Wednesday, September 9, 2020

पुढील हंगामासाठी सोयाबीन बियाणे तयार करा घरीच कृषी विभागाचा शेतकऱ्यांना सल्ला


            सोलापूर,दि.9सोलापूर जिल्ह्यात यंदा अनेक ठिकाणी सोयाबीन बियाणे उगवले नसल्याच्या तक्रारी आल्या आहेत. बियाणे कंपन्याही पुढच्या वर्षी सोयाबीनचे बियाणे पुरवठा करण्याच्या मानसिकतेत नसल्याने शेतकऱ्यांनी शेतातील सोयाबीनचे बियाणे तयार करावेतअसे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रवींद्र माने यांनी केले आहे.

            यंदा जिल्ह्यात जून ते सप्टेंबर अखेर 428.2 मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून याची टक्केवारी 119.7 आहे. जिल्ह्यात सोयाबीनचा पेराही वाढला असून 61 हजार 207 हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे. याची टक्केवारी 162 टक्के आहे. यात बार्शी तालुक्यातील क्षेत्र 31 हजार 749 हेक्टर आहे. काही ठिकाणी बियाण्यांच्या तक्रारी आल्या असून यामुळे शेतकऱ्यांना पुढच्या वर्षी घरच्या घरीच बियाणे तयार करावे लागणार आहे. बियाणांचा खर्च कमी करून शेतकऱ्यांना गुणवत्तापूर्ण बियाणे शेतावरच तयार करता येणार आहे. याची प्रक्रियाही सोपी आहे.

बियाणांची निर्मितीकाढणी आणि साठवणूक यावेळी काळजी घेतल्यास दर्जेदारगुणत्तापूर्ण बियाणे घरच्या घरी तयार करू शकतोअसेही श्री. माने यांनी सांगितले.

        बियाणे तयार करण्याची पद्धत आणि घ्यावयाची काळजी

  • ज्या शेतातील बियाणे तयार करणार आहोततेथील तण, भेसळरोगटशेंगा भरत असलेली झाडे काढून टाकावीत.
  • कीड आणि रोगाचा बंदोबस्त करावा. शेंगा भरत असताना आंतरप्रवाही बुरशीनाशकाची फवारणी करावीत्यामुळे साठवणुकीमध्ये बुरशी वाढणार नाही.
  • चारही बाजूला त्याच वाणाचे सोयाबीन असावे. नसेल तर ज्या बाजूला वाणाचे बियाणे नाहीत्या बाजूला बांधापासून 3 मीटर आतपर्यंतची झाडे बियाणासाठी काढणीच्यावेळी घेऊ नयेत.
  • कापणी वेळीच करावी. कापणीनंतर पावसात भिजलेले बियाणे राखून ठेऊ नये.
  • सोयाबीन पीक परिपक्व अवस्थेत असताना पाऊस आल्यामुळे बियाण्याची उगवण क्षमता कायम राखण्यासाठी कापणीपूर्वी बाविस्टीन किंवा कॅप्टन बुरशीनाशकाची फवारणी करावी.
  • कापणीनंतर बियाण्यातील आर्द्रता 13-14 टक्के आणण्यासाठी 1 ते 2 दिवस बियाणे उन्हात सुकवावे. उत्पादित बियाणांची आर्द्रता 14 टक्के असेल तर मळणी यंत्राचा वेग 400 ते 500 आरपीएम आणि 13 टक्के असेल तर वेग 300 ते 400 आरपीएम असावा. अन्यथा बियाणांमध्ये तांत्रिक नुकसान होऊ शकते.
  • बियाणे वाळविताना मोठा ढीग न करता पातळ थरावर वाळवावे. साठवणूक करण्यापूर्वी बियाणातील आर्द्रता 9 ते 12 टक्के असेल याची काळजी घ्यावी.
  • वाळलेले आणि स्वच्छ चाळणी केलेले बियाणे ज्यूट बारदानामध्ये भरावे. पोत्यामध्ये साधारण 60 किलोपर्यंत बियाणे साठवावे.
  • साठवणूक करतेवेळी एकावर एक थप्पी ठेवण्याऐवजी बियाणे वेगळे ठेवावे. जमिनीवर तट्टे किंवा लाकडी फळ्यांचा वापर करून कोरड्या जागी साठवणूक करावी.
  • पोत्याची रचना उभ्या-आडव्या पद्धतीने करावी म्हणजे हवा खेळती राहून बियाणांची गुणवत्ता जास्त काळ टिकण्यास मदत होईल. बियाणे नाजूक असल्याने उंचावरून आदळणार नाहीतयाची काळजी घ्यावी.
  • आपल्या बियाणांची उगवणक्षमता तीनवेळा म्हणजे डिसेंबरमार्च आणि जूनमध्ये चाचणी करूनच पेरणी करावी.

 

00000000

“विकेल ते पिकेल” धोरणावर उद्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साधणार शेतकऱ्यांशी संवाद

 

कृषी विभागाच्या युट्युब चॅनेलवर कार्यक्रमाचे लाईव्ह प्रसारण


पुणे,दि.9: कृषि विषयक विविध योजनां संदर्भात मुख्यमंत्री उध्दव ठाकरे हे गुरुवार दिनांक 10 सप्टेंबर 2020 रोजी दुपारी 12 ते 1.30 यावेळेत शेतकऱ्यांशी संवाद साधणार आहेत. या प्रसंगी उपमुख्यमंत्री अजित पवार, कृषि मंत्री दादाजी भुसे, फलोत्पादन मंत्री संदिपान भुमरे, कृषि राज्यमंत्री विश्वजीत कदम, फलोत्पादन राज्यमंत्री आदिती तटकरे, कृषि सचिव एकनाथ डवले, पोकराचे प्रकल्प संचालक रस्तोगी, कृषि आयुक्त धीरज कुमार उपस्थित राहणार आहेत.


 हा कार्यक्रम online होणार असून त्याचे थेट प्रक्षेपण कृषी विभागाच्या युट्युब चॅनेलवरून करण्यात येणार आहे. राज्यातील जास्तीत जास्त शेतकरी, महिला व नागरिकांनी या कार्यक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन कृषिमंत्री दादाजी भुसे यांनी केले आहे. 


कृषि, महसूल व ग्रामविकास विभागाचे क्षेत्रिय कर्मचारी ग्रामपातळीवर स्थानिकांसाठी कार्यक्रमाचे आयोजन करणार आहेत. या कार्यक्रमाचे लाईव्ह प्रसारण कृषि विभागाच्या  (http://www.youtube.com/c/AgricultureDepartmentGoM) या यु-ट्युब चॅनेलवर  करण्यात येणार आहे.


“विकेल ते पिकेल” अभियान शुभारंभ व मा. बाळासाहेब ठाकरे कृषि व्यवसाय व ग्रामीण परिर्वतन प्रकल्प (SMART) या जागतिक बँक अर्थसहाय्यीत प्रकल्पाचा शुभारंभ यावेळी करण्यात येईल. या प्रसंगी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे ग्रामपातळीवरील कृषि विकास कार्यक्रमाची रुपरेषा मांडून “चिंतामुक्त”  शेतकरी  व “शेतकरी केंद्रित” कृषि विकास यावर विचार व्यक्त करुन शेतकऱ्यांशी संवाद साधणार आहेत.

     00000

Monday, September 7, 2020

महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेची प्रभावी अंमलबजावणी करावी- जिल्हाधिकारी डॉ राजेश देशमुख







 

पुणेदि. ७:- पुणेपिंपरी-चिंचवड शहर व पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागात कोरोना विषाणूचा संसर्ग वाढत असल्यामुळे जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या सर्वाधिक आहे. कोरोनाच्या संकट काळात कोरोनाबाधित रुग्णांची आर्थिक पिळवणूक होवू नये यासाठी मानवतेच्या भावनेने सर्वांनी मिळून मदत करण्याच्या दृष्टीने जिल्ह्यात महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेची प्रभावी अंमलबजावणी  करावीअशी सूचना जिल्हाधिकारी डॉ राजेश देशमुख यांनी केली. तसेच या योजनेअंतर्गत जास्तीत जास्त पात्र लाभार्थ्यांना लाभ देण्याची कार्यवाही करावीअसेही यावेळी जिल्हाधिकारी डॉ देशमुख यांनी आवाहन केले.

        जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी डॉ राजेश देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेबाबत पुणे आणि पिंपरी-चिंचवड महानगरपालिका तसेच जिल्ह्यातील ग्रामीण भागातील रुग्णालयांच्या प्रतिनिधींसोबत दूरदृश्य प्रणालीद्वारे आढावा बैठक घेवून संवाद साधला. या बैठकीला जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अशोक नांदापूरकरमहात्मा ज्योतिबा फुले आरोग्य योजनेचे विभागीय समन्वयक डॉ अमोल म्हस्केजिल्हा समन्वयक डॉ सागर पाटीलडॉ प्रिती लोखंडेएम.डी. इंडियाचे प्रतिनिधी अविनाश बागडे उपस्थित होते.

            प्रारंभी जिल्हाधिकारी डॉ देशमुख यांनी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ‌ नांदापूरकर यांच्या समवेत महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेच्या जिल्ह्यात अमंलबजावणीच्या अनुषंगाने रुग्णालयांच्या प्रतिनिधींकडून येणाऱ्या समस्या जाणून घेतल्या. जिल्हाधिकारी डॉ. देशमुख म्हणालेमहात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत कोरोनाच्या काळात पुणे महानगरपालिकेच्या क्षेत्रातील रुग्णालयांनी  हजार 609, पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या क्षेत्रातील रुग्णालयांनी २ हजार ३१पुणे जिल्ह्यतील ग्रामीण भागातील रुग्णालयांनी ६८७ असे एकूण  हजार 327 रुग्णांला लाभ देण्यात आलेला आहे.  यातून असे निदर्शनात येते कीकाही रुग्णालयांनी या योजनेअंतर्गत जास्तीत जास्त लाभार्थ्यांना लाभ दिलेला आहेही निश्चितच समाधानकारक बाब आहे. परंतु काही रुग्णालये पात्र लाभार्थ्यांना अपेक्षित लाभ देण्यामध्ये कमी पडलेले आहेत. त्यामुळे आपण सर्वांनी याप्रकरणी गांभीर्याने व संवेदनशीलतेने लक्ष घालून परिस्थिती सुधारावीकोरोना बाधित रुग्णाला मदत करावीया योजनेच्या प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी महसूल विभागजिल्हा परिषदेतील कर्मचारी तसेच आरोग्य मित्र यांच्या समन्वयाने रुग्णालयांनी काम करावे.  ही योजना सर्व लोकप्रतिनिधींमार्फत सर्व नागरिकांपर्यत पोहचवावीअशा सूचना जिल्हाधिकारी डॉ. देशमुख यांनी दिल्या. रुग्णालयाच्या प्रलंबित देयकाच्या अनुषंगाने जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याशी चर्चा करुन पुढील निर्णय घेण्यात येईल असेही यावेळी स्पष्ट केले.

          महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेच्या प्रभावी अंमलबजावणी करिता रुग्णालयांकडून सहकार्य करण्यात येईलअसे आश्वासन यावेळी रुग्णालयांच्या प्रतिनिधींकडून देण्यात आले.

Saturday, September 5, 2020

खासदार शरद पवार यांनी घेतला पुण्यातील कोरोना परिस्थितीचा आढावा तपासण्या वाढवून रुग्णांना तात्काळ उपचार मिळवून द्या श्री. पवार यांच्या सूचना





 

·       उपमुख्यमंत्री अजित पवारकेंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकरआरोग्य मंत्री राजेश टोपेकामगार मंत्री दिलीप वळसे पाटीलराज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांची प्रमुख उपस्थिती

 

·       कोरोना परिस्थिती नियंत्रणासाठी जनजागृतीवर भर द्या.

·       मास्क न वापरणाऱ्यांकडून दंड वसूल करा.

 

            पुणे,दि. 5: कोरोनाच्या अनुषंगाने तपासण्यांची क्षमता वाढवून बाधित रुग्णांना तात्काळ उपचार मिळवून द्यायला हवेतअशा सूचना खासदार शरद पवार यांनी केल्या.

            कोविड 19 विषाणू प्रादूर्भावाच्या अनुषंगाने करण्यात येत असलेल्या प्रतिबंधात्मक उपाययोजना व कार्यवाहीबाबत पुण्यातील विधानभवन सभागृहात आज शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली तसेच उपमुख्यमंत्री अजित पवारकेंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकरआरोग्य मंत्री राजेश टोपेकामगार मंत्री दिलीप वळसे पाटीलसार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या प्रमुख उपस्थितीत वरिष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक घेण्यात आलीयावेळी श्री. पवार बोलत होते.

            बैठकीला पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळपिंपरी चिंचवड च्या महापौर उषा उर्फ माई ढोरेकेंद्रीय उच्चपदस्थ अधिकारी डॉ. सुजितकुमार सिंह व सहसंचालक संकेत कुलकर्णीविभागीय आयुक्त सौरभ रावजमाबंदी आयुक्त एस. चोक्कलिंगमपोलीस आयुक्त डॉ. के.व्यंकटेशमपुणे महापालिका आयुक्त विक्रमकुमारपिंपरी चिंचवड महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकरअतिरिक्त आयुक्त रुबल अग्रवालजिल्हा पोलीस अधीक्षक संदीप पाटीलजिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसादआरोग्य विभागाच्या संचालक डॉ. अर्चना पाटीलससून चे प्र.अधिष्ठाता डॉ. मुरलीधर तांबेवैद्यकीय सल्लागार डॉ.सुभाष साळुंखे तसेच संबंधित विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

            पुणे आणि पिंपरी चिंचवड शहर व जिल्ह्यातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेऊन खासदार शरद पवार यांनी वरिष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्यांना सूचना केल्या. ते म्हणाले,  कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी घरोघरी सर्वेक्षणावर भर द्यायला हवा. बाधित रुग्णांवर जलदगतीने उपचार मिळवून द्यायला हवेत. त्याचबरोबर बाधित रुग्णांच्या संपर्कातील व्यक्तींचा शोध प्रभावीपणे घ्यायला हवा. कोरोना परिस्थिती नियंत्रणासाठी जनजागृतीवर भर द्यावा. कोरोनाचा फैलाव रोखण्यात नागरिकांचा सहभागही महत्वाचा आहे. बरेच नागरिक मास्क शिवाय फिरताना दिसतातही गंभीर बाब आहे. मास्क शिवाय रस्त्यावर फिरताना आढळणाऱ्या नागरिकांकडून दंड वसूल करावाअशा सूचना खासदार शरद पवार यांनी दिल्या.

            श्री. पवार म्हणालेमॉलबसस्थानकरेल्वे स्थानकमोठी दुकाने याठिकाण च्या प्रवेशद्वारावर आरोग्य तपासणी बंधनकारक करावी. बांधून तयार असणाऱ्या इमारतींचा उपयोग कोविड उपचार केंद्रासाठी करता येऊ शकेलअसेही त्यांनी यावेळी सांगितले.

            केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर म्हणालेदेशात सर्वात जास्त रुग्णदर आणि रुग्णवाढीचा वेग पुण्यात आहेही चिंतेची बाब आहे. पुण्यातील रुग्णदर व रुग्णवाढीचा वेग कमी करण्यासाठी प्रतिबंधित क्षेत्र व्यवस्थापनशासकीयखाजगी व जम्बो हॉस्पिटलचे प्रभावी व्यवस्थापन याबरोबरच जनजागृतीवर भर द्यावा. कोरोनामधून बरे झालेल्या रुग्णांचे संदेशपर व्हिडीओ सोशल माध्यमातून प्रसारित करावेतजेणेकरून लोकांमधील भीती कमी होईल. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी प्रशासकीय यंत्रणा विविध प्रकारच्या उपाययोजना राबवित असून  नागरिकांनी समाजात वावरताना घ्यावयाच्या खबरदारीबाबत जनजागृती करणे गरजेचे आहे. मास्क शिवाय रस्त्यावर फिरणाऱ्या नागरिकांकडून पोलीस विभागाने दंड वसूल करावा,असेही त्यांनी सांगितले.

 

 

            आरोग्य मंत्री राजेश टोपे म्हणाले, 'माझे कुटुंब माझी जबाबदारीही मोहीम राज्यात 15 सप्टेंबर पासून राबविण्यात येणार आहे. विविध पथके स्थापन करून त्यांच्यामार्फत ही मोहीम राबवण्यात येणार आहे. यात लोकप्रतिनिधीनगरसेवकस्वयंसेवी संस्था व नागरिकांचा सहभागदेखील महत्वाचा आहे. लक्षणे नसणाऱ्या रुग्णांसाठी बेड अडविला जाणार नाहीयाची दक्षता घ्यावी. रुग्णालयात भरती असणाऱ्या रुग्णाच्या तब्बेतीची माहिती नातेवाईकांना समजावीयादृष्टीने रुग्णालयांनी खबरदारी घ्यावीअसे सांगून राज्यात कोरोना परिस्थिती नियंत्रणाच्या दृष्टीने करण्यात येत असलेल्या उपाययोजनांच्या अनुषंगाने केंद्र सरकारच्या आरोग्य विभागाकडून सहकार्य मिळावेअशी अपेक्षा श्री टोपे यांनी व्यक्त केली.

             डॉ. सुजित सिंह यांनी प्रतिबंधित क्षेत्रात करावयाच्या उपाययोजनांबाबत सूचना केल्या..

            विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी पुण्यातील आजवरचे बाधित रुग्णबरे झालेले रुग्णमृत्यू दरतपासण्यांची संख्याप्लाझ्मा थेरपी तसेच कोरोना व्यवस्थापनाच्या दृष्टीने पुढील नियोजनाबाबत माहिती दिली.

            पुणे महापालिका आयुक्त विक्रम कुमार तसेच पिंपरी चिंचवड महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी महानगरपालिका क्षेत्रात करण्यात आलेल्या उपाययोजनांची माहिती दिली. लवकर निदान होऊन रुग्णांवर वेळेत उपचार होण्याच्या दृष्टीने तपासण्या वाढवण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.

 

000000


‘कोरोना’ विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी मास्कचा नियमित वापर करण्याबाबत जनजागृती करावी-केंद्रीय पर्यावरणमंत्री प्रकाश जावडेकर














पुणे, दि. 5:- पुणे, पिंपरी-चिंचवड शहर व पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागात वाढता कोरोनाचा संसर्ग रोखणे गरजेचे आहे. शासनाने लॉकडाऊनमध्ये शिथिलता दिल्यानंतर नागरिक मोठ्या प्रमाणावर विनामास्क घराबाहेर पडतांना दिसत आहे. त्यामुळे ‘कोरोना’ विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी नागरिकांमध्ये मास्कचा नियमित वापर करण्याबाबत मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्याची कार्यवाही करण्याचे निर्देश केंद्रीय पर्यावरणमंत्री प्रकाश जावडेकर यांनी यावेळी दिले.

       पुण्यातील विधान भवन सभागृहात केंद्रीय पर्यावरणमंत्री प्रकाश जावडेकर यांच्या अध्यक्षतेखाली व ज्येष्ठ नेते तथा खासदार शरद पवार, उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या प्रमुख उपस्थितीत पुणे जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींसोबत कोरोना विषाणू प्रतिबंधात्मक उपाययोजनांच्या आढावा व नियोजनाबाबत बैठक घेण्यात आली.

बैठकीला कामगार मंत्री दिलीप वळसे-पाटील, सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री दत्तात्रय भरणे, पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ, पिंपरी-चिंचवडच्या महापौर उषा ऊर्फ माई ढोरे, खासदार गिरीश बापट, श्रीरंग बारणे, वंदना चव्हाण, डॉ अमोल कोल्हे, आमदार चंद्रकांत पाटील, दिलीप मोहिते-पाटील, सिध्दार्थ शिरोळे, अशोक पवार, ॲड राहुल कुल, संजय जगताप, सुनील शेळके, लक्ष्मण जगताप, अण्णा बनसोडे, महेश लांडगे, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा निर्मला पानसरे, केंद्रीय उच्चपदस्थ अधिकारी डॉ. सुजितकुमार सिंह व सहसंचालक संकेत कुलकर्णी, विभागीय आयुक्त सौरभ राव, पोलीस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम, पिंपरी-चिंचवडचे पोलीस आयुक्त कृष्णप्रकाश, पुणे महानगरपालिका आयुक्त विक्रम कुमार, पिंपरी-चिंचवडचे महानगरपालिका आयुक्त श्रावण हर्डीकर, मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, अतिरिक्त आयुक्त रुबल अग्रवाल, डॉ कुणाल खेमनार, पोलीस अधिक्षक संदीप पाटील आरोग्य विभागाच्या संचालक डॉ. अर्चना पाटील, ससूनचे प्र.अधिष्ठाता डॉ. मुरलीधर तांबे, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ जयश्री कटारे यांच्यासह संबंधित विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. 

          केंद्रीय पर्यावरणमंत्री प्रकाश जावडेकर व खासदार शरद पवार यांनी शहरासह जिल्ह्यातील कोरोना परिस्थिती जाणून घेवून लोकप्रतिनिधींच्या अडचणी व सूचना जाणून घेतल्या. यावेळी केंद्रीय मंत्री श्री जावडेकर म्हणाले, नागरिकांमध्ये ‘कोरोना’ विषाणूची भीती कमी करण्याची गरज आहे. नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी रुग्णालयातील खाटांबाबतची माहिती डॅशबोर्डवर अद्ययावत करावी. कोरोनाच्या काळात नागरिकांना उत्तम आरोग्य सोई-सुविधा तात्काळ उपलब्ध करुन द्यावात, अशा सूचनाही केंद्रीय पर्यावरणमंत्री श्री जावडेकर यांनी दिल्या.

विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे दृक श्राव्यप्रणालीद्वारे बैठकीत भाग घेवून सूचना केल्या. यावेळी त्या म्हणाल्या, जम्बो कोवीड रुग्णालयातील उपचारांबाबतची माहिती नागरिकांना मिळावी, खाजगी रुग्णालयांमध्ये महापौरांनी दर आठवड्यात चार रुग्णालयाची कामकाजाची माहिती घेवून चित्रफीत सादरीकरण करावी. याचप्रमाणे खासदार आमदार यांसह एक महिन्याची मोहिम राबवावी. याचा आरोग्य सेवेला फायदा होईल. नागरिकांमध्यील अफवा, गैरसमज दूर होवून वस्तुस्थिती स्पष्ट होईल.

      उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, जिल्ह्यातील लोकप्रतिनिधांना कोरोनाच्या काळात कोणत्या यंत्रणेकडे कोणती जबाबदारी दिली आहे याबाबत माहिती द्या. कोरोनाच्या काळात सेवानिवृत्त अधिकाऱ्यांच्या अनुभवाचा उपयोग होण्यासाठी मानधन तत्वावर नियुक्ती करा. मास्क न वापरता घराबाहेर पडणाऱ्या नागरिकांवर करण्यात येणाऱ्या कार्यवाहीची मोहिम अतिप्रभावी करा, अशा सूचना उपमुख्यमंत्री श्री पवार यांनी केल्या.

      आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणाले, मेगाभरती अंतर्गत प्राप्त झालेल्या उमेदवारांच्या अर्जांची छानणी करुन कायमस्वरुपी रिक्त पदाची भरती प्रकिया सुरु आहे. कोविडच्या अनुषंगाने तात्पुरती मनुष्यबळांची भरती करण्याचे अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहे. ग्रामीण भागातील रुग्णांवर ग्रामीण भागात उपचार करण्यासाठी टेली-एक्सरे सुविधा उपलब्ध करण्याची कार्यवाही सुरु आहे. नागरिकांची आरोग्य सुविधा वेळेत मिळव्यात यासाठी 50 टक्के नवीन रुग्णवाहिका खरेदी करणार असल्याची माहिती आरोग्यमंत्री श्री टोपे यांनी दिली.

        कोरोना रुग्णाला उपचारांती खासगी रुग्णालयांकडून देण्यात येणाऱ्या देयकांचे लेखापरीक्षण करा. यामध्ये ऑक्सिजन दर, पीपीई संच इत्यांदी बाबी शासनाच्या परिपत्रकान्वये आकारणी केली आहे का ? त्यांची तपासणी करा. ऑक्सिजनच्या पुरवठ्याध्ये तुटवडा होणार नाही याबाबत विशेष लक्ष द्या. डॅशबोर्डवर नागरिकांना मार्गदर्शन मिळावे याबाबत नोंद घेवून कार्यवाही करा. महात्मा फुले जन आरोग्य योजनेत कोविड-19 च्या अनुषंगाने 20 पॅकेजसाठी खासगी रुग्णालयाने मोफत उपचार करण्याची तरतूद आहे त्याप्रमाणे कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार झालेच पाहिजे. याचे उल्लघंन करणाऱ्या खासगी रुग्णालयांवर दंड आकारणी करा, अशा सूचना आरोग्यमंत्री श्री. टोपे यांनी यावेळी दिल्या. 

खासदार श्री पवार म्हणाले, कोरोनाच्या काळात सेवानिवृत्त अधिकाऱ्यांच्या अनुभवाचा उपयोग होण्यासाठी मानधन तत्वावर नियुक्ती कराव्यात अशी सूचना केली.

        खासदार श्री बापट नागरिकांना उत्तम आरोग्यविषयक सोई-सुविधा देण्यासाठी तसेच रुग्णवाहिका तात्काळ होण्यासाठी उच्चस्तरीय समन्वय यंत्रणा उभी करावी अशी सूचना केली.

        खासदार श्री बारणे यांनी खासगी रुग्णालयाच्या बाबत प्राप्त तक्रारीची गांर्भीयाने दखल घ्यावी. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेवून रुग्णांच्या नातेवाईकांना रुग्णांच्या स्थितीबाबत माहिती देण्याची सूचना केल्या.

      खासदार डॉ कोल्हे यांनी ग्रामीण भागातील रुग्णांवर ग्रामीण भागात उपचार करण्यासाठी सुविधा उपलब्ध करावी. ॲटीजेन चाचणी केल्यानंतर केल्यानंतर लक्षणे आढळणाऱ्या रुग्णांच्या संपर्कांतील व्यक्तींचे लगेच शोध घेवून पुढील वैद्यकीय कार्यवाही करण्याची सूचना केली.

खासदार वंदना चव्हाण यांनी शासकीय रुग्णालयाप्रमाणे खासगी रुग्णालय, प्रयोगशाळांमध्ये कोरोना विषयक चाचण्या रात्री कराव्यात. नागरिकांना डॅशबोर्डवर तसेच समाज माध्यमातून अद्ययावत माहिती देण्याच्या सूचना केल्या. 

     आमदार चंद्रकांत पाटील, दिलीप मोहिते-पाटील, सिध्दार्थ शिरोळे, अशोक पवार, ॲड राहुल कुल, संजय जगताप, सुनील शेळके, अण्णा बनसोडे, महेश लांडगे यांनी कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी आवश्यक त्या सूचना केल्या.

**

Thursday, September 3, 2020

कोरोनावर मात करण्यासाठी सर्वांनी नियमांचे पालन करणे गरजेचे -जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख








पुणे दि .03 : -   पुणे जिल्हयामध्ये कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर करण्यात येणा-या उपाययोजनांची प्रत्यक्ष पाहणी  करण्याकरीता जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख यांनी दौंड तालुक्याचा आज दौरा केला. दौंड तालुक्यामध्ये कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढली असून कोरोना संसर्ग रोखण्यासाठी बाधितांचा वेळीच शोध घेवून त्यांचे अलगीकरण करणे गरजेचे असल्याचे सांगतानाच कोरोनावर मात करण्यासाठी सर्वांनी नियमांचे पालन केले पाहिजे. नियमभंग करणाऱ्या विरुद्ध कडक कारवाई करा, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी आज दिले.

जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख यांनी आज यवत ग्रामीण रुग्णालय  व दौंड नगरपरिषद क्षेत्रातील प्रतिबंधित क्षेत्राची पाहणी तसेच राज्य राखीव पोलीस मुख्यालयामध्ये  दौंड तालुक्यातील कोरोना प्रतिबंधक उपाययोजनांचा आढावा घेतला. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.अशोक नांदापूरकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.भगवान पवार, उपविभागीय अधिकारी प्रमोद गायकवाड, जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर, गट विकास अधिकारी अमर माने, प्रभारी तहसिलदार एच.आर.म्हेत्रे आदि उपस्थित होते.

जिल्हाधिकारी डॉ.देशमुख म्हणाले की, अति जोखमीचे आजार असलेल्या व्यक्तींचा कोरोना विषाणू संसर्गापासून अधिक हानी होण्याची शक्यता असते. त्यामुळे तालुक्यातील नागरिकांची आरोग्य तपासणी करुन अतिजोखमीचे  आजार तसेच प्रतिबंधित क्षेत्रातील बंधने पाळली जावीत, सुरक्षित अंतर, मास्कचा वापर आदीचा अवलंब होत नसल्यास कारवाई करुन शिस्त निर्माण करण्यासाठी प्रयत्न करावा, असे निर्देशही त्यांनी दिले, तसेच  चेस दि व्हायरस या संकल्पनेप्रमाणे लक्षणे असणा-या व्यक्तींपर्यंत आरोग्य यंत्रणेने पोहचले पाहिजे, त्यामुळे संसर्गाची साखळी तुटण्यास मदत होईल. हीच संकल्पना आपण संपूर्ण जिल्हाभर राबवित असल्याचेही त्यांनी सांगितले.

जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी ग्रामीण भागात कोरोना संसर्ग 

रोखण्यासाठी करण्यात येत असलेल्या उपाययोजना अधिक प्रभावीपणे राबवा तसेच कोरोनाबाधित व्यक्तीचा संपर्क शोधण्यावर अधिक भर द्या, अशा सूचना केल्या. यावेळी विविध विभागांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते

0 0 0 0 0

Tuesday, September 1, 2020

पुणे विभागातील 1 लाख 75 हजार 143 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले, विभागात कोरोना बाधित 2 लाख 37 हजार 936 रुग्ण -विभागीय आयुक्त सौरभ राव

 

        पुणे,दि.1 :- पुणे विभागातील 1 लाख 75 हजार 143 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या  2 लाख 37 हजार 936 झाली आहे. तर ॲक्टीव रुग्ण संख्या   56 हजार 450 इतकी आहे. कोरोनाबाधीत एकुण 6 हजार 343 रुग्णांचा मृत्यू झाला असून मृत्यूचे प्रमाण   2.67 टक्के आहे. पुणे विभागामध्ये बऱ्या होणा-या रुग्णांचे प्रमाण 73.61  टक्के आहेअशी माहिती विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी दिली.

पुणे जिल्हा

            पुणे जिल्हयातील   कोरोना बाधीत एकूण 1  लाख 70  हजार  314  रुग्णांपैकी  1 लाख 32 हजार    601 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 33  हजार 697  आहे. कोरोनाबाधित एकूण 4 हजार   16 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृत्यूचे प्रमाण  2.36 टक्के इतके आहे तर  बरे  होणा-या रुग्णांचे प्रमाण 77.86  टक्के आहे.

सातारा जिल्हा

              सातारा जिल्हयातील  कोरोना बाधीत एकूण 13  हजार 997 रुग्णांपैकी 7  हजार 592  रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या  6 हजार 8 आहे. कोरोनाबाधित एकूण 397 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

सोलापूर जिल्हा

              सोलापूर जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 18  हजार 164  रुग्णांपैकी 13 हजार 563  रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 3  हजार 859 आहे. कोरोनाबाधित एकूण 742 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. 

 सांगली जिल्हा

               सांगली  जिल्हयातील  कोरोना बाधीत एकूण  11  हजार 778  रुग्णांपैकी  6 हजार 338  रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 4  हजार  975 आहे. कोरोनाबाधित एकूण 465  रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

कोल्हापूर जिल्हा

            कोल्हापूर जिल्हयातील  कोरोना बाधीत एकूण 23  हजार 683  रुग्णांपैकी 14  हजार  49 रुग्ण  बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या  7 हजार  911 आहे. कोरोनाबाधित एकूण 723  रुग्णांचा मृत्यू झाला आहे

कालच्या रुग्णसंख्येच्या तुलनेत आज झालेली वाढ

कालच्या बाधीत रुग्ण संख्येच्या तुलनेत पुणे विभागात बाधीत रुग्णांच्या संख्येमध्ये एकूण 4 हजार 82  ने वाढ झाली आहे. यामध्ये पुणे जिल्ह्यात 1 हजार 933सातारा जिल्ह्यात 489सोलापूर जिल्ह्यात 363सांगली जिल्ह्यात 686  तर कोल्हापूर जिल्ह्यात 611 अशी रुग्ण संख्येमध्ये वाढ झालेली आहे.

पुणे विभागातील सर्व्हेक्षण

आजपर्यत विभागामध्ये एकुण 10 लाख 86 हजार 765 नमून्याचा तपासणी अहवाल प्राप्त झाला. प्राप्त अहवालांपैकी 2  लाख 37  हजार 936  नमून्यांचा अहवाल सकारात्मक (पॉझिटिव्ह) आहे.

टिप :- दि. 31 ऑगस्ट 2020 रोजी रात्री 9.00 वा. पर्यंतच्या आकडेवारीनुसार )

                         ***