पुणे, दि. २४ (वि.मा.का.): पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आज पुणे मेट्रो रेल्वे प्रकल्प उद्घाटन कार्यक्रमानंतर भारतीय हवाई दलाच्या विमानाने लोहगाव विमानतळावरून रात्री ८. ५० वाजता दिल्लीकडे प्रयाण झाले.
श्री. मोदी यांना निरोप देण्यासाठी राज्यपाल सी. विद्यासागर राव आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. तसेच केंद्रीय नगरविकास व माहिती प्रसारण मंत्री व्यंकय्या नायडू, केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी, केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर, पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश बापट, आमदार जगदीश मुळीक, राज्याचे मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय, लष्कराचे ले. जनरल पी. एम. हरतीज, एअर कमांडर ए. के. भारती, विभागीय आयुक्त एस. चोक्कलिंगम, पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला, जिल्हाधिकारी सौरभ राव यांनीही श्री. मोदी यांना निरोप दिला.
00000

No comments:
Post a Comment