सोलापूर, दि. 1- वालचंद महाविद्यालयाच्या दोन वस्तीगृहात आणि जुळे सोलापूर येथील म्हाडाच्या इमारतीत तसेच कंबर तलवा शेजारील केटरिंग कॉलेजच्या इमारतीत क्वारंटाइन सेंटर सुरू करण्यात येणार आहे. या तिन्ही ठिकाणी जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर आणि महापालिका आयुक्त पी. शिवशंकर यांनी भेट देऊन पाहणी केली.
वालचंद महाविद्यालयाच्या वसतिगृहातील दोन इमारती जिल्हा प्रशासनाने अधिग्रहीत केल्या आहेत. येथे 330 लोकांची व्यवस्था होऊ शकते. येथे लोकांना राहण्यासाठी सर्व आवश्यक व्यवस्था करण्यात आली आहे. येथे महापालिकेमार्फत साफसफाई व्यवस्था करण्यात येते आहे. म्हाडाची जुळे सोलापूर येथील 70 प्लॅटची इमारतही क्वारंटाइन सेंटरसाठी घेण्यात आली आहे. एका फ्लॅटमध्ये पाच संशयितांना ठेवले जाऊ शकते, असे अधीक्षक अभियंता संतोष शेलार यांनी सांगितले.
श्री शंभरकर आणि श्री शिवशंकर यांनी या तिन्ही इमारतींची पाहणी केली. सुरक्षितता आणि स्वच्छतेच्या अनुषंगाने आवश्यक कामकाज करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. यावेळी उपविभागीय अधिकारी हेमंत निकम, कार्यकारी अभियंता संभाजी धोत्रे, महेश क्षीरसागर आदी उपस्थित होते.
No comments:
Post a Comment