पुणे दि. 04:- नीरा नरसिंहपूर येथील श्री लक्ष्मी नृसिंह देवस्थानचा येत्या तीन वर्षात सर्वांगीणविकास करणार, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नीरा नरसिंहपुर (ता. इंदापुर) येथे सांगितले.
श्री लक्ष्मी नृसिंह देवस्थानच्या विकासासाठी 260 कोटी रुपयांचा विकास आराखडा तयार करण्यात आलाआहे. या आराखड्यातील 22 कोटी रुपयांच्या विकास कामांचे आज नीरा -नरसिंहपूर (ता. इंदापुर) येथेमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते भूमिपूजन झाले त्यावेळी बोलत होते.
यावेळी आमदार दत्तात्रय भरणे, पंचायत समिती सभापती विलास वाघमोडे, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील,जिल्हाधिकारी सौरभ राव, मुख्य अभियंता प्रमोद किडे, अधीक्षक अभियंता राजेंद्र राहणे आदी उपस्थित होते.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, श्री लक्ष्मी नृसिंह देवस्थान प्राचीन आहे. येथे देशभरातून भाविक येतात. याभाविकांना चांगल्या सुविधा व्हाव्यात यासाठी देवस्थानचा नियोजनबध्द विकास करण्यात येत आहे. देवस्थानच्याविकासाबरोबरच परिसराचाही विकास होईल. त्याद्वारे स्थानिक पातळीवर रोजगार उपलब्ध होतील याचा स्थानिकयुवकांना लाभ होईल.
जिल्हाधिकारी सौरभ राव यांनी 260 कोटी रुपयांच्या विकास आराखड्याबाबत माहिती दिली. सध्यासार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून 22 कोटी आणि पुरातत्व विभागाच्या माध्यमातून साडेचारी कोटीरुपयांची विकासकामे केली जात असल्याचे सांगितले.
यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पर्यटक निवास, भक्त निवास, बहुउद्देशीय सभागृहाच्याकामांचे भूमीपूजन झाले त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंदिरात जाऊन दर्शन घेतले.
0000

No comments:
Post a Comment