Friday, September 2, 2016

आदिवासी विकासमंत्री विष्णु सावरा यांच्या उपस्थितीत आढावा बैठक संपन्न


            पुणे, दि. 02 – आदिवासी विकास विभागातर्फे राज्यातील आदिवासी विद्यार्थ्यांना विविध वस्तू पुरविण्यात येतात. या वस्तूंचा पुरवठा विद्यार्थ्यांना आदिवासी विकास विभागातील अधिकाऱ्यांना वेळेत करावा, त्यासाठी नियोजन करावे अशा सूचना आदिवासी विकास मंत्री विष्णु सावरा यांनी अधिकाऱ्यांना केल्या.
            आदिवासी विकास विभागाचे अप्पर आयुक्त व प्रकल्प अधिकारी यांची दोन दिवसीय आढावा बैठक यशदा येथे आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत आदिवासी विभागातर्फे राबविण्यात येणाऱ्या योजनांचा आढावा आदिवासी विकास मंत्री विष्णु सावरा यांनी घेतला. अधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना त्यांनी, आदिवासी विद्यार्थ्यांना हिवाळयापूर्वी स्वेटर उपलब्ध करुन द्यावे असे सांगितले. विद्यार्थ्यांना शालेय साहित्य, शाळांना फर्निचरचा पुरवठा तातडीने करण्याच्या सूचना केल्या.
            आदिवासी विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या डॉ..पी.जे.अब्दूल कलाम अमृत आहार योजनेचा आढावाही या बैठकीत घेण्यात आला.
            बैठकीला आदिवासी विकास विभागाचे सचिव राजगोपाल देवरा, आदिवासी विकास आयुक्त राजू जाधव, सुभाष साळूंके, राज्यातील आदिवासी विकास विभागाचे अप्पर आयुक्त, प्रकल्प अधिकारी उपस्थित होते.
000


            

No comments:

Post a Comment