Friday, September 2, 2016

पुणे कौशल्य विकासाचे जनक व्हावे : कौशल्य विकास मंत्री निलंगेकर


पुणे, दि. 02 : पुणे शहर संस्कृतीचे तसेच अनेक गोष्टींचे जनक आहे. त्याचप्रमाणे कौशल्य विकासाचेही जनक झाले पाहिजे असे प्रतिपादन राज्याचे कौशल्य विकास,उद्योजकता कामगार मंत्री संभाजी पाटीलनिलंगेकर यांनी केले.
कोथरुड येथील यशंवतराव चव्हाण सभागृहात महिला सबलीकरणाच्या दिशेने कौशल्य विकासाचे पहिले पाऊल "वुई ग्लोबल" सक्षमच्या वतीने आयोजित कार्यक्रमात मागदर्शन करताना बोलत होते. यावेळी पालकमंत्री गिरीश बापट, आमदार श्रीमती मेधा कुलकर्णी, मुख्यमंत्री यांचे विशेष कार्य अधिकारी श्रीकांत भारतीय, ॲड माधवी नाईक, उद्योजक प्रसाद लाड आदिंची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी कौशल्य विकास मंत्री निलंगेकर म्हणाले की, कौशल्य विकास विभागामार्फत महिलांना सक्षम करण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. प्रत्येक व्यक्तीमध्ये क्षमता असते. ती ओळखून प्रशिक्षण देण्याचा प्रयत्न देशात सर्वप्रथम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला. या विभागामार्फत सरकार जनतेपर्यंत जावून त्यांच्या  रोजच्या जीवनात फरक पडेल असे काम केले जाईल अशी ग्वाही श्री. निलंगेकर यांनी  दिली.
 याप्रसंगी पालकमंत्री गिरीश बापट म्हणाले की, महिलांमध्ये कष्ट करण्याची तयारी,इच्छाशक्ती असते. महिलांचे सबलीकरण, कौशल्यांचा विकास करण्यासाठी केंद्र राज्य शासनाने विशेष लक्ष दिले असल्याचे प्रतिपादन केले. महिलांमध्ये जागृती संघटन करुन चांगला उपक्रम राबविण्या बद्दल संयोजकांचे कौतुक केले.
यावेळी मुख्यमंत्री कार्यालयाचे विशेष कार्य अधिकारी श्रीकांत भारतीय म्हणाले की, कौशल्य विकास अभियान हे गरिबांच्या आत्मविश्वासासाठी आहे. पंतप्रधान नरेंद मोदी यांनी कौशल्य विकासाची संकल्पना मांडली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, कौशल्य विकास मंत्री श्री. निलंगेकर यांनी ही संकल्पना सक्षमपणे पुढे नेल्याची भूमिका घेतली असल्याचे प्रतिपादन केले.
याप्रसंगी आमदार श्रीमती मेधा कुलकर्णी, ॲड. माधवी नाईक, उद्योजक प्रसाद लाड यांची समयोचित भाषणे झाली.
सदर कार्यक्रमात महिला बचत गटांच्या वेगाने उत्कृष्ट कार्य केलेल्या मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तसेच स्त्री सबलीकरणासाठीच्या मानचिन्हाचेही अनावरण करण्यात आले.

00000000

No comments:

Post a Comment