Pages

Monday, September 19, 2016

29 सप्टेंबर रोजी डाक अदालत

  
                सातारा दि.19(जि.मा.का):  डाक सेवेबाबत सहा आठवड्यांपेक्षा जास्त काळ अनुत्तरित तक्रारींचे लवकर निवारण करण्यासाठी 29 सप्टेंबर रोजी सकाळी 11 वाजता पोस्टमास्तर जनरल, पुणे रिजन पुणे यांच्या कार्यालयामध्ये 43 व्या डाक अदालतीचे आयोजन करण्यात आले आहे.
                 पोस्टमास्तर जनरल, पुणे  यांनी प्रसिद्धीपत्रकात माहिती दिली आहे की, देशामधील पोस्टाची सेवा ही सामाजिक आर्थिक जीवनाचा एक अभिन्न भाग आहे.  देशातील प्रत्येक नागरिकांच्या मनामध्ये अपरोक्षपणे पोस्टाच्या सेवेने एक वेगळ्या प्रकारचे स्थान निर्माण केले आहे.  पोस्ट खाते हे लोकांना चांगल्या प्रकारची सेवा देण्याचा ग्राहकांचे जास्तीत जास्त समाधान करण्याचा प्रयत्न करते.  ही सेवा देताना संभाषणामध्ये, पत्रव्यवहारामध्ये किंवा सेवेमधील काही त्रुटींमुळे असे काही प्रसंग निर्माण होतात की, त्यामुळे पोस्टाच्या सेवेबद्दल तक्रार करण्याची वेळ येते. या तक्रारींचे योग्य प्रकारे निराकरण करण्यासाठी पोस्ट खाते वेळोवेळी डाक अदालत घेते.  त्यामध्ये पोस्ट विभागाचे अधिकारी तक्रार सोडविण्याचा प्रयत्न करतात.
                पोस्टाच्या कार्यपद्धतीविषयी किंवा कामकाजाबद्दल ज्या तक्रारींचे निवारण सहा आठवड्यांच्या आत झालेले सेल समाधानकारक उत्तर मिळाले नसेल अशा तक्रारींची या डाक अदालतमध्ये दखल घेतली जाईल.  यामध्ये टपाल, रजि. पार्सल, स्पीड पोस्ट, काऊंटरसेवा, डाक वस्तू, पार्सल, बचत बँक मनिऑर्डर, बचत पत्राबाबतच्या तक्रारी विचारात घेतल्या जातील.
                आपल्या तक्रारीचा समावेश या डाक अदालतीमध्ये होण्यासाठी तक्रारीचा उल्लेख सर्व तपशीलासह केलेला असावा.  अनुत्तरीत तक्रारी बाबत मुळची तक्रार ज्या अधिका-याकडे दाखल केली असेल त्याचा हुद्दा, संपूर्ण नांव पत्ता तसेच तक्रार दाखल केल्याची तारीख आदी तपशिलासह आपली तक्रार या डाक अदालतीमध्ये ठेवण्यासाठी दिनांक 26 सप्टेंबरपूर्वी समक्ष अथवा पोस्टाने सु.भ. वालुंज, सहायक निदेशक, डाक सेवा, पोस्टमास्टर जनरलचे कार्यालय, पुणे यांच्या नावे पाठवावी.  मुदतीनंतर आलेल्या तक्रारींचा डाक अदालतीमध्ये विचार केला जाणार नाही , असेही पोस्टमास्तर जनरल यांनी कळविले आहे.

00000

No comments:

Post a Comment