Pages

Sunday, August 14, 2016

अत्याधुनिक सायबर लॅबचे आज पोलीस आयुक्तालयात उद्घाटन


अत्याधुनिक सायबर लॅबचे आज
पोलीस आयुक्तालयात उद्घाटन
सोलापूर दि. 14: - महाराष्ट्र सुरक्षा प्रकल्पाच्या अंतर्गत अत्याधुनिक सायबर लॅब येथील पोलीस आयुक्तालयात विकसित करण्यात आली आहे. या लॅबचे उद्घाटन पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांच्या हस्ते उद्या 15 ऑगस्ट 2016 रोजी होणार आहे.
                              येथील पोलीस आयुक्त कार्यालयात सकाळी 11.30 वाजता हा कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमास सर्वांनी उपस्थित रहावे, असे आवाहन पोलीस प्रशासनातर्फे करण्यात आले आहे. इंटरनेटच्या माध्यमातून वाढणा-या गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकार आणि संकल्पनेतून ही सायबर लॅब आकारास येत आहे. या कार्यक्रमास उपस्थित रहावे असे आवाहन पोलीस आयुक्त रवींद्र सेनगावकर यांनी केले आहे.   

No comments:

Post a Comment