Pages

Saturday, July 2, 2016

प्रेस कौन्सिल ऑफ इंडियाची उपसमिती जाहिरातींच्या मुद्यांबाबत माहिती घेणार

प्रेस कौन्सिल ऑफ इंडियाची उपसमिती जाहिरातींच्या मुद्यांबाबत माहिती घेणार

पुणे, दि. 2 (विमाका): प्रेस कौन्सिल ऑफ इंडियाची उपसमिती जाहिरातींच्या मुद्यांबाबत तपासणी करण्यासाठी मुंबईत येत आहे. या उपसमितीमध्ये उपसमितीचे अध्यक्ष गुरींदर सिंग, सदस्य प्रभात कुमार दक्ष यांचा समावेश असणार आहे. ही उपसमिती मुंबई भेटीदरम्यान राज्य शासनाच्या अधिकाऱ्यांकडून जाहिरात धोरणाबाबतची माहिती तसेच जाहिरातींचे विविध मुद्दे यांची माहिती घेणार आहे.
            ही उपसमिती येत्या 4 जुलै 2016 रोजी सकाळी 11 ते 2 या वेळेत मलबार हिल येथील सह्याद्री अतिथीगृहातील वसंतदादा पाटील सभागृह, हॉल क्र. 4 येथे माध्यम क्षेत्रातील संबंधित मालक, मुद्रक, प्रकाशक, व्यवस्थापक यांचे सोबत या विषयासंदर्भात बैठक घेणार आहे. तर 5 जुलै 2016 रोजी याच ठिकाणी सकाळी 11 ते 1.30 या वेळेत राज्य शासनाच्या प्रतिनिधींशी चर्चा करणार आहे.
            यावेळी वेगवेगळ्या माध्यम क्षेत्रातील प्रतिनिधींना उपसमितीबरोबर चर्चा करता येणार असून आपल्या काही तक्रारी व सूचना असल्यास त्या मांडण्याची संधी मिळणार आहे.
000



No comments:

Post a Comment