Monday, June 1, 2020

मृत्युदर कमी करण्यासाठी डॉक्टरांनी प्रयत्न करावेत- जिल्हाधिकारी नवल किशोर राम


कोविड-१९ विरुद्ध च्या युद्धात डॉक्टर, परीचारिकांची भूमिका महत्वपूर्ण असून मृत्यूदर कमी करण्यासाठी डॉक्टरांनी प्रयत्न करावेत, असे आवाहन जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी केले.

 खाजगी रुग्णालयांनी प्रशासनाशी समन्वय ठेवून एकत्रित काम करावे व पुणे जिल्हा कोरोनामुक्त करुया, असेही त्यांनी सांगितले.

कोरोना संसर्गाचा मुकाबला करण्यासाठी सरकारी आणि खाजगी रुग्णालये मिळून काम करणे आवश्यक आहे, असे सांगून ते म्हणाले, डॉक्टरांनी कोरोना रुग्णांवर उपचार करताना काही बदल करणे आवश्यक असल्याचे कळविल्यास प्रशासन निश्चितच सकारात्मक असेल. 

रुग्णालयांनी बेड व्यवस्थापन व्यवस्थित हाताळावे, जेणेकरून अडचण निर्माण न होता प्रत्येक गरजू रुग्णाला तातडीने उपचार देणे सुलभ होईल, असेही जिल्हाधिकारी श्री. राम म्हणाले.

यावेळी पुण्यातील खाजगी रुग्णालय व्यवस्थापाचे प्रमुख, डॉक्टर तसेच कोरोना प्रतिबंधासाठी कार्यरत अधिकारी उपस्थित होते.

बैठकीत खाजगी रुग्णालय प्रमुख व वैद्यकीय अधिकारी यांनी सूचना केल्या, व रुग्णालयातील सेवा-सुविधा व साधनसामग्रीची माहिती दिली.
00000000

No comments:

Post a Comment