Pages

Thursday, October 6, 2016

गुणवत्ता शिष्यवृत्तीसाठी अर्ज करण्याचे आवाहन


सोलापूर दि. 06: - जिल्हृयातील सर्व शासकीय अनुदानितविनाअनुदानित शाळेमध्ये अनु जाती, विजाभज विमाप्र वर्गातील विद्यार्थ्यांसाठी सन 16-17 या शैक्षणिक वर्षाकरिता सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती, गुणवत्ता शिष्यवृत्ती, परिक्षा फी योजनेकरिता . 9 वी , 10 वी मधील अनु जातीच्या विद्यार्थ्यांसाठी भारत सरकार मॅट्रीकपूर्व शिष्यवृत्तीसाठी ऑनलाईन अर्ज 30 नोव्हेंबर 16 अखेर पर्यंत करावेत.
                       Mahaeschool.maharashtra.gov.in  या तसेच zpsolapur.gov.in यावर अर्ज उपलब्ध असून ऑनलाईन अर्ज भरतांना विद्यार्थ्यांचे चुकीचे खाते क्रमांक भरण्यात येवू नये. चुकीचे खाते क्रमांक भरल्यास संबंधित मुख्याध्यापकांना जबाबदार धरण्यात येईल. तसेच इयत्ता 5 वी ते 10 वीच्या विद्यार्थ्यांनी आधार कार्ड सादर करणे आवश्यक असल्याची माहिती जिल्हा समाज कल्याण अधिकारी छाया गाडेकर यांन दिली.

0000000

No comments:

Post a Comment