Pages

Thursday, August 25, 2016

वाहनांच्या आकर्षक क्रमांकासाठी अर्ज करण्याचे आवाहन


पुणे, दि.25 : चारचाकी वाहनांसाठी नवीन मालिकेतील आकर्षक नोंदणी क्रमांक तीनपट शुल्क भरुन चारचाकी वाहनांसाठी राखून ठेवण्याकरिता आगाऊ अर्ज स्विकारण्यात येणार आहेत व लिलाव कार्यपद्धती वापरण्यात येणार आहे, असे प्रादेशिक परिवहन अधिकारी, पुणे यांनी कळविले आहे.
          चारचाकी वाहन मालकांना नव्याने सुरु होणाऱ्या चारचाकी मालिकेतील आकर्षक तसेच पसंतीचे क्रमांक विहित शुल्क ( तीनपट शुल्क ) भरुन हवे असतील त्यांनी 29 ऑगस्ट, 2016 रोजी कार्यालयीन वेळेत सकाळी  11-00 ते दुपारी 2-30 या दरम्यान विहित नमुन्यात अर्ज करावा.
          अर्ज प्रादेशिक कार्यालयाच्या नवीन नोंदणी विभागात डी.डी, पत्त्याचा पुरावा, ओळखपत्र, पॅनकार्डच्या साक्षांकित प्रतीसह जमा करावा. डीडी प्रादेशिक परिवहन अधिकारी, पुणे यांच्या नावे राष्ट्रीयीकृत/शेड्युल्ड बँक, पुणे येथील असणे आवश्यक आहे. अर्जदाराने अर्जासोबत फोटो ओळखपत्र (उदा. आधार कार्ड/निवडणूक आयोगाचे ओळखपत्र/पासपोर्ट/ पॅन कार्ड इ.) ची साक्षांकित प्रत सादर करणे आवश्यक आहे.
          एकाच क्रमांकाकरिता एकापेक्षा जास्त अर्ज आल्यास त्यांची यादी  30 ऑगस्ट,2016 रोजी 10-30 वा. कार्यालयाच्या नोटीस बोर्डवर लावण्यात येणार आहे. लिलावाकरिता जर जास्त रकमेचा डीडी जमा करावयचा असेल तर त्यांनी दुपारी 3-30 वाजेपर्यंत सीलबंद पाकीटात प्रादेशिक कार्यालयात जमा करावा. त्याच दिवशी दुपारी 4-30 वा. सहकार सभागृह, प्रादेशिक परिवहन कार्यालय, पुणे येथे उप प्रादेशिक परिवहन अधिकारी व सहा. प्रादेशिक अधिकारी यांच्या उपस्थित पात्र व्यक्तीसमोर (संबंधीत अर्जदार) लिफाफे उघडून अर्जदाराने विनिर्दीष्ट शुल्कापेक्षा जास्तीत जास्त रकमेचा डी.डी. सादर केला असेल त्यास नमूद पसंती क्रमांक वितरित केला जाईल. राखून ठेवलेला क्रमांक 30 दिवसांच्या आत नोंदणीसाठी वाहन सादर केले नाही तर राखून ठेवलेला क्रमांक आपोआप रद्द होईल व फी सरकार जमा होईल. फी कोणत्याही परिस्थिती परत केली जाणार नाही अथवा समायोजन करता येणार नाही, असे पत्रकात  नमूद केले आहे.
                                                   0000


No comments:

Post a Comment