Thursday, September 3, 2020

कोरोनावर मात करण्यासाठी सर्वांनी नियमांचे पालन करणे गरजेचे -जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख

पुणे दि .03 : -   पुणे जिल्हयामध्ये कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर करण्यात येणा-या उपाययोजनांची प्रत्यक्ष पाहणी  करण्याकरीता जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख यांनी दौंड तालुक्याचा आज दौरा केला. दौंड तालुक्यामध्ये कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढली असून कोरोना संसर्ग रोखण्यासाठी बाधितांचा वेळीच शोध घेवून त्यांचे अलगीकरण करणे गरजेचे असल्याचे सांगतानाच कोरोनावर मात करण्यासाठी सर्वांनी नियमांचे पालन केले पाहिजे. नियमभंग करणाऱ्या विरुद्ध कडक कारवाई करा, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी आज दिले.

जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख यांनी आज यवत ग्रामीण रुग्णालय  व दौंड नगरपरिषद क्षेत्रातील प्रतिबंधित क्षेत्राची पाहणी तसेच राज्य राखीव पोलीस मुख्यालयामध्ये  दौंड तालुक्यातील कोरोना प्रतिबंधक उपाययोजनांचा आढावा घेतला. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.अशोक नांदापूरकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.भगवान पवार, उपविभागीय अधिकारी प्रमोद गायकवाड, जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर, गट विकास अधिकारी अमर माने, प्रभारी तहसिलदार एच.आर.म्हेत्रे आदि उपस्थित होते.

जिल्हाधिकारी डॉ.देशमुख म्हणाले की, अति जोखमीचे आजार असलेल्या व्यक्तींचा कोरोना विषाणू संसर्गापासून अधिक हानी होण्याची शक्यता असते. त्यामुळे तालुक्यातील नागरिकांची आरोग्य तपासणी करुन अतिजोखमीचे  आजार तसेच प्रतिबंधित क्षेत्रातील बंधने पाळली जावीत, सुरक्षित अंतर, मास्कचा वापर आदीचा अवलंब होत नसल्यास कारवाई करुन शिस्त निर्माण करण्यासाठी प्रयत्न करावा, असे निर्देशही त्यांनी दिले, तसेच  चेस दि व्हायरस या संकल्पनेप्रमाणे लक्षणे असणा-या व्यक्तींपर्यंत आरोग्य यंत्रणेने पोहचले पाहिजे, त्यामुळे संसर्गाची साखळी तुटण्यास मदत होईल. हीच संकल्पना आपण संपूर्ण जिल्हाभर राबवित असल्याचेही त्यांनी सांगितले.

जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी ग्रामीण भागात कोरोना संसर्ग 

रोखण्यासाठी करण्यात येत असलेल्या उपाययोजना अधिक प्रभावीपणे राबवा तसेच कोरोनाबाधित व्यक्तीचा संपर्क शोधण्यावर अधिक भर द्या, अशा सूचना केल्या. यावेळी विविध विभागांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते

0 0 0 0 0

Tuesday, September 1, 2020

पुणे विभागातील 1 लाख 75 हजार 143 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले, विभागात कोरोना बाधित 2 लाख 37 हजार 936 रुग्ण -विभागीय आयुक्त सौरभ राव

        पुणे,दि.1 :- पुणे विभागातील 1 लाख 75 हजार 143 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या  2 लाख 37 हजार 936 झाली आहे. तर ॲक्टीव रुग्ण संख्या   56 हजार 450 इतकी आहे. कोरोनाबाधीत एकुण 6 हजार 343 रुग्णांचा मृत्यू झाला असून मृत्यूचे प्रमाण   2.67 टक्के आहे. पुणे विभागामध्ये बऱ्या होणा-या रुग्णांचे प्रमाण 73.61  टक्के आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी दिली.

पुणे जिल्हा

            पुणे जिल्हयातील   कोरोना बाधीत एकूण 1  लाख 70  हजार  314  रुग्णांपैकी  1 लाख 32 हजार    601 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 33  हजार 697  आहे. कोरोनाबाधित एकूण 4 हजार   16 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृत्यूचे प्रमाण  2.36 टक्के इतके आहे तर  बरे  होणा-या रुग्णांचे प्रमाण 77.86  टक्के आहे.

सातारा जिल्हा

              सातारा जिल्हयातील  कोरोना बाधीत एकूण 13  हजार 997 रुग्णांपैकी 7  हजार 592  रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या  6 हजार 8 आहे. कोरोनाबाधित एकूण 397 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

सोलापूर जिल्हा

              सोलापूर जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 18  हजार 164  रुग्णांपैकी 13 हजार 563  रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 3  हजार 859 आहे. कोरोनाबाधित एकूण 742 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. 

 सांगली जिल्हा

               सांगली  जिल्हयातील  कोरोना बाधीत एकूण  11  हजार 778  रुग्णांपैकी  6 हजार 338  रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 4  हजार  975 आहे. कोरोनाबाधित एकूण 465  रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

कोल्हापूर जिल्हा

            कोल्हापूर जिल्हयातील  कोरोना बाधीत एकूण 23  हजार 683  रुग्णांपैकी 14  हजार  49 रुग्ण  बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या  7 हजार  911 आहे. कोरोनाबाधित एकूण 723  रुग्णांचा मृत्यू झाला आहे

कालच्या रुग्णसंख्येच्या तुलनेत आज झालेली वाढ

कालच्या बाधीत रुग्ण संख्येच्या तुलनेत पुणे विभागात बाधीत रुग्णांच्या संख्येमध्ये एकूण 4 हजार 82  ने वाढ झाली आहे. यामध्ये पुणे जिल्ह्यात 1 हजार 933, सातारा जिल्ह्यात 489, सोलापूर जिल्ह्यात 363, सांगली जिल्ह्यात 686  तर कोल्हापूर जिल्ह्यात 611 अशी रुग्ण संख्येमध्ये वाढ झालेली आहे.

पुणे विभागातील सर्व्हेक्षण

आजपर्यत विभागामध्ये एकुण 10 लाख 86 हजार 765 नमून्याचा तपासणी अहवाल प्राप्त झाला. प्राप्त अहवालांपैकी 2  लाख 37  हजार 936  नमून्यांचा अहवाल सकारात्मक (पॉझिटिव्ह) आहे.

( टिप :- दि. 31 ऑगस्ट 2020 रोजी रात्री 9.00 वा. पर्यंतच्या आकडेवारीनुसार )

                         ***

Saturday, August 29, 2020

पंढरपुरात समन्वय अधिकारी नेमा : पालकमंत्री भरणे

कोविड आणि नॉन कोविड रुग्णांवर वेळीच उपचारासाठी उपाययोजना

               पंढरपूर.दि.29:. कोविड बाधित आणि नॉन कोविड रुग्णांवर वेळीच उपचार व्हावेत यासाठी समन्वय अधिकारी नेमावा अशा सूचना पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी आज पंढरपूर येथे दिल्या.

कोरोना विषाणूच्या प्रतिबंधाला आळा घालण्यासाठी केल्या जाणाऱ्या उपाययोजनांचा आढावा घेण्यासाठी आज पंढरपूर येथे बैठक झाली. या बैठकीत त्यांनी या सूचना दिल्या.बैठकीस आमदार भारत भालके, नगराध्यक्षा साधना भोसले, जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी प्रकाश वायचळ, आदी उपस्थित होते.

आमदार भालके यांनी  कोविड विषाणूची बाधा झालेले आणि न झालेल्या रुग्णांवर वेळीच उपचार होण्याची आवश्यकता असल्याचे सांगितले. काही खाजगी डॉक्टरांकडून सामान्य रुग्णांवर उपचाराला नकार दिला जातो. त्यामुळे  सर्वसामान्य रुग्णांना वैद्यकीय उपचारा पासून मुकावे लागत आहे. यावर तोडगा काढला जावा, असे त्यांनी सांगितले. यावर समन्वय अधिकारी नेमला जावा. त्याने कोविड बाधित रुग्णांना कोणत्या हॉस्पिटलमध्ये बेड उपलब्ध आहेत, आणि अनुषांगिक माहिती नागरिकांना उपलब्ध करुन द्यावी अशा सूचना पालकमंत्री भरणे यांनी दिल्या.

           पंढरपूर येथे 65 एकर परिसरात उभारण्यात आलेले कोविड केअर सेंटर मधून कोरोना बाधित रुग्णांच्या वेळीच उपचार होतील. या सेंटरला आणि तालुक्यातील शासकीय रुग्णालयांना आवश्यकती मदत आणि निधी  जिल्हा प्रशासन व राज्य शासनाच्या माध्यमातून उपलब्ध करुन दिला जाईल असेही,श्री भरणे यांनी सांगितले. कोविडच्या कालावधित चांगले काम करणाऱ्या आशा वर्कर यांच्या मानधनाबाबत सकारात्मक निर्णय घेतला जाईल असे त्यांनी यावेळी सांगितले.

श्री. शंभरकर यांनी जिल्ह्यातील सर्व  डेडीकेटेड कोविड हॉस्पिटल, कोविड केअर हॉस्पिटल यांना आक्सिजनचा पुरवठा वेळेत व्हावा यासाठी समिती नेमण्यात आली आहे. या समितीच्या माध्यमातून सर्व ठिकाणी ऑक्सिजन पुरवठा वेळेत होईल. कोविड केअर सेंटर आणि हॉस्पिटल येथे आवश्यक असणाऱ्या पायाभूत सुविधा आणि औषधे पुरवठा करण्यासाठी आवश्यक निधी उपलब्ध आहे. पंढरपूर येथे लवकरच समन्वय अधिकारी नियुक्त केला जाईल असे त्यांनी सांगितले. 

कोरोनाचा प्रभाव रोखण्यासाठी तालुका प्रशासनाकडून करण्यात आलेल्या  विविध उपाययोजना व सोयी, सुविधांची माहिती प्रांताधिकारी सचिन ढोले यांनी यावेळी दिली.

           यावेळी  जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. भीमाशंकर जमादार, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. प्रदीप ढेले, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ.सागर कवडे, तहसिलदार वैशाली वाघमारे, मुख्याधिकारी अनिकेत मानोरकर, उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षिका डॉ.जयश्री ढवळे, डॉ.केचे आदी उपस्थित होते. 

                                                    0000000

प्लाझ्मा दान करण्यासाठी प्रत्येकाने पुढे यावे -पोलीस आयुक्त डॉ.के.व्यंकटेशम

 पुणे दि.29- पुणे शहराबरोबरच ग्रामीण भागातही कोरोना रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. कोरोनावर मात करण्यासाठी पूर्णपणे बरे झालेल्या प्रत्येक रुग्णांनी प्लाझ्मा (रक्तद्रव) दान करण्यासाठी पुढे यावे, असे आवाहन पोलीस आयुक्त डॉ.के.व्यंकटेशम यांनी  केले.

             पुणे शहर पोलीस आयुक्त कार्यालयात प्लाझ्मादाता गौरव कार्यक्रम पोलीस आयुक्त डॉ.के.व्यंकटेशम यांच्या हस्ते पार पडला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी पोलीस सह आयुक्त डॉ. रवींद्र शिसवे, अपर पोलीस आयुक्त संजय शिंदे, पोलीस उप आयुक्त मितेश घट्टे आदी उपस्थित होते.

            पोलीस आयुक्त डॉ.के.व्यंकटेशम म्हणाले, कोरोना बाधित रुग्णसंख्या कमी करण्यासाठी पुणे शहर पोलीस आयुक्त कार्यालयाने उपलब्ध करुन दिलेल्या http://puneplasma.in या वेबसाईटवर किंवा सहायक पोलीस निरीक्षक शिंत्रे मो.नं.9960530329 या  व्हॉटस्अपवर मेसेजव्दारे प्लाझ्मा देऊ इच्छिणाऱ्यांनी नोंद करावी.  पोलीस उप आयुक्त मितेश घट्टे यांनी हे चांगले व्यासपीठ तयार केले आहे. बोलणारे भरपूर बोलतात पण आपण सर्व प्लाझ्मादान करणाऱ्यांनी जे काही करुन दाखविले याचा मला आनंद आहे.  पूर्णपणे बरे झालेल्या रुग्णांनी प्लाझ्मा दान करणे गरजेचे आहे. ज्यांना ज्यांना प्लाझ्माची गरज आहे त्यांना  ते देण्यासाठीच आपण हा उपक्रम राबवत आहोत. यामुळे एखाद्याचा जीव वाचू शकतो, असेही ते म्हणाले.

            यावेळी प्लाझ्मा दाते करण रणदिवे, मोहिम नलावडे, राहुल तुपे, वैभव लोढा, अजय मुनोत, राहुल लंगर,जमीर शेख, अवधुत दिवटे, वैभव भाकन, कुणाल तोडी, मोहित तोडी यांना पोलीस आयुक्त डॉ.व्यंकटेशम यांच्या हस्ते प्रशस्तिपत्रक देऊन गौरविण्यात आले.

            पोलीस सह आयुक्त रवींद्र शिसवे म्हणाले, आपण सर्वांनी सगळया शंका-कुशंकांवर मात करुन अनेकवेळा प्लाझ्मा दान केले आहे. तुमची ही कृती फार महत्त्वाची असून एखाद्याचा जीव वाचविणे हे एक मोठे काम आहे. तुमच्या मनात जागृत झालेली ही भावना अशीच पुढे चालू राहून समाजात एक मोठी चळवळ झाली पाहिजे. ही मोहीम शहराबरोबरच ग्रामीण भागातही राबवावी. देणाऱ्याने देत जावे घेणाऱ्याने घेत जावे, अशी भावना त्यांनी  व्यक्त केली.

            यावेळी प्लाझ्मा दाते अजय मुनोत, राहुल लंगर, वैभव भाकन व प्लाझ्मा स्वीकारणारे संदिप सोनवणे यांनीही आपले मनोगत व्यक्त करुन पुणे शहर पोलीस आयुक्त कार्यालयातील अधिकाऱ्यांचे या उपक्रमाबद्दल आभार मानले.

            पोलीस उप आयुक्त मितेश घट्टे कार्यक्रमाचे प्रास्ताविक करतांना म्हणाले, कोरोनावर मात करण्यासाठी पुणे शहर पोलीस विभागाने प्लाझ्मा थेरपी हा चांगला उपक्रम हाती घेतला असून पोलीस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम यांनी केलेल्या आवाहनामुळे 405 प्लाझ्मा दात्यांनी प्लाझ्मा दान करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. रुग्णालयातून बरे होऊन बाहेर पडणाऱ्या प्रत्येक रुग्णाने मदतीचा हात पुढे करुन प्लाझ्मा दान करणे गरजेचे आहे. यामुळे प्लाझ्मा दाता एक मोठी चळवळ होऊ शकेल. उपस्थितांचे सहायक पोलीस निरीक्षक प्रेमा पाटील यांनी आभार मानले.

            यावेळी पुणे शहर पोलीस आयुक्तालयातील पोलीस अधिकारी, कर्मचारी, प्लाझ्मा दाते व प्लाझ्मा स्वीकारलेल्या रुग्णांचे नातेवाईक उपस्थित होते.

००००

Friday, August 28, 2020

कोरोनाविरुद्धची लढाई जिंकण्यासाठी प्रत्येकाने मास्कचा वापर व सुरक्षित अंतर ठेवण्याची दक्षता घ्यावी -उपमुख्यमंत्री अजित पवार

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी  घेतला पुणे व पिंपरी-चिंचवड महानगरातील 'कोरोना' प्रतिबंधासाठीच्या उपाययोजनांचा आढावा

        पुणे, दि. 28 :  कोरोनावर संपूर्णपणे मात करण्यासाठी सर्वांनी नियमांचे पालन केले पाहिजे. त्यामुळे यंत्रणांनी नियमभंग करणा-यांविरुद्ध अधिक धडकपणे कारवाया करण्याचे स्पष्ट निर्देश उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांनी आज प्रशासनाला दिले.  कोरोनाविरुद्धची लढाई सर्वांचीच असून नागरिकांची त्याला साथ मिळणे आवश्यक आहे. त्यामुळे प्रत्येकाने मास्कचा वापर व सुरक्षित अंतर ठेवण्याची दक्षता घ्यावी व कोरोनावर मात करण्यासाठी प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहनही त्यांनी केले.

              विभागीय आयुक्त कार्यालयात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली पुणे व पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रातील 'कोरोना'बाबतच्या उपाययोजनाबाबत आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार बोलत होते. बैठकीला  विभागीय आयुक्त सौरभ राव, जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख, पोलीस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम, पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त संदीप बिष्णोई, जमाबंदी आयुक्त एस. चोक्कलिंगम, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, पुणे मनपा आयुक्त विक्रम कुमार, पिंपरी चिंचवड मनपा आयुक्त श्रावण हर्डीकर, पुणे मनपाच्या अतिरिक्त आयुक्त रुबल अग्रवाल, पोलीस अधीक्षक संदीप पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ.जयश्री कटारे, ससूनचे अधिष्ठाता डॉ. मुरलीधर तांबे, आरोग्य उपसंचालक संजय देशमुख, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अशोक नांदापुकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. भगवान पवार, डॉ. सुभाष साळुंखे, डॉ.दिलीप कदम यांच्यासह संबंधित विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. 

          उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, कोरोनाची साथ संपविण्यासाठी सार्वजनिक शिस्त निर्माण करावीच लागेल. त्यामुळे नियमभंग करणाऱ्यांवर नियमितपणे कारवाई झालीच पाहिजे.  सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन होणे, हे सर्वांच्याच हिताचे आहे. त्यामुळे सार्वजनिक हिताला बाधा आणणाऱ्यांवर तात्काळ कारवाई करावी. मास्क न लावणाऱ्या व सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱ्या व्यक्तीवर दंडात्मक कारवाई करण्याचे निर्देशही त्यांनी  दिले.

             कोरोनाबाधीत रुग्णांवर उपचार करणाऱ्या ग्रामीण तसेच शहरी भागातील डॉक्टरांना तज्ञ डॉक्टर तसेच टास्क फोर्समार्फत कोरोना उपचाराबाबत प्रशिक्षण देणे गरजेचे आहे, त्यादृष्टिने कार्यवाही करावी. कोरोना कालावधीत पोलीस अहोरात्र कार्यरत आहेत, त्यातील बाधित पोलिसांच्या तसेच कार्यरत पोलिसांच्या आरोग्याची काळजी घ्यावी, त्यांच्या उपचार सुविधाबाबत दक्षता घेण्याचे निर्देशही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले.

        प्रारंभी विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी क्षेत्रनिहाय कोरोना बाधित रुग्ण, नमुना तपासणी प्रयोगशाळा तपशील, आठवडानिहाय कोरोना बाधित रुग्ण व मृत्यूचा तपशील, कोरोना मुक्त झालेले रुग्ण, कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यूदर, संपर्क व्यक्ती शोध, प्रतिबंधित क्षेत्र, बेड उपलब्धता, रुग्णवाहिका उपलब्धता, 60 वर्षेवरील व सहव्याधी सर्व्हेक्षण, रुग्णालय व्यवस्थापन, रुग्णांचे बील व्यवस्थापन याबाबतची सविस्तर माहिती दिली. तसेच कोरोनाबाधित रुग्णांसाठी उपचार  सुविधाही पुरेशा प्रमाणात असल्याचे  सांगितले.

                  जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख यांनी जिल्ह्यात कोरोना संसर्ग रोखण्यासाठी करण्यात येत असलेल्या उपाययोजनांची माहिती दिली. 

            पुणे मनपा आयुक्त विक्रमकुमार व पिंपरी-चिंचवड आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी महापालिकाक्षेत्रात कोरोना प्रतिबंधासाठी करण्यात येत असलेल्या उपाययोजनाबाबत माहिती दिली. यावेळी विविध विभागाचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.

***

मास्क न वापरणारे, सुरक्षित अंतराचे पालन न करणारे तसेच निष्कारण गर्दी करणा-यांवर वेळीच कारवाई करा -उपमुख्यमंत्री अजित पवार

 ग्रामीण भागातील कोरोना उपाययोजनाबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी साधला लोकप्रतिनिधींशी संवाद

मास्क न वापरणारे, सुरक्षित अंतराचे पालन न करणारे तसेच निष्कारण गर्दी करणा-यांवर वेळीच कारवाई करा

                -उपमुख्यमंत्री अजित पवार

■  जम्बो रुग्णालयामुळे ग्रामीण भागातील रुग्णांना निश्चितच दिलासा

■ ग्रामीण भागात प्लाझ्मादानबाबत व्यापक जनजागृती करावी

■ कोरोनासोबतच पावसाळयाच्या कालावधीतील आजाराबात अधीक दक्षता घ्या

        पुणे, दि.28: कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासन व प्रशासन विविध प्रतिबंधात्मक उपाययोजना राबवित आहे. परंतू, गत काही दिवसात जिल्ह्यात कोरोना संक्रमितांची संख्या वाढलेली आहे. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी सातत्यपूर्ण स्वच्छता, मास्कचा वापर व सुरक्षित आंतर व शासनाच्या निमयमांचे पालन करणे गरजेचे असल्याचे उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांनी आज येथे सांगितले. मास्क न वापरणारे, सुरक्षित आंतराचे पालन न करणारे तसेच निष्कारण गर्दी करणा-यांवर वेळीच कारवाई झाली पाहिजे. अशी कारवाई सतत व नियमितपणे करावी. कुठेही गर्दी होणार नाही आणि व्यक्तींमध्ये सुरक्षित अंतर राहील याबाबत प्रशासनाने खबरदारी घ्यावी, असे निर्देशही त्यांनी दिले.

 ‘कोविड-१९’ विषाणू  उपाययोजनाबाबत जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींसमवेत आज उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली  विभागीय आयुक्त कार्यालयाच्या सभागृहात बैठक पार पडली. यावेळी राज्य उत्पादन शुल्क मंत्री दिलीप वळसे-पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. विधान परिषदेच्या उपसभापती आमदार डॉ. निलम गोऱ्हे व्हिडीओ कॉन्फरन्सव्दारे बैठकीत सहभागी झाल्या. यावेळी खासदार सुप्रिया सुळे, खासदार श्रीरंग बारणे, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा निर्मला पानसरे, आमदार सर्वश्री दिलीप मोहिते, सुनिल शेळके, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष रणजित शिवतारे, विभागीय आयुक्त सौरभ राव, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, कोरोनाबाधित रुग्णांना वेळेत उपचार मिळावेत यासाठी पुणे, पिंपरी चिंचवड महानगरात उभारण्यात आलेल्या जम्बो रुग्णालयामुळे ग्रामीण भागातील रुग्णांना निश्चितच दिलासा मिळेल. कोरोना प्रतिबंधासाठीच्या उपाययोजना करताना ग्रामीण भागात समन्वयासाठी स्वतंत्रपणे अधिका-यांची नेमणूक करावी, कोरोना प्रतिबंध उपाययोजना व इतरही योजनांच्या अंमलबजावणीबाबत प्रशासनाने लोकप्रतिनिधींच्या सूचना विचारात घेऊन कार्यवाही करावी. सर्वांशी समन्वय ठेवून कार्यवाही होणे अपेक्षित आहे जेणेकरून उपाययोजनेची परिणामकारता वाढेल,असे त्यांनी सांगितले.

कोरोनासोबतच पावसाळयाच्या कालावधीतील आजाराबात अधीक दक्षता घेण्याचे सांगून उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, कोरोनाबाधित रुग्णांना महात्मा फुले जन आरोग्य योजनेचा लाभ मिळवून देण्याच्या दृष्टीने गतीने कार्यवाही करावी. ग्रामीण भागातील कोरोनाचा रुग्णदर व मृत्यूदर कमी करण्यासाठी सर्वाचे एकत्रित प्रयत्न महत्त्वाचे ठरणार असल्याचे उपमुख्यमंत्री श्री पवार यांनी सांगितले. ग्रामीण भागात प्लाझ्मादानबाबत व्यापक प्रमाणात जनजागृती करावी, तसेच प्लाझ्मादानसाठी स्वतंत्रपणे ॲप तयार करावे, असे निर्देशही त्यांनी दिले.

            राज्य उत्पादन शुल्क मंत्री दिलीप वळसे-पाटील म्हणाले, ग्रामीण भागातील रुग्णालयातील आवश्यक सोई सुविधांची वाढ करावी तसेच ग्रामीण भागातील रुग्णांसाठी खाटांची उपलब्धता असावी, कोरोना प्रतिबंधासोबतच उपचाराच्या सुविधांबाबत दक्षता घेण्याच्या सूचनाही त्यांनी सबंधित यंत्रणेला दिल्या.

            यावेळी खासदार सुप्रिया सुळे व खासदार खासदार श्रीरंग बारणे, आमदार सर्वश्री दिलीप मोहिते, सुनिल शेळके, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा निर्मला पानसरे, उपाध्यक्ष रणजित शिवतरे यांनी कोरोना नियंत्रणासाठी आवश्यक त्या सूचना केल्या.

                        विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये उभारण्यात आलेले जम्बो रुग्णालयांमध्ये ग्रामीण भागातून आलेल्या रुग्णाला प्राधान्याने उपचार देण्यात येतील, उपचारापासून कोणताही रुग्ण वंचित राहणार नाही, याची काळजी घेतली जात असल्याचे सांगितले.

             जिल्हाधिकारी श्री. देशमुख यांनी जिल्ह्यात कोरोना संसर्ग रोखण्यासाठी करण्यात येत असलेल्या उपाययोजनांची माहिती दिली. जिल्ह्यातील कोरोना बाधित रुग्ण, कोरोनामुक्त झालेले रुग्ण तसेच कोरोना संसर्ग विषयक सद्यस्थिती, आरोग्य सुविधा आणि उपलब्ध सामग्रीबाबत माहिती दिली.

             यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी डॉ.जयश्री कटारे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अशोक नांदापूरकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. भगवान पवार यांच्यासह विविध विभागांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.

        ००००००