पुणे, दि. 16: जिल्हा परिषद, पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूकीसाठी मंगळवार, दिनांक 21 फेब्रुवारी,2017 रोजी मतदान होणार आहे.
या दिवशी कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी तसेच मतदानावर परिणाम होऊ नये यासाठी मंगळवार दि.21 फेब्रुवारी रोजी जिल्ह्यातील सर्व ठिकाणी भरणाऱ्या आठवडी बाजार बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी सौरभ राव यांनी दिले आहेत.
जिल्ह्यातील मावळ,
बारामती, शिरुर, खेड, मुळशी, भोर या तालुक्यामधील गावांमध्ये मंगळवार दिनांक 21 फेब्रुवारी रोजी आठवडी बाजार भरणार होता. या सर्वांना आठवडी बाजार बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी सौरभ राव यांनी दिले आहेत. या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्ती मुंबई मार्केट अँड फेअर ॲक्ट 1862 चे कलम मधील तरतूदी 7 अन्वये दंड व शिक्षेस पात्र ठरतील असेही आदेशात नमूद केले आहे.
000000
No comments:
Post a Comment