Pages

Tuesday, September 27, 2016

मुंबई पोलीस अधिनियम 151 चे कलम 36 लागू


            सोलापूर दि. 27 :-जिल्ह्यात 1 ते 11 ऑक्टोबर कालावधीत नवरात्र उत्सव, 15 rsतेrs 16 ऑक्टोबर काजागिरी पोर्णिमा आणि 03 ते 12 ऑक्टोबर मोहरम सण साजरे होणार आहेत. त्याअनुषंगाने दिनांक 01 ते 12 ऑक्टोबर 2016 रोजीच्या रात्री 12 वाजेपर्यंत मुंबई पोलीस अधिनियम 151 चे कलम 36 मधील पोटकलम अ ते फ लागू करण्यात येणार आहे.
           या कलमांन्वये कोणत्याही मिरवणूका, कोणत्या मार्गाने किंवा कोणत्यावेळी काढाव्यात अथवा काढू नयेत हे निश्चित करण्यात येते. तसेच मोर्चे, निर्दशने, पदयात्रा, मिरवणूका आदि कार्यक्रम पोलीस आयुक्तालय सोलापूर शहर हद्द वगळून संबंधित ठाणेदार किंवा त्यापेक्षा वरिष्ठ अधिका-यांकडून मार्ग  व दिनांक निश्चिती तसेच वेळ व त्यामध्ये दिल्या जाणा-या घोषणांचा अंतर्भाव निश्चित केल्याशिवाय आयोजित करण्यात येवू नये. त्याचबरोबर धार्मिक ठिकाणी, सार्वजनिक जागेत, रस्यात कर्णकर्कश वाद्ये वाजवू नयेत. वरील आदेश लग्नसमारंभ व अंत्यविधीसाठी लागू नाहीत. 
           या बाबींचे उल्लंघन करणा-याविरुध्द मुंबई पोलीस अधिनियम 1951 च्या कलम 134 प्रमाणे कारवाई करण्यात येईल असा इशारा पोलिस अधिक्षक एस.विरेश प्रभु यांनी दिला.
                                  0 0 0 0

No comments:

Post a Comment