Tuesday, March 21, 2017

तलाठी कार्यशाळा संपन्न

पुणे, दि.21 जिल्ह्यातील महसूल प्रशासनातील कर्मचारी यांना अधिकाधिक संगणकीय ज्ञान देणे,महसूल प्रशासनाला संगणीकृतकरणे,ई-प्रशासन जागृती या उद्देशाने जिल्हाधिकारी कार्यालय पुणे मार्फत जिल्ह्यातील सर्व महसूल कर्मचारी यांच्यासाठी तलाठी कार्यशाळाआयोजित करण्यात आली होती.
अल्प बचत भवन सभागृह येथे  ही कार्यशाळा संपन्न झाली. या कार्यशाळेत 7/12 चा अद्यावत फॉरमॅट सुलभ पद्धतीने नागरिकांना कसाउपलब्ध होईल. ई-फेरफार पूर्वतयारी,नवीन आज्ञावली संदर्भात ट्रेनिंग, ऑनलाईन कागदपत्रे काढण्यावर भर, सायबर सेलचे नियम ,आय टी ऍक्ट,जमीन महसूल कायद्यातील सुधारणा या बाबींवर प्रकाश टाकण्यात आला.
कर्मचाऱ्यांनी अपडेट राहणे  गरजेचे  आहे  कारण  नवीन  तंत्रज्ञान  आत्मसात  केले तरच  आपण  गुणवत्तापूर्ण  सेवा  देऊ  शकतो  असे  प्रतिपादन  कुळकायदा  शाखा  कोल्हापूरचे उपजिल्हाधिकारी रामदास  जगताप  यांनी  उपस्थितांना  मार्गदर्शन  करताना केले.
याकार्यशाळेचे उद्घाटन अतिरिक्त जिल्हाधिकारी रमेश काळे यांच्या हस्ते झाले. कुळ कायदा शाखेच्या उपजिल्हाधिकारी मोनिका सिंग,जिल्ह्यातील सर्व प्रांताधिकारी,तहसीलदार, नायब तहसीलदार,मंडळ अधिकारी,तलाठी तसेच महसूल विभागातील सर्व कर्मचारीवृंद मोठ्यासंख्येने उपस्थित होते.

0000

No comments:

Post a Comment