Pages

Saturday, July 30, 2016

कर्करोग जनजागृती विषयी डॉ.जगताप यांची आकाशवाणीवर आज मुलाखत


सातारा दि.30 (जि.मा.का.):मौखिक, डोके, मान व चेहरा यांचा कर्करोग दिनाच्या अनुषंगाने जनजागृती सप्ताहनिमित्त दंतशल्यचिकित्सक डॉ.विजया जगताप यांची उद्या रविवार दिनांक 31 जुलै रोजी सायंकाळी 6 .35 मि. सातारा आकाशवाणीवरुन मुलाखत प्रसारित होणार आहे.
27 जुलै हा जागतिक मौखिक, डोके, मान व चेहरा यांचा कर्करोग दिन म्हणून 1 ऑगस्टपासून कर्करोज जनजागृती सप्ताह जिल्हयात राबविण्यात येत आहे. या जनजागृती सप्ताहनिमित्ताने येथील क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालयाच्या दंतशल्यचिकित्सक डॉ.विजया जगताप यांची मुलाखत कार्यक्रम अधिकारी विक्रांत मंडपे यांनी घेतली आहे. तिचे प्रसारण उद्या रविवार दिनांक 31 जुलै रोजी सायंकाळी 6.35 वाजता आकाशवाणी केंद्रावरुन होणार आहे.
0000


No comments:

Post a Comment