Friday, January 6, 2017

डीजी धन मेळाव्यात समाजातील सर्व घटकांना सहभागी करून घेण्यासाठी विशेष प्रयत्न करा -जिल्हाधिकारी सौरभ राव यांची सूचना


Ø  एस.पी. कॉलेजच्या प्रांगणात शनिवारी सकाळी ११ पासून मेळाव्याला सुरुवात
Ø  केंद्रिय मंत्री स्मृती ईराणी, सुभाष भांमरे यांची विशेष उपस्थिती
Ø  कॉलेज विद्यार्थ्यांसह शेतकरी, कामगार, गृहिणी, दुकानदारांचा सहभाग

पुणे दि. 5 : रोखरहित महाराष्ट्राच्या दिशेने यशस्वी वाटचाल करुन डिजीटल अर्थप्रणालीला चालना देण्यासाठी शनिवारी येथील एसपी कॉलेजवर आयोजित करण्यात आलेल्या डीजी धन मेळाव्याला २० हजारहून अधिक लोक भेट देणार आहेत. या मेळाव्यात समाजातील सर्व घटकांना सहभागी करुन घेण्यासाठी विशेष प्रयत्न करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी सौरभ राव यांनी आज केल्या.
शनिवार दि. ७ जानेवारी २०१७ रोजी येथील एस. पी. कॉलेजच्या प्रांगणात आयोजित डीजी धन मेळाव्याच्या तयारीचा सर्व विभागांचा आढावा जिल्हाधिकारी सौरभ राव यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात घेतला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्याधिकारी दौलत देसाई, निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र मुठे यांच्यासह सर्व विभागांचे विभाग प्रमुख उपस्थित होते.
जिल्हाधिकारी सौरभ राव म्हणाले, डिजी धन मेळावा हा केंद्र सरकार, राज्य सरकार आणि सर्व बँका यांचा संयुक्त कार्यक्रम आहे. हा अत्यंत महत्वाचा कार्यक्रम असून या मेळाव्याच्या माध्यमातून समाजातील सर्व सामान्य लोकांपर्यंत डिजीटल अर्थप्रणालीची माहिती पोहोचणार आहे. या मेळाव्याचे उद्घाटन पालकमंत्री गिरीश बापट यांच्या हस्ते एसपी कॉलेजच्या प्रांगणात सकाळी ११ वाजता होणार आहे. तर दुपारच्या सत्रात एस. पी. कॉलेजच्या लेडी रमाबाई सभागृहात लकी ड्रॉ केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री स्मृती ईराणी, केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री सुभाष भामरे यांच्या उपस्थितीत होणार आहे. यावेळी पालकमंत्री गिरीश बापट, समाजकल्याण राज्यमंत्री दिलीप कांबळे, जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे यांची प्रमुख उपस्थिती राहील. या कार्यक्रमाला जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी, शासकीय अधिकारी, कर्मचारी व हजारो नागरिकांची उपस्थिती राहणार आहे. या मेळाव्यात ६० स्टॉल सहभागी होणार आहेतयावेळी जिल्ह्यातील १० ग्रामपंचायती व १० नगरपालिकांना डिजीटल म्हणून घोषित करण्यात येणार आहे. तसेच लकी ग्राहक योजनेअंतर्गत लकी ड्रॉ काढण्यात येणार आहे.
या मेळाव्यात इलेक्ट्रॉनिक, हस्तकला, कपडे, खाद्यपदार्थ आदी  विविध वस्तूंच्या तसेच बचत गटांचे व  विविध बँका, आपले सरकार सेवा केंद्र, आधार केंद्र यांच्या सेवांचा समावेश असलेल्या 60 स्टॉलची उभारणी करण्यात येत आहे. या ठिकाणी सर्व व्यवहार हे डिजिटल स्वरुपात करण्यात येणार आहेत. यासाठी रुपे कार्ड, डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, आधार आधारित पेमेंट, यूपीआय, यूएसएसडी आदी मार्गांचा वापर करण्यात येणार आहे. यावेळी बँकांचे नवीन खाते उघडणे, बँक खात्याशी मोबाईल क्रमांक जोडणे, आधार नोंदणीतील दुरुस्ती व अद्यावतीकरण, बँक खात्याशी आधार क्रमांक जोडणी आदी विविध सेवाही देण्यात येणार आहेत.
या मेळाव्याला शासनाच्या सर्व विभागाच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांनी भेट देण्याच्या सूचना जिल्हाधिकारी श्री. राव यांनी केल्या. हा मेळावा अधिक व्यापक होण्यासाठी विशेष प्रयत्न करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी श्री. राव यांनी केल्या. यावेळी विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
******

मेळाव्याची वैशिष्ठ्ये-
Ø   मेळाव्याला २० हजारहून अधिक लोक भेट देणार. 
Ø  मेळाव्यातील एकूण ६० पैकी २९ स्टॉल विविध बँकांसाठी.
Ø  मेळाव्यात डिजीटल अर्थप्रणालीसंबंधी चे विविध मोबाईल ॲप डाऊन लोड करुन मिळाणार.
Ø  मेळावा परिसरात बीएसएनएल व रिलायन्स जीओची उच्च क्षमतेची वायफाय सेवा.
Ø  कृषी विभागाशी संबंधित महाबीज, आरसीएफ, फार्मर्स प्रोड्यूसर कंपनीसह विविध स्टॉलचा सहभाग.
Ø  मेळाव्यात संपुर्ण कॅशलेस व्यवहार होणार.
Ø  शहराच्या मध्यवर्ती एसपी कॉलेजमध्ये मेळावा, पार्कींगसाठी ४ एकर प्रशस्त जागा.
Ø  खादी ग्रामोदद्योग, नेसकॉम, कात्रज डेअरी, जिल्हा ग्रामीण यंत्रणेचे स्टॉल.
Ø  ग्राहकपेठसह आरटीओ, पुणे महानगरपालिकेचे स्टॉल.
Ø  डिजीटल व्यवहारासंबंधी विशेष मार्गदर्शन.
Ø  जिल्ह्यातील १० ग्रामपंचायती, १० नगरपालिकांना डिजीटल घोषित करणार.
Ø  मेळाव्यात लकी ग्राहक योजनेअंतर्गत लकी ड्रॉ काढण्यात येणार.
Ø  संपर्कासाठी फेसबुक fb.me/Collectorofficepune व ट्विटर http:twitter.com/CollectorPune लिंक.
******




Thursday, January 5, 2017

आदिवासी आश्रमशाळातील गैरप्रकार खपवून घेतले जाणार नाहीत - विष्णू सावरा




            पुणेदि4 (वि.मा.का.) : आदिवासी विकास विभागाच्या शासकीय तसेच अनुदानित आश्रमशाळा, निवडलेल्या नामांकित शाळा, एकलव्य शाळांमध्ये काही गैरप्रकार होत असल्यास त्याची तात्काळ फेरतपासणी करुन संबंधितांवर निलंबनासारख्या कठोर कारवाई करण्यासह शाळांची संलग्नताही रद्द करण्यात येईल, असा इशारा आदिवासी विकास मंत्री विष्णू  सावरा यांनी आज येथे दिला.
            आदिवासी विकास विभागाच्या अधिकाऱ्यांची एकदिवसीय आढावा बैठक श्री. सावरा यांच्या अध्यक्षतेखाली आज यशदाच्या सभागृहामध्ये आयोजित करण्यात आली होती. त्याप्रसंगी ते बोलत होते. आदिवासी विकास विभागाचे सचिव राजगोपाल देवरा, आयुक्त राजीव जाधव, उपसचिव स. ना. शिंदे यांच्यासह नाशिक, नागपूर, ठाणे आणि अमरावतीचे अपर आदिवासी आयुक्त, नव्याने रुजू झालेले प्रकल्प अधिकारी, सहायक आदिवासी आयुक्त या बैठकीस उपस्थ‍ित होते.
            बुटीबोरी तसेच बुलढाणा येथे झालेले आश्रमशाळेच्या विद्यार्थीनींशी गैरवर्तनाचे व छळाचे प्रकार पाहता आदिवासी विकास विभागातील सर्वच घटकांनी संवेदनशिलरित्या तात्काळ प्रतिसाद पद्धतीने काम करण्याची गरज आहे, असे सांगून आदिवासी विकास मंत्री सावरा म्हणाले की, शासनकडून आदिवासी विद्यार्थ्यांच्या कल्याणाच्या दृष्टीने चांगले निर्णय घेण्यात येत आहेत. मात्र, या निर्णयांची काटेकोर अंमलबजावणी होईल याकडे कटाक्षाने लक्ष दिले पाहिजे. डॉ. सुभाष साळुंके समितीच्या शिफारसींची अंमलबजावणी करण्यात यावी. शाळांना जास्तीत जास्त सेवा सुविधा पुरविण्याकडे लक्ष देतानाच तेथे योग्य पद्धतीने व्यवस्थापन होते किंवा नाही याकडेही लक्ष द्यावे. टप्प्या- टप्प्याने सर्वच आश्रमशाळांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात यावेत, जेणेकरुन गैरप्रकारांवर अंकुश येईल, असेही ते म्हणाले.
            या बैठकीत नाशिक, नागपूर, ठाणे आणि अमरावती येथील अपर आयुक्त आदिवासी विकास विभाग यांच्यासह प्रकल्पनिहाय प्रकल्प अधिकाऱ्यांकडील कामकाजाचा आढावा घेण्यात आला. यात शासकीय तसेच अनुदानित आश्रमशाळा, निवडलेल्या नामांकित, एकलव्य शाळांमधील त्रुटी व त्यांची पूर्तता या अनुषंगाने करावयाच्या कार्यवाहीच्या सूचना मंत्री श्री. सावरा, सचिव श्री. देवरा आणि आयुक्त श्री. जाधव यांनी दिल्या. आश्रमशाळांमधील मुलींच्या त्यांच्याशी गैरवर्तणूक होत असल्याच्या तक्रारी असतात. हे लक्षात घेता महिला समिती स्थापन करण्यात आली असून या समितीकडून तपासणी केली जात आहे. यापुढेही नियमितपणे समितीकडून मुलींच्या आश्रमशाळांची तपासणी करण्यात याव्यात अशा सूचना त्यांनी दिल्या.
            आदिवासी विकास विभागातील रिक्त पदभरतीसाठी अपर आयुक्त स्तर ते प्रकल्प अधिकारी स्तरावर अधिकारांचे प्रत्यायोजन करण्याबाबत विचार करण्यात येईल. विभाग तसेच प्रकल्पांतर्गत अतिरिक्त पदांच्या समायोजनासाठी प्रस्ताव तयार करुन कार्योत्तर मंजुरी घ्यावी. बहुउपयोगी (मल्टीपर्पज) काम करणाऱ्या पदांचा संवर्ग एकत्रित करावा. आश्रमशाळांच्या इमारती, भौतिक सेवा सुविधांचा आढावा तात्काळ घेऊन जेथे खासगी असतील तेथे शासकीय इमारती बांधण्याची अंदाजपत्रके, प्रस्ताव तयार करावेत, आदी सूचनाही मंत्री श्री. सावरा, सचिव श्री. देवरा आणि आयुक्त श्री. जाधव यांनी यावेळी दिल्या.
00000

Wednesday, January 4, 2017

येत्या काळात पुणे शहर ' स्टार्टअप ' चे कॅपीटल म्हणून ओळखले जाणार - मुख्यमंत्री





       पुणे दि4 : शिक्षण व सांस्कृतिक शहर म्हणून पुणे हे सर्वत्र ओळखले जात असले तरी येत्या काळात देशाचे 'स्टार्टअप' चे कॅपीटल म्हणून पुणे शहर ओळखले जाईल. आजच शासनाने पुणे विकास आराखड्याला मंजुरी दिली असून पुरंदर येथील नियोजीत छत्रपती संभाजीराजे आंतरराष्ट्रीय  विमानतळाचा प्रश्नही मार्गी लावलेला आहे. त्यामुळे येथे मोठ्या प्रमाणावर रोजगाराच्या संधी निर्माण होणार आहेत.  छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने असलेले हे उद्यान सर्वांना प्रेरणा देत राहील, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
            वडगाव शेरी वार्ड क्र. 3 येथील छत्रपती शिवाजी महाराज उद्यानाचे लोकार्पण, जर्मन तंत्रज्ञानाने सुसज्य संगित कारंजे व मिनी ट्रेन चे उद्घाटन आज मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झाले, त्यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमाला पालकमंत्री गिरीश बापट , राज्यमंत्री दिलीप कांबळे, खा.अनिल शिरोळे, खा.संजय काकडे, आमदार जगदीश मुळीक,नगरसेवक योगेश मुळीक आदी उपस्थित होते.
            कार्यक्रमस्थळी आगमन होताच मुख्यमंत्री मिनी ट्रेनमध्ये बसून व्यासपीठावर विराजमान झाले. तत्पूर्वी त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुढे म्हणाले, या उद्यानात बसविण्यात आलेले संगित कारंजे जर्मन तंत्रज्ञानाने बनविलेले आहेत. भव्य अशा या उद्यानात मुलांना खेळता येईल. तर ज्येष्ठांना आनंद घेता येईल. शहरांमध्ये उद्याने विकसित केली पाहिजेत. जेणे करुन नागरिकांना आल्हाददायी जीवन जगता येईल, अशी अपेक्षा व्यक्त करुन ते पुढे म्हणाले, पुणे शहराला ऐतिहासिक परंपरा आहे. पुण्याचे वैभव आपण जपले पाहिजे. वाढती लोकसंख्या पाहता त्यानुसार सोयी सुविधा उपलब्ध करुन देणे आवश्यक असल्याचे ते म्हणाले.
            पुणे शहर हे 'आयटी ' हब  म्हणून ओळखले जात आहे. या ठिकाणी उद्योजक मोठ्या प्रमाणात येत आहेत. परदेशी उद्योजकांच्या दृष्टीने हे ठिकाण नेहमीच पसंतीचे राहिले आहे. त्यामुळे येत्या काळात देशाचे स्टार्टअप कॅपीटल म्हणून पुणे शहर ओळखले जाईल, असे सांगून ते म्हणाले, आंतरराष्ट्रीय विमानतळाला मंजुरी देण्यात आली आहे. त्यामुळे तरुणांना रोजगार मिळेल. राज्यस्तरीय छानणी समितीचा अहवाल स्वीकारुन पुण्याच्या विकास आराखड्याला शासनाने मान्यता दिली आहे. त्यामुळे पुण्यातील पेठांचा विकास होईल. परिणामी सामान्य माणसांना दिलासा मिळेल, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. नवीन तंत्रज्ञानाचा वापर करण्याच्या अनुषंगाने मुख्यमंत्री पुढे म्हणाले, आपण कॅशलेस व्यवहाराकडे वाटचाल करीत आहोत. पंतप्रधानांनी कॅशलेस व्यवहारासाठी नुकतेच 'भीमॲप लाँच केले आहे. नागरिकांनी या ॲपचा वापर कॅशलेस व्यवहारासाठी करावा, असे आवाहन त्यांनी यावेळी केले. नोटबंदी मुळे बँकामध्ये मोठ्या प्रमाणात पैसा जमा झाला आहे. त्यामुळे निश्चितच रोजगार वाढेल, असे त्यांनी यावेळी सांगितले.
            पुणे हे सांस्कृतिक राजधानी आहे. येथील लोक सुसंस्कृत आहे. गुण्यागोविंदाने राहणारे आहेत. त्यामुळे कुठल्याही प्रकरणावरुन गालबोट लागू नये याची दक्षता सर्वांनी घेणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.
            यावेळी पालकमंत्री गिरीश बापट म्हणाले की, मेट्रोमुळे नागरिकांचा वाहतुकीचा प्रश्न सुटण्यास मदत होणार आहे. आमदार जगदीश मुळीक यांनी येणाऱ्या काळात विविध विकास कामे पूर्ण करण्यात येणार आहेत असे सांगितले.
            या कार्यक्रमाला वडगाव शेरी परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

*********

पुणे शहराचा सर्वांगीण विकास करणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस









·         क्रीडा महर्षी बाबुलाल झंवर क्रीडा संकुलाचे उद्घाटन
·         सुरेश अंबादास गुजराथी व्यायाम शाळेचे उद्घाटन
·         क्रीडाप्रेमींची झाली सोय
पुणे, दि. 4 : पुणे शहरात अनेक चांगल्या गोष्टी असून विविध प्रकल्पाच्या माध्यमातून पुणे शहराचा सर्वांगीण विकास करणार असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज केले.
            बिबवेवाडी ओटा येथील प्रभाग क्रमांक 71 मधील क्रीडा महर्षी बाबुलाल प्रेमलाल झंवर क्रीडा संकुल व सुरेश अंबादास गुजराथी व्यायामशाळेचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले. यावेळी श्री. फडणवीस बोलत होते. यावेळी पालकमंत्री गिरीश बापट, खासदार अनिल शिरोळे, खासदार संजय काकडे, आमदार माधुरी मिसाळ, नगरसेविका मानसी देशपांडे, नगरसेवक सुनिल कांबळे उपस्थित होते.
            मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, स्मार्ट सिटी, पुणे मेट्रोसह विविध प्रकल्पाच्या माध्यमातून पुणे शहराचा सर्वांगीण विकास करण्यासाठी सरकार प्रयत्नीशल आहे. येत्या काळात पुणे शहरात अनेक चांगले प्रकल्प आणून पुणे शहराचा चेहरामोहरा बदलण्याचा आमचा संकल्प आहे. या ठिकाणी उभारण्यात आलेल्या क्रीडा संकुलाच्या माध्यमातून या परिसरातील क्रीडा प्रेमींची चांगली सोय झाली आहे. या सुविधेचा क्रीडा प्रेमी नागरीकांनी लाभ घ्यावा. या ठिकाणी काम करत असलेल्या नगरसेवकांचे काम चांगले आहे. या नगरसेवकांच्या माध्यमातून यापुढेही या परिसराचा विकास होत राहील, असा विश्वास श्री. फडणवीस यांनी व्यक्त केला.
            या कार्यक्रमाला परिसरातील क्रीडा प्रेमी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
                                                                               ****-- 

श्रीलक्ष्मी – नृसिंह देवस्थानचा तीन वर्षात सर्वांगीण विकास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस : विकास कामांचे भूमिपूजन







   
पुणे दि04:-  नीरा नरसिंहपूर येथील श्री लक्ष्मी नृसिंह देवस्थानचा येत्या तीन वर्षात सर्वांगीणविकास करणारअसे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नीरा नरसिंहपुर (ताइंदापुरयेथे सांगितले.
श्री लक्ष्मी नृसिंह देवस्थानच्या विकासासाठी 260 कोटी रुपयांचा विकास आराखडा तयार करण्यात आलाआहेया आराखड्यातील 22 कोटी रुपयांच्या विकास कामांचे आज नीरा -नरसिंहपूर (ताइंदापुरयेथेमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते भूमिपूजन झाले त्यावेळी बोलत होते.
  यावेळी आमदार दत्तात्रय भरणेपंचायत समिती सभापती विलास वाघमोडेमाजी मंत्री हर्षवर्धन पाटील,जिल्हाधिकारी सौरभ राव,  मुख्य अभियंता प्रमोद किडेअधीक्षक अभियंता राजेंद्र राहणे आदी उपस्थित होते.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणालेश्री लक्ष्मी नृसिंह देवस्थान प्राचीन आहेयेथे देशभरातून भाविक येतातयाभाविकांना चांगल्या सुविधा व्हाव्यात यासाठी देवस्थानचा नियोजनबध्द विकास करण्यात येत आहेदेवस्थानच्याविकासाबरोबरच परिसराचाही विकास होईलत्याद्वारे स्थानिक पातळीवर रोजगार उपलब्ध होतील याचा स्थानिकयुवकांना लाभ होईल.
जिल्हाधिकारी सौरभ राव यांनी 260 कोटी रुपयांच्या विकास आराखड्याबाबत माहिती दिलीसध्यासार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून 22 कोटी आणि पुरातत्व विभागाच्या माध्यमातून साडेचारी कोटीरुपयांची विकासकामे केली जात असल्याचे सांगितले.
यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पर्यटक निवासभक्त निवासबहुउद्देशीय सभागृहाच्याकामांचे भूमीपूजन झाले त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंदिरात जाऊन दर्शन घेतले.
                                             0000
           


स्वामी विवेकानंद पुतळ्यावरील मेघडंबरीच्या हस्ते मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन