Thursday, September 29, 2016

गांधी जयंती निमित्त जिल्हास्तरीय युवा संमलेनाचे आयोजन


सोलापूर दि. 29 :  नेहरु युवा केंद्र, महात्मा गांधी ग्लोबल व्हिलेज, बोरामणी आणि युथ फॉर डेव्हलपमेंट, सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने  गांधी जयंती निमित्त जिल्हास्तरीय युवा संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. हे संमेलन शिवस्मारक सभागृह, शिंदे चौक, सोलापूर येथे सकाळी 10 ते 1 या वेळेत  दिनांक 2 ऑक्टोबर 2016 रोजी संपन्न होणार आहे. युवा संमलेलनातील विकासासाठी युवा या विषयावरील चर्चासत्रात माजी कुलगुरु डॉ. इरेश स्वामी, ज्येष्ठ पत्रकार अमर हबीब,सर्वोदयी गांधीवादी प्रा. नरेश बदनोरे तसेच प्रा. डॉ. उमाकांत चनशेट्टी, प्रा. हिंदुराव गोरे व श्री. जाधव यांचे मार्गदर्शन करणार  आहेत.
            सकाळी 9 वाजता महात्मा गांधी पुतळा, स्टेशन चौक सोलापूर येथून युवा रॅली निघणार असून ही रॅली डफरीन चौक-पार्क चौक-चार पुतळा-सरस्वती चौक-भागवत सिनेमा या मार्गे शिवस्मारक सभागृह येथे येणार आहे. खेड्यांकडे चला या महात्मा गांधी यांच्या तत्वानुसार विकास ज्योत गावपातळीवर देण्यात येणार असून विकासासाठी युवा या बिदवाक्यानुसार गावपातळीवरील विकास कामात युवकांचा सक्रीय सहभाग वाढविण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत.
            जिल्हास्तरीय युवा संमेलनाच्या समारोप समारंभात जिल्हाधिकारी रणजीतकुमार यांच्या हस्ते जिल्ह्यातील निवडक युवा मंडळाना क्रीडा साहित्याचे वाटप करण्यात येणार आहे. तसेच मान्यवरांच्या उपस्थितीत व्यसनमुक्त रुग्णांचा सत्कार करण्यात येणार आहे. या कार्यक्रमास  शहर व जिल्ह्यातील जास्तीत जास्त युवकांनी सहभागी व्हावे असे आवाहन संयोजकामार्फत करण्यात आले आहे.

जलसंधारण मंत्री प्रा. राम शिंदे यांचा सोलापूर जिल्हा दौरा


 सोलापूर दि. 29 : राज्याचे जलसंधारण व राजशिष्टाचार मंत्री प्रा. राम शिंदे हे शुक्रवार दिनांक 30 सप्टेंबर 2016 रेाजी सोलापूर‍ जिल्हा दौ-यावर येत आहेत. त्यांच्या दौ-याचा तपशील पुढीलप्रमाणे -
पहाटे 3.38 वाजता  सिध्देश्वर एक्सप्रेसने जेऊर ता. करमाळा येथे आगमन आणि पहाटे 4 वाजता शासकीय विश्रामगृह करमाळा येथे आगमन व राखीव.

रद्दी विक्रीबाबत आवाहन


               सोलापूर दि. 29 :- जिल्हा माहिती कार्यालय, सोलापूर या कार्यालयाची रद्दी विक्री करावयाची आहे. यासाठी इच्छुकांनी जिल्हा माहिती कार्यालय, सोलापूर येथील रद्दी विक्रीबाबत जिल्हा माहिती अधिकारी, जिल्हा माहिती कार्यालय, नवीन प्रशासकीय इमारत, तळमजला क विभाग, सोलापूर -1 या पत्त्यावर बंद लिफाफयात आपली दरपत्रके पाठवावीत. दरपत्रके स्विकारण्याची अंतिम तारीख 7 ऑक्टोबर 2016 रोजीपर्यंत कार्यालयीन वेळेत सादर करावीत.
                                                                        000

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील उत्तीर्ण उमेदवारांच्या माहितीसाठी


सोलापूर दि. 29 : औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतून उत्तीर्ण उमेदवारांना 10 वी, 12 वी चे प्रमाणपत्र देण्यासाठी प्रमाणपत्र परिक्षा 10 व 11 डिसेंबर 2016 रोजी होणार आहे. यासाठी अर्ज करण्याची मुदत            30 सप्टेंबर 2016 अखेरआहे. उमेदवारांचे अर्ज स्विकारण्यासाठी मुंबई येथे ॲडव्हान्स ट्रेनिंग इन्स्टिटयूट, डायरेक्टर जनरल ऑफ ट्रेनिंग, मिनिस्ट्री ऑफ स्किल डेव्हलपमेंट ॲण्ड इंटरप्रिनिअरशिप,  सायन (ईस्ट) मुंबई 400022 येथे सोय करण्यात आली आहे. या परीक्षेचे ऑनलाईन अर्ज www.nios.ac.in  या संकेतस्थळावर उपलब्ध व अर्ज भरण्याची माहितीही उपलब्ध आहे. याचा लाभ इच्छुक उमेदवारांनी घ्यावा असे आवाहन औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या प्राचार्यांनी कळविले आहे.
                                                            0000 

अन्न व औषध प्रशासन विभागमार्फत दिशाभूल करणाऱ्या खाद्य तेलाचा साठा जप्त


सोलापूर दि. 29 : अन्न सुरक्षा व मानदे कायदा 2006 व नियम व नियमन 2011 नुसार अन्न व औषध प्रशासन विभाग सोलापूरमार्फत  दिशाभूल करणाऱ्या खाद्य तेलाचा साठा जप्त करण्यात  आला आहे. अन्न व औषध प्रशासन विभागास मिळालेल्या माहितीच्या आधारे मे. अडाणी विल्मर लि. कोंढी जि. सोलापूर या खद्यतेल/वनस्ती उत्पादन कंपनीच्या गोदामावर धाड टाकली असता  तेथे  फॉरच्युन राईस, ब्रान, फॉर्च्युन व्हिवो, ब्लेंडेड व्हेजिटेबल चा साठा विक्रीस ठेवल्याचे आढळले. खाद्य तेलाच्या पॅकेट्स वर दिशाभूल करणारा मजकूर जसे की, डायबेटीक कंट्रोल, कोलेस्टेरॉल लोअरिंग ऑईल, हार्ट फे्रंडली, सेल्सीयस ब्लड प्रेशर, अँटी कॅन्सर, प्रोटेक्शन अगेन्स्ट डीसीज असा मजकूर छापल्याचे दिसून आहे. हा मजकूर कायद्यांतर्गत तरतुदींचे उल्लंघन करीत असल्याने त्याचे नमुने विश्लेषणासाठी घेण्यात येऊन उर्वरित रुपये 307740/ किंमतीचा साठा जप्त करण्यात आला आहे.
            या प्रकरणी उत्पादकास नोटीस पाठविण्यात आली असून त्यांचा खुलासा व नमुन्याचे विश्लेषण अहवाल प्राप्त झाल्यानंतर कायद्यातील तरतुदीनुसार कार्यवाही करण्यात येईल असे सहायक आयुक्त (अन्न) सं.भा. नारागुडे यांनी कळविले आहे. तसेच सदर अन्न पदार्थाच्या उत्पादकांना  वृतपत्रात दिशाभूल करणाऱ्या जाहिरातीबाबत नोटीस पाठविण्यात आली असून त्यांच्याकडूनही खुलासा प्राप्त होताच पुढील कार्यवाही करण्यात येणार असल्याचेही सहायक आयुक्त (अन्न) सं.भा. नारागुडे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे.
0000

होमगार्ड सदस्य नोंदणी तात्पुरती गुणवत्ता यादी प्रसिद्ध


 सोलापूर दि. 29 : जिल्हा समादेशक होमगार्ड कार्यालयामार्फत दिनांक 20 सप्टेंबर  व 22 सप्टेंबर रोजी घेण्यात आलेल्या आलेल्या नवीन होमगार्ड सदस्य नोंदणीचे धावणे व गोळाफेक या मैदानी चाचणीचे गुणपत्रक व तांत्रिक आर्हतेची गुणपत्रिका पथकासह तात्पुरती यादी दिनांक 28 सप्टेंबर 2016 रोजी कार्यालयात प्रसिद्ध करण्यात आली आहे. या तात्पुरत्या यादीबाबत कोणाच्या हरकती असल्यास त्यांनी  त्या होमगार्ड कार्यालयात दिनांक 1 ऑक्टोबर 2016 पर्यंत कार्यालयीन वेळेत लेखी स्वरुपात सादर करावेत असे जिल्हा समादेशक होमगार्ड, सोलापूर यांनी कळविले आहे.
00000

जिल्हाधिकारी कार्यालयात स्वच्छता मोहिम अभियान




सोलापूर दि.29 : - स्वच्छ भारत स्वच्छ महाराष्ट्र योजनेचा एक भाग म्हणून आज जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात स्वच्छता मोहिम राबविण्यात आली.
                          जिल्हाधिकारी रणजीतकुमार आणि निवासी उपजिल्हाधिकारी अजित रेळेकर यांच्यासह जिल्हा प्रशासन आणि इतर विभागातील अधिकारी उपस्थित होते.
                         जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसराबरोबरच, दक्षिण सोलापूर तहसिलदार कार्यालय, जिल्हा कोषगार कार्यालय, जिल्हा नियोजन कार्यालय, दक्षिण सोलापूर तालुका पंचायत समिती आदी कार्यालये आणि परिसरातही स्वच्छता करण्यात आली.
                                                                          0 0 0 0