Tuesday, September 19, 2017

छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेस 22 सप्टेंबर पर्यंत मुदतवाढ योजनेचा लाभ घेण्याचे जिल्हाधिकारी सौरभ राव यांचे आवाहन


पुणेदि. 18 : राज्यातील सततच्या दुष्काळी व नापिकीच्या परिस्थितीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांच्या जीवनात समृध्दी निर्माण करण्यासाठी राज्य शासनाने छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना -2017 जाहीर केली आहेया योजनेला 22 सप्टेंबर 2017 पर्यंत शासनाने मुदतवाढ दिली आहेपुणे जिल्हयातील ज्या शेतकऱ्यांनी अद्याप अर्ज भरलेले नाहीत,त्यांनी जवळच्या महा ई-सेवा केंद्रावर किंवा  आपले सरकार’ या संकेत स्थळावर आपले अर्ज ऑनलाईन पध्दतीने  भरुन घ्यावेत,असे आवाहन  जिल्हाधिकारी सौरभ राव यांनी पुणे जिल्हास्तरीय अंमलबजावणी व नियंत्रण समितीच्या बैठकी दरम्यान केले.
 योजनेच्या अंमलबजावणीसाठी शासनाकडून मार्गदर्शक सुचना प्राप्त झाल्या आहेतत्यानुसार योजनेच्या अंमलबजावणीसाठी जिल्हाउपविभाग व  तालुकास्तरावर समिती गठीत करण्यात आलेली आहेपुणे जिल्हा स्तरावरील जिल्हा स्तरीय अंमलबजावणी व नियंत्रण समितीची बैठक जिल्हाधिकारी सौरभ राव यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आलीयावेळी लाभार्थी शेतकऱ्यांच्या ऑनलाईन अर्ज नोंदणीची प्रगती व योजनेच्या अंमलबजावणीचा सविस्तर आढावा श्रीराव यांनी घेतला.
या  योजने अंतर्गत लाभार्थ्यांची माहितीवित्तीय संस्थांनी आपले सरकार पोर्टलवर तात्काळ भरावयाची आहेराष्ट्रियीकृत बँकेच्या लाभार्थी शेतकऱ्यांनी आपले खाते असलेल्या राष्ट्रीयीकृत बँकेच्या शाखेमध्ये व जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या लाभार्थी अर्जदारांनी संबंधित विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थामध्ये आपल्या  आधार कार्डाची छायांकित प्रत त्वरीत सादर करावीअसेही आवाहन श्री राव यांनी केले.
00000

Monday, September 18, 2017

पायाभूत चाचण्यामुळे शिक्षणाची गुणवत्ता उंचावण्यास मदत शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांचे प्रतिपादन



सोलापूर दि. 18 :- शालेय शिक्षणाचा दर्जा सुधारावा यासाठीच राज्य शासनाने पायाभूत चाचण्या सुरु केल्या. या चाचण्यामुळे शालेय शिक्षणाची गुणवत्ता उंचावण्यासाठी मदत झाली आहे, असे शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी आज येथे विद्यार्थ्यांशी संवाद साधताना सांगितले.
येथील ज्ञान प्रबोधनी हायस्कूलमध्ये आज श्री. तावडे यांनी शालेय विद्यार्थ्यांसोबत जलप्रतिज्ञा घेतली. त्यावेळी विद्यार्थ्यांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे देताना श्री. तावडे बोलत होते. यावेळी ज्येष्ठ नेते सुधाकरपंत परिचारक, हिवरे बाजारचे सरपंच पोपटराव पवार, शिक्षण विभागाचे प्रधान सचिव नंदकुमार, माध्यमिक शिक्षक संचालक गंगाधर म्हमाणे, माजी कुलगुरु इरेश स्वामी आदी उपस्थित होते.
मंत्री तावडे म्हणाले की, ‘शाळेत विविध परीक्षा आणि चाचण्या घेतल्या जातात. पण शिक्षणाची गुणवत्ता उंचावण्यासाठी आवश्यकता वाटल्यामुळेच पायाभूत चाचण्या सुरु करण्यात आल्या. या चाचण्यांमुळेच अनेक शाळांतील गुणवत्ता सुधारली आहे. त्याचबरोबर एका शाळेतील विद्यार्थी एका ठराविक क्षेत्रात कमकुवत असतील तर त्या शाळेत त्या क्षेत्रांचे मार्गदर्शन देता येणे शक्य होते. यामुळे त्या शाळेच्या गुणवत्तेचा दर्जा उंचावण्यास मदत झाली आहे’.
यावेळी विद्यार्थ्यांनी मंत्री तावडे यांना विविध प्रश्न विचारले. यावेळी मंत्री तावडे यांनी विद्यार्थ्यांबरोबर जलप्रतिज्ञा घेतली. शाळेच्या स्थानिक अध्यक्ष स्वरलता भिशीकर यांनी प्रास्ताविक आणि सूत्रसंचालन केले.
                                                                       *****            



अनुदानातून नव्हे तर, योगदानातून सहकार क्षेत्र सक्षम करा सहकारमंत्री सुभाष देशमुख यांचे प्रतिपादन



सोलापूर दि. 17 :- सहकार क्षेत्रातील अवस्था जर बदलायची असेल तर सहकार क्षेत्रात अनुदानातून नव्हे तर, योगदानातून सहकार क्षेत्र सक्षम करा, असे प्रतिपादन सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी आज महाराष्ट्र राज्य सहकारी संघ मर्या, पुणे आयोजित राज्यतस्तरीय पणन व प्रक्रिया सहकारी संस्थेच्या कार्यशाळेच्या उद्घाटन प्रसंगी बोलताना केले.
यावेळी महाराष्ट्र राज्य सहकारी संघाचे मुख्य कार्यकारी अधिकारी यु.एस.इंदलकर, पणन संचालक डॉ. आनंद जोगदंड, अटल महापणन विकास अभियानाचे मुख्य व्याख्याते गणेश शिंदे आदी उपस्थित होते.
कार्यक्रमापूर्वी महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवन्नोती अभियान ( उमेद) यांच्या सहकार्याने विविध महिला बचत गटांच्या स्टॉलचे उद्घाटन सहकारमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले. त्यांनतर दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली.
सहकारमंत्री देशमुख म्हणाले, व्यापाराचे अर्थकारण बदलल्यामूळे  सहकार क्षेत्रातील कृषी उत्पन्न बाजार समित्या,विविध विकास सोसायट्या तसेच बाजार समित्या समोर आव्हाने आहेत.  त्यांना टिकावयाचे असेल तर त्यांनी मार्केटिंग व ब्रॅण्डींग करुन  वेगवेगळे प्रक्रिया उद्योग सुरु करुन आर्थिक परिस्थितीत सुधारावी लागेल.त्यांनी विविध महिला बचत गटांच्या माध्यमातील उद्योगांना एक बाजारपेठ मिळवून देऊन त्यांचाही या माध्यमातून आर्थिक विकास करणे गरजेचे आहे. राज्य शासन विविध संस्थांचे संगोपन व बळकटीकरण करण्यासाठी त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे.
यावेळी अटल महापणन विकास अभियानाचे मुख्य व्याख्याते गणेश शिंदे, डॉ. आनंद जोगदंड यांनीही मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक व स्वागत यु.एस. इंदलकर यांनी केले.                                                                                                                       

0000


दिव्यांग व्यक्तींसाठी होणाऱ्या शिबिरासाठी काटेकोर नियोजन करावे -खासदार अनिल शिरोळे


               
                पुणे, दि. 16: केंद्र सरकारच्या 'कृत्रिम अवयव वाटप कार्यक्रम' योजनेंतर्गत पुणे जिल्ह्यातील दिव्यांग व्यक्तींना कृत्रिम अवयव आणि सहायकारी यंत्र प्रदान करण्यासाठी पुण्यात एक दिवसीय शिबिराचे आयोजन करण्यात येणार आहे. या शिबिरात अधिकाधिक दिव्यांग व्यक्ती सहभागी व्हावेत आणि त्यांना याचा लाभ व्हावा, यासाठी संबंधित विभागांनी काटेकोर नियोजन करावे, अशी सूचना खासदार अनिल शिरोळे यांनी केली.
            विकलांग प्रशिक्षण शिबिराच्या पूर्व नियोजन बैठकीत त्यांनी ही सूचना दिली. यावेळी जिल्हाधिकारी सौरभ राव, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दौलत देसाई, अपंग कल्याण विभागाचे उपायुक्त नितीन ढगे, निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र मुठे, तहसीलदार मीनल कळस्कर तसेच संबंधित विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
            यावेळी खासदार श्री. शिरोळे म्हणाले, केंद्र सरकारची ही योजना दिव्यांग व्यक्तींसाठी महत्वपूर्ण आहे. या योजनेचा लाभ गरजू दिव्यांगांना मिळवून देण्यासाठी विविध शासकीय यंत्रणांची मदत घ्यावी.
            जिल्हाधिकारी श्री. राव म्हणाले, पुण्यात होणाऱ्या शिबिराचा लाभ जिल्ह्यातील अधिकाधिक दिव्यांग व्यक्तींना व्हावा, यासाठी या शिबिराची माहिती गरजूंपर्यंत पोहोचायला हवी. यासाठी दिव्यांग व्यक्तींसाठी कार्यरत जिल्ह्यातील विविध स्वयंसेवी संस्था, संघटना, लोकप्रतिनिधी, शासकीय विभाग तसेच पुणे व पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची मदत घेवून पात्र दिव्यांग लाभार्थ्यांची अद्ययावत यादी करावी. याबरोबरच सूक्ष्म नियोजन करुन त्यानुसार कार्यवाही करावी.
            उपायुक्त श्री. ढगे यांनी शिबिरामध्ये लाभ मिळू शकणाऱ्या दिव्यांग व्यक्तींसाठी पात्रतेच्या अटींबद्दल माहिती दिली. ते म्हणाले, या योजनेचा लाभ घेण्यासाठी संबंधित दिव्यांग व्यक्ती भारताचा नागरिक असावा, त्याच्याकडे 40 टक्के अपंगत्वाचे प्रमाणपत्र हवे, मागील 3 वर्षात या योजनेचा लाभ त्याने घेतला नसावा, उत्पन्न दरमहा 15 हजार पेक्षा जास्त नसावे. अशा अटी असून ओळखपत्राचा पुरावा आवश्यक आहे, असेही श्री. ढगे यांनी सांगितले.
०००००००


          



                
                

                

Thursday, September 14, 2017

मागणी आणि पुरवठ्याचा समतोल राखण्यासाठी शेतमाल तारण कर्ज योजना उपयुक्त - सहकार व पणन मंत्री सुभाष देशमुख


शेतमाल तारण कर्ज योजने अंतर्गत बाजार समित्यांना पुरस्कार प्रदान
पुणे, दि. 14: शेतमालाची मागणी आणि पुरवठ्याचा समतोल राखायचा असेल तर शेतमाल तारण कर्ज योजना अत्यंत उपयुक्त आहे, असे प्रतिपादन  सहकार, पणन वस्त्रोद्योग मंत्री सुभाष देशमुख यांनी केले.
येथील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे सभागृहात झालेल्या कृषी उत्पन्न बाजार समिती कार्यशाळा शेतमाल तारण कर्ज योजना 2016-17 पुरस्कार वितरण कार्यक्रमा दरम्यान ते बोलत होते. यावेळी महाराष्ट्र राज्य बाजार समिती सहकारी संघ सभापती दिलीप मोहिते, . माधुरी मिसाळ, महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाचे कार्यकारी संचालक सुनिल पवार, सरव्यवस्थापक दिपक शिंदे, सहाय्यक व्यवस्थापक एम. एल. लोखंडे, पणन संचालक डॉ. .बी. जोगदंड, कृषी पणन विभागाचे प्रधान सचिव विजय कुमार, कृषी पणन मंडळाचे व्यवस्थापक जे.जे जाधव उपस्थित होते.
            श्री. सुभाष देशमुख म्हणाले, राज्यातील शेतकऱ्यांनी उत्पादित केलेल्या शेतमाल काढणी हंगामात कमी भावाने विक्री करता तो शेतमाल बाजार समितीच्या गोदामामध्ये  तारणात ठेवून शेतकऱ्यांना तारण कर्जाच्या स्वरुपात कमी व्याजदराने त्वरित सुलभ निधी उपलब्ध करुन देण्यासाठी ही योजना अत्यंत उपयोगी आहे. यामुळे कमी भावात शेतमाल विकून शेतकऱ्यांचे होणारे नुकसान कमी होणार आहे. शेतकऱ्यांचे तारण करता बाजार समिती आहे. त्यांनी शेतकऱ्यांना  वेळोवेळी माहिती देवून मदत करा योग्य मार्गदर्शन करुन प्रामाणिकपणे काम करा, अशाही सूचना श्री देशमुख यांनी बाजार समितीच्या सदस्यांना दिल्या.यावेळी त्यांनी कोकणातील शेतकऱ्यांना काजूसाठी शेतमाल तारण योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन केले. तसेच या योजनेची माहिती राज्यातील सर्व शेतकऱ्यांपर्यंत पोहचवण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना देवून पुरस्कार प्राप्त बाजार समित्यांना शुभेच्छा दिल्या.
            चार्टर्ड अकाऊंटन्ट डॉ. संजय बुरड यांनी जी.एस.टी कायदा बाजार समित्या या विषयावर मार्गदर्शन केले, सरव्यवस्थापक दिपक शिंदे यांनी शेतमाल तारण कर्ज योजेची सविस्तर माहिती दिली, सहाय्यक व्यवस्थापक एम. एल. लोखंडे यांनी बाजार समित्यांमधील -ट्रेर्डींग -ऑक्शन बाबत माहिती दिली तसेच डॉ. . बी. जोगदंड यांनी बाजार समिती कायद्यातील प्रस्तावीत बदलांबाबत माहिती दिली.
 दरम्यान सन 2016-17 मध्ये शेतमाल तारण कर्ज योजने अंतर्गत जिल्हा स्तरांवर अकोला, लातूर, अमरावती, वाशिम वर्धा, परभणी, सोलापूर, अहमदनगर येथील बाजार समित्यांना पुरस्कार देण्यात आले.तसेच विभागीय स्तरावर अमरावती, नागपूर, लातूर, पुणे, नाशिक औरंगाबाद या कार्यालयांना देखील पुरस्कार देण्यात आला. यावेळी महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाचे सदस्य, राज्यातील सर्व बाजार समिती सहकारी संघटनेचे प्रतिनिधी शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

0000000000





Wednesday, September 13, 2017

राजेंद्र सरग यांना 'दिवा प्रतिष्‍ठान'चा सर्वोत्‍कृष्‍ट व्‍यंगचित्रकार पुरस्‍कार जाहीर


पुणे - 'दिवा प्रतिष्‍ठानच्‍यावतीने घेण्‍यात आलेल्‍या दिवाळी अंक वाचक स्‍पर्धेचे निकाल जाहीर झाले असून सर्वोत्‍कृष्‍ट व्‍यंगचित्रकाराचा पुरस्‍कार राजेंद्र सरग यांना जाहीर झाला आहे. 'दिवा प्रतिष्‍ठानही  दिवाळी अंकांच्‍या संपादकांची संघटना आहे. या संघटनेच्‍यावतीने दरवर्षी वाचक स्‍पर्धेचे आयोजन करण्‍यात येते.
            सर्वोत्‍कृष्‍ट वाचकाचा प्रथम पुरस्‍कार रागिनी पुंडलिक (पुणे)द्वितीय पुरस्‍कार कल्‍पना चिंतामणराव मार्कंडेय (औरंगाबाद) आणि तृतीय पुरस्‍कार सौरभ साबळे (मलकापूर कराड) यांना जाहीर झाला आहे.  सर्वोत्‍कृष्‍ट विनोदी दिवाळी अंकाचा पुरस्‍कार नाशिकच्‍या महेंद्र देशपांडे संपादित  'हास्‍यधमालया दिवाळी अंकाला प्राप्‍त झाला आहे.  सर्वोत्‍कृष्‍ट लेखक पुरस्‍कार अमोल सांडेसर्वोत्‍कृष्‍ट लेखिका मोनिका गजेंद्रगडकर सर्वोत्‍कृष्‍ट  विनोदी लेखिका रेखा खानपुरे सर्वोत्‍कृष्‍ट कवी पुररस्‍कार विलास क-हाडे सर्वोत्‍कृष्‍ट  ज्‍योतिषविषयक दिवाळी अंक ज्‍योतिष ओनामावाचकांनी निवडलेला सर्वोत्‍कृष्‍ट वैशिष्‍ट्यपूर्ण दिवाळी अंक पुरस्‍कार डॉ. सतीश देसाई संपादित 'पुण्‍यभूषणया दिवाळी अंकास प्राप्‍त झाला आहे.  
     शनिवार, दिनांक 16 सप्‍टेंबर रोजी महाराष्‍ट्र साहित्‍य परिषदेत दिवाळी अंक संपादकांचे एक दिवशीय अधिवेशन होणार असून यावेळी पुरस्‍कारांचे वितरण होईल. अधिवेशनाचे उद्घाटन सकाळी 11.30 वाजता सुप्रसिध्‍द उद्योजक भारत देसडला यांच्‍या हस्‍ते होणार असून अध्‍यक्षस्‍थानी सुप्रसिध्‍द वात्रटिकाकार रामदास फुटाणे तर प्रमुख पाहुणे म्‍हणून ज्‍येष्‍ठ साहित्यिक ल.म. कडू उपस्थित राहतील.
 कार्यक्रमाचे सूत्र संचालन आपला डॉक्टर चे संपादक सन्ना मोरे करणार आहेत. दुपारी 1-30 ते 2-30 या वेळेत  दिवाळी अंक आणि विनोदी साहित्य या विषयावर चर्चासत्र होणार असून अध्यक्षस्थानी मिलींद जोशी राहतील. यामध्‍ये भारतभूषण पाटकरविवेक मेहेत्रे,व्यंगचित्रकार प्रभाकर झळकेविनोदी कथा लेखक सुभाष खुटवड यांचा सहभाग असेल. दुपारी 2-30 ते 3-30 वाजता दिवाळी अंक आणि कविता या विषयावरील चर्चासत्र डॉ.मनोहर जाधव यांच्‍याअध्‍यक्षतेखाली होईल. यामध्‍ये डॉ.सौ स्नेहसुधा कुलकर्णी संतोष शेणईमंगेश काळे,उध्दव कानडे सहभागी होतील.
दुपारी 3-30 ते 4-30 ‘वाचकांच्या नजरेतून दिवाळी अंक या विषयावरील चर्चासत्रात  कल्पना बांदल,  रागीणी पुंडलिकभूषण लोहार,प्रसाद सोवनी हे सहभागी होणार असून डॉ. अंजली पोतदार सूत्रसंचालन करणार आहेत. अध्यक्षस्थानी सचीन ईटकर असतील. सायंकाळी 4-30ते 5-50 वाजता प्रकाश पायगुडे यांच्या अध्यक्षतेखाली समारोप तसेच संपादकांचे चर्चासत्र  होईल. संस्कृती च्या संपादिका सुनीता पवारसोनल खानोलकर, ‘भूमिका च्या संपादिका रुपाली अवचरे, ‘साहित्य आभा च्‍या संपादिका शारदा धुळप, ‘धमाल धमाका चे संपादक नसीर शेख, ‘कलाकुंज व हास्यधमालचे संपादक महेंद्र देशपांडे, ‘आक्रोशचे संपादक  ज्ञानेश्‍वरतात्‍या जराड, ‘विशाखाचे  ह.ल. निपुणगे यात सहभागी होणार आहेत. या कार्यक्रमानंतर प्रातिनिधीक सत्कार होणार असून सूत्रसंचालन सुनील गायकवाड करणार आहेत.
अधिवेशनाचे संयुक्‍त आयो‍जक चंद्रकांत शेवाळे आणि अरुण जाखडे हे असून अधिवेशनास उपस्थित राहण्‍याचे आवाहन आयोजकांसह प्रतिष्‍ठानचे अध्‍यक्ष विजय पाध्‍येकार्यवाह शिवाजी धुरी यांनी केले आहे. 
00000 

Monday, September 11, 2017

हिंजवडी परिसरातील वाहतूक समस्येचा घेतला पालकमंत्री बापट यांनी आढावा


पुणे, दि. 12- अन्न व नागरी पुरवठा मंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालक मंत्री गिरीश बापट यांनी हिंजवडी परिसरातील वाहतूक समस्येचा आढावा घेऊन त्यावर तात्काळ आणि दीर्घकालीन उपाययोजना राबविण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. यावेळी खा. सुप्रिया सुळे, जिल्हाधिकारी सौरभ राव, निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र मुठे, पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त श्रावण हर्डीकर, हिंजवडी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे प्रादेशिक अधिकारी संतोष देशमुख उपस्थित होते.
 हिंजवडी येथील महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ परिसरातील रस्त्यांचा विकास, सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचे नियोजन, अतिक्रमणे, सध्या सुरु असलेल्या रस्ते विकासांचे कामे, व्यावसायिक कर व कचरा प्रशनांबाबत पालकमंत्री बापट यांनी हिंजवडी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे अधिकारी व हिंजवडी  इंडस्ट्रियल असोसिएशनच्या (एचआयए) पदाधिकाऱ्यांसमवेत चर्चा केली.
वाहतूक समस्येवर तोडगा काढण्यासाठी  लवकरच पालकमंत्री श्री बापट, जिल्हाधिकारी सौरभ राव व इतर संबंधित अधिकारी हिंजवडी परिसराची प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी करणार आहेत.
 यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी, पोलीस दलातील अधिकारी व हिंजवडी  इंडस्ट्रियल असोसिएशनचे पदाधिकारी उपस्थित होते.

00000