Saturday, June 6, 2020

पुणे विभागात अन्नधान्य व भाजीपाल्याचा पुरेसा पुरवठा -विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर


        पुणे, दि. 06 :- सध्याच्या लॉकडाऊन काळात पुणे विभागात अन्नधान्य व भाजीपाल्याचा पुरेसा पुरवठा झाला आहे. विभागात अंदाजे 26 हजार 477 क्विंटल अन्नधान्याची तर 19 हजार 402 क्विंटल भाजीपाल्याची आवक मार्केटमध्ये झाली आहे. विभागात 3 हजार 330 क्विंटल फळांची आवक तसेच कांदा-बटाटयाची आवक 14 हजार 802 क्विंटल इतकी झाली आहे.  पुणे विभागात 5 जून 2020 रोजी  94.33 लाख लिटर दुधाचे संकलन झाले असून 24.01 लाख लिटर दुधाचे पॅकेजिंग स्वरुपात वितरण झाले आहे. उर्वरीत दुध सुट्टया स्वरुपात वितरित करण्यात आले आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी दिली.
             
( टिप :- सदरची आकडेवारी दुपारी 12 वा.पर्यंतची आहे. )
                                      0  0   0    0

No comments:

Post a Comment