Pages

Thursday, November 17, 2016

घरासाठी अर्ज करण्याचे स्वातंत्र्य सैनिकांना आवाहन


सोलापूर दि.17 :- जिल्हयातील बेघर स्वातंत्र सैनिकांना राहत्या  गावात घर घेण्यासाठी 10 लाख रुपयांपर्यंत अर्थसहाय्य उपलब्ध करुन देण्याच्या दृष्टीने अशा व्यक्तींकडून शासनस्तरावर अर्ज मागविण्यात येणार आहेत.
                     त्यादृष्टीने जे स्वातंत्र सैनिक हयात आहेत अथवा त्यांच्या पत्नीचे स्वत:चे घर नाही किंवा  त्यांच्या निकटवर्तियांचे घर नाही असे लाभार्थी यासाठी पात्र असून ते केंद्र व राज्य स्वातंत्र सैनिक अर्थसहाय्य मिळविण्यासाठी अर्ज करु शकतात. मात्र हा अर्ज सादर करताना संबंधितांचे देशात अथवा राज्यात स्वत:चे घर नसावे.
                     अधिक माहितीसाठी गरजूंनी संबंधित तालुक्याच्या तहसिलदारांशी संपर्क करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी रणजितकुमार यांनी केले आहे.
                                                           0 0 0 0 

No comments:

Post a Comment