठी 26 हजार क्विंटल बियाणांची गरज आहे. शेतकऱ्यांच्या मागणीप्रमाणे थेट बांधावर खते कृषि निवीष्ठा उपलब्ध करुन देण्यासोबतच यामध्ये कोणत्याही परिस्थितीत हयगय करु नका. कृषि निवीष्ठाबाबत भरारी पथकाच्या माध्यमातून लक्ष ठेवणे आवश्यक असून यामध्ये जादा दराने विक्री होणार नाही तसेच याबाबत शेतकऱ्याची अडवणूक होणार नाही या दृष्टीने सतर्क राहण्याच्या सूचनाही श्री.पवार यांनी दिल्या.
  शेतकऱ्यांना पुरविण्यात येणाऱ्या बियाणांची उगवणक्षमता दर्जेदार असावी असे सांगून श्री.पवार म्हणाले, कृषि विभागाने बियाणे उपलब्धतेबाबत व त्याच्या गुणवत्तेबाबत अत्यंत काटेकोरपणे नियोजन करावे. उत्पादन खर्च कमी करण्याच्या दृष्टीने शेतकऱ्यांना स्वत:कडील दर्जेदार बियाणेही वापरणे शक्य होईल. शेतकऱ्यांना खते व पिक नियोजन सुलभ होण्याच्या दृष्टीने माती परिक्षण महत्वाचे असल्याचे सांगून शेतकरी ते ग्राहक थेट बाजारव्यवस्था उभारणीबाबतचा निर्णय लवकरात लवकर घेण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
  जिल्हयातील दुरुस्तीअभावी बंद असलेल्या ट्रान्सफार्मरबाबतची अडचण तसेच शेतकऱ्यांना वीज कनेक्शन देण्याबाबत निर्णय घेण्यात येईल, असे सांगून खत मागणी व पुरवठा, कृषि निविष्ठा विक्रेत्यांची संख्या, गुणवत्ता नियंत्रण निरीक्षकांसाठी नमुन्याचे नियोजन, संनियत्रणासाठी स्थापन केलेली भरारी पथके, संनियंत्रण कक्ष, राष्ट्रीय शाश्वत शेती अभियान, उन्नत शेती, समृध्द शेती, मागेल त्याला शेततळे, प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना, एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान, राष्ट्रीय कृषी विकास योजना, खरीप, रब्बी पीक कर्जवाटप, विंधन विहीर दुरुस्ती, गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना आदी विषयांचा सविस्तर आढावा घेण्यात आला.
  जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी पुणे जिल्हा खरीप हंगाम 2020 च्या नियोजनाबाबत सादरीकरणाव्दारे सविस्तर माहिती दिली. यावेळी विविध विभागांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.
0 000