Pages

Friday, September 23, 2016

विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांचा दौरा


              सातारा, दि.23 (जिमाका) :  विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर हे सातारा जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे.
              शनिवार दि.24 सप्टेंबर 2016 रोजी सकाळी 10.30 वाजता सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मर्या. कार्यकारी समितीची सभा. स्थळ : सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मर्या. मुख्य कार्यालयातील सभागृह. 11 वाजता मालोजी राजे सहकारी बँक वार्षीक सर्वसाधारण सभा. स्थळ : मालोजी राजे सहकारी बँक, ता. फलटण जि. सातारा. दुपारी 1 वाजता श्रीराम सहकारी साखर कारखाना वार्षिक सर्वसाधारण सभा. स्थळ : कारखाना कार्यस्थळ, ता. फलटण जि. सातारा. 4 वाजता हरिनाम सप्ताह सोहळा नियोजनासंदर्भात बैठक. स्थळ : हरिनाम मंदिर, ता. फलटण, सायंकाळी 6.30 वाजता मोटारीने फलटण येथून सोनके ता. कोरेगावकडे प्रयाण. 7 वाजता श्री. दत्तात्रय धुमाळ यांच्याकडे सत्कार समारंभ. स्थळ : सोनके, ता. कोरेगाव व सोयीनुसार मोटारीने सोनके येथून फलटणकडे प्रयाण.
              रविवार दि.25 सप्टेंबर रोजी फलटण येथे मुक्काम. सोमवार दि. 26 सप्टेंबर रोजी सकाळी सोयीनुसार फलटण येथून रॉक स्प्रिंग रिसोर्ट, भाटमरळीकडे प्रयाण. दुपारी 12 वाजता राष्ट्रवादी युवक कॉग्रेस केडर कँप स्थळ-रॉक स्प्रिंग रिसोर्ट, भाटमरळी जि.सातारा. दुपारी 1 वाजता भाटमरळी येथून मोटारीने मुंबईकडे प्रयाण.

00000

No comments:

Post a Comment