Pages

Tuesday, August 23, 2016

सोलापूर जिल्ह्यात 37 (1) कलम जारी



सोलापूर दि. 23  :- सोलापूर ग्रामीण हद्दीत शांतता, सुरक्षितता अबाधित रहावी, कायदा व सुव्यवस्था राखता यावी म्हणून अजित रेळेकर, अपर जिल्हादंडाधिकारी, सोलापूर  यांनी मुंबई पोलीस कायदा 1951 चे 37 (1)(अ ते फ) कलमान्वये सोलापूर ग्रामीण जिल्ह्याच्या हद्दीत ( पोलिस आयुक्तालय सोलापूर शहर हद्द वगळून) दिनांक 20 ऑगस्ट  ते 3 सप्टेंबर 2016  रोजी रात्री 20.00 वाजेपर्यंत आदेश जारी केला आहे.
            या कलमान्वये शस्त्रे, सोटे, तलवारी, भाले, दांडे, सुरे, काठी किंवा झेंडा लावलेली काठी किंवा शरीरास ईजा करण्याकरिता वापरता येईल अशी कोणतीही वस्तु बरोबर नेणे, आणणे, दगड अगर तत्सम वस्तु, शस्त्रे हाताळणे अगर त्याचा फेकून मारण्यासाठी उपयोग करणे, कोणताही ज्वालाग्राही अगर स्फोटक पदार्थ वाहून नेणे, व्यक्ती किंवा त्याची प्रेत यात्रा, प्रतिमा यांचे प्रदर्शन करणे, सार्वजनिक घोषणा करणे या बाबीस प्रतिबंध जाहिर केला आहे. असभ्‍य हावभाव करणे, ग्राम्य भाषा वापरणे, सभ्यता अगर नितीविरुध्द निरनिराळ्या जाती जमातीच्या भावना दुखावल्या जातील  त्यामुळे त्यांच्यात भांडणे बखेडे निर्माण होवून शांततेस बाधा होईल अशी सोंगे, चिन्हे तयार करुन त्याचा प्रसार करणे यास या कलमान्वये प्रतिबंध घालण्यात आला आहे. ज्या सरकारी नोकरांना त्यांची कर्तव्ये बजावताना वरील वस्तू हाताळाव्या लागतात आणि ज्यांनी सक्षम पोलीस प्राधिकरणाची परवानगी घेतली आहे अशा व्यक्तींना परवानगीतील अटीस पात्र राहून सदरचे आदेश लागू होणार नाहीत.  

                                                                          00000
 
            सोलापूर जिल्ह्यात 37 (3) कलम जारी

        सोलापूर दि. 23 :- सोलापूर ग्रामीण जिल्ह्याच्या हद्दीत (पोलिस आयुक्तालय सोलापूर शहर हद्द वगळून) शांतता, सुरक्षितता अबाधित रहावी, समाजकंटक व गुंडप्रवृत्तीचे इसमांवर प्रतिबंधक कारवाई करणे सोईचे जावे म्हणून अजित रेळेकर, अपर जिल्हादंडाधिकारी, सोलापूर  यांनी मुंबई पोलीस कायदा 1951 चे 37 (3) कलमान्वये पोलीस सोलापूर ग्रामीण जिल्ह्याच्या हद्दीत दिनांक 20 ऑगस्ट  ते 3 सप्टेंबर 2016 रोजीचे रात्री  20.00 वाजेपर्यंत पांच किंवा पांचाहून अधिक लोक एकत्र येण्यास बंदी घातली आहे.
             ज्या सरकारी नोकरांना त्यांची कर्तव्ये बजावताना वरील वस्तू हाताळाव्या लागतात आणि ज्यांनी सक्षम पोलीस प्राधिकरणाची परवानगी घेतली आहे अशा व्यक्तींना परवानगीतील अटीस पात्र राहून सदरचे आदेश लागू होणार नाहीत.     


00000

No comments:

Post a Comment