Tuesday, October 3, 2017

जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेची बैठक संपन्न


            पुणे, दि. 3 :  जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेची बैठक जिल्हा पुरवठा अधिकारी दिनेश भालेदार यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालय येथे संपन्न झाली.
या बैठकीस अशासकीय सदस्य अरुण वाघमारे, श्रीमती विद्या म्हात्रे, तुषार झेंडे, प्रमोद जाधव,रमेश फोंडगे, अशोक अग्रवाल, सर्जेराव जाधव, बाळासाहेब औटीआदि उपस्थित होते. या बैठकीत अशासकीय सदस्यांनी ग्राहकांच्या वतीने त्यांच्या समस्या  मांडल्या. संबंधित विभागांनी त्यावर तात्काळ कार्यवाही करावी असे आदेश श्री.भालेदार यांनी संबंधित अधिका ऱ्यांना दिले.  
            बैठकीला संबंधित विभागांचे अधिकारी , प्रतिनिधी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment