Tuesday, July 9, 2019


                  




राज्यातील ऊसतोड कामगारांसाठी तात्काळ फिरत्या स्वच्छतागृहासह
आरोग्य सुविधा उपलब्ध करून द्याव्यात
-विधानपरिषद उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांच्या सूचना
              पुणे, दि.९: राज्यातील ऊसतोड कामगारांसाठी तात्काळ फिरते स्वच्छतागृह व आवश्यक आरोग्य सुविधा उपलब्ध करुन देण्याच्या सूचना विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी आज दिल्या.
येथील विधानभवनाच्या सभागृहात गर्भाशय काढण्याच्या शस्त्रक्रियेसंबंधी राज्यस्तरीय समितीची आढावा बैठक
डॉ. निलम गोऱ्हे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. त्यावेळी त्या बोलत होत्या. बैठकीसाठी सार्वजनिक आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास, विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर, कामगार आयुक्त राजीव जाधव, साखर आयुक्त शेखर गायकवाड, आरोग्य सेवा विभागाच्या संचालक डॉ.अर्चना पाटील, पुणे व बीड चे जिल्हा शल्यचिकित्सक अनुक्रमे डॉ. अशोक नांदापूरकर, डॉ.अशोक थोरात, डॉ.अनिरुध्द देशपांडे, डॉ.मधुसूदन कर्नाटकी उपस्थित होते.
डॉ. निलम गोऱ्हे म्हणाल्या, राज्यातील ऊसतोड कामगारांचे प्रश्न आणि त्यांना भेडसावणाऱ्या समस्या लवकरात लवकर सोडवणे गरजेचे आहे. कामगार विभागाने कारखान्याच्या ठिकाणी असणाऱ्या स्वच्छतागृहांची माहिती  घेण्याबरोबरच ज्या ठिकाणी स्वछतागृहे नाहीत अशा ठिकाणी फिरते स्वच्छतागृह तातडीने उपलब्ध करून द्यावे. ऊसतोड कामगारांच्या आरोग्य विषयक तक्रारींचे निराकरण करण्यासाठी हंगाम सुरू होण्यापूर्वी नियमितपणे आरोग्य विभाग, कामगार विभाग व साखर आयुक्तालयाच्या पुढाकारातून ऊसतोड कामगारांची आरोग्य तपासणी करण्याचे निर्देश त्यांनी दिले.
            ऊसतोड कामगारांना कोयता पध्दतीने वेतन न देता समान पद्धतीने वेतन देण्यात यावे. कामगारांना आरोग्य विषयक सुविधा वेळेत उपलब्ध करून देण्यासाठी कारखान्याच्या परिसरात फिरते हॉस्पिटल उपलब्ध करून देण्यात यावे, अशाही सूचना ही डॉ.गोऱ्हे यांनी दिल्या.
उसतोड कामगार महिलांमध्ये गर्भाशय काढून टाकण्याचे प्रमाण वाढत असल्याबाबत चिंता व्यक्त करून महिला कामगारांचे आरोग्य चांगले राहण्यासाठी त्यांचे समुपदेशन करणे आवश्यक असून त्यांना योग्य त्या सुविधा उपलब्ध करून देण्याच्या सूचना डॉ. गोऱ्हे यांनी दिल्या. ऊसतोड महिला कामगारांच्या विविध समस्या जाऊन घेऊन त्या सोडविण्यासाठी सर्व्हेक्षण करण्यात येणार आहे. हे काम व्यवस्थित पार पाडण्यासाठी स्वयंसेवी संस्थांची मदत घ्यावी व या सर्वेक्षणाचा अहवाल येत्या 30 जुलै पर्यंत सदर करावा, अशा सूचना डॉ.गोऱ्हे यांनी यावेळी केल्या.
             प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी ऊसतोड कामगारांना आवश्यक असणाऱ्या आरोग्याच्या सुविधा देण्यासाठी तसेच फिरते रुग्णालय उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील, असे स्पष्ट केले.
                कामगार आयुक्त राजीव जाधव म्हणाले, ऊसतोड कामगारांसाठी आरोग्यविषयक योजना राबविण्यासाठी कामगार विभाग निधी उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करेल. 
                   शेखर गायकवाड यांनी याबाबत सर्व साखर कारखान्यांना सूचना देण्यात येतील, असे सांगितले.

******
                        



Friday, July 5, 2019

प्राधान्याच्या कामांसाठी जिल्हा परिषदेला तातडीने निधी उपलब्ध करून देणार
-          पालकमंत्री चंद्रकांत पाटील
पुणे दि. 5 : जिल्ह्यासाठी तातडीने आणि प्राधान्याने आवश्यक असणाऱ्या कामांची यादी जिल्हा परिषदेचे पदाधिकारी आणि अधिकारी यांनी एकत्रितपणे तयार करुन तसा प्रस्ताव तातडीने जिल्हाधिकाऱ्यांमार्फत पाठविण्याच्या सूचना देत अशा प्राधान्याच्या कामांसाठी तातडीने निधी उपलब्ध करून देण्यात येईल, अशी ग्वाही महसूल मंत्री तथा पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज दिली.
            पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज पुणे जिल्हा परिषदेला भेट दिली. जिल्हा परिषदेच्या सभागृहात त्यांनी जिल्हा परिषदेचे पदाधिकारी आणि अधिकारी यांच्याशी संवाद साधला. यावेळी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष विश्वासराव देवकाते-पाटील, उपाध्यक्ष विवेक वळसे-पाटील, जिल्हाधिकारी नवल किशोर राम, स्थायी समितीचे सदस्य शरद बुट्टे-पाटील, सदस्य नितीन मराठे, मुख्य कार्यकारी अधिकारी प्रभाकर गावडे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी नृसिंह मित्रगोत्री यांच्यासह सर्व विभागांचे प्रमुख उपस्थित होते.
             पालकमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, पुणे जिल्ह्यातील प्राथमिक शाळा व रस्त्यांच्या दुरूस्तीसाठी आवश्यक असणाऱ्या निधीची मागणी तातडीने नोंदवावी, या मागणीचा प्राधान्याने विचार करून जिल्हा वार्षिक योजनेतून आवश्यक असणारा निधी देण्यात येईल. तसेच जिल्ह्यात सध्या तातडीच्या आणि प्राधान्याच्या कामाची यादी व प्रस्ताव पदाधिकारी आणि अधिकाऱ्यांनी एकत्रित बसून तयार करावा, तो तातडीने जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फत पाठवून द्यावा, या कामांसाठी आवश्यक निधीची उपलब्धता करून देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.  
            यावेळी राज्य शासनाकडे असणारी मुद्रांक शुल्क बाकी, टंचाई आराखडा, जिल्ह्यात सुरू असणारे पाण्याचे टँकर, मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल कार्यक्रमांतर्गत सुरु असणाऱ्या जिल्ह्यातील 12 कामांच्या प्रगतीचा आढावा, पालखी सोहळ्यासाठी जिल्हा परिषदेच्या माध्यमातून करण्यात आलेल्या उपाययोजना, 33 कोटी वृक्ष लागवड कार्यक्रम, स्वच्छ भारत मिशन, महराष्ट्र ग्राम सामाजिक परिवर्तन अभियान कार्यक्रम आदी कामांचा आढावा पालकमंत्री यांनी घेतला.
            मुख्य कार्यकारी अधिकारी प्रभाकर गावडे यांनी सादरीकरण केले. यावेळी विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
*****


सातबारा संगणकीकरणाचे काम गतीने पूर्ण करावे - महसूल मंत्री चंद्रकांत पाटील


पुणे दि. 5: पुणे विभागातील सर्व जिल्ह्यांच्या सातबारा संगणकीकरणाचे काम गतीने पूर्ण करावे,  अशा सूचना महसूल मंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केल्या. पुणे विभागातील जिल्हाधिकारी व अपर जिल्हाधिकारी यांची आढावा बैठक श्री. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली विभागीय आयुक्त कार्यालयातील सभागृहात पार पडली, यावेळी ते बोलत होते.
            यावेळी विभागीय आयुक्त डॉ. दिपक म्हैसेकर, जमाबंदी आयुक्त एस. चोक्कलिंगम, पुणे, सातारा, सोलापूर, सांगलीचे जिल्हाधिकारी अनुक्रमे नवल किशोर राम, श्रीमती श्वेता सिंघल, डॉ. राजेंद्र भोसले, डॉ. अभिजीत चौधरी, प्रभारी जिल्हाधिकारी नंदकुमार काटकर, अपर जिल्हाधिकारी रमेश काळे, गोपीचंद कदम, साहेबराव गायकवाड, रामचंद्र शिंदे तसेच महसूल विभागाचे उपायुक्त प्रताप जाधव, संजयसिंह चव्हाण, अजित पवार, जयंत पिंपळगावकर आदी  उपस्थित होते.    
श्री. पाटील म्हणाले, गौण खनिज वसूलीच्या पध्दतीत बदल होणे गरजेचे आहे. यात आवश्यक बदल सुचविण्यासाठी सोलापूरचे जिल्हाधिकारी डॉ. भोसले यांनी अन्य राज्यांच्या गौण खनिज वसूली पध्दतीचा अभ्यास करुन अहवाल राज्य शासनाला सादर करावा. सातबारा संगणकीकरणाचे कोल्हापूर जिल्ह्याचे काम 84 टक्के झाले असून नागरिकांच्या सोयीसाठी अन्य जिल्ह्यांनीही यास प्राधान्य देवून हे काम तात्काळ पूर्ण करावे, असे त्यांनी सांगितले.
यावेळी श्री.पाटील यांनी सातबारा संगणकीकरणांतर्गत डिजीटल सिग्नेचर पोर्टल (डीएसपी) या आज्ञावलीत कामाची सद्यस्थिती, ई फेरफार, ऑनलाईन डाटा कम्फर्मेशन, डॉक्युमेंट स्कॅनिंग, अभिलेख कक्षाचे अद्ययावतीकरण याबरोबरच जमीन महसूल व गौण खनिज वसूली याबाबतचा आढावा घेतला.
यावेळी विभागीय आयुक्त डॉ. दिपक म्हैसेकर यांनी सादरीकरण करुन पुणे विभागातील कामांच्या सद्यस्थितीची माहिती दिली. तसेच  कोल्हापूर क्रीडा संकुल, पंढरपूर व आळंदी विकास कामांबाबत माहिती दिली. विभागातील सर्व जिल्हाधिकारी व अपर जिल्हाधिकारी यांनी आपापल्या जिल्ह्याची माहिती सादर केली.

*****





Monday, July 1, 2019














माडिया शिकू या पाठ्यपुस्तक व अभ्यासपुस्तकाचे प्रकाशन
आदिवासींच्या प्रत्येक बोलीभाषेसाठी माडिया शिकू या सारखी पाठ्यपुस्तके तयार व्हावीत
                                                                                                   -डॉ. प्रकाश आमटे
                   
पुणे दि. 1: देशाच्या लोकसंख्येत दहा टक्के असणारा आदिवासी समाज एकेकाळी जंगलाचा राजा होता. या समाजाला त्यांच्या हक्कांची जाणीव व्हावी यासाठी शिक्षणाची गरज आहे. मात्र भाषा हीच शिक्षण घेताना त्यांच्या समोरची मुख्य अडचण आहे. माडिया शिकू या या पुस्तकांच्या माध्यमातून ही अडचण दूर होण्यास मदत होईल असा विश्वास व्यक्त करत अशी पुस्तके आदिवासींच्या प्रत्येक बोलीभाषेत तयार करण्याची आवश्यकता असल्याचे मत डॉ. प्रकाश आमटे यांनी आज व्यक्त केले. 
                        येथील पंडीत जवाहरलाल नेहरू सभागृहात आदिवासी विकास विभागाच्यावतीने तयार करण्यात आलेल्या माडिया शिकू या या पाठ्यपुस्तक व अभ्यासपुस्ताकाचे प्रकाशन डॉ. प्रकाश व डॉ. मंदाकिनी आमटे यांच्या हस्ते झाले. त्यावेळी डॉ. प्रकाश आमटे बोलत होते. यावेळी आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्थेचे आयुक्त डॉ. किरण कुलकर्णी, संस्थेच्या सहसंचालक नंदिनी आवडे, जर्मन भाषातज्ज्ञ तथा माडी भाषेच्या अभ्यासक डॉ. मंजिरी परांजपे, संस्थेच्या उपसंचालिका माधुरी यादवाडकर, माडिया समाजाची विद्यार्थीनी मनिषा मदजी उपस्थित होते.
                                   डॉ. प्रकाश आमटे म्हणाले, आदिवासी समाज आणि त्यांची संस्कृती ही मुळातच समृध्द आहे. मात्र त्यांच्यात असणाऱ्या शिक्षणाच्या आभावामुळे त्यांना नागर संस्कृती सोबत जुळवून घेताना अडचणी निर्माण होत आहेत. त्यांना त्यांच्या हक्कांची जाणीव व्हावी, यासाठी त्यांना शिक्षणाची आवश्यकता आहे. शिक्षणाच्या माध्यमातून त्यांच्या जीवनात अमुलाग्र बदल घडत असून अंध्दश्रध्देच्या जोखडातून हा समाज आता मुक्त होत आहे. या समाजातील अनेक तरुण शिक्षण घेवून विकासाच्या मुख्य प्रवाहात आले आहेत.
                                    डॉ. किरण कुलकर्णी म्हणाले, सध्याचा मुख्य प्रवाहातील समाज अनेक प्रश्नांनी गोंधळला आहे. या समाजाच्या प्रश्नांची उत्तरे आदिवासी समाजाच्या संस्कृतीत दडलेली आहेत. आदिवासी समाजाच्या संस्कृतीचे संवर्धन करण्याबरोबरच त्यांना मुख्य प्रवाहात आणण्याचे काम आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था अनेक उपक्रमांच्या माध्यमातून करत आहे. बोलीभाषा या संस्कृतीच्या वाहक असून त्यांच्या संवर्धनाचे काम होणे आवश्यक आहे. या क्षेत्रात काम करणाऱ्या प्रत्येक घटकाच्या पाठीशी आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था उभी राहणार असल्याची ग्वाही डॉ. कुलकर्णी यांनी दिली.
                      यावेळी कोड ऑफ एथिक्सआणि प्रमुख 11 आदिवासी भाषांच्या क्रमिक पुस्तकांसाठी वापरण्याच्या कार्यपुस्तिकेचे प्रकाशन तसेच इयत्ता पाहिलीसाठी मराठी अभ्यासक्रमावर आधारित बोलीभाषेतील दृक्श्राव्य पेनड्राईव्हचे लोकार्पण करण्यात आले.
यावेळी पुस्तकाच्या लेखिका डॉ. मंजिरी परांजपे, मनिषा मदजी यांनी आपली मनोगते व्यक्त केली. पुस्तकाच्या निर्मितीमध्ये योगदान देणाऱ्यांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते यावेळी करण्यात आला.
                  आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्थेची ओळख करून देत संस्थेच्या कार्याबाबतची माहिती संस्थेच्या सहसंचालक नंदिनी आवडे यांनी प्रास्ताविकात दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुधीर गाडगीळ यांनी केले तर आभार विनीत पवार यांनी मानले. या कार्यक्रमाला अभ्यासक, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.                                                                                          


***

वृक्षलागवड मोहिमे अंतर्गत विधानभवन परिसरात विभागीय आयुक्त डॉ. दिपक म्हैसेकर यांच्या हस्ते वृक्षारोपण




वृक्षलागवड मोहिमे अंतर्गत विधानभवन परिसरात
 विभागीय आयुक्त डॉ. दिपक म्हैसेकर यांच्या हस्ते वृक्षारोपण
पुणे,दि. 1: 33 कोटी वृक्ष लागवड मोहिमे अंतर्गत विभागीय आयुक्त डॉ. दिपक म्हैसेकर यांच्या हस्ते आज विधानभवन परिसरात वृक्षारोपण करण्यात आले.
            यावेळी उपवनसंरक्षक श्री लक्ष्मी ए., उपायुक्त(सामान्य प्रशासन) संजयसिंह चव्हाण, उपायुक्त(महसूल) प्रताप जाधव, उपायुक्त (रोहयो) अजित पवार, नगरप्रशासन विभागाचे उपसंचालक प्रशांत खांडकेकर, अधिक्षक कृषी अधिकारी (रोहयो) विनयकुमार आवटी, सहायक वनसंरक्षक संजय मारणे, वनपरिक्षेत्र अधिकारी एम.जे.सणस, उपजिल्हाधिकारी स्नेहल बर्गे व मुकेश काकडे यांनीही वृक्षारोपण केले.
            यावेळी डॉ. म्हैसेकर म्हणाले, पुणे विभागाचे वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट 5  कोटी 1 लाख 10 हजार असून विभागात 5 कोटी 57 लाख 63 हजार खड्डे खोदण्यात आले आहेत. ही मोहिम यशस्वी करण्यामध्ये ग्रामपंचायत आणि वन विभागाचा महत्वपूर्ण वाटा असणार आहे. पुणे विभागातील सर्व जिल्हयात 100 टक्के काम पूर्ण करण्यासाठी नियोजन करण्यात आले आहे. वारी मार्गावर आणि अन्य ठिकाणी वृक्षारोपण करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
श्री लक्ष्मी, म्हणाल्या वृक्ष लागवड मोहिमे अंतर्गत पुणे जिल्हयात 1 कोटी 54 लाख खड्डे खोदण्यात आले आहेत. या मोहिमेमध्ये वन विभाग, सामाजिक वनीकरण या विभागांबरोबरच अन्य विभागांचाही मोलाचा वाटा आहे. ही मोहिम यशस्वी करण्यासाठी लोक प्रतिनिधी, एन.सी.सीचे विद्यार्थी, नागरिक यांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे. वृक्ष लागवडीची अद्यायवात माहिती वन विभागाच्या सांकेतिक स्थळावर उपलब्ध आहे. कार्यक्रमास महसूल, वन व कृषी विभागाचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

0000


Sunday, June 23, 2019

मुख्‍यमंत्री फडणवीस यांच्‍या हस्‍ते नाना वाड्याचे पुनरुज्जीवन व "स्वराज्य" क्रांतिकारक संग्रहालयाचे उद्घाटन



       पुणे दि.२३-  पुण्यनगरीचा ऐतिहासिक वारसा जतन करण्याचे काम "स्वराज्य" या क्रांतिकारकांच्या संग्रहालयात झाल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. पुणे महानगरपालिकेतर्फे आयोजित पेशवे कालीन नाना वाड्याचे पुनरुज्जीवन व "स्वराज्य" क्रांतिकारक संग्रहालयाचे उद्घाटन आणि लोकार्पण सोहळा कार्यक्रमात ते बोलत होते.
            यावेळी पद्मविभूषण शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे, खासदार गिरीश बापट, खासदार संजय काकडे, माजी राज्यमंत्री दिलीप कांबळे, आमदार विजय काळे, जगदीश मुळीक, महापौर मुक्ता टिळक, महापालिका आयुक्त सौरभ राव, जिल्हाधिकारी नवल किशोर राम आदींची प्रमुख उपस्थिती होती.
 मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, नाना वाड्याचे पुनरुज्जीवन करून महापौर आणि नगरसेवक यांनी अभिनंदनीय कार्य केले आहे. पुण्यामध्ये ऐतिहासिक वास्तूंची कमी नाही. आपल्या देशाला 5000 वर्षांची संस्कृती आहे.
आपण आपल्या देशाचा इतिहास जतन केला पाहिजे. महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेले किल्ले आहेत, शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या वाणीतून त्या किल्ल्यांची माहिती ऐकण्याची पर्वणी असते. राज्यातील ऐतिहासिक किल्ल्यांचे जतन करण्याचे काम राज्य शासनाने दोन वर्षापासून हाती घेतले आहे.रायगड किल्ल्याचे संपूर्णपणे संवर्धन केले जात आहे, तेथे झालेल्‍या उत्खननात अडीचशे पेक्षा अधिक साईट सापडल्या आहेत. त्यातून महाराजांचे देदीप्यमान चित्र समाजापुढे उभे राहणार आहे. आपल्या देशाचा सांस्कृतिक वारसा समाजापुढे आला नाही तर समाज ऊर्जावान होऊ शकत नाही, नाना वाड्याचे पुनरुज्जीवन हा या शृंखलेतील एक भाग आहे.
            नाना वाड्यातील संग्रहालय इतिहासाचं चालते बोलते पुस्तक असून या ठिकाणी देदीप्यमान इतिहास मांडण्याचा प्रयत्न झाला आहे. पुणे महापालिकेच्यावतीने अशा पद्धतीने होणाऱ्या कामास राज्य सरकार पूर्ण मदत करेल, असेही मुख्यमंत्री श्री.फडणवीस यांनी यावेळी सांगितले. या कार्यक्रमात स्वातंत्र्य सैनिकांच्या कुटुंबियांचा सत्कार मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आला. या बद्दलही मुख्‍यमंत्र्यांनी महापालिकेचे कौतुक केले.
            पद्मविभूषण शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनीही थोडक्‍यात आपल्‍या भावना व्‍यक्‍त केल्‍या.  मी विद्यार्थी आहे,
असे नम्रपणे नमूद करुन देशाच्‍या स्‍वातंत्र्यासाठी हाल-अपेष्‍टा सहन करणा-या एका तरी क्रांतीकारकाचे
चरित्र पूर्णपणे वाचावे, असे आवाहन केले. मुक्‍या मनाने किती उधळावे शब्‍दांचे बुडबुडे, तुझे पोवाडे गातील पुढचे तोफांचे चौघडे या काव्‍यातून समर्पकपणे आपल्‍या भावना मांडल्या.

       खासदार गिरीश बापट यांनी हा एक ऐतिहासिक कार्यक्रम असल्‍याचे सांगितले. पुणे शहराला सांस्‍कृतिक, क्रीडा, शैक्षणिक, औद्योगिक वारसा असल्‍याचा उल्‍लेख करुन स्‍मार्ट सिटीच्‍या माध्‍यमातून पुणे शहराला आदर्श शहर बनविण्‍यात येत असल्‍याचे त्‍यांनी सांगितले. नाना वाड्यातील संग्रहालयामुळे आजच्‍या पिढीला प्रेरणा मिळेल, असा विश्‍वास व्‍यक्‍त करुन आपला इतिहास न विसरण्‍याचे नागरिकांना आवाहन केले.
महापौर मुक्‍ता टिळक यांनी आपल्‍या प्रास्‍ताविकात या संग्रहालयाचा पहिला टप्पा पूर्ण झाला असून नानावाडा ही वर्ग एक दर्जाची ऐतिहासिक वास्तू असल्‍याचे सांगितले. सन 1740 ते 1750 या कालावधीत पेशव्यांचे मंत्री असलेल्या नाना फडणवीसांनी हा वाडा बांधून घेतला. या वाड्याचे क्षेत्रफळ सुमारे दोन हजार चौ.मी. आहे. या वाड्यामध्ये ब्रिटीशकालीन दगडी इमारत आणि एल आकारातील मूळ पेशवाई वास्तू यांचा समावेश आहे.
            सागवानी लाकडात बनवलेल्या तुळ्या, दगडी खांब, दुर्मिळ मेघडंबरी, नाजूक कलाकुसर असलेले फॉलसिलींग,  दिवाणखाना, दुर्मिळ भीत्तीचित्रे ही या वाड्याची वैशिष्ट्ये आहेत. ही सर्व वैशिष्‍ट्य जतन करण्‍यात आल्‍याचे त्‍यांनी सांगितले. या वाड्यात स्वातंत्र्य लढ्यात सहभागी असणा-या क्रांतीकारकांची माहिती असणारे संग्रहालय उभारण्यात आले आहे. त्याच्या पहिल्या टप्प्याचे काम पूर्ण करण्यात आले आहे. त्यामध्ये तळमजल्यावर असलेल्या अकरा खोल्यात स्वागत कक्ष, उमाजी नाईक, वासूदेव बळवंत फडके, लहुजी वस्ताद या क्रांतिकारकांचे तसेच 1857 चे युध्‍द, आदिवासींचा उठाव, नेमस्तांची चळवळ,  बाळ गंगाधर टिळक,  चापेकर बंधू,  जोतिबा-सावित्रीबाई फुले, शाहू महाराज या समाजसुधारकांचे जीवन चरित्र यामध्ये दर्शविण्यात आले आहे.
            उद्घाटनापूर्वी  मुख्‍यमंत्री श्री. फडणवीस यांनी या संग्रहालयाला भेट देऊन पहाणी केली.
कार्यक्रमास स्‍थायी समिती अध्‍यक्ष सुनिल कांबळे, नगरसेवक श्रीनाथ भिमाले, हेमंत रासने, राजेश येनपुरे, गायत्री खडके, तसेच नागरिक मोठ्या संख्‍येने उपस्थित होते. 
००००










पुणे श्रमिक पत्रकार संघाच्या स्मृतिचित्रे स्मरणिकेचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रकाशन राज्यातील ज्येष्ठ पत्रकारांना लवकरच सन्मान योजनेचा ला -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस


           पुणे दि. 23: पत्रकारांच्या कल्याणासाठी राज्य सरकार नेहमीच सकारात्मक असून ज्येष्ठ पत्रकारांच्या सन्मान योजनेसाठी 25 कोटी रुपयांच्या निधीची तरतूद करण्यात आली असून पुढच्या महिन्यापर्यंत पहिल्या टप्प्यात अर्ज केलेल्या पत्रकारांना याचा लाभ मिळेल ,अशी ग्वाही देतानाच  म्हाडाच्या विशेष योजनेच्या माध्यमातून पुण्यातील पत्रकारांसाठी घरे उपलब्ध करून देणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिली. तसेच पुणे प्रेस क्लबसाठीही जागा उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
            येथील पुणे श्रमिक पत्रकार संघाच्या सभागृहात पुणे पत्रकार संघाच्या सन 1940 ते 2019 या आठ दशकांचा चित्रमय प्रवास असणाऱ्या स्मृतिचित्रे या स्मरणिकेचे प्रकाशन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज झाले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी महापौर मुक्ता टिळकखासदार गिरीश बापटआमदार जगदीश मुळीकमेधा कुलकर्णी,जिल्हाधिकारी नवल किशोर रामपत्रकार संघाचे अध्यक्ष राजेंद्र पाटीलसरचिटणीस  पांडुरंग सांडभोर उपस्थित होते. 
             मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणालेआपल्या देशात अनेक संस्था निर्माण झाल्यात्या मोठ्या झाल्या .मात्र त्याच्या इतिहासाचे जतन करण्याचे काम आपल्याकडे फारसे झाले नाही. परदेशात मात्र संस्थांच्या इतिहासाचे योग्य प्रकारे जतन करण्यात येते. संघर्षाच्या काळात तसेच पुढील पिढीसाठी हा ऐतिहासिक दस्ताऐवज उपयुक्त ठरतो. पुणे श्रमिक पत्रकार संघाला स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र्योत्तर असा ऐतिहासिक वारसा आहे. हा सर्व इतिहास संग्रहीत करून तो चित्ररूपाने प्रदर्शीत करण्याचा पत्रकार संघाचा हा उपक्रम अभिनव आहे.
               पत्रकारिता व्यवसायासमोर आज अनेक अडचणी  आहेतत्यातच नवमाध्यमांच्या उदयाने हे क्षेत्र अधिकच आव्हानात्मक बनले आहे. अशा परिस्थितीत पत्रकारांच्या कल्याणासाठी त्यांचा समावेश शासनाच्या महात्मा फुले जनआरोग्य योजनेमध्ये करण्यात आला आहे. याचा लाभ राज्यातील पत्रकारांना होणार असल्याचे सांगत पत्रकारितेला अधिक प्रगल्भ करण्यासाठी पत्रकार संघाने पुढाकार घेवून विशेष अभ्यासदौरे आणि अभ्यासक्रम सुरू करण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन मुख्यमंत्री श्री फडणवीस यांनी केले. 
               खासदार गिरीश बापट म्हणालेपुणे श्रमिक पत्रकार संघाचा पुण्याच्या सांस्कृतिक जीवनात मोठा वाटा आहे. पत्रकार हा लोकशाहीचा आधार आहे. समाजाच्या दुख:ला न्याय मिळवून देण्याचे काम पत्रकार करत असतात. पुणे श्रमिक पत्रकार संघाचा इतिहास आदर्शवत असून पुणे प्रेस क्लबच्या उभारणीत शहरातील सर्व लोकप्रतिनिधी सक्रीय सहभाग नोंदवणार असल्याचे त्यांनी सांगितले.

आषाढी वारी 2019 मार्गदर्शिकेचे प्रकाशन
             पंढरपूरच्या आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर वारीत सहभागी होणाऱ्या वारकऱ्यांना आणि नागरिकांना वारीच्या संदर्भात अद्ययावत माहिती मिळावीमहत्वाचे फोन नंबर उपलब्ध व्हावेतयासाठी जिल्हा  प्रशासनाने तयार केलेल्या आषाढी वारी 2019 या मार्गदर्शक पुस्तिकेचे प्रकाशन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते यावेळी करण्यात आले.   
            कार्यक्रमाचे स्वागत पांडुरंग सांडभोर यांनी केले. प्रस्तावना राजेंद्र पाटील यांनी केली. सुत्रसंचालन प्रशांत आहेर यांनी केले. तर आभार चंद्रकांत हंचाटे यांनी मानले. या कार्यक्रमाला पुणे शहर आणि परिसरातील ज्येष्ठ पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते.  
*****