Pages

Saturday, October 15, 2016

जलयुक्त शिवार पत्रकार पुरस्कारासाठी अर्ज करण्याची मुदत 20 ऑक्टोबर


पुणे, दि. १५ (विमाका) : जलयुक्त शिवार अभियानात वृत्तपत्रातून तसेच इलेक्ट्रॉनिक माध्यमाद्वारे जलसंधारणाचे महत्त्व सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहचविणाऱ्या वृत्तपत्र प्रतिनिधींना शासनातर्फे राज्य, विभाग तसेच जिल्हास्तरावर पुरस्कार देण्यात येणार आहेत. या पुरस्कारांसाठी प्रवेशिका मागविण्याच्या तारखेमध्ये बदल करण्यात आला असून आता इच्छुक पत्रकारांनी २० ऑक्टोबर २०१६ पर्यंत आपली प्रवेशिका विहित नमुन्यात तीन प्रतीत संबंधित स्तरावरील निवड समितीकडे सादर करावी. अधिक माहितीसाठी महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.inया संकेतस्थळावर शासन निर्णय या लिंकमध्ये ग्रामविकास व जलसंधारण विभागाचा दि. 28 सप्टेंबर 2016 रोजीचा शासन निर्णय आणि दि. 10 ऑक्टोबर 2016 रोजीचे  शासन  परिपत्रक पहावे, असे आवाहन पुणे येथील उपसंचालक, विभागीय माहिती कार्यालय यांनी केले आहे.
****

No comments:

Post a Comment