Pages

Tuesday, August 23, 2016

वसंतराव नाईक महामंडळातर्फे आवाहन

  

         सोलापूर दि.23 :-  येथील वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळाकडून शासनाच्या विविध कर्जयोजना  वि.जा... तसेच विशेष मागासवर्गासाठी  (एसबीसी) राबविण्यात येतात. त्यानुषंगाने सन 2016-17 या वर्षाकरीता 5 लाखापर्यंत बीजभांडवल योजना राबविण्यात येणार आहे.
            यासाठी 18 ते 45 वयोगटातील संबंधित लाभार्थ्यांनी जातीचा तसेच 1 लाख रुपयांपर्यंत उत्पन्नाचा दाखला, रेशन- आधारकार्डकोटेशन, प्रकल्प अहवाल त्याचबरोबर वाहनपरवाना आवश्यक असून इच्छुक लाभार्थ्यांनी अधिक माहितीसाठी 0217 – 2315472 या दूरध्वनीवर डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय व सांस्कृतिक भवन, दुसरा मजला, सात रस्ता, सोलापूर याठिकाणी  दि. 31 ऑगस्ट 2016 पर्यंत परिपूर्ण माहितीसह अर्ज सादर करावेत. मुदतीनंतर आलेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही. अशी माहिती या कार्यालयाच्या व्यवस्थापकांनी पत्रकाद्वारे दिली आहे.

                                                                                  0 0 0 0 

No comments:

Post a Comment