Saturday, September 3, 2016

गणेश चतुर्थी निमित्त मद्य व ताडी विक्री बंदी­­­­­­­


सोलापूर दि.03 : - मुंबई मद्य निषेध अधिनियम 1949 मधील कलम 142 अन्वये जिल्हाधिकारी रणजीतकुमार यांनी कायदा व सुव्यवस्था अबाधीत राहण्यासाठी गणेश चतुर्थी व अनंत चतुदर्शी  निमित्त सोलापूर जिल्हयातील, या दिवशी सर्व देशी / विदेशी मद्य व ताडी विक्री अनुज्ञप्तीचे व्यवहार बंद ठेवण्याचे आदेश पारित केले आहेत. या आदेशानुसार  दि. 05 सप्टेंबर रोजी तर  दि. 15 सप्टेंबर 2016 रोजी  अनंत चतुदर्शी जिल्हयातील सर्व   दुकाने पूर्ण दिवसभरासाठी  बंद राहतील.
याशिवाय फक्त्‍ अक्कलकोट शहरातील गणपती विसर्जनाची मिरवणूक 15 सप्टेंबर रोजी समाप्त न झाल्यास दि. 16 सप्टेंबर रोजी अक्कलकोट शहरातील सर्व  देशी / विदेशी मद्य व ताडी विक्रीस बंदी घालण्यात आली आहे. या आदेशाचे उल्लंघन करणा-या विरुध्द कडक कारवाई करण्यात येईल असा इशारा जिल्हाधिका-यांनी दिला आहे.

                                    0000 

No comments:

Post a Comment