Pages

Saturday, November 19, 2016

निवृत्तीवेतन धारकांचा मेळावा


पुणे, दि.19:कोषागार कार्यालयातर्फे पुणे जिल्हयातील राज्यशासकीय व निमशासकीय निवृत्तीवेतनधारकांचा मेळावा मंगळवार दि. 22 नोव्हेंबर 2016 रोजी सकाळी 11 वाजता महात्मा गांधी  सभागृह,बी.जे. वैद्यकीय महाविद्यालय,पुणे येथे आयोजित केलेला आहे. मेळाव्यामध्ये सर्व निवृत्तीवेतन धारक यांना निवृत्तीवेतनाबाबत येणाऱ्या अडचणीबाबत मार्गदर्शन करण्यात येणार आहे.

मेळाव्यास पुणे जिल्हयातील सर्व निवृत्तीवेतनधारक/ कुटुंबनिवृत्तीवेतन धारक यांनी उपस्थित रहाण्याचे आवाहन वरिष्ठ कोषागार अधिकारी यांनी पत्रकान्वये केले आहे.

00000

No comments:

Post a Comment