Wednesday, January 9, 2019

खेलो इंडीया २०१९ चे शानदार उद्घाटन औरंगाबादमध्ये महाराष्ट्रातील पहिले क्रीडा विद्यापीठ उभारणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा

खेलो इंडीया २०१९ चे शानदार उद्घाटन
औरंगाबादमध्ये महाराष्ट्रातील पहिले क्रीडा विद्यापीठ उभारणार
- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा

·         डोळ्याचे पारणे फेडणारा रंगारंग कार्यक्रम सव्वातास चालल्याने उपस्थितांमध्ये उत्साह वाढला
·         नीटनेटके आणि उत्साहपूर्ण आयोजन
·         रंगारंग कार्यक्रमाच्या प्रारंभीच महाराष्ट्राच्या संस्कृतीचे दर्शन आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कार्य कर्तुत्वाची झलक दाखविण्यात आली
·         संपूर्ण देशातून खेळाडू आल्याने खऱ्या अर्थाने भारतीय संस्कृतीचे दर्शन घडले
·         लहान मुलांच्या कलागुणांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय क्रीडा मंत्री रावर्धनसिंग राठोड व अन्य मान्यवरांनी उत्स्फूर्त दाद दिली.

पुणे दि : युवकांसाठी खेलो इंडीया स्पर्धेचे आयोजन करून केंद्र सरकार स्वामी विवेकानदांच्या सुदृढ भारत निर्माणाचा मंत्र आचरणात आणत आहेतीच प्रेरणा घेवून क्रीडा क्षेत्रातमहाराष्ट्राचे नाव उंचाविण्यासाठी औंरगाबादमध्ये महाराष्ट्रातील पहिले क्रीडा विद्यापीठ उभारणार असल्याची महत्वपूर्ण घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज केली.
महाळुंगे-बालेवाडी येथील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलमध्ये दुसऱ्या खेलो इंडीया २०१९ स्पर्धेचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झालेत्यावेळी श्री फडणवीस बोलतहोतेयावेळी केंद्रिय क्रीडा  युवक कल्याण मंत्री कर्नल राजवर्धनसिंग राठोडपालकमंत्री गिरीश बापटक्रीडा मंत्री विनोद तावडेसामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळेखासदार अनिलशिरोळेआंतरराष्ट्रीय कुस्तीपटू सुशील कुमारस्पोर्ट ॲथॉरिटी ऑफ इंडीयाच्या महासंचालक नीलम कपूरक्रीडा विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव वंदना कृष्णाकेंद्राचे क्रीडा सचिव राहूलभटनागरसाईचे उपमहासंचालक संदीप प्रधान उपस्थित होते.  
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणालेमहाराष्ट्रात खेलो इंडियाचे आयोजन केल्याबद्दल केंद्र सरकारचे आभारी आहेस्वामी विवेकानंद युवकांना म्हणाले होते मंदिरात जाण्याऐवजी फुटबॉलच्या मैदानावर जाऊन खेळाज्या प्रमाणे देवाला सुकलेली फुले चालत नाहीतत्याच प्रमाणे तंदुरूस्त नसलेले युवक मातृभूमीला चालत नाहीतसुदृढ युवकांच्या माध्यमातून स्वस्थ भारताच्या निर्माणाचे स्वामी विवेकानंदांचे स्वप्न होते.
स्वामी विवेकानंदांच्या शिकवणीचे आचरण सरकार करत आहेत्यामाध्यमातून खेलो इंडीया स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहेयामुळे युवा खेळाडूंना चांगला मंच मिळाला आहेया स्पर्धेच्या माध्यमातून प्रतिभाशाली खेळाडू घडतील.
केंद्राच्या धर्तीवरच राज्य शासनानेही क्रीडा क्षेत्रात काही महत्वपूर्ण निर्णय घेतले आहेतपूर्वी तालुकास्तरावर क्रीडा मैदानाच्या उभारणीसाठी १ कोटी रुपये दिले जात होतेती रक्कम आता ५ कोटी रूपये केली आहेतर विभागस्तरावरील मैदानासाठी २४ कोटी रूपयांच्या ऐवजी ४५ कोटी रूपये दिले जात आहेतक्रीडा क्षेत्रात महाराष्ट्राचे नाव उज्ज्वल करण्यासाठीच राज्य शासनाने ही पाऊले उचलली आहेत.
खेळात हार जीत तर होत असते असे सांगत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देशाचे माजी प्रधानमंत्री अटल बिहारी वाजपेय यांची ना हार मैना जीत मै ही कविता उध्दगृत केलीतसेच खेळात हार जीतपेक्षा खेळाची उर्मी असणे आवश्यक आहेहारू तर पुन्हा जिंकूजिंकू तर पुन्हा पुढे जावू आणि पुढे जावू तर देशाचे नाव पुढे जाईल असे सांगत देशाचा तिरंगा उचावण्यासाठी खेळण्याचे आवाहन त्यांनी खेळाडूंना यावेळी केले.




सामान्य नागरिकांना पोलीसांची भिती नाही तर भरोसा वाटावा - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस






पुणे दि. : केवळ गुन्हेगार पकडणे हेच पोलीसांचे काम नाहीतर त्यांच्या कामाला सामाजिक आयाम असणे आवश्यक आहे. बदलत्या शहरीकरणामुळे समाजात अनेक नव्या समस्या निर्माण होत असून या सामाजिक समस्या सोडविण्यासाठी पोलीसांनी समुपदेशनावर भर द्यावा. समाजाला सेवा देणे हेच पोलीसांचे काम आहे. पोलीसांकडे गेल्यावर सामान्य नागरिकांना भिती न वाटता भरोसा वाटावा असे काम पोलीस विभागाने करण्याचे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज केले. 
            पुणे पोलीस आयुक्तालयाच्यावतीने आयुक्तालयाच्या परिसरात महिलाज्येष्ठ नागरिक आणि बालक यांना एकाच ठिकाणी मदत व सुविधा उपलब्ध करून देणाऱ्या भरोसा कक्षाचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले. त्यानंतर जवाहरलाल नेहरू मेमोरिअल सेंटर येथे झालेल्या कार्यक्रमात मुख्यमंत्री श्री फडणवीस बोलत होते.
यावेळी पालकमंत्री गिरीश बापटसामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळेमहापौर मुक्ता टिळकखासदार अनिल शिरोळेआमदार मेधा कुलकर्णीमाधुरी मिसाळजगदिश मुळीकपोलीस महासंचालक दत्ता पडसलगीकरपोलीस आयुक्त डॉ. व्यंकटेशम के.पुणे महापालिकेचे आयुक्त सौरभ रावजिल्हाधिकारी नवल किशोर राम,  पोलीस सहआयुक्त शिवाजी बोडखे उपस्थित  होते. 
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले,  सध्या शहरीकरणामुळे नागरीकांच्या जीवनाचे अनेक संदर्भ बदलत आहेत. अनेक नव्या समस्यांना लोकांना तोंड द्यावे लागत आहे. या नव्या समस्यांना सामोरे जाताना समुपदेशनाची मदत घेण्याची आवश्यकता आहे. कौटुंबिक कलह ही सुध्दा मोठी समस्या निर्माण झाली आहे. या नव्या समस्यांना सामोरे जाताना पोलीसांनी केवळ तांत्रिक बाबीत न जाता समुपदेशनाचा मार्ग स्वीकारावा. समुपदेशनाच्या माध्यमातून नवा सुदृढ समाज घडविण्यासाठी प्रयत्न करावा.
भरोसा कक्षाचे नागपूर शहरात थोड्याच कालावधीत चांगले परिणाम पहावयास मिळाले हातेत्यात सुधारणा करून पुण्यात भरोसा कक्ष सुरू करण्यात आला आहे. याचा पुण्यातही निश्चितच चांगला परिणाम पहावयास मिळेलअसा विश्वास व्यक्त करत मुख्यमंत्री श्री फडणवीस म्हणालेइंग्रजांच्या काळात राज्य करण्यासाठी पोलीस दलाचा उपयोग केला जात होताआता मात्र पोलीस हे सामान्य नागरिकांना सेवा देण्यासाठी आहेत. अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून पोलिसींग अधिक सुकर झाले आहेतसेच या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने पोलीसांच्यावरील ताण कमी होण्यास मदत झाली आहे.
पोलीस दलाच्या आधुनिकतेबरोबरच पोलीसांचे विविध प्रश्न सोडविण्यासाठीही शासन विशेष प्रयत्न करत आहे. राज्यातील पोलीसांच्या घरांच्या प्रश्नावर सरकारने मोठे काम केले आहे. मुंबई खालोखाल पुण्यात पोलीसांसाठी घरे उपलब्ध करून देण्यासाठी विविध योजना राबविण्यात आल्या आहेत. पुणे शहरात लावण्यात आलेल्या कॅमेराच्या माध्यमातून गुन्हगारीवर नियंत्रण राखत कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न सोडविण्यास मदत झाली आहे. मात्र शहरातील हे सीसीटीव्ही कॅमेरे अपग्रेड करून घेण्याची सूचना मुख्यमंत्री श्री फडणवीस यांनी यावेळी केली.  
पालकमंत्री गिरीश बापट म्हणालेपोलीस हा मध्यवर्ती घटक धरून सभागृहात चर्चा झालेल्या अनेक योजनांची पुर्तता शासनाने केली आहे. शासनाने पोलीसांच्या निवासस्थानाचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी विशेष प्रयत्न केले. भरोसा कक्षाच्या माध्यमातून ज्येष्ठ नागरिकमहिला व बालकांचे प्रश्न सोडविण्यास निश्चितच मदत होईल. तसेच कौटुंबिक प्रश्न सोडविण्यासाठीही या कक्षाची मोठी मदत होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
पोलीस महासंचालक दत्ता पडसलगीकर म्हणालेभरोसा कक्ष हा अत्यंत उपयुक्त उपक्रम आहे. हा सर्वात चांगला आणि उत्तम उपक्रम आहे. या माध्यमातून समाजातील गरजूपर्यंत मदत पोहोचेल.
भरोसा सेलच्या उद्घाटनानंतर मुख्यमंत्री श्री फडणवीस यांनी भरोसा सेलची पाहणी करून या कक्षाच्या कामाची माहिती घेतली. योवळी श्री फडणवीस यांनी या कक्षात आलेल्या तक्रारदाराचे कार्ड स्वत: लिहून त्यांना भरून दिले. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते भरोसा पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आले. 
यावेळी विशेष कामगिरी करणाऱ्या पोलीस निरीक्षक गजानन पवारतनया सुनिल फुलारीमहेश सप्रे यांचा मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आले.    
प्रास्ताविकात पोलीस आयुक्त डॉ. व्यंकटेशम के. यांनी पुणे पोलीस आयुक्तालयाच्यावतीने राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांचा आढावा घेतला. आभार पोलीस सहआयुक्त शिवाजी बोडखे यांनी मानले. यावेळी पोलीस विभागातील अधिकारीकर्मचाऱ्यांसह सामान्य नागरिक उपस्थित होते.
००००

भरोसा सेलची वैशिष्ट्ये

• भरोसा सेल (COPS HUB)च्या माध्यमातून पिडीत महिलामुले व ज्येष्ठ नागरिक यांना एकाच ठिकाणी सर्व प्रकारची मदत व सुविधा उपलब्ध करून देणे.
• महिला सहायक कक्षांतर्गत पोलीस मदतमहिला हेल्पलाईनसमुपदेशनवैद्यकीय सेवाविधीविषयक सेवामानसोपचार तज्ज्ञपिडीत महिलांचे पुनर्वसनकौटुंबिक हिंसाचार कायद्यांतर्गत संरक्षण सेवेचा समावेश
• भरोसा सेलमुळे पिडीत महिलांना अत्याचाराविरुद्ध लढण्यासाठी मानसिक बळ मिळेल
• भरोसा सेल हे पिडीत महिलांच्या तक्रारीकरिता २४ ७ सुरु राहणार असून महिला हेल्पलाईन नंबर १९०१चाईल्ड हेल्पलाईन नंबर १०९८ज्येष्ठ नागरिक हेल्पलाईन नंबर  १०९० तसेच १०० नंबरवर तक्रारदारांच्या तक्रारी स्वीकारून तज्ज्ञांकडे पाठवणार
• पिडीत महिलांना समुपदेशन करून आवश्यकता असल्यास तात्पुरत्या निवासाची व्यवस्था
• विशेष बालपथक सेवेंतर्गत पिडीत बालकांना मानसिक बळ व आधार देणे
• विधी संघर्षग्रस्त बालकांचे पुनर्वसन करणे
• पिडीत बालकांना तत्काळ वैद्यकीय सुविधामानसोपचार तज्ज्ञविधीतज्ज्ञ संरक्षण अधिकारी व पुनर्वसन आदी सेवा पुरविणे
• गुन्हेगारी वातावरणापासून बालकांना दूरू ठेवण्याकरिता योजना राबविणे
• बालकांच्या हक्काचे संरक्षण करणे
• ज्येष्ठ नागरिक कक्षांतर्गत ज्येष्ठ नागरिकांचे अर्ज स्वीकारून तात्काळ कार्यवाही करणे
• ज्येष्ठ नागरिकांना आवश्यक त्या सुविधा देऊन ज्येष्ठ नागरिक संघाचे / NGOचे सहकार्य घेणे
• ज्येष्ठ नागरिकांना व गैरअर्जदारांना समुपदेशन करून योग्य ते मार्गदर्शन करणे
0000











Friday, January 4, 2019


खेलो इंडीयाच्या यशस्वीतेसाठी
दिलेल्या जबाबदाऱ्या समन्वयाने पार पाडाव्यात
-    आनंद लिमये
पुणे दि. 04: खेलो इंडीया हा राष्ट्रीय कार्यक्रम असून या स्पर्धेच्या आयोजनाचा मान महाराष्ट्राला मिळाला आहे. ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी सर्व विभगांनी दिलेल्या जबाबदाऱ्या समन्वयानी पार पाडण्याच्या सूचना विभागीय आयुक्त तथा यशदाचे महासंचालक आनंद लिमये यानी आज केल्या.  
महाळुंगे-बालेवाडी येथील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलाच्या सभागृहात खेलो इंडीया स्पर्धेच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी विभागीय आयुक्त तथा यशदाचे महासंचालक आनंद लिमये यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. त्यावेळी ते बोलत होते. या बैठकीला क्रीडा आयुक्त सुनील केंद्रेकर, पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त श्रावण हार्डीकर,  संयोजन समितीचे अध्यक्ष तथा उपसचिव (क्रीडा) राजेंद्र पवार, क्रीडा व युवक मंत्र्यांचे विशेष कार्य अधिकारी श्रीकांत ढेकणे, संयोजन समितीचे सचिव तथा सहसंचालक (क्रीडा) एन. एम. सोपल, निवासी उपजिल्हाधिकारी जयश्री कटारे उपस्थित होत्या.
श्री आनंद लिमये म्हणाले, खेलो इंडीया या स्पर्धेचे देशपातळीवर आयोजन करण्यात येते, यावर्षी या स्पर्धेच्या आयोजनाचा मान महाराष्ट्राला मिळाला आहे. ही स्पर्धा यशस्वी करण्याची आपली सर्वांची जबाबदारी आहे. त्यामुळे सर्वांनी समन्वयाने काम करावे. पुणे महानगरपालिकेने स्पर्धेच्या प्रसिध्दीसाठी त्यांच्या हद्दीत खेलो इंडीयाचे होर्डींग लावून सेल्फी पाँईट उभारावेत. तसेच स्पर्धेच्या कालावधीत मोठ्या प्रमाणात कचरा निर्मिती होणार आहे, या कचऱ्याची विल्हेवाट लावण्याची जबाबदारी पुणे व पिंपरी-चिंचवड महानगर पालिकेची आहे. स्पर्धेच्या कालावधीत पुणे महानगरपालिकेने पुरेशा प्रमाणात फिरती शौचालये क्रीडा संकुलाच्या आवारात उभारण्याच्या सूचना श्री लिमये यांनी दिल्या.   
श्री सुनील केंद्रेकर यांनी खेलो इंडीया स्पर्धेच्या अनुषंगाने केलेल्या कार्यवाहीचा व नियोजित कामांचा आढावा यावेळी सादर केला. या बैठकीला राज्य शासनातील विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
0000



Thursday, January 3, 2019

सावित्रीबाईंच्या जन्मगावी नायगाव येथे जागतिक दर्जाचे कौशल्य विकास केंद्र उभारणार -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा

सावित्रीबाईंच्या जन्मगावी
नायगाव येथे जागतिक दर्जाचे कौशल्य विकास केंद्र उभारणार
-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा


·         नायगावमध्ये सावित्री सृष्टी उभारणार
·         भिडे वाड्याच्या राष्ट्रीय स्मारकाचे काम मार्गी लावणार
·         नायगाव-मांढरदेवी रस्त्याचे काम करणार
·         उपसा सिंचन योजनांची ८१ टक्के वीजबिले सरकार भरणार
·         फुले दाम्पत्यांच्या भारतरत्नसाठी केंद्राकडे पाठपुरावा करणार
·         संत सावता माळींचे जन्मस्थान असलेले अरणचा विकास करणार 

सातारा दि. ३ (जि.मा.का.):  : महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनीच महाराष्ट्रात  पुरोगामित्वाची मुहुर्तमेढ रोवली, त्यांच्यामुळेच राज्याला पुरोगामी म्हणून ओळख मिळाली. त्यांनी घालून दिलेल्या मार्गावरच वाटचाल करू असे  सांगत सावित्रीबाई फुले यांच्या नावाने नायगाव या त्यांच्या जन्मगावी महिलांसाठी जागतिक दर्जाचे कौशल्य विकास केंद्र उभारणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज केली.
            सुरूवातीला नायगाव (ता. खंडाळा) येथील क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या स्मारकास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अभिवादन करून पुरातत्व विभागाने सावित्रीबाईंच्या जीवनावर आधारित उभारलेल्या स्मारक व चित्रशिल्पाची पाहणी केली. त्यानंतर सातारा जिल्हा परिषदेच्यावतीने आयोजित ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले जयंती सोहळा मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला, त्यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर होते.
यावेळी पालकमंत्री विजय शिवतारे, कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजीव नाईक-निंबाळकर, पिंपरी-चिंचवडचे महापौर राहूल जाधव, आमदार शंभूराज देसाई, आमदार जयकुमार गोरे, आमदार मनिषा चौधरी, कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील, जिल्हाधिकारी श्वेता सिंघल, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कैलास शिंदे, नायगावचे सरपंच निखील झगडे उपस्थित होते.   
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुढे  म्हणाले, क्रांतीज्योती सावित्रीबाईंनी महाराष्ट्रात परिवर्तन आणले. महात्मा फुले यांनी सावित्रीबाईंना शिकवून स्त्री शिक्षणाची मुहुर्तमेढ रोवली. स्त्री शिक्षणात भरीव कामगिरी करून त्यांनी सनातनी समाजाला झणझणीत उत्तर दिले. आज या गोष्टी सोप्या वाटत असल्या तरी त्या काळी या गोष्टी खूप कठीण होत्या. हे कार्य करताना समाजाचा मोठा रोष त्यांना सहन करावा लागला.
महात्मा फुले आणि सावित्रीबाईंनी समाजातील वंचितांपर्यंत विकास आणि महिलांपर्यंत शिक्षण पोहोचविण्याचे काम यशस्वीपणे केले. त्यांनी महिलांसाठी आणि विधवांसाठी मोठा लढा उभा केला. समाजातील वंचित घटकांच्यामागे उभे राहण्याचे काम या दाम्पत्याने केले. जातीभेद मिटविण्यासाठी तसेच स्त्रीमुक्तीसाठी मोठा लढा त्यांनी उभा केला. महात्मा फुलेंच्या कामाची प्रेरणा घेवूनच डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी सामाजिक समतेचे काम केले.
            महिलांच्या मुक्तीसाठी आयुष्य घालवणाऱ्या सावित्रीबाई फुले यांचे जन्मगाव असणाऱ्या  नायगावला ' 'दर्जाचे तीर्थक्षेत्र घोषित करण्यासाठी जिल्हाधिकारी यांनी तात्काळ प्रस्ताव पाठविण्याच्या सूचना करून मुख्यमंत्री म्हणाले, नायगावमध्ये सावित्रीसृष्टीउभारणीसाठी मान्यता देऊ. तसेच पुणे शहरातील ज्या भिडे वाड्यात पहिली मुलींची शाळा सुरू झाली, त्या ठिकाणी राष्ट्रीय स्मारक उभारणीचा प्रश्न कायदेशीर कचाट्यात अडकला आहे. मात्र सर्व कायदेशीर प्रक्रीया पूर्ण करून स्मारक उभे करण्याचे काम सरकार करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
तसेच या परिसरातील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेची क्षमता लवकरच वाढविण्यात येणार असल्याचे सांगत मुख्यमंत्री म्हणाले, नायगाव ते मांढरदेवी हा रस्ताही लवकरच करण्यात येईल. नीरा-देवधर धरण लाभक्षेत्रातील योजनांची कामे मार्गी लावून शेतकऱ्यांच्या शेतात पाणी पोहोचवू. तसेच लीफ्ट इरिगेशन प्रकल्पांची ८१ टक्के वीज बिले सरकार भरणार आहे, तर केवळ १९ टक्के रक्कम शेतकऱ्यांना भरावी लागणार आहे. त्यामुळे वीज  बिलाअभावी कोणतीही लिफ्ट इरिगेशन योजना बंद पडणार नाहीत.
देशातील महिला व वंचितांसाठी फुले दाम्पत्याने भरीव काम केले आहे. फुले दाम्पत्याला भारतरत्न देण्यासाठी राज्य सरकारने केंद्राकडे प्रस्ताव पाठविला असून राज्य सरकार या विषयी केंद्राकडे पाठपुरावा करणार असल्याचे सांगत संत सावता माळी यांचे जन्म गाव असणाऱ्या अरणचा तीर्थक्षेत्र विकास आराखडा तयार केला असून तेही काम वेगाने मार्गी लावणार असल्याचे श्री. फडणवीस यांनी यावेळी सांगितले.
यावेळी नायगाव ग्रामपंचायतीच्यावतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी जिल्हा परिषदेच्यावतीने तयार करण्यात आलेल्या बेटी बचाव-बेटी पढाओ या पुस्तकाचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. यावेळी विविध क्षेत्रात विशेष कामगिरी करणाऱ्या आर्या देशपांडे, जनाबाई हिरवे, यशस्वी साळुंखे आणि प्रांजल साळुंखे या मुलींचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक सरपंच निखील झगडे यांनी केले. या कार्यक्रमाला विविध संस्थांचे पदाधिकारी, अधिकारी, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.  
०००००







डॉ. म्हैसेकर यांची सचिवपदी पदोन्नती पुणे विभागीय आयुक्तपदी नियमित नियुक्ती




पुणे दि. 2 : पुणे विभागाचे प्रभारी विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांची सचिवपदी पदोन्नती झाली असून पुणे विभागाच्या विभागीय आयुक्तपदी त्यांची नियमित नियुक्ती झाली  आहे.
           मे 2018 रोजी डॉ. दीपक म्हैसेकर यांची पुणे विभागाच्या अतिरिक्त आयुक्तपदी बदली झाली होती, तेंव्हापासून त्यांच्याकडे पुणे विभागीय आयुक्तपदाचा अतिरिक्त कार्यभार सोपविण्यात आला होता.
    या कालावधीत डॉ. म्हैसेकर यांनी प्रत्येक बाबींचा  प्रकरण निहाय आढावा घेवून कामाला गती दिली. त्यांनी तीर्थक्षेत्र विकास आराखडा, पालखी मार्ग व पालखी तळ विकासाच्या कामांना गती दिली.मेट्रो प्रकल्प जमीन अधीग्रहण, पुरंदर विमानतळ या महत्वाच्या कामांना त्यांनी गती दिली.
             डॉ. म्हैसेकर हे पशुवैद्यक शास्त्राचे पदव्युत्तर पदवीधारक असून या विषयात त्यांना सुवर्णपदक मिळाले आहे. तसेच त्यांनी नागपूर विद्यापीठातून कायद्याची पदवीही प्राप्त केली आहे. २००३सालच्या तुकडीचे ते आयएएस अधिकारी आहेत. त्यांच्या नांदेड महानगरपालिकेच्या आयुक्तपदाच्या कार्यकाळात नांदेडला पाणी पुरवठा आणि घनकचरा व्यवस्थापनात देशात दुसरा क्रमांक मिळला. तसेच राज्यस्तरीय गाडगे महाराज स्वच्छता अभियानात पहिला क्रमांक मिळाला. तसेच बेसिक सर्व्हिस टू अर्बन पुअर (बीएसयूपी) अभियानांतर्गत झोपडपट्टीमुक्तीसाठी केलेल्या कामाला  त्यांच्या कारकीर्दीतच देशपातळीवरील पहिला पुरस्कार नांदेड महानगरपालिकेला मिळाला होता.
           डॉ. म्हैसेकर यांच्या कोल्हापूर मुख्य कार्यकारी अधिकारीपदाच्या कार्यकाळात कोल्हापूरला यशवंत पंचायत राजचे राज्य आणि राष्ट्रीय पातळीवरील पुरस्कार प्राप्त झाले आहेत. तसेच त्यांनी तीन वर्षाच्या चंद्रपूर जिल्हाधिकारी पदाच्या कालावधीत विविध नाविन्यपूर्ण उपक्रम राबविले आहेत. तसेच पुणे येथे येण्यापूर्वी नागपूर सुधार प्रन्यासचे ते सभापती होते .याकाळातही त्यांनी लोकहिताचे अनेक निर्णय घेतले होते .
           उत्तम प्रशासकीय अधिकारी अशी ओळख असलेल्या डॉ. म्हैसेकर यांना वाचनाची आवड आहे.
0000