Thursday, January 19, 2017

पुणे ग्रामीण जिल्ह्यासाठी प्रतिबंधात्मक आदेश जारी


            पुणे, दि. 19 :  पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक,मो.सुवेज हक  यांनी पुणे ग्रामीण कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी दिनांक 26जानेवारी, 2017 रोजी रात्रौ  12  वाजेपर्यंत  मुंबई पोलीस अधिनियम 1951 च्या कलम 36 अन्वये प्रतिबंधात्मक आदेश जारी  केला आहे.
          यानुसार रस्त्यावरुन जाणाऱ्या अगर मिरवणूक व्यक्तींचे वागणे अगर बिभत्स व अश्लिल हावभाव किंवा वर्तन अगर कृत्याबाबत आदेश देणे .  ज्या मार्गाने मिरवणूक किंवा जमाव जाईल अगर जाणार नाही ती वेळ व मार्ग निश्तीत करणे.  सार्वजनिक ठिकाणी अगर सार्वजनिक करमणूकीच्या कार्यक्रमाच्या वेळी वापरण्यांत येणाऱ्या लाऊड स्पिकरची वेळ, पध्दती, ध्वनी ‍ तिव्रता आवाजाची दिशा यांचे नियत्रंण करणे. रस्त्यावर किंवा सार्वजनिक जागेत वाद्य वाजविणे, गाणी,  ताशे, ढोल किंवा इतर वाद्ये, हॉर्न वाजविणे किंवा कर्कश आवाज करणारे अन्य वाद्य वाजविण्यावर नियंत्रण ठेवणे. आदेशाचे उल्लघंन करणारी व्यक्ती कायद्यानुसार शिक्षेस पात्र राहील, असे आदेशात नमूद केले आहे.

No comments:

Post a Comment