Thursday, January 26, 2017

प्रजासत्ताक दिनाच्या सदुसष्टाव्या वर्धापनदिनानिमित्त जिल्हाधिकारी सौरभ राव यांच्या हस्ते शनिवारवाडा येथे ध्वजारोहण


पुणे, दि. 26: प्रजासत्ताक दिनाच्या सदुसष्टाव्या वर्धापन दिनानिमित्त जिल्हाधिकारी सौरभ राव यांच्याहस्ते शहरातील ऐतिहासिक शनिवारवाडा येथे आज उत्साहपूर्ण वातावरणात ध्वजारोहण झाले. यावेळी  जिल्हाधिकारी सौरभ राव यांनी राष्ट्रगीताचे पठण करत राष्ट्रध्वजाला उपस्थितांसमवेत सलामी दिली. तसेच उपस्थित सर्व नागरिकांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
या कार्यक्रमास अपर जिल्हाधिकारी रमेश काळे, निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र मुठे, हवेलीच्या उपविभागीयअधिकारी ज्योती कदम, शहर व ग्रामीण पोलीस दलातील अधिकारी, कर्मचारी, होमगार्ड तसेच जिल्हा प्रशासन,  माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे अधिकारी,कर्मचारीनागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मध्यवर्ती इमारत येथे ध्वजारोहण
                मध्यवर्ती इमारतीच्या परिसरात कृषि आयुक्त विकास देशमुख यांच्याहस्ते प्रजासत्ताक दिनानिमित्तउत्साहपूर्ण वातावरणात ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी विविध विभागातील अधिकारी, कर्मचारी मोठया संख्येने उपस्थित होते.
000


No comments:

Post a Comment