Tuesday, October 25, 2016

शिधापत्रिकाधारकांनी 15 नोव्हेंबर पर्यंत आधार क्रमांक उपलब्ध करुन देण्याचे आवाहन


पुणे,दि.25 : अंत्योदय अन्न योजना, प्राधान्य कुटुंब योजना व एपिएल (केशरी) शिधापत्रिकाधारक शेतकरी योजनेतील लाभार्थ्यांपैकी ज्यांनी अद्याप आधार क्रमांक उपलब्ध करु दिलेला नाहीअशा शिधापत्रिकाधारकांनी दि. 15 नोव्हेंबर 2016 पर्यंत संबंधित रेशन दुकानदारांकडे आधार क्रमांक उपलब्ध करुन देण्याचे आवाहन अन्नधान्य वितरण अधिकारी  यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये  केले आहे.
             पत्रकात म्हटले आहे की, अन्नधान्याचा लाभ मिळत असलेल्या लाभार्थ्यांनी आधार क्रमांक उपलब्ध करुन न दिल्यास 16 नोव्हेंबर 2016 पासून यादीतून कायमस्वरुपी नावे वगळण्यात येतीलत्यांना अन्नधान्याचा लाभ दिला जाणार नाही.

00000

जलयुक्त शिवार विभागीय पत्रकार पुरस्कारांसाठी अर्ज करण्याची मुदत आजपर्यंत


पुणे, दि. २५ (विमाका) : जलयुक्त शिवार अभियानात वृत्तपत्रातून तसेच इलेक्ट्रॉनिक माध्यमाद्वारे जलसंधारणाचे महत्त्व सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहचविणाऱ्या वृत्तपत्र प्रतिनिधींना शासनातर्फे राज्य, विभाग तसेच जिल्हास्तरावर पुरस्कार देण्यात येणार आहेत. या पुरस्कारांसाठी प्रवेशिका मागविण्याच्या तारखेमध्ये बदल करण्यात आला असून आता इच्छुक पत्रकारांनी विभागीय पत्रकार पुरस्कारांसाठी २६ ऑक्टोबर पर्यंत तर राज्यस्तरीय पुरस्कारांसाठी २ नोव्हेंबर २०१६ पर्यंत आपली प्रवेशिका विहित नमुन्यात तीन प्रतीत संबंधित स्तरावरील निवड समितीकडे सादर करावी, असे आवाहन पुणे येथील विभागीय माहिती कार्यालयाच्या उपसंचालकांनी केले आहे.
जलयुक्त शिवार अभियानामध्ये भाग घेणाऱ्या मुंबई व मुंबई उपनगर या जिल्ह्यातील पत्रकारांनी ज्या जिल्ह्यांच्या कामांची, जलयुक्त शिवार अभियानाची प्रचार, प्रसिद्धी व जनजागृती केली आहे अशा जिल्ह्यात पुरस्कार प्रस्ताव जिल्हास्तर समितीकडे २६ ऑक्टोबर २०१६ पर्यंत सादर करायचे आहेत. तसेच या दोन जिल्ह्यातील पत्रकारांनी ज्या महसूल विभागात जलयुक्त शिवार अभियानाची जनजागृती, पाणलोटाच्या यशोगाथा प्रकाशित केल्या असतील त्या पत्रकारांनी त्या विभाग स्तरावरील समितीकडे व राज्यस्तरावर प्रचार, प्रसिद्धी केली असल्यास राज्यस्तर समितीकडे प्रस्ताव दि. २ नोव्हेंबर २०१६ पर्यंत सादर करावेत. इलेक्ट्रॉनिक माध्यमांच्या पत्रकारांनी राज्यस्तर पुरस्कारांसाठी संचालक, मृद संधारण व पाणलोट क्षेत्र व्यवस्थापन, पुणे यांच्याकडे २ नोव्हेंबर २०१६ पर्यंत आपले प्रस्ताव द्यावेत. जिल्ह्यातील पत्रकारांचे जिल्हास्तरीय पुरस्कारांसाठीचे प्रस्ताव स्वीकारण्याची तारीख २० ऑक्टोबर २०१६ होती. यामध्ये कोणताही बदल करण्यात आला नाही.
 अधिक माहितीसाठी महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर शासन निर्णय या लिंकमध्ये ग्रामविकास व जलसंधारण विभागाचा दि. 28 सप्टेंबर 2016 रोजीचा शासन निर्णय,  दि. 10 ऑक्टोबर 2016 रोजीचे तसेच दि. २४ ऑक्टोबर २०१६ रोजीचे शासन  परिपत्रक पहावे, असेही कळविण्यात येत आहे.
****


सोलापूरात 12 नोव्हेंबरला राष्ट्रीय महालोकअदालत


सोलापूर दि. 25 :-  महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण मुंबई यांच्या वतीने प्रलंबित दिवाणी फौजदारी प्रकरणे तसेच सर्व दाखलपूर्व प्रकरणांचा अनुषंगाने येत्या 12 नोव्हेंबर 2016 रोजी सकाळी 10.30 वाजता राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले आहे.
                    या लोकअदालतीमध्ये जास्तीत जास्त पक्षकारांनी सहभागी होवून या संधीचा लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हाविधी सेवा प्राधिकरणाच्या अध्यक्षा तथा प्रमुख जिल्हा  सत्र न्यायाधिश श्रीमती विभा कंकणवाडी यांनी  पत्रकान्वये केले आहे.

00000

उद्योगासाठी अकृषक जमिनीचा वापर करण्याचे आवाहन



सोलापूर दि. 25 :-  उद्योजकांनी अकृषक जमिनीचा वापर उद्योगासाठी करण्यास प्राधान्य द्यावे, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी अजित रेळेकर यांनी केले. श्री. रेळेकर यांच्या अध्यक्षतेखाली औद्योगिक अकृषक जमीन वापर सहाय्यभूत समितीची बैठक झाली. त्यावेळी त्यांनी वरील आवाहन केले.
            श्री रेळेकर म्हणाले, ‘नवीन उद्योजकास आवश्यक ती अधिकृत माहितीविविध विभागामार्फत  तसेच संबंधित प्राधिकरणाकडूनएक खिडकीसंरचनेतर्गत मिळावी यासाठी प्रयत्न करण्यात येत असून यासाठी इच्छूकांना  ना विकास विभागात सुध्दा अर्ज करता येतील’.  बैठकीमध्ये करमाळा तालुक्यातील मौजे हिवरे येथील शामराव फरतडे यांच्या अर्जावर विचार विनिमय करण्यात आला.
            या बैठकीसाठी महसूल तहसिलदार श्रीमती मिनल भामरे - मुळे, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे उप प्रादेशिक अधिकारी . . अवताडे, नगर रचना विभागाचे सहाय्यक संचालक रा. ना. हवळे, शहर एम.एस..बी चे अतिरिक्त कार्यकारी अभियंता अर्जुन कांबळे, लाभ क्षेत्र विकास प्राधिकरणाचे कार्यकारी अभियंता . सि. शिंदे, जिल्हा परिषद . पा  चे  उप कार्यकारी अभियंता एम.के. मुल्ला, जिल्हा उद्योग केंद्राचे उद्योग निरिक्षक एस. डी. खंबायत यांच्यासह इतर विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

00000

आचारसंहितेचे काटेकोर पालन करा जिल्हाधिकारी रणजीतकुमार यांच्या सूचना


सोलापूर दि. 25 :-  जिल्ह्यातील नऊ नगरपरिषदांच्या निवडणूकांत आचारसंहितेचे काटेकोर पालन करण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना केल्या जाव्यात, असे निर्देश जिल्हाधिकारी रणजीतकुमार यांनी आज येथे दिले.
            जिल्हाधिकारी रणजीतकुमार यांच्या अध्यक्षतेखाली आज निवडणूक संनियंत्रण समितीची बैठक झाली. या बैठकीस सोलापूर विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. . एन. मालदार, जिल्हा पोलीस अधीक्षक एस. वीरेश प्रभु, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अरुण डोंगरे, उप जिल्हा निवडणूक अधिकारी सतीश धुमाळ आदी उपस्थित होते.
            जिल्हाधिकार रणजीतकुमार यांनी सांगितले की, जिल्ह्यातील नऊ नगरपरिषदांच्या निवडणूका आहेत. या निवडणूका निर्भय वातावरणात झाल्या पाहिजेत. त्याचबरोबर आदर्श आचारसंहितेचे कोठेही उल्लंघन होणार नाही, याची काळजी संबंधित यंत्रणेने घ्यावयाची आहे.
            बँकातील  मोठ्या आर्थिक व्यवहारावर लक्ष ठेवण्यात यावे. तशा सूचना अग्रणी बँक व्यवस्थापकांनी सर्व बँक व्यवस्थापकांना द्याव्यात. असे व्यवहार आढळल्यास  त्याची शहानिशा करावी तसेच निवडणूक शाखेला त्याची माहिती द्यावी, अशा सूचना जिल्हाधिकारी रणजीकुमार यांनी अग्रणी बँकेचे जिल्हा व्यवस्थापक श्रीनिवास पत्की यांना दिल्या.
            निवडणूकांच्या कालावधीत कायदा आणि सुव्यवस्था राखली जाण्यासाठी आवश्यक उपाययोजना केल्या जाव्यात. जेथे गरज आहे तेथे प्रतिबंधात्मक उपाययोजना केल्या जाव्यात, अशा सूचना जिल्हाधिकारी रणजीतकुमार यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक एस. वीरेश  प्रभू यांना दिल्या.
            शासकीय विश्रामगृह दिले जाताना सर्व पक्षांना समप्रमाणात वितरण कले जावे. शासकीय विश्रामगृहाच्या परिसरात निवडणूक विषयक प्रचार बैठक अथवा मेळावा घेतला जाऊ नये अशा आशयाच्या सूचना दिल्या जाव्यात, असे जिल्हाधिकारी रणजीतकुमार यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता व्ही. . मोरे यांना दिल्या. जिल्ह्यातील सर्व संबंधित विश्रामगृहात तशा आशयाच्या सूचना देण्याचे निर्देशही जिल्हाधिकारी रणजीतकुमार यांनी दिले.
                जिल्ह्यातील नऊ नगरपरिषदांच्या निवडणूकीसाठी जिल्हा परिषेदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अरुण डोंगरे यांची मुख्य निरीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. म्हाडा पुणे चे मुख्याधिकारी अशोक काकडे आणि अन्नधान्य वितरण अधिकारी शहाजी पवार सह निरीक्षक असतील अशी माहिती उपजिल्हा निवडणूक अधिकारी सतीश धुमाळ यांनी दिली.
               बैठकीस नगर प्रशासन अधिकारी त्र्यंबक ढेंगळे- पाटील, राज्य उत्पादन शुल्क विभागाचे उपअधीक्षक आर. आर. कोले, महावितरण कंपनीचे कार्यकारी अभियंता एस. . कोळी, अग्रणी बँक व्यवस्थापक श्रीनिवास पत्की, पोलीस निरीक्षक आय. डी. ओमासे  उपस्थित होते.

00000