Wednesday, October 4, 2017

जिल्ह्यातील ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणूकी दरम्यान परवाना धारक शस्त्र बाळगण्यास मनाई आदेश



पुणे, दि. 4 : जिल्ह्यातील ग्रामपंचायतीची सार्वत्रिक निवडणूक शांततेत व सुरळीतपणे पार पडण्यासाठी  अपर जिल्हादंडाधिकारी राजेंद्र मुठे यांनी क्रिमिनल प्रोसिजर कोड 1973 चे कलम 144 व शस्त्र अधिनियम 1951 चे कलम 17 (3) (अे) व (बी) मधील प्राप्त अधिकारान्वये कोणत्याही व्यक्तीस पुणे ग्रामीण जिल्ह्यातील सार्वत्रिक व पोट निवडणूक असलेल्या ग्रामपंचायतीच्या कार्यक्षेत्रात सदर आदेशाच्या दिनांकापासून ते निवडणुकीचा निकाल जाहीर होईपर्यंत म्हणजेच 26/10/2017 अखेरपर्यंत स्वत: जवळ परवानाप्राप्त अग्नीशस्त्रे, हत्यारे, दारुगोळा बाळगण्यास व बरोबर नेण्यास मनाई केली आहे. या आदेशातून बंदोबस्तासाठी असणारे अधिकारी/कर्मचारी तसेच बँका व सार्वजनिक मालमत्तेच्या सुरक्षिततेसाठी नेमण्यात आलेल्या सुरक्षा कर्मचाऱ्यांना वगळण्यात आले आहे. बँका अथवा सार्वजनिक संस्था यांनी निवडणूक कालावधीमध्ये त्यांच्याकडील हत्यारांचा गैरवापर होणार नाही, याची दक्षता घेण्याची जबाबदारी संबंधित बँकेची, संस्थांची व अधिकाऱ्यांची राहील.
            हा आदेश 26/10/2017 रात्री 24 वाजेपर्यंत अंमलात राहील. आदेशाचे उल्लंघन करणारी व्यक्ती भारतीय दंड संहिता कलम 188 मधील तरतूदीनुसार कारवाईस पात्र राहील, असे आदेशात नमुद करण्यात आले आहे.

प्रधानमंत्री पीक वीमा योजना तपशील जाहिर



पुणे, दि. 4 : प्रधान मंत्री पीक वीमा योजनेअंतर्गत पुनर्रचित हवामान आधारीत पीक वीमा योजना सन 2017-18 आंबिया बहारामध्ये फळपिकांना लागु करण्यात आली आहे.
            या योजनेचा उदेश कमी/जास्त पाऊस, वेगाचा वारा, गारपीट व आर्द्रता या हवामान धोक्यापासुन निर्धारित केलेल्या कालावधीत शेतकऱ्यांना विमा संरक्षण आणि आर्थिक सहाय्य देणे असा आहे पुणे जिल्ह्यातील पेरु, द्राक्षे, डाळींब, केळी, आंबा, लिंबु, मोसंबी, संत्री या अधिसूचित फळपिकासाठी सदर योजना इफको टोकीयो जनरल इंन्श्योरन्स कंपनीमार्फत कार्यान्वित करण्यात येत आहे.
            या योजनेसाठी पुणे जिल्ह्याकरीता फळपिकनिहाय अधिसूचित तालुके पुढीलप्रमाणे आहेत. फळपिकनिहाय अधिसुचित महसुल मंडळामध्ये हि योजना राबविण्यात येणार असून त्याचा तपशिल पुढील प्रमाणे
अ.क्र
फळ पीक
तालुके
1
आंबा
दौंड, आंबेगाव, भोर, जुन्नर, मावळ, खेड, हवेली, शिरुर, वेल्हा, मुळशी, बारामती, इंदापुर
2
डाळिंब
दौंड, आंबेगाव, बारामती, जुन्नर, इंदापुर, सासवड, शिरुर, हवेली
3
द्राक्षे
दौंड, आंबेगाव, बारामती, जुन्नर, इंदापुर
4
केळी
दौंड, आंबेगाव, बारामती, जुन्नर, इंदापुर, खेड, हवेली, शिरुर
5
मोसंबी
इंदापुर
6
संत्रा
शिरुर
7
पेरु
बारामती, दौंड, हवेली, भारे, पुरंदर, शिरुर
8
लिंबु
शिरुर, बारामती, दौंड

कर्जदार/बिगर कर्जदार शेतकऱ्यांनी फळपिकांचा विमा प्रस्ताव बॅकांना सादर करण्याची अंतिम मुदत व प्रति हेक्टर विमा हप्ता पुढील प्रमाणे आहे.

अ.क्र
पीक
शेतकऱ्यांसाठी विमा हप्ता रुपये प्रति हेक्टर
अंतिम मुदत
1
पेरु
2500/-
31 ऑक्टोबर
2
द्राक्षे
14000/-
15 ऑक्टोबर
3
डाळींब
5500/-
31 ऑक्टोबर
4
केळी
6000/-
31 ऑक्टोबर
5
आंबा
5500/-
31 डिसेंबर
6
लिंबु
3000/-
14 नोव्हेंबर
7
मोसंबी
3500/-
31 ऑक्टोबर
8
संत्रा
3500/-
30 नोव्हेंबर


सदर योजना कर्जदार शेतकऱ्यांना अनिवार्य असून बिगर कर्जदार शेतकऱ्यांना ऐच्छिक आहे. या योजनेत हवामानातील बदलामुळे म्हणजेच अवेळी पाऊस, जास्त तापमान, कमी तापमान, यामुळे फुलधारणा व फळ धारणेच्या कालावधीत होणाऱ्या संभाव्य नुकसानीस विमा संरक्षण देय राहील, योजनेमध्ये शेतकऱ्यांनी विमासंरक्षीत रकमेच्या केवळ 5 टक्के विमा हप्ता भरावयाचे आहे. या योजनेत नुकसान भरपाई महसुल मंडळस्तरावरील स्वंयचलित हवामान केंद्राच्या आकडेवारीनुसार देण्यात येणार आहे, त्यामुळे मानवी हस्ताक्षेप राहणार नाही.
            अधिसुचित क्षेत्रातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या योजनेत सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी, पुणे यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे केले आहे. अधिक माहितीसाठी शेतकऱ्यांनी संबंधित तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा.

शिधापत्रिकाधारकांनी विविध योजनांचा लाभ घ्यावा

   
पुणे दि 3: अन्नधान्य  वितरण कार्यालय पुणे यांच्या अंतर्गत एकूण 11 परिमंडळ कार्यालय कार्यरत असून अकरा परिमंडळ अंतर्गत असलेल्या सर्व शासन मान्य रास्तभाव दुकानांमध्ये प्रत्येक महिन्याच्या 7 ते 15 तारखेला अन्नदिन, अन्नसप्ताह व सामाजिक अंकेक्षण साजरा करण्यात येतो. यादिवशी विशेष कार्यक्रमांचे आयोजन करून पदाधिकारी व मान्यवर शिधापत्रिकाधारकांना धान्य वितरित करतात.
सर्व शिधापत्रिकाधारकांनी याची नोंद घेऊन विविध योजनांचा लाभ घ्यावा असे आवाहन अन्नधान्य वितरण अधिकारी शहाजी  पवार यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.
         000000


बालगंधर्व रंगमंदिर येथे मुद्रा प्रोत्साहन अभियानाचे आयोजन कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत -राजेंद्र मुठे


            पुणेदि. 3: "मुद्रा प्रोत्साहन अभियानामध्ये" जिल्हयातील तरुणांचा सहभाग महत्वाचा असून  हे अभियान यशस्वीहोण्यासाठी सर्व विभागाच्या अधिकाऱ्यांनी प्रयत्न करावेत, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र मुठे यांनी आज येथे केले.
            कॅशलेस इंडिया या मोहिमे अंतर्गत "मुद्रा प्रोत्साहन अभियान" हा कार्यक्रम पुण्यात बालगंधर्व रंगमंदिर येथे 16 ऑक्टोबर 2017 रोजी आयोजित करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाच्या आयोजनाचा आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत मार्गदर्शन करताना श्री. मुठे बोलत होते.
             या बैठकीस जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दौलत देसाई, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक दिनेश डोके, जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक दिनकर देशमुख, प्रांताधिकारी भाऊसाहेब गलांडे, प्रांताधिकारी ज्योती कदम, जिल्हा पुरवठा अधिकारी दिनेश भालेदार, जिल्हा अन्नधान्य वितरण अधिकारी शहाजी पवार, जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक के.जी.डेकाटे, जिल्हा कौशल्य विकास रोजगार व स्वयंरोजगार विभागाच्या सहायक संचालक अनुपमा पवार आदि उपस्थित होते.
            श्री. मुठे म्हणाले, देशात कॅशलेस इंडिया मोहिम राबविण्यावर भर देण्यात येत आहे. विविध शासकीय योजना राबविताना अधिकारी व कर्मचाऱ्यांबरोबरच तरुणांनीही डिजीटल व्यवहाराला प्रोत्साहन द्यावे, यासाठी पुण्यातील "मुद्रा प्रोत्साहन अभियान" या कार्यक्रमातही कॅशलेस व्यवहारावर भर देण्यात येणार आहे. राज्यात केवळ मुंबई, नागपूर व पुणे अशा तीनच ठिकाणी हा कार्यक्रम घेण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.
            जिल्हा अग्रणी बँकेचे श्री. देशमुख म्हणाले, मुद्रा प्रोत्साहन अभियानात मुद्रा बँक योजनेची माहिती देण्याबरोबरच लाभार्थ्यांच्या यशकथांचा माहितीपटही दाखविण्याचे नियोजन करण्यात आले आहे. याठिकाणी विविध  बँकांचे, विविध शासकीय योजनांची माहिती देणारे स्टॉल्स, बचत गट वस्तू विक्री, आधार कार्ड बँक खात्याला लिंक करणे, खाद्य पदार्थ विक्री, विविध कंपन्यांचे स्टॉल्सही लावण्यात येणार असून याद्वारे डिजीटल पेमेंटचा प्रसार करण्यात येणार आहे, असेही ते म्हणाले या बैठकीला विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
0000

Tuesday, October 3, 2017

जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेची बैठक संपन्न


            पुणेदि3 :  जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेची बैठक जिल्हा पुरवठा अधिकारी दिनेश भालेदार यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालय येथे संपन्न झाली.
या बैठकीस अशासकीय सदस्य अरुण वाघमारेश्रीमती विद्या म्हात्रेतुषार झेंडेप्रमोद जाधव,रमेश फोंडगेअशोक अग्रवालसर्जेराव जाधवबाळासाहेब औटीआदि उपस्थित होतेया बैठकीत अशासकीय सदस्यांनी ग्राहकांच्या वतीने त्यांच्या समस्या  मांडल्यासंबंधित विभागांनी त्यावर तात्काळ कार्यवाही करावी असे आदेश श्री.भालेदार यांनी संबंधित अधिका ऱ्यांना दिले 
            बैठकीला संबंधित विभागांचे अधिकारी प्रतिनिधी उपस्थित होते.

पंढरपूरला करणार स्मार्ट तीर्थक्षेत्र कॅनडाचे कौन्सिल जनरल जॉर्डन रिव्हज् यांची ग्वाही




पंढरपूर दि. 3 :-  पंढरपूरचा विकास स्मार्ट तीर्थक्षेत्र म्हणून करुन अशी ग्वाही कॅनडाचे कौन्सिल जनरल जॉर्डन रिव्हज् यांनी आज येथे दिली.
            कॅनडाचे कॉन्सिल जनरल जॉर्डन रिव्हज् त्यांच्या सहकारी श्रीमती अँजेला शूवॉटर तारा  यांनी आज पंढरपुरातील विठ्ठल-रुक्मिणी मंदीर, चंद्रभागा नदीपात्र, मंदीर परिसराला भेट देऊन पाहणी केली.  त्यानंतर संत तुकाराम भवन येथे झालेलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर पालकमंत्री विजय देशमुख, नगराध्यक्षा साधना भोसले, आमदार भारत भालके, यशोमती ठाकूर, प्रशांत परिचारक, जिल्हा परिषद अध्यक्ष संजय शिंदे, जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले, मंदिर समितीचे अध्यक्ष अतुल भोसले आदी उपस्थित होते.
            कौन्सिल गव्हर्नर जॉर्डन रिव्हज म्हणाले, मी गेली दोन वर्षे भारतात आहे. पण पंढरपुरातील नागरिकांनी दिलेले प्रेम पाहून भारावून गेलो. येथे आल्यापासून लोक माझा सत्कार करत आहेत. मला भेटत आहेत. माझ्यासाठी हा अनुभव खूपच वेगळा आहे.
            पंढरपूर अतिशय महत्वाचे तीर्थक्षेत्र आहे. दरवर्षी मोठ्या संख्येने येणाऱ्या भाविकांना सोयी सुविधा मिळाव्यात यासाठी कॅनडा सरकार पंढरपुरला स्मार्ट तीर्थक्षेत्र करु इच्छित आहे. यासाठी येथील नागरिक, लोकप्रतिनिधी, भाविक आणि सर्व संबंधितांशी चर्चा केली जाईल. स्मार्ट तीर्थक्षेत्र करण्यासाठी योग्य नियोजन आणि त्याचा आराखडा निश्चित केला जाईल, असे श्री. रिव्हज यांनी सांगितले.
            पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांनी पंढरपूरच्या सर्वांगीण विकासासाठी कॅनडा सरकारने दाखवलेल्या सहकार्याबद्दल आभार व्यक्त केले. या शहराचा विकास होणे अतिशय गरजेचे आहे. यासाठी कॅनडा सरकारने उचललेले सकारात्मक पाउल अतिशय महत्वाचे आहे. विकासाच्या या पहिल्या पावलाचे रुपांतर विधायक आणि शाश्वत अशा कार्यात होईल्‍, असे त्यांनी सांगितले.
            यावेळी आमदार यशोधरा ठाकूर यांनी कौंडिण्यपूरचाही विकास करण्यासाठी कॅनडा सरकारने मदत द्यावी अशी मागणी केली. यावेळी आमदार भारत भालके, प्रशांत परिचारक, नगराध्यक्ष साधना भोसले, मंदिर समितीचे अध्यक्ष अतुल भोसले यांची भाषणे झाली.
            श्री. गहिनाथ महाराज औसेकर यांनी प्रास्ताविक केले. यावेळी एमडीसी कॉर्पोरेशनचे पुष्कर टापरे, पन्नीरसेल्वम् अरुमुगम,  प्रांताधिकारी विजय देशमुख, नगरपालिकेचे  मुख्याधिकारी अभिजित बापट यांच्यासह मान्यवर पदाधिकारी, वारकरी संप्रदायातील महाराज व नागरीक उपस्थित होते.
तत्पुर्वी श्री. रिव्हज्, श्रीमती तारा आणि त्यांच्या सर्व सहका-यांनी श्री विठ्ठल-रक्मिणी यांचे दर्शन घेतले त्यांनी मंदिराच्या परिसराची पाहणी केली. मंदीरा पासून चंद्रभागा नदी पात्रापर्यंत चालत जाऊन पाहणी केली.
00000





स्वच्छ भारत अभियानातून क्रांती घडेल --- पालकमंत्री गिरीश बापट




पुणे, दि. 29:  संपूर्ण देशभरात राबविण्यात येते असलेल्या स्वच्छ भारत अभियानातून  स्वच्छतेची क्रांती घडल्या शिवाय राहणार नाही. असा विश्वास जिल्हाचे पालकमंत्री गिरीश बापट  यांनी केला.
महात्मा गांधी जयंती निमित्त  चतु :श्रृंगी मंदिराच्या परिसरात आयोजित करण्यात आलेल्या स्वच्छता अभियाना प्रसंगी पालकमंत्री बोलत होते. भारतीय इतिहासात महात्मा गांधी यांचे मोठे स्थान आहे. गांधीजींनी अंहिसेच्या मार्गाने आंदोलन करुन जगभरात नाव मिळविले. त्यामुळे त्यांना आदरांजली वाहतांना सुमनांने नव्हे तर श्रमदान करुन  श्रध्दांजली वाहणे हे संयुक्तीक ठरेल असे, सांगून ते पुढे म्हणाले, स्वच्छतेची सुरुवात स्वत: पासून करुन ती सवय म्हणून रुजायला पाहिजे. सर्वांनी संकल्प करायला हवा की, आपला देश स्वच्छ करणे ही आपली जबाबदारी आहे. सरकार तसेच महापालिका स्वच्छतेच्याबाबतीत गंभीर आहे. प्रत्येकाने स्वच्छतेचे महत्व जाणणे गरजेचे आहे. स्वच्छता हा एक संस्कार आहे.
यावेळी पालक मंत्र्यांनी विद्यार्थ्यांसमवेत मंदिराच्या परिसराची साफ सफाई केली. खुद्द मंत्री महोदय हातात झाडू घेवून मंत्री पदाचा कोणताही अभिनिवेश न बाळगता आपल्या बरोबरीने श्रमदान करत असल्याचे पाहून विद्यार्थ्यांचाही उत्साह वाढला होता. पालकमंत्र्या समवेत 'मी अस्वच्छता करणार नाही – आणि करु देणार नाही 'अशा घोषणा विद्यार्थ्यांनी यावेळी दिल्या.
यावेळी   चतु :श्रृंगी मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष डॉ. गंगाधर अनगळ, भारतीय जैन संघटनेचे शांतीलाल मुथा,सरला मुथा,प्रफुल्ल पारेख आणि शिक्षक तसेच विद्यार्थी मोठया संख्यने उपस्थित होते.
000000