Pages

Saturday, June 20, 2020

दापोडी येथील वाहतुकीमध्ये तात्पुरता बदल



पुणे दि.20 : - पिंपरी-चिंचवड  शहर, वाहतुक शाखे अंतर्गत दापोडी येथील रेल्वे फाटकाचे खडी,स्लिपरस, रेल्वे रुळ दुरुस्तीचे काम सुरु होणार असल्याने दापोडी रेल्वे गेट येथे  21 जून रोजी 7.00 वा. ते 20.00 वा. या दरम्यानच्या कालावधीमध्ये वाहतुकीमध्ये तात्पुरता बदल करण्यात आला आहे.
याबदलानुसार कासारवाडी रेल्वे फाटक कडे न जाता सरळ पुणे-मुंबई रोडने फुगेवाडी चौक डावीकडे वळुन इच्छित स्थळी जातील. तसेच फुगेवाडी चौकातुन इच्छित स्थळी जातील.
या तात्पुरत्या वाहतुक बदलाबाबत सेंट्रल रेल्वेचे कर्मचारी व वाहतुक कर्मचारी यांना सहकार्य करण्याचे आवाहन पिंपरी-चिंचवड शहर वाहतुक ,शाखेचे पोलीस उप आयुक्त सुधीर हिरेमठ यांनी केले आहे.
0 0 0 0

No comments:

Post a Comment