Wednesday, September 19, 2018

लोकराज्य मधील माहिती सर्वच घटकांना उपयुक्त मुख्याध्यापक संजय गळीतकर



     पंढरपूर, दि. 18 :- लोकाराज्य मासिकातून मिळणारी माहिती समाजातील सर्वच घटकांसाठी उपयुक्त असल्याचे प्रतिपादन मुख्याध्यापक संजय गळीतकर लोकराज्य वाचक मेळाव्या प्रसंगी विद्यार्थ्यांना मार्गदर्श करताना केले
             जिल्हा माहिती कार्यालय सोलापूरच्या वतीने अकलूज येथील महर्षी शंकरराव मोहिते पाटील प्रशालेत आयोजित लोकराज्य मासिक मेळाव्यास लक्ष्मीबाई कन्या प्रशालेच्या मुख्याध्यापिका शहिनाज मकबूल शेख, ज्येष्ठ पत्रकार चंद्रकांत कुंभार, महिती सहाय्यक एकनाथ पोवार, माहिती कार्यालयाचे अविनाश गरगडे, इक्बाल भाईजान, भाऊसाहेब चोरमले, शिवाजी पालवे आदी उपस्थित होते.
            शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालाच्या वतीने लोकराज्य मासिक प्रकाशित करण्यात येते. मासिकात विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेसाठी आवश्यक असणारी माहिती अत्यंत उपयुक्त आहे. लोकराज्यमध्ये  शासच्या विविध योजना, शैक्षणिक माहिती, शेतक-यांसाठी व नागरीकांसाठी शासनामार्फत राबविण्यात येत असलेल्या योजनांची माहिती या बरोबरच अन्य विषयांची सर्वसमावेशक अशी माहिती देण्यात येत आहे. मासिकाच्या माध्यमातून शासनाच्या योजना घराघरात पोहचण्यास मदत होत असल्याने  प्रत्येकाने मासिकाचे वर्गणीदार व्हावे, असे आवाहन त्यांनी केले.     
प्रारंभी एकनाथ पोवार यांनी लोकराज्य मासिकाबाबत माहिती देवून मासिक विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेसाठी उपयुक्त असल्याचे सांगितले. मासिकाची वार्षिक वर्गणी 100 रुपये असून, विद्यार्थ्यांनी मासिकाचे वर्गणीदार व्हावे, असे आवाहन त्यांनी केले.
            लोकराज्य वाचक मेळाव्यात विद्यार्थ्यांनी लोकराज्य मासिकाचे वाचनही केले.


                                                             00000


विद्यार्थ्यांसाठी लोकराज्य मासिक माहितीचा खजाना मुख्याध्यापिका शहिनाज शेख



           पंढरपूर, दि. 18 :- शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालाच्या वतीने  प्रकाशित करण्यात येत असलेल्या लोकराज्यमध्ये शासकीय योजनांसह स्पर्धा परीक्षेसाठी आवश्यक माहितीचा खजाना विद्यार्थ्यांच्या ज्ञानाच्या कक्षा उंचावण्यासाठी उपयुक्त असल्याचे मत लक्ष्मीबाई कन्या प्रशालेच्या मुख्याध्यापिका शहिनाज शेख यांनी  व्यक्त केले .
            जिल्हा माहिती कार्यालय सोलापूरच्या वतीने अकलूज येथील लक्ष्मीबाई कन्या प्रशालेत आयोजित लोकराज्य मासिक मेळाव्यास मुख्याध्यापक संजय गळीतकर, ज्येष्ठ पत्रकार चंद्रकांत कुंभार, महिती सहाय्यक एकनाथ पोवार, माहिती कार्यालयाचे अविनाश गरगडे, इक्बाल भाईजान, भाऊसाहेब चोरमले, शिवाजी पालवे आदी उपस्थित होते.
            शासनामार्फत सर्वसामान्यांसाठी  लोकल्याणकारी विविध योजना राबविल्या जात आहेत. या योजनांची माहिती लोकराज्य मासिकात येत असते. त्यामध्ये शेतकरी, कष्टकरी, कामगार, महिला, विद्यार्थ्यांसाठी सुरु असलेल्या  विविध शिष्यवृत्तीची माहिती असल्याने विद्यार्थ्यांसाठी लोकराज्य मासिक दिशादर्शकच आहे. 
            ज्येष्ठ पत्रकार कुंभार यांनी लोकराज्यमध्ये येणारे दुर्मिळ लेख विद्यार्थ्यांच्या ज्ञानात भर टाकणारे आहेत, असे सांगितले. स्पर्धा परीक्षेसाठी अचुक माहिती देणाऱ्या लोकराज्य मासिकाचे विद्यार्थ्यानी नियमित वाचन करावे. माहिती विभागामार्फत राबविण्यात येत असलेला लोकराज्य वाचक अभियान उपक्रम स्तुत्य असल्याचे त्यांनी सांगितले.
            माहिती सहायक एकनाथ पोवार यांनी विद्यार्थ्याना लोकराज्य मासिकाबाबत माहिती दिली. मासिकाची वार्षिक वर्गणी 100 रुपये असून, विद्यार्थ्यांनी मासिकाचे वर्गणीदार व्हावे, असे आवाहन त्यांनी केले.
00000


Monday, September 17, 2018

रेशन दुकानातून आता मीठ विक्रीला सुरुवात -पालकमंत्री गिरीश बापट





            पुणे,दि.17 :- रेशन दुकानातून आता मीठ विक्री सुरु करण्यात आली आहे. मिठामुळे  शरीरातील हिमोग्लोबीन वाढण्यास मदत होऊन पुरुषाबरोबरच महिलाही अधिक सशक्त होण्यासाठी ही योजना शासनाने आणली आहे, असे  प्रतिपादन अन्न व नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण, अन्न  व औषध प्रशासन, संसदीय कार्य तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांनी केले. यावेळी प्राथमिक स्वरुपात काही महिलांना मीठ पिशवीचे वाटपही पालकमंत्री यांच्या हस्ते करण्यात आले.
            नाना पेठ, येथील क्रांती ज्योती स्वस्त धान्य दुकानात लोह आणि आयोडीन युक्त मिठाची रास्तभाव दुकानातून विक्रीचा शुभारंभ पालकमंत्री गिरीश बापट यांच्या हस्ते करण्यात आला त्यावेळी ते बोलत होते. यावेळी पुरवठा विभागाच्या उपायुक्त नीलिमा धायगुडे, अन्न धान्य वितरण अधिकारी अस्मिता मोरे, पुणे कॅन्टोनमेंट बोर्डाचे माजी उपाध्यक्ष दिलीप गिरमकर,टाटा कंपनीचे श्री. अय्यर  आदी उपस्थित होते.
            पालकमंत्री गिरीश बापट म्हणाले, राज्यात नागपूर आणि पुणे या दोन जिल्हयांत मीठ विक्रीची सुरुवात झाली आहे. त्या पाठोपाठ इतर जिल्हयांतही ती लवकरच सुरु करणार आहोत. स्वस्त धान्य दुकानदारांच्या माध्यमातून धान्य वितरणासाठी ई-पॉस मशीनचा उपयोग करण्यात येत आहे. ज्यांनी अद्यापपर्यंत आधार कार्ड काढलेले नाही त्यांनी ते लवकरात लवकर काढून घेतले पाहिजे म्हणजे त्यांना या योजनांचा लाभ मिळू शकतो. पुण्यामध्ये महिलांच्या तपासणीमधून असे लक्षात आले आहे की, 5 ते 15 वयोगटातील 98 टक्के महिलांमध्ये रक्तातील लोहाचे प्रमाण कमी आहे. मिठामध्ये हिमोग्लोबीन वाढीसाठी पोषक घटक आहेत. याचा सर्वांनी लाभ घ्यावा, असेही ते म्हणाले.
            कार्यक्रमाचे प्रास्ताविक पुरवठा विभागाच्या उपायुक्त नीलिमा धायगुडे यांनी तर उपस्थितांचे आभार अस्मिता मोरे यांनी मानले. यावेळी पुरवठा विभागाचे अधिकारी, कर्मचारी  व परिसरातील नागरिक उपस्थित होते.
00000

माझ्या यशात ‘लोकराज्य’चा मोठा वाटा - डॉ. विठ्ठलराव जाधव



पुणे दि. 17 : स्पर्धा परिक्षेच्या विद्यार्थ्यांसाठी लोकराज्य हे मासिक अत्यंत उपयुक्त असून माझ्या यशात ‘लोकराज्य’ मासिकाचा मोठा वाटा असल्याचे प्रतिपादन विशेष पोलीस महानिरीक्षक (कारागृह)(मु) डॉ. विठ्ठलराव जाधव यांनी आज केले.
लोकराज्य मासिकाच्या सष्टेबर महिन्याच्या ‘सामर्थ्य शिक्षणाचे, समृध्द महाराष्ट्राचे’! या विशेषांकाचे प्रकाशन डॉ. विठ्ठलराव जाधव यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी कारागृह उपमहानिरीक्षक स्वाती साठे, कारागृह उपमहानिरीक्षक योगेश देसाई, प्राचार्य एस. व्ही. खटावकर, कारागृह अधीक्षक यु. टी. पवार, पुणे विभागीय उपसंचालक (माहिती) मोहन राठोड, तुरुंगाधिकारी एस. बी. दराडे, माहिती सहायक संग्राम इंगळे, राष्ट्रीय शांतीदूत संस्थेचे अध्यक्ष तथा महाराष्ट्र पोलीस समन्वय समितीचे कार्याध्यक्ष डॉ. ऋतुराज काळे, राष्ट्रीय शांतीदूत संस्थेचे राज्याध्यक्ष भगवान डिखळे, संदीप राठोड, नितीन सोनावणे, अमर माने उपस्थित होते.
डॉ. विठ्ठलराव जाधव म्हणाले, माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे प्रकाशन असणारे लोकराज्य हे मासिक अत्यंत दर्जेदार आहे. महाराष्ट्र शासनाचे ते मुखपत्र आहे. गेल्या सत्तर वर्षापासून शासनाच्या विविध कल्याणकारी योजना सामान्यांपर्यंत पोहोचविण्याचे काम हे मासिक करत आहे. लोकराज्य वाचक अभियानाच्या माध्यमातून प्रत्येक व्यक्तीपर्यंत लोकराज्य पोहोचविण्याची महासंचालनालयाची भूमीका स्तुत्य आहे.
स्पर्धा परिक्षेच्या विद्यार्थ्यांसाठी हे मासिक अत्यंत उपयुक्त आहे. या माध्यमातून अधिकृत माहिती विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचण्यास मदत होते. स्पर्धा परिक्षेची तयारी करताना मी सुध्दा याच मासिकाचे मी नियमीत वाचन करत होतो, माझ्या यशात या मासिकाचा मोठा वाटा आहे. लोकराज्य मासिक हे अत्यंत सवलतीच्या दरात शासनाच्यावतीने उपलब्ध करून देण्यात आले आहे, याचा लाभ प्रत्येकाने घेण्याचे आवाहन डॉ. जाधव यांनी केले.
*****

      

Wednesday, September 12, 2018

"लोकराज्य" मासिक हे ज्ञानाचे भांडार - उप प्राचार्य डॉ. शिवाजी साठे



बारामती दि. 12: स्पर्धा परीक्षेसाठी लोकराज्य हे मासिक अत्यंत उपयुक्त असून ते ज्ञानाचे भांडार असल्याचे प्रतिपादन तुळजाराम चतुरचंद कला,विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयाचे उप प्राचार्य डॉ. शिवाजी साठे यांनी आज केले.
       येथील तुळजाराम चतुरचंद महाविद्यालयाच्या जीवराज सभागृहात "लोकराज्य वाचक मेळावा" कार्यक्रमात डॉ. शिवाजी साठे बोलत होते. यावेळी पुणे विभागाचे उपसंचालक (माहिती) मोहन राठोडजिल्हा माहिती अधिकारी राजेंद्र सरगमाहिती अधिकारी संग्राम इंगळेसहायक पोलीस निरीक्षक सुहास कांबळेप्रा. विलास कर्डीले उपस्थित होते.
       डॉ. शिवाजी साठे म्हणालेवाचनाने माणूस समृध्द होतो. शासनाचे मुखपत्र असणारे लोकराज्य हे मासिक दर्जेदार असून स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अत्यंत उपयुक्त आहे. ज्ञानाचे आकलन होण्यासाठी वाचन महत्वाचे असतेही ज्ञानाची भूक भागविण्याचे काम लोकराज्य मासिकाच्या माध्यमातून होते.
       श्री. मोहन राठोड म्हणालेलोकराज्य हे शासनाचे मुखपत्र आहे. लोकराज्यच्या माध्यमातून शासनाचे निर्णयविविध कल्याणकारी योजना लोकांपर्यंत पोहोचण्यास मदत होते. स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हे मासिक दिशादर्शकाची भूमिका निभावते. देशाचे उज्ज्वल भवितव्य घडविण्यासाठी लोकराज्य मासिक विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविणे हाच लोकराज्य वाचक मेळाव्याचा उद्देश असल्याचे त्यांनी सांगितले.
       श्री. राजेंद्र सरग म्हणालेलोकराज्य मासिकाला सत्तर वर्षांची परंपरा आहे. अनेक दिग्गज लेखकांचे विविध विषयांवरील लेख लोकराज्यच्या माध्यमातून वाचकांपर्यंत पोहोचत असतात. लोकराज्य विशेषांकांच्या माध्यमातून वाचकांच्या ज्ञानाची कक्षा रुंदावते.
       श्री. ज्ञानेश भुकेले यांनी लोकराज्य वाचक मेळाव्याची संकल्पना विषद केली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. चंद्रकांत कांबळे यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महाविद्यालयाच्या विद्यार्थिनी सारिका कळसकरगीता वरकुटे यांनी केले. आभार संग्राम इंगळे यांनी मानले.
       यावेळी प्रा.एस. आर. काळेप्रा. जयेंद्र राणेप्रा. रणजीत पंडीतप्रा. जयप्रकाश पाटीलडॉ. राऊतप्रा. विनायक लष्करराजश्री आगमप्रा. संजय भिसेउप माहिती कार्यालयाचे प्र.माहिती सहायक विलास कसबेविशाल कार्लेकरसुर्यकांत कासारनरेंद्र वासनिकअमित खडतरेभिमराव गायकवाड यांच्यासह विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
०००००






Friday, September 7, 2018

राजे उमाजी नाईक आर्थिक विकास महामंडळाची निर्मिती करणार --मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा


पुणेदि. 7 – आद्यक्रांतीवीर राजे उमाजी नाईक यांनी इंग्रजांच्या विरोधात मोठा लढा उभा केला. त्यांचे कार्य प्रेरणादायी असून राजे उमाजी नाईक यांच्या नावाने आर्थिक विकास महामंडळाची निर्मिती करणार असल्याची महत्वपूर्ण घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज केली.
भिवडी ता. पुरंदर येथील हुतात्मा उमाजी नाईक विद्यालयाच्या प्रांगणात जय मल्हार क्रांती संघटना व भिवडी ग्रामस्थ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित आद्यक्रांतीवीर राजे उमाजी नाईक यांच्या २२७ व्या जयंती महोत्सवात मुख्यमंत्री श्री. फडणवीस बोलत होते.
यावेळी अन्नऔषधसंसदीय कामकाज तथा पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापटजलसंधारण मंत्री प्रा. राम शिंदेपशुसंवर्धन व दुग्ध विकास मंत्री महादेव जानकरसामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळेजलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारेकृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोतआमदार बाबुराव पाचर्णेआमदार बाळा भेगडेमाजी मंत्री दादासाहेब जाधवराव,आद्यक्रांतीवीर उमाजी नाईक यांचे वंशज रमण खोमणे-नाईकचंद्रकांत खोमणे-नाईकभिवडीच्या सरपंच उषा मोकाशी उपस्थित होत्या.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणालेरामोशी समाजाला मोठा इतिहास आहे. राजे उमाजी नाईक यांनी इंग्रजांना सळो की पळो करून सोडले. ब्रिटीश सरकार विरोधात त्यांनी पहिले बंड पुकारले. या राजाने स्वातंत्र्य युध्दाची सुरूवात केली. त्यांचे हे कर्तृत्व पाहून इंग्रजांनी जाणूनबुजून त्यांचे नाव दरोडेखोरांच्या यादीत टाकले. बहिर्जी नाईक ते उमाजी नाईक अशा उज्ज्वल इतिहासाची समाजाला परंपरा आहे. इंग्रजांनी चुकीचा इतिहास लिहिल्यामुळे हा समाज शिक्षणसंस्कृती यापासून वंचित राहीला. देशासाठी लढता-लढता मागास झाला. या समाजाचा आर्थिकसामाजिक विकास होण्यासाठी शासन प्रयत्नशील राहील.
राजे उमाजी नाईक यांचा इतिहास सामान्य माणूस व तरुणाईपर्यंत जाण्यासाठी त्यांच्या जीवनावर आधारित चित्रपट निर्माण करण्यासाठी शासन आर्थिक मदत करेलअशी ग्वाही मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी दिली.
समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न सोडविण्यासाठी शासनाच्यावतीने न्यायमूर्ती बापट आयोगाच्या शिफारशींची छाननी करण्याचे काम सुरू असून त्यावर बैठक घेऊन उचित शिफारस केंद्र सरकारकडे करणार असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच राजे उमाजी नाईक यांच्या स्मारकासाठी पुरेसा निधी उपलब्ध करून देण्यात येईलअसेही ते म्हणाले.
पालकमंत्री श्री. गिरीश बापट म्हणालेराजे उमाजी नाईक यांचे देशासाठीचे कार्य मोठे आहे. त्यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन करण्यासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून अनेक समाजबांधव येतात. या समाजाच्या विकासासाठी धोरणात्मक निर्णय घेण्याची आवश्यकता आहे. शिक्षणवसतिगृहप्रशिक्षण या माध्यमातून हा समाज स्वत:च्या पायावर उभा राहावा,यासाठी  शासनाच्यावतीने प्रयत्न केले जातीलअसे ते म्हणाले.
वंचित समाजाला मान-सन्मान देण्याचे काम या शासनाने केले आहे. राजे उमाजी नाईक यांची जयंती शासनाच्यावतीने साजरी करण्यासाठी जलदगतीने  शासन निर्णय काढल्याचे प्रा. राम शिंदे यांनी यावेळी सांगितले.
जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी पुरंदरची भूमी पावन असून येथे शक्ती आणि भक्तीचा संगम झाल्याचे सांगून राजे उमाजी नाईक यांच्या कार्याचा गौरव केला.
यावेळी पशु संवर्धन मंत्री महादेव जानकरबाबाराजे जाधवराव यांची भाषणे झाली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक दौलत शितोळे यांनी केले.
जयंती महोत्सवाच्या कार्यक्रमापूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भिवडी गावातील राजे उमाजी नाईक यांच्या स्मारकाला भेट देवून अभिवादन केले.
या कार्यक्रमास समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
00000





















Saturday, September 1, 2018

‘लोकराज्य’ वाचक मेळाव्याच्या माध्यमातून वाचन संस्कृतीला बळकटी मिळेल - प्राचार्य डॉ. एस. आर. पाटील

पुणे दि. 1: वाचनाने माणूस समृध्द होतो, त्यामुळे विद्यार्थ्यांनी अभ्यासाबरोबरच आवांतर वाचनावर भर देणे आवश्यक आहे. ‘लोकराज्य’ मासिक स्पर्धा परिक्षेसाठी उपयुक्त असून लोकराज्य मेळाव्याच्या माध्यमातून वाचन संस्कृतीला निश्चित बळकटी मिळेल असा विश्वास प्राचार्य डॉ. एस. आर. पाटील यांनी आज व्यक्त केला.
            एरंडवणा येथील भारती विद्यापीठाच्या यशवंतराव मोहिते कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयाच्या सभागृहात विभागीय माहिती कार्यालय व जिल्हा माहिती कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने ‘लोकराज्य वाचक मेळाव्या’चे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी डॉ. एस. आर. पाटील बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपसंचालक (माहिती) मोहन राठोड होते. यावेळी जिल्हा माहिती अधिकारी राजेंद्र सरग, महाविद्यालयाचे उप-प्राचार्य डॉ. इ.डी. पाटील, मराठी विभाग प्रमुख डॉ. एस. एस. पाटील उपस्थित होते.
   प्राचार्य डॉ. एस. आर. पाटील म्हणाले, लोकराज्य हे महाराष्ट्र शासनाचे मुखपत्र असून ते महाराष्ट्राचे प्रतिबिंब आहे. लोकराज्य वाचक मेळाव्याच्या माध्यमातून वाचनसंस्कृती वाढीसाठी मदत होणार आहे. शासनाच्या विविध योजनांची माहिती लोकराज्यच्या माध्यमातून समाजाच्या तळागाळापर्यंत पोहोचण्यास मदत होत असल्याचे त्यांनी सांगितले.
            मोहन राठोड म्हणाले, खुल्या अर्थव्यवस्थेमुळे माध्यमांचे स्वरूप झपाट्याने बदलत आहे. माध्यमांच्या या बदलात वाचन संस्कृती कमी होत आहे. याला चालना देण्यासाठी लोकराज्य वाचक मेळावा उपयुक्त ठरणार आहे. स्पर्धा परिक्षेच्या विद्यार्थ्यांसाठी लोकराज्य उपयुक्त आहे. समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत शासनाच्या योजना पोहोचविण्यासाठी लोकराज्य मराठी भाषेबरोबरच इंग्रजी, हिंदी, गुजराती आणि ऊर्दू भाषेतही प्रकाशित करण्यात येते.
            कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात जिल्हा माहिती अधिकारी राजेंद्र सरग यांनी लोकराज्यचे महत्व सांगितले. यावेळी डॉ. इ. डी. पाटील, डॉ. एस. एस. पाटील यांची भाषणे झाली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सहायक संचालक वृषाली पाटील यांनी केले. तर आभार माहिती सहायक जयंत कर्पे यांनी मानले. या कार्यक्रमाला विभागीय माहिती कार्यालय, जिल्हा माहिती कार्यालयातील कर्मचारी, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
*****